मी त्यांना पाहिले..... नव्हे नव्हे मी बोललो सुध्दा

Submitted by नितीनचंद्र on 12 August, 2020 - 03:25

४-५ वर्षांपुर्वी चिंचवडच्या चाफेकर चौकात दहीहंडीच्या दिवशी एक मोठा प्रश्न चिन्ह असलेला बॅनर होता. आजच्या दहीहंडीच्या कार्येक्रमाला कोण मोठा कलाकार येणार आणि त्या खाली मोठे प्रश्न चिन्ह. सोबत रात्री आठ वाजता चौकात या. आणि स्वतः पहा असे ही लिहले होते.

मला एका सौदर्य प्रसाधनाच्या जाहिरातीची आठवण झाली. सकाळ मधे पानभर जाहीरात होती. भारतात प्रथमच आपल्या सौदर्याला आणखी खुलवण्यासाठी येत आहे. उद्याचा पेपर पहा. यात सगळी माहिती असेल वगरे वगरे... उत्कंठा वाढवण्यासाठी आणि लॉन्चींगला इंपॅक्ट मिळवण्यासाठीचे तंत्र होते.

पण एक सिने कलाकार किंवा मराठी सिरीयल कलाकार येताना ही जाहीरात ? कोण असेल बर मी विचार करत होतो. तेंव्हा सैराट आलेला नव्हता. होणार सुन मधली तेजश्री किंवा तो शशांक केतकर जरा जास्त फेमस झाले होते. मी विचार करत घरी गेलो आणि रात्री ८ वाजता पुन्हा आलो.

थोड्याच वेळात एक महान कलाकार आपल्या समोर येतील अशी दवंडी ऐकू येत होती. पहाता पहाता चिंचवडचा तो चौक भरला. महान कलाकार आता आपल्या समोर येतील अशी बराच वेळ घोषणा झाल्यावर पहातो तो काय साक्षात अमिताभ बच्चन चिंचवडच्या चौकात स्टेजवर अवतिर्ण झाले.

माझा माझ्या डोळ्यावर विश्वास बसेना. एका दही हंडीच्या कार्येक्रमाला स्वतः अमिताभ ? काय सांगावे ? मावळात एका सामान्य माणसाच्या लग्नाला सचिन तेंडुलकर उपस्थित होते कारण तो त्यांच्या फार्म हाऊसचा केअर टेकर आहे.

संघवी केशरी महाविद्यालय चिंचवड येथे प्रशांत दामले याने शिक्षण घेतले आहे. यामुळे प्रशांत दामले यांचा फोननंबर माझ्या मित्राकडे आहे. ते दोघे मैत्री संभाळून आहेत. मुक्ता बर्वेचा जन्म ही चिंचवडचा असू शकेल. त्यांचे लहानपण आणि बरेचसे शिक्षण चिंचवडला झाले कारण त्यांच्या आई मला वर्गशिक्षीका होत्या. यांच्या पैकी जुन्या मैत्रीला जागुन अनेक कलाकार चिंचवडला येतात. पण स्वतः अमिताभ ?

अमिताभ बच्चन यांनी आपल्या फेमस चित्रपटातले संवाद म्हणले. त्यांच्या पेक्षा उंचीने, सामाजीक उंचीने खुज्या कार्यकर्त्यांसमवेत फोटो काढले आणि अमिताभ बच्चन स्टेजवरुन गेले.

मला खुप आनंद झाला. या जन्मी तरी सिनेमाचा पडदा किंवा आता केबीसी सोडता आपल्याला अमिताभ यांना प्रत्यक्ष पहाणे शक्य नव्हते. माझ्या मनीची भावना आजी मी ब्रह्म पाहीले किंवा मला ते दत्त गुरु दिसले अशी होती. मी ज्याला त्याला सांगत होतो मी आणि माझ्या बरोबर पाच सहा हजार लोकांनी अमिताभ यांना पाहिले.

दुसर्या दिवशी मी माझ्या मावस बहिणीकडे गेलो. तिला हे सगळे रसभरीत वर्णन करुन सांगीतले. ती म्हणाली नितीन पण येवढे सगळे होऊन तुला त्यांच्याशी बोलता आले नसेल ना ? मी म्हणल कस शक्य आहे ? मी त्या मंडळाचा कार्यकर्ता नाही. मला कोण त्यांच्या जवळ जाऊ देणार होत ?

चल तु आज अमिताभ सरांशी बोलच अस म्हणत म्हणत तिने एक फोननंबर मोबाईलवर लावला. फोन सुरु होताच नमस्ते अमिताभ सर, म्हणून सुरवात केली कल आप चिंचवड गये थे ना ? असा प्रश्न तिने विचारला . समोरुन आवाज ऐकू येत नव्हता. मला वाटल माझी मावस बहीण माझी खेचते आहे. कल का आपका प्रोग्रम बढीया हुवा ये मेरा भाई बता रहा है . उसे बडा दु:ख है की वो आपके नजदीक नही आ सका. आपसे बात नही कर सका. क्या आप उससे बात करेंगे ? बहुदा अमिताभ यांनी माझे नाव विचारले. बहिणीने माझे नाव सांगुन फोन माझ्या हातात दिला.

