1. चिंच ( छोट्या लिंबाएवढी)
2. २ टोमॅटो
3. १/४ छोटा चमचा मेथी दाणे
4. कडीपत्ता
5. २ लाल सुक्या मिरच्या
6. 12-15 लसूण पाकळ्या(ठेचून)
7. मोहरी
8. हळद
9. हिंग
10. अर्धा छोटा चमचा काळी मीरे पावडर
11. अर्धा छोटा चमचा जिरं पावडर
12.कोथिंबीर.
13.तेल
14.मीठ
प्रत्येकाची रस्सम पद्धत वेगळी असू शकते.
माझी पद्धत माझ्या माहेरी हिट आणि सासरी सुपरहिट आहे.
●पातेल्यात पाऊण ग्लास पाणी ,दोन टोमॅटो फोडी करून, चिंच आणि मेथी दाणे टाकून दहा मिनिटे उकळून घ्या.
●हे मिश्रण व्यवस्थित गाळून घ्या.
●पातेले गैस स्टोव्हवर ठेवून गैस चालू करा.
●पातेल्यात अर्धा छोटा चमचा तेल टाका.
●तेल तापल्यावर मोहरी, ठेचलेला लसूण, कडीपत्ता, हळद,हिंग,सुक्या मिरच्या, जिरे पावडर,पेप्पर पावडर टाका.
●लगेच वर गाळलेले चिंच टोमॅटो चे पाणी टाका.
●हवे तितके पाणी टाका.
●मिठ आणि कोथिंबीर टाका.
●एक उकळी आली की गैस बंद करा.
टैंगी,स्पायसी रस्सम तयार.
गरमागरम भातात, चमचाभर तूप, एखादे पोरीयल(सूकी भाजी).
लंच तयार.
ज्यांना गोड आवडते त्यांच्या साठी:-
जिरे पावडर, मिरे पावडर स्किप करा. जिरे फोडणीत टाका आणि जराशी साखर टाका. बाकी क्रुती सेम. टोमॅटो रस्सम तयार.
ज्यांना आवडत असेल त्यांनी चमचाभर शिजवलेली तुर डाळ टाकावी अजून एक रस्सम प्रकार तयार.
वरील रेसिपीचा फोटो-पेप्पर
वरील रेसिपीचा फोटो-पेप्पर रस्सम
मस्त!! किती तरी दिवस झाले
मस्त!! किती तरी दिवस झाले रस्सम् पिऊन. करून बघते आता हे.
रस्सम माझे पण आवडते,
रस्सम माझे पण आवडते,
एकदम सोप्पी वाटतेय. करून
एकदम सोप्पी वाटतेय. करून बघावी लागेल.
मस्त दिसतंय नक्की करून बघणार
मस्त दिसतंय
नक्की करून बघणार
खूपच छान, खिचडी सोबत आवडते.
खूपच छान, खिचडी सोबत आवडते. एकदा वेल्लोर वरून कुणी मसाला आणला होता फारच अप्रतिम व्हायचे ते रसम. आता असे करून बघते. हिवाळ्यात फारच छान वाटते सूप सारखे प्यायला.
छान
छान
वाह
वाह
चांगलं दिसतं आहे हे व्हर्शन.
चांगलं दिसतं आहे हे व्हर्शन. करून पाहायला हवं बिनाडाळीचं.
आपल्या त्या ह्यांची एक रेस्पी आहे हिथे.
पेपर रस्सम (मिळाग रस्सम)
आत्ता लगोलग रेस्पी करणेत येईल
आत्ता लगोलग रेस्पी करणेत येईल. टॉमेटोच्या फोडी जितक्या बारीक तेवढेच सोयीचे असेल ना?
मस्तच. चिंच शिजवून केलं
मस्तच. चिंच शिजवून केलं नाहीये. करून पाहणार.
सोपी आहे ही पाकृ.
सोपी आहे ही पाकृ.
पुढच्या खिचडीच्या वेळी करण्यात येईल.
