नमस्कार मायबोलीकर,
यावर्षीचा आपला मायबोलीचा बाप्पा २१ वा! आणि २१ म्हंटले की बाप्पाचे आवडते २१ मोदक आलेच. म्हणूनच यावर्षी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मोदक बनवण्याची स्पर्धा. गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी सर्वच घरात मोदक बनवले जातात. त्या बनवलेल्या मोदकांचाच छान सजवून आणि फोटो काढून तुम्ही पाठवायचा आहे.
यात फक्त उकडीचेच नाही तर सर्व प्रकारच्या मोदकांचा समावेश होईल.. खवा, सुका मेवा, fusion, पारंपारिक उकडीचे मोदक, तळणीचे मोदक इ. तसेच मोदकांशी साम्य असलेले व्हेज मोमोज ही चालतील.
नियम-
१) मोदक स्वतः बनवायचे आहेत. बाहेरून विकत आणलेल्या मोदकांची प्रवेशिका आढळून आल्यास बाद ठरवण्यात येईल.
२) पाककृती स्वतः तयार केलेली असावी.
३) पाककृती मध्ये वापरण्यात येणारे पदार्थ शाकाहारी असावेत.
४) मिठाई, खवा इ. मोदक बनवताना अत्यंत आवश्यकता असेल तरच साचा वापरावा. उकडीचे मोदक बनवताना साच्याचा वापर करू नये.
५) स्पर्धेच्या प्रवेशिका २२ ऑगस्ट २०२० पासून तुम्ही पाठवू शकता. (IST)
६) एक id प्रत्येकी २ प्रवेशिका देऊ शकेल.
७) स्पर्धा महिला आणि पुरुष दोन्ही गटांसाठी खुली आहे.
८) पाककृतींचे step by step किमान २-३ प्रकाशचित्रे देणे बंधनकारक आहे.
प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे बघता येईल. - https://www.maayboli.com/node/1556
९) प्रवेशिकेचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे -
"पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे - {तुमचा आयडी}"
१०) स्पर्धेचे विजेते मतदानाद्वारे निवडण्यात येतील आणि 2 क्रिटिक अवॉर्ड असतील.
तुमच्या काहीही शंका, प्रश्न, सूचना असल्यास येथे जरूर विचारा.
!!! गणपती बाप्पा मोरया !!!
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
स्पर्धांच्या पूर्वतयारीला पुरेसा वाव मिळावा म्हणून स्पर्धा व नियम जाहीर करत आहोत. प्रवेशिका पाठवण्यासाठी गणपती प्रतिष्ठापनेनंतर धागे उघडले जातील.
विजेते मोदकांचा सुबकपणा, त्यांच्या कळ्या इ. निकषांवरून पोल घेऊन ठरवण्यात येतील.
4) पाककृती स्व:त तयार केलेली
4) पाककृती स्व:त (स्वत:) तयार केलेली असावी आणि पूर्वप्रकाशित नसावी >>> हे कसे शक्य असेल ? अनेकजण विविध ठिकाणी वाचलेल्या आणि घरी आजमावलेल्या रेसेपी वापरून करतील की प्रत्येक सहभागी सदस्याची रेसीपी ही पुर्णतः नवीन असेल ( पूर्व प्रकाशित नसेल )
अनंतनी धन्यवाद आवश्यक ती
अनंतनी धन्यवाद आवश्यक ती दुरुस्ती केली आहे.
अरे वा! छान स्पर्धा.
अरे वा! छान स्पर्धा.
हाही धागा सगळ्यात वरती दिसत राहिला तर जास्त सदस्यांच्या नजरेस पडेल.
वा...मला मोदक बघायला खूप
वा...मला मोदक बघायला खूप आवडतात. धागा वरती ठेवा म्हणजे सतत पाहिला जाईल.
शीर्षकात जो १ आकडा आहे तो
संपादित
मोदक पाकृ येणार.. मज्जा
मस्त आहे स्पर्धा
मस्त आहे स्पर्धा
गोडच हवे की तिखट चालेल?
मस्त स्पर्धा आहे ही. इतके
मस्त स्पर्धा आहे ही. इतके वर्ष गणपती बसवतोय पण मोदकाची स्पर्धा घ्यायच कुणाच्याच लक्षात आल नव्हत.
बॅक टु बेसिक्स.
ये हुई ना बात!
ये हुई ना बात!
गणपती आणि मोदक बराबर है!
नायतर दरवर्षी किचकट पाकृ असायच्या. ह्याच्यात ते त्याच्यात ते हवं. ते तेच पण त्याला त्विस्ट वैगेरे.
मोदक म्हणजे कसं सहज सुंदर काम. (माझी ते पण जमताना मारामार आहे ते सोडा.)
पण सुगरणींनी बनवलेल्या सुंदर मोदकांचे सुंदर फोटो बघणार.
मनीमोहोर, मंजुताई, हह, टिपापाच्या सुगरणी आणि बाकीही आहेतच.
शुभेच्छा!
गोड, तिखट, तुम्ही प्रयोग करून
गोड, तिखट, तुम्ही प्रयोग करून बनवलेले असे कोणत्याही प्रकारचे शाकाहारी मोदक चालतील.
मस्त साधि सोपी आयडिया आहे!
