आज मी टी.बी मधून बाहेर पडले.
मला अजूनही खरे वाटत नाही.6 महिने झाले मी उपचार घेत आहे,आणि आज मी पूर्णपणे बरी झाले.आजही आठवते मला ते सर्व.13/10/2019 ला मला मुलगी झाली. Normal च झाले होते मी. 2/3 महिने अजिबात काही काम केले नाही. माहेरी कोणी नसल्याने मुंबई मध्ये च डिलिव्हरी झाली होती. After delivery काळजी घेतली नाही नीट.कोणाचे ऐकून घेतले नाही. नंतर हळूहळू वजन कमी व्हायला लागले. ताप यायला लागला. अगोदर लक्ष च दिले नाही. पन नंतर धाप लागायला लागली. चक्कर यायची अधूनमधून. मग सासू ने डॉक्टर कडे नेले. बीपी वगैरे चेक केला. नोरमल होता. ताप पाहिला.104 होता. मग गोळ्या दिल्या. दूध जास्त प्यायला सांगितले. कारण बाळ होते लहान. पीत होते अंगावर. घरी आल्यावर थोडे जेवण करून गोळ्या खाल्ला. नंतर अचानक त्रास व्हायला लागला. अस्वस्थ वाटायला लागले. काही च समजत नव्हते.
क़मशा.............
टि.बी मधून बाहेर पडताना भाग 1
Submitted by Rohini Sable on 11 August, 2020 - 07:46
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एका खूप गरजेच्या विषयावर
एका खूप गरजेच्या विषयावर लिहीत आहात. तुमच्या या लेखामुळे बरीच माहिती मिळेल. आपल्या इथे खूप गरज आहे अशा अनुभव लेखनाची.
लिहीत रहा.
धन्यवाद
धन्यवाद
या विषयी जