'डर के आगे जीत है' हा हिंदी वाक्प्रचार बर्याचदा धाडसाचं महत्त्व सांगण्यासाठी वापरला जातो.पण खरंच भितीमुळे दरवेळी नुकसानच होतं का?दरवेळी 'भिती' ही प्रगतीतली धोंडच ठरते का? उदा.गुन्ह्यात सापडलो तर आपल्याला शिक्षा होईल या भितीपोटी कितीतरी गुन्हे व्हायचे टळतात.'बागुलबुवाची भिती दाखवून आई आपल्या लहान मुलाला जेवू घालते.' फार काय अगदी कोर्टातही साक्षीदाराला त्याच्यादृष्टीने पवित्र अशा ग्रंथावर हात ठेवून शपथ घ्यायला लावणं हा सुद्धा भिती वापरुन घेण्याचाच प्रकार आहे.परीक्षेत नापास होण्याच्या भितीने अभ्यास करणारी मुलं,नोकरी जाण्याच्या भितीने स्वत:चा आक्रमकपणा नियंत्रणात ठेवणारे कामगार अशी बरीच उदाहरणे देता येतील जिथे भितीमुळे हवा तो परिणाम साधला गेलेला आहे.किंबहूना भितीमुळे जितक्या लवकर परिणाम साधतो तितक्या लवकर भिती दूर झाल्याने साधत नाही.सुरक्षा प्रणालीची अर्धवट माहिती कामगाराला झाली तर आपल्याला ती पूर्ण माहिती झालीय या गैरसमजात तो ती डायव्हर्ट करुन 'स्वत:ची हुशारी' सिद्ध करायला जाऊ शकतो आणि जीवाशी खेळ होऊ शकतो.अशा ठिकाणी 'भितीचं महत्त्व' लक्षात येईल.
पाप घडलं तर परमेश्वर शिक्षा करेल या भितीपोटीच कितीतरी 'पापं' टळतात.देव आहे की नाही हे निश्चित माहित नसूनही 'आपल्याकडून काही भ्रष्टाचार घडला असल्यास देवानं आपली श्रीमंती काढून घेऊ नये यासाठी मोठमोठे धनी उद्योजक देवळांना देणग्या देतात.'याच पैशातून समाजोपयोगी कामे मंदिरांकडून केली जातात.
भिती नष्ट करुन ज्याची भिती वाटते त्यामागचं गमक उघडं करुन ज्ञान वाढल्याने जेवढ्या लवकर काम होण्याचा परिणाम साधला जातो त्याहीपेक्षा अधिक लवकर अज्ञानातून येणार्या भितीमुळे होत असेल तर भिती 'निरुपयोगी' कशी?
भिती नुकसानकारक कशी?
Submitted by केअशु on 8 August, 2020 - 02:53
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
भीतीने माणुस रिस्क घ्यायचे
भीतीने माणुस रिस्क घ्यायचे टाळतो.काही बाबतीत भीती फायद्याची असेल पण ९९% केसेसमध्ये भीतीने नुकसानच होते.५०% हार्ट ॲटॅक स्ट्रेस रिलेटेड आहेत जो स्ट्रेस भीतीने येतो.
भिती माणसाला पॅरालाईज करते.भितीने येणारा ताण बरेचदा हेल्दी आऊटपुट देत नाही.भिती म्हणजे बुद्धीला मतीला गुंग करणारी भावना आहे .भविष्याच्या भितीने आत्महत्या करणारे कर्जबाजरी शेतकरी,मार्क कमी पडतील म्हणून आत्महत्या करणारे विद्यार्थी, अशी यादी वाढतच जाईल.
अंधाराची भीती वाटते म्हणून २४
अंधाराची भीती वाटते म्हणून २४ तास लाईट लावून बसलं तर बिल किती येईल?
अंधाराला घाबरत नाही म्हणून अंधार्या गुहेत गेलं आणि तिथे कुणी खाल्लं तर?
कुठलीही गोष्ट प्रमाणातच बरी आणि योग्य वेळीच बरी.
मी 'भिशी नुकसानकारक कशी?' असं
मी 'भिशी नुकसानकारक कशी?' असं वाचलं
मी "मीशी नुकसानकारक कशी?"
मी "मीशी नुकसानकारक कशी?" असं वाचल.
(No subject)
विशिष्ट प्रसंगी मिशी टोचु
विशिष्ट प्रसंगी मिशी टोचु शकते म्हणुन ती नुकसानकारक आहे असे म्हणू शकतो.
उत्क्रांतीवादाच्या
उत्क्रांतीवादाच्या दृष्टिकोनातून भीती हि सजीवांना जिवंत ठेवन्यास मदत करते. वाघ सिंहांच्या भीतीने पळून जाणाऱ्या हरिनाची जिवंत राहण्याची श्यक्यता हि न पळून जाणाऱ्या हरिनापेक्षा जास्त असेल. भीतीच्या या फायद्यामुळेच भीती निर्माण करणारे जीन्स टिकून आहेत व म्हणून भीतीही टिकून आहे.