हिवाळ्यात फारच छान वाटते सूप
हिवाळ्यात फारच छान वाटते सूप सारखे प्यायला.
हो अस्मिता, ईथे होसुर मधे नेहमी थंड हवामान असते. मस्त वाटतं प्यायला. वरणभात खाणारी मी, रस्सम भात तितकासा आवडत नाही.
टॉमेटोच्या फोडी जितक्या बारीक
टॉमेटोच्या फोडी जितक्या बारीक तेवढेच सोयीचे असेल ना?
हो फिल्मी,लवकर शिजतात आणि टोमॅटोचा सगळा गर व्यवस्थित गाळता येतो.
योकु, आपण लिंक दिलेल्या
योकु, आपण लिंक दिलेल्या रेसिपीतील टिप्स अगदी योग्य आहेत.
फोडणी घातल्यावर रस्सम उकळू नका.
सर्दी असेल तर पेप्पर रस्सम ने घशाला मस्त आराम मिळतो.
मी हि असेच करते पेपर रस्सम .
मी हि असेच करते पेपर रस्सम ..नेहमीप्रमाणे माझा शॉर्टकट..टोमॅटो फोडी ऐवजी, टोमॅटो पेस्ट टाकते..आणि गाळत नाही....गरम गरम प्यायला मस्त लागते.. साऊथ इंडियन टोमॅटो सूप..
अरे वा.. आजच रस्सम बनवलं आणि
अरे वा.. आजच रस्सम बनवलं आणि हा धागा बघितला. (माझी पद्धत जरा जरा वेगळी आहे)
यम् दिसतंय रस्सम मनिम्याऊ.
यम् दिसतंय रस्सम मनिम्याऊ.
प्रतिसाद दिल्याबद्दल
प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार.
मस्त रेसिपी आहे. करून बघेन
मस्त रेसिपी आहे. करून बघेन
भाताबरोबर रस्सम पांचट लागत नाही का?
मला तरी रस्सम प्यायला आवडते.
मला तरी रस्सम प्यायला आवडते.
पण दक्षिणेकडची लोकं मस्त आणि मस्ट रस्सम राईस खातात.
माझ्या मुलांना आणि नवर्याला आवडते भातासोबत. एरवी माझी अडीच वर्षाची मुलगी तासभर लावते जेवायला.रस्सम राईस असेल तर १५ मिनटात संपवते.
अरे वाह. छानचं पाकृ, फोटो
अरे वाह. छानचं पाकृ, फोटो मस्त आहे!
चिंचं आणि टोमॉटो शिजल्यावर गाळन्यापुरी कुस्कुरून घ्यायचे का? Mash करायचे का?
हो mash करून टोमॅटो, चिंचेचा
हो mash करून टोमॅटो, चिंचेचा सगळा गर काढून घ्यायचा.
फक्त चोथा उरला पाहिजे.
व्वा छान चविष्ट रस्सम पाकृ.
व्वा छान चविष्ट रस्सम पाकृ. डाळ भाताचा कंटाळा आलाय. आज रस्सम भात.
धन्यवाद किशोरजी.
धन्यवाद किशोरजी.
Webmaster
Webmaster
हा फोटो टाकता येईल का मुख्य चित्र म्हणून..
एकदा आप्पे आणि हे रसम केलं
एकदा आप्पे आणि हे रसम केलं होतं.
सर्वाना आवडलं.
लै भारी.
लै भारी.
माझ्या मुलीला जाम आवडते. पण आम्हाला नुसतं प्यायला आवडतं सुप सारखं.
थँक्स mi_anu.
थँक्स mi_anu.
थँक्स जेम्स बॉन्ड.
आमच्याकडे हा पदार्थ फक्त
आमच्याकडे हा पदार्थ फक्त नवराच आवडीने आणि चवीने खाणार. मग त्याला ती रसम पावडर विकत घेऊन देतो
कष्टइवगैरे नको आम्हाला.
मस्त फोटो.
Pages