दोन दिवस गोड मोदक खाऊन घसा खवखवला असेल तर हा घ्या..तिखट, झणझणीत, रसरशीत असा मोदक रस्सा.
सारणासाठी लागणारे साहित्य -
१ वाटी चिरलेला कांदा, १ वाटी किसलेलं सुकं खोबरं, २ चमचे तीळ, १ चमचा खसखस, ५-६ पाकळ्या लसूण, मीठ, गरम मसाला पावडर १/२ चमचा, थोडीशी कोथिंबीर
पारीते साहित्य -
१ चणाडाळीचे पीठ, पाव वाटी गव्हाचे पीठ, मीठ, तेल, हळद, लाल तिखट
रस्स्यासाठीचे (काही जणं हे ‘रस्त्यासाठीचे’ असेही वाचतील :)) साहित्य -
जीरे, अर्धा वाटी चिरलेला कांदा, पाव वाटी किसलेलं सुकं खोबरं, २ चमचे डाळे, २ पळ्या तेल, २ मोठे चमचे लाल तिखट , १ मोठा चमचा मालवणी मसाला/काळा मसाला, कोथिंबीर
पटापट कृतीकडे पळूयात -
रेसिपी अगदी सोप्पीए ओ.. मोदक म्हंटलं की सासू आणि आई उगाचच बाऊ करतात असं वाटतं..
ही रेसिपी पूर्वी ह्या दोघींनाही शिकवून झाली आहे, त्यामुळे आता जगात कोणालाही शिकऊ शकेन इतका आत्मविश्वास वाढला आहे..
यापूर्वी जर तुमच्याकडे कोणीही असा ‘तिखट रस्सा मोदक’ खाल्ला नसेल तर बिंधास्त किचनच्या रणांगणात उतरा आणि मसाल्याचा धुराळा उडवायला सज्ज व्हा..
सर्वप्रथम पेटत्या शेगडीवर कढई ठेऊन चमचाभर तेलात चिरलेला कांदा, किसलेलं खोबर, तीळ, खसखस, लसूण हे सगळं एकत्र न भाजचा, एका वेळेस एक या पद्धतीने खरपूस भाजून घ्यायचं. त्यानंतर भाजलेलं जिन्नस, मीठ, गरम मसाला, कोथिंबीर पाणी न घालता मिक्सरला फिरवायचं. सारण तयार.
पारीसाठीचे साहित्य एकत्र करून थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यावं. लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून पारी लाटून त्यात सारण भरून मोदकाचा आकार द्यावा. हा मोदक बनवणं उकडीच्या मोदकापेक्षा २१ पटीने सोप्पा आहे यांत मुळीच शंका नाही पण तरीही आकार न जमल्यास चिंता नसावी.. पूर्वी अशा मोदकाला पूर्णपणे रस्स्यात बुडवून लपवण्याची कामगिरी फत्ते केलेली आहे.
आता रस्स्यासाठी थोड्या तेलात कांदा, खोबरं,डाळे खरपूस भाजून घ्या. मिक्सर मधे बारीकसर वाटून घ्या आणि कढईत तेल ओतून त्यात छान परतून घ्या.. लाल तिखट, मसाला पावडर घालून तेल सुटेपर्यंत हलवा ..गरम पाणी ओतून मीठ घालून एक उकळी काढा..त्यानंतर रस्स्यात मोदक सोडून झाकण ठेऊन १५ मि. शिजू द्या.. रस्स्यातले मोदक थुईथुई नाचू लागले की पेटलेली शेगडी बंद करा..शेवटी कोशिंबीर घालून सजवा.
महत्वाचा सल्ला - पूर्वी असाच अफलातून ‘रस्सा मोदक’ आई आणि सासूला खाऊ घातल्याची आठवण झाली.. माझ्या आईकडे कौतुकाची कायमच टंचाई म्हणून तिच्याकडे नेहमी प्रमाणे दुर्लक्ष फेकत आपली नजर सासूकडे वळवली होती.. सासूने मस्त चपातीचा घास रस्स्यात मुरगळत, मोदकाचा लचका तोडत तोंडात गडप केला.. तीच्या चेहऱ्यावरचे तृप्त भाव तिखट मोदक आवडल्याची साक्ष देत होते.. तोंडातला घास संपताच आनंदाच्या भरात एखाद्या नवाबाप्रमाणे आपल्या गळ्यातील दोन पदरी सोन्याची माळ काढून माझ्याकडे भिरकावण्यासाठी वळलेले हात बघून माझ्या मनातले मोदक थुईथुई नाचू लागले.. पण तितक्यात “रस्स्यात मीठ थोडं कमी आहे” म्हणत माशी शिंकावी तशी आयशी शिंकली.. सासूनेही लगेचच गळ्याजवळचा हात मीठाच्या बरणीकडे वळवत कधी नव्हे ते आईच्या ‘हो’ ला ‘हो’ दिला.. म्हणून मीठाकडे खास लक्ष द्यावे.