पण एका विशिष्ट क्षणासाठी
पण एका विशिष्ट क्षणासाठी इतक्या निगुतीने सांभाळलेली मिशी उडवणे म्हणजे
तो प्रसंग किती महत्वाचा आहे
तो प्रसंग किती महत्वाचा आहे यावरून ठरवाव लागेल कि मिशी किती नुकसानकारक आहे.
चर्चा मिशीवर आहे की भितीवर
चर्चा मिशीवर आहे की भितीवर आहे.
कोण जास्त नुकसानकारक आहे
कोण जास्त नुकसानकारक आहे त्यावर ते ठरेल...
करोना काळापूर्वी मीशी
करोना काळापूर्वी मीशी नुकसानकारक होती.
मीशी असणाऱ्यांना तशी वेळ आलीच तर पोलिसांना चकमा देण्यास पटकन स्त्रीवेशभूषा करून पळुन जाणे शक्य नव्हते.
पण आता मास्क अनिवार्य असल्याने ते ही शक्य झाले आहे.
मीशी असणाऱ्यांना तशी वेळ आलीच
मीशी असणाऱ्यांना तशी वेळ आलीच तर पोलिसांना चकमा देण्यास पटकन स्त्रीवेशभूषा करून पळुन जाणे शक्य नव्हते >> मिशीच काय त्याबरोबर दाढी असणाऱ्या एका थोर गृहस्थांनी सर्व जगासमोर याचा अयशस्वी डेमो दिलाय ऑलरेडी
बाबा रामदेव.
बाबा रामदेव.
सगळ्यांची मत लक्षात घेतली तर
सगळ्यांची मत लक्षात घेतली तर निष्कर्ष असा निघतोय की मिशी ही बर्याच वेळी नुकसानकारकच असते.
अरे देवा। भीतीवर बोला.
अरे देवा।
भीतीवर बोला.
मिशीच काय त्याबरोबर दाढी
मिशीच काय त्याबरोबर दाढी असणाऱ्या एका थोर गृहस्थांनी सर्व जगासमोर याचा अयशस्वी डेमो दिलाय ऑलरेडी>>
दाढी मिशीचा त्याग करुन पळाले असते तर पलायन यशस्वी ठरले असते. दाढी मिशीने घात केला.
दाढी मिशीचा त्याग करुन पळाले
दाढी मिशीचा त्याग करुन पळाले असते तर पलायन यशस्वी ठरले असते. दाढी मिशीने घात केला >>

अजाबात नाय.. एवढे भरजरी करकमल असल्यावर जगातील कोणताही स्त्रीवेष धारण केला तरी उपयोग नाही. अर्थात त्यावेळी पतंजली वॅक्स नसल्याने त्यांचा नाईलाज झाला असेल.
(No subject)
भरजरी करकमल
पण इतक्या दाढीवाल्या
पण इतक्या दाढीवाल्या लोकांमध्ये अंगाला वेटोळे घालून बसले असते तरी सापडले नसते कोणाला
इतका व्याप करायाची गरजच नव्हती
इतके अंगभर कपडे घातल्याने कसातरीच वाटत असेल ना
मगकाय दाढी मिशा काढून
मगकाय दाढी मिशा काढून लंगोटीवर पळ काढायचा होता का?
पळ काढायलाच नको होता असे
पळ काढायलाच नको होता असे म्हणतोय
मगकाय दाढी मिशा काढून
मगकाय दाढी मिशा काढून लंगोटीवर पळ काढायचा होता का?
>> तसे पळाले असते तर जगात हसे तरी झाले नसते.
चांगल्या धाग्याची वाट लागली.
चांगल्या धाग्याची वाट लागली.
चांगल्या धाग्याची वाट लागली.
चांगल्या धाग्याची वाट लागली.
नवीन Submitted by Akshay. on 12 August, 2020 - 16:02
>>>>>
अवांतर पोस्ट आल्या - येस
धाग्याची वाट लागली - येस ऑर नो - व्यक्तीसापेक्ष
गोंगाट हा कुठल्याही मोठ्या आवाजाला म्हणत नाही. तर जो आवाज नकोसा होतो त्याला म्हटले जाते.
जसे की शेजारची लोकं पार्टी करत आहे. पण आपल्याला आमंत्रण नसेल. तर आपल्याला तो गोंगाट वाटतो.
तेच आपण त्या पार्टीत नाचत असू, तर आपल्याला तो माहौल वाटतो.
अवांतर चर्चेचा त्रास तेव्हाच होतो जेव्हा आपण त्यात सामील नसतो. त्यापेक्षा सामील व्हावे आणि एंजॉय करावे
मी स्वतः धागाकर्ता असतो तेव्हाही हाच अॅटीट्यूड ठेवतो.
@ धागा - थोबाडीत मारल्याची भिती नाही वाटत, प्रेमाची वाटते.