कापुराची माया

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 4 August, 2020 - 10:58

कापुराची माया
************
कापुराची माया
आगीला कळावी
समरस व्हावी
मिठी मग ॥

तैसी घडो भेटी
देवा तुझी माझी
हौस नसण्याची
पुरवावी ॥

मिठाची बाहुली
भेटावी सागरा
भेदाचा पसारा
नुरुनिया ॥

तैसे घडो काही
जिवलगा नेई
आणुनिया पाही
प्राण डोळा ॥

सरो देह भाव
जळो मन राव
निरंजनी ठाव
देई मज ॥

विक्रांत दत्ताचा
दास हा जन्माचा
तयाचा प्रेमाचा
ध्यास धरी ॥
*******
डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिठाची बाहुली
भेटावी सागरा
भेदाचा पसारा
नुरुनिया >>> व्वा !! तुम्ही आणि पुरंदरे सर, दोघांनाही जन्मतः सरस्वतीचा वरदहस्त लाभलेला आहे.

सरो देह भाव
जळो मन राव
निरंजनी ठाव
देई मज ॥ >>>> हे खर्‍या भक्ताचे मागणे....

____/\____