हा दुसरा धक्का होता. कैसे हे नितीनजी ? तोच आवाज. मी तर उडालोच होतो. कस बस स्वतःला सावरत मी म्हणालो. मै ठीक हू लेकीन मुझे विश्वास नही हो रहा है की स्वयं अमिताभजी मुझसे बात कर रहे है . मग त्यांनी त्या फेमस कार्यकर्त्याचे नाव सांगीतले ज्याने कालचा कार्येक्रम अरेंज केला होता.

पुढील काही मिनीटे मी फक्त अमिताभ बच्चन यांचा आवाज कानात साठवत होतो.अमिताभ म्हणाले नितीनजी आपकी फार्मईश बोलीये . मेरी कौनसी फेमस डायलॉग आप सुनना पसंत करेंगे. मला काही सुचत नव्हते. मी सुचवले शराबी मधला नौ लाख के हार के लिए बारा लाख का नुकसान अमिताभजींनी तो डायलॉग सही सही ऐकवला आणि म्हणाले. कभी मिलेंगे जरुर मेरा नाम शशिकांत पेडवाल आहे. मी पुण्यालाच रहातो. माधुरी ( माझी मावसबहीण ) ज्या कार्येक्रमाचे अ‍ॅकरिंग करते त्यात मी मिमीक्री आर्टीस्ट आहे. मीच काल चिंचवडला आलो होतो......

नर्व्हस व्हावे असे काहीच नव्हते. खरे अमिताभ भेटतील आणि बोलतील ही शक्यता नव्हतीच, आताही नाही पण काही क्षण शशीकांत पेडवाल यांच्या मुळे आनंदात गेले. हे सुध्दा काही कमी नाही.

http://www.thestorypedia.com/viral/lets-meet-amitabh-bachhans-duplicate-...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Happy

छान. Happy बर्वे बाई मराठी शिकवत. पोरं फारच त्रास द्यायची त्यांना Happy दामले चिंचवडला राहायला पण होते थोडे दिवस, पटवर्धन म्हणून त्यांची बहीण होती एक गोखले पार्क मध्ये रहायला.

@लंपन , या शिवाय किरण यजोपवित माझ्याच गल्लीत चिंचवडला रहात होता. कट्यार काळजात घुसली हे नाटक खासाहेबांच्या भुमिकेत चिंचवडच्या दोन कलाकारांनी ( दोघेही कै वसंतराव देशपांडे यांचे शिष्य ) सादर केले. एक कै पद्माकर कुलकर्णी दुसरे डॉ रविंद्र घांगुर्डे - अरे हो सावनी रविंद्र डॉ रविंद्र घांगुर्डे यांची कन्या ..... चिंचवडला सांगीतीक आणि साहीत्य विषयक मोठा वारसा आहे.

हो नक्कीच नितीनजी. पद्माकर कुलकर्णींच्या मिसेस माझ्या 10वीच्या वर्गशिक्षिका. फक्त मुलांची शाळा पण ह्या कुलकर्णी बाई टेरर. अशी काही मुस्काटात द्यायच्या की बास आणि ती खाताना मध्ये हात नाही घालायचा. मध्ये हात घातला की अजून 2 गणपती कानाखाली Happy किरणची बहीण स्वाती वाड्यात देव बाईंकडे यायची क्लासला संस्कृतच्या. आम्ही एक परीक्षा एकत्र दिली आहे वेदशास्त्रोकतेजक सभेची, ती वयाने मोठी असल्याने तिच्यावर मला परीक्षेला नेणे आणि परत आणणे अशी जबाबदारी होती Happy देव वाड्यात अजूनही दर चतुर्थीला रात्री शास्त्रीय संगीताची मैफल असते.

मस्त Lol

मिमिक्री आर्टिस्टचा आवाज अमिताभच्या आवाजाशी मिळताजुळता असेल हे शक्य आहेच पण दिसणंही? म्हणजे प्रत्यक्ष आल्यावर कुणीही ओळखू शकलं नाही की हा खरा अमिताभ नाही?

पण दिसणंही? म्हणजे प्रत्यक्ष आल्यावर कुणीही ओळखू शकलं नाही की हा खरा अमिताभ नाही?

>>>>

अमिताभ देव आहे
लोकं थक्क होतात त्याला समोर बघून
डोळे दिपतात त्यांचे
डोकं चालायचे बंद होते
सहज शक्य आहे कोणीही फसणे...

त्यांना अंधभक्त म्हणतात. त्या घोळक्यात सगळेच अंधभक्तीच्या आहारी गेलेले नसावेत.
>>>>

भक्त म्हणने पुरेसे असते
ते अंधच असतात
जगात फार कमी लोकं आहेत जे कोणाचे भक्त नसतात.
कोणी कलावंतांचा भक्त असतो कोणी खेळाडूंचा भक्त असतो
कोणी राजकीय नेत्यांचा भक्त असतो तर कोणी प्रियजनांचा भक्त असतो.
कुठल्या ना कुठल्या देवाच्या भक्तांची तर वेगळीच लिस्ट बनेल.

भक्त कसा जाणावा यासाठी मी एक धागा काढला आहे. तिथे एकही भक्त फिरकला नाहीये Happy

ऋन्मेऽऽष प्रत्येकाचा एक कल्ट असतो. भक्त भक्त म्हणून सर्वांना हिणवणार्यांचा सुध्दा कल्टच असतो