मस्त साधि सोपी आयडिया आहे! वेगवेगळे मोदक बघायला मिळतील!
वाह वाह! फोटो बघायला मजा येईल
वाह वाह! फोटो बघायला मजा येईल
कुणीतरी सुगरण एकावर एक असे ते हंडी रचल्यासारखे मोदक करेलच!
गोडच हवे की तिखट चालेल?>>>
गोडच हवे की तिखट चालेल?>>>
तिखट म्हणजे मोमोज. (ते चालतील हे दिले आहेच.)
मस्त स्पर्धा. फोटो रेसिपीच्या
मस्त स्पर्धा. फोटो रेसिपीच्या प्रतिक्षेत!
मोदक म्हणजे कसं सहज सुंदर काम
मोदक म्हणजे कसं सहज सुंदर काम.........अगदी आदराने वाचले.
तिखट म्हणजे मोमोज>> तिखट मोदक
तिखट म्हणजे मोमोज>> तिखट मोदक मोमोज पेक्शा जरा वेगळे असतात
रस्स्यात टाकून बनवले जातात.
अच्छा, म्हणजे भारीच. या
अच्छा, म्हणजे भारीच. या सगळ्या पाकृ येणार आता, सहीच.
मस्त उपक्रम.
तिखट मोदक मोमोज पेक्शा जरा
तिखट मोदक मोमोज पेक्शा जरा वेगळे असतात Happy रस्स्यात टाकून बनवले जातात. > म्हाळसा तुमची प्रवेशपत्रिका येऊ देच
बापरे! मी ते पटकन रस्त्यात
बापरे! मी ते पटकन रस्त्यात टाकून वाचलं. सॉरी हं.
मी पण रस्त्यात टाकून वाचलं
मी पण रस्त्यात टाकून वाचलं
मला वाटलं रस्त्यावर गाडीवर मिळणारे मोमो अस्वच्छ या अर्थाने लिहिलेय
मजा येणार आहे रेसिपी बघायला.(जमल्यास बनवून इथे टाकायलाही.)
इतके वर्ष गणपती बसवतोय पण
इतके वर्ष गणपती बसवतोय पण मोदकाची स्पर्धा घ्यायच कुणाच्याच लक्षात आल नव्हत. Happy
>>>>
+७८६
संयोजकांसाठी जोरदार टाळ्या
अॅब्स्ट्रॅक्ट आकाराचे मोदक
अॅब्स्ट्रॅक्ट आकाराचे मोदक असतील तर त्यांच्याकडे कलात्मक दृष्टीकोनातून बघण्यात येईल काय?
मामी
मामी

घ्या
पण खरंच, मोदकाच्या आकाराचा निकष काय आहे? कमीत कमी किती कळ्या असल्या पाहिजेत?
संयोजक
संस्कृत मध्ये म्हणे लाडू पण
मोदक म्हटल्यावर सर्व साधारणतः
मोदक म्हटल्यावर सर्व साधारणतः जो आकार डोळ्यासमोर येतो तो आम्ही अपेक्षित धरला होता, कळ्या अमक्या ईतक्या असल्या पाहिजेत असा काही आग्रह नाही. आपण आकडा बनवणार्याच्या कौशल्यावर सोडून देवू.
एकवीसावे वर्षे म्हणून एकवीस कळ्या केल्यात तर तसा खास उल्लेख करा म्हणजे सगळ्यांना अधिक कौतुक वाटेल.
>>अॅब्स्ट्रॅक्ट आकाराचे मोदक
>>अॅब्स्ट्रॅक्ट आकाराचे मोदक असतील तर त्यांच्याकडे कलात्मक दृष्टीकोनातून बघण्यात येईल काय?
मामे
अॅब्स्ट्रॅक्ट आकाराचे मोदक
अॅब्स्ट्रॅक्ट आकाराचे मोदक असतील तर >>>मग त्यात माझा no पहिलाच येईल अशी खात्री बाळगा
अॅब्स्ट्रॅक्ट आकाराचे मोदक
अॅब्स्ट्रॅक्ट आकाराचे मोदक असतील तर त्यांच्याकडे कलात्मक दृष्टीकोनातून बघण्यात येईल काय?>>>>मामी
मज्जा येणारे खरी. मला पण मोदक करायला आणि छान मोदक बघायला खुप आवडतात. आपल्या मायबोलीवर एकसे एक लोकं आहेत मोदक करणारी.
एकवीसावे वर्षे म्हणून एकवीस
एकवीसावे वर्षे म्हणून एकवीस कळ्या केल्यात तर >> ५ कळ्या कश्याबश्या जमू लागल्या आहेत. २१च्या वाटेलाही जाणार नाही.
पण कोणीतरी करेलच. यंदा २१ कळ्यांचा जंबो मोदक हिट होणार!!
एकवीसावे वर्षे म्हणून एकवीस
एकवीसावे वर्षे म्हणून एकवीस कळ्या केल्यात तर >> लेबर डे ७ सप्टेंबरला आहे त्यातला लेबर कोण ते कळेल...
मंडळी विनोद, कोपरखळ्यांमधे
मंडळी विनोद, कोपरखळ्यांमधे कोणाचे प्रश्न उत्तर द्यायचे राहून जाणार नाहीत ह्यासाठी जरा मदत करा.
Pages