सकाळी ॲलेक्सावर अरूण दाते यांच्या आवाजातलं “दिवस तुझे हे फुलायचे“ गाणं ऐकत ऐकत तिखट मोदकाचा घाट घातला.. मग तेव्हाच थोडंसं विडंबन सुचलं आणि दिवसभर तेच विडंबन ऐकवून नवरोबाला छळलं..आता थोडंसं माबोकरांनाही छळायची इच्छा झाली आहे
(चालीत म्हणा)
दिवस आले हे खादाडीचे
तिखट मोदक हादडायचे
कांदा थोडा चिरून घेणे
खोबरं पण किसून ठेवणे
कढईत ह्याला परतायचे
पाट्यावर ठेऊन वाटायचे
बेसण घ्या घट्ट मळून
पारी पण घ्यावी जरा लाटून
अलगद सारण भरायचे
कळ्यांचे मोदक बनवाऽऽयचे
तिखट झणझणीत सार
सोसेना मोदकाचा भार
चमच्याने चाटून बघायचे
झाकण ठेऊन उकळायचे
माझ्या ह्या ताटाच्यापाशी
थांबते मी पण जराशी
फोटो जरा टिपून काढायचे
तिखट मोदक हादडायचे
दिवस आले हे खादाडीचे
तिखट मोदक हादडायचे
————————-
सर्वांना गणेश चतुर्थीच्या मोदका सारख्या झणझणीत आणि रश्श्यासारख्या रसरशीत शुभेच्छा.
छानच, झणझणीत दिसतायेत, अगदी
छानच, झणझणीत दिसतायेत, अगदी तोपासू
मी काय म्हणते, रेसिपी पण लिहून टाकाकी
धन्यवाद VB.. ”रेसिपी ओर अन्य
धन्यवाद VB.. ”रेसिपी और अन्य कहानीयां” मी वेगळ्या धाग्यावर टाकायचा विचार करतेय
मोदक किती सुबक झालेत!
मोदक किती सुबक झालेत!
आणि रस्सा ही फक्कड!
विडंबन अगदी अल्टिमेटच !!
विडंबन अगदी अल्टिमेटच !!
रस्सा पण मस्त.
मोदक विडंबन दोन्ही खास
मोदक, विडंबन दोन्ही खास
मस्त दिसतायत मोदक
मस्त दिसतायत मोदक
छान स्टेप बाय स्टेप रेसिपी लिहून टाका म्हणजे आम्ही पण प्रयत्न करू
मस्त तिखट तिखट
मस्त तिखट तिखट
हाहाहा. फोटो व विडंबन दोन्ही
हाहाहा. फोटो व विडंबन दोन्ही आवडले. कळ्या मस्त आल्यात.
मस्त रेसिपी. स्पर्धेच्या
मस्त रेसिपी. स्पर्धेच्या नियमांप्रमाणे रेसिपी इथेच लिहायची आहे बहुतेक
फोटो व विडंबन दोन्ही आवडले.
फोटो व विडंबन दोन्ही आवडले. (आयते मिळाले तर खायलाही आवडतील :D)
तोंडाला पाणी सुटला फोटो पाहून
तोंडाला पाणी सुटला फोटो पाहून
खतरनाक !
खतरनाक !
तुमची मोदक बनवायची शैलीही अगदी डिट्टो माझ्यासारखी आहे
मस्तच
मस्तच
वेगळा प्रकार.मस्त
वेगळा प्रकार.मस्त
वा!
वा!
फोटो आणी विडबन छान जमलय!
फोटो आणी विडबन छान जमलय!
फोटो व विडंबन दोन्ही मस्तच .
फोटो व विडंबन दोन्ही मस्तच . गोड खाऊन कंटाळा आला आहे . असं झणझणीत काही तरी खायची इच्छा होते आहे .
म्हाळसादेवी तुम्ही महान आहात.
म्हाळसादेवी तुम्ही महान आहात.
खुप छान रेसिपी व विडंबन..
खुप छान रेसिपी व विडंबन.. नाविन्यपुर्ण.
मस्त आहे .
मस्त आहे .
मोदक छान आणि विडंबन त्याहून
मोदक छान आणि विडंबन त्याहून छान!
खूप छान!!!
खूप छान!!!
तिखट रस्सा मोदक तोपासू.
तिखट रस्सा मोदक तोपासू.
मस्त मोदक. रेसिपी लिहा लवकर
मस्त मोदक. रेसिपी लिहा लवकर म्हणजे गणपती घरी असतानाच ट्राय करता येईल.
उत्तम पदार्थ.
उत्तम पदार्थ.
रेसिपी नको. कारण ते गट्टे का साग विद ट्विस्ट( पाकळ्या) आहे हे लक्षात येतंय.
एकदम झणझणीत पाकृ! फोटो व
एकदम झणझणीत पाकृ! फोटो व विडंबन आवडलं.
फोटो पाहून तोंपासू झाले एकदमच
फोटो पाहून तोंपासू झाले एकदमच. रेसिपी द्या ओ.
Superb..... फोटो बघूनच मन
Superb..... फोटो बघूनच मन भरले. माझ्यासाठी ही अवार्ड विनिंग रेसिपी आहे.
रेसिपी नको. कारण ते गट्टे का साग विद ट्विस्ट( पाकळ्या) आहे हे लक्षात येतंय.....>>>
हाहा... प्रांतोप्रांती गट्टे का साग बनवायची पद्धत बदलते.. राजस्थानात दह्याची ग्रेव्ही करतात, मराठी लोक खोबऱ्याचे वाटण घालतात.
सारण कसले केलेय??
भारी दिसताहेत मोदक.
भारी दिसताहेत मोदक. पहिल्यांदाच असे तिखट मोदक पाहिले.
कविता लैच भारी हे सांगायचे
कविता लैच भारी हे सांगायचे राहिले.
तेवढे सारणावर पण एक कडवे येऊ द्या, म्हणजे साठा उत्तराची रेसिपी सुफळ संपूर्ण झाली.
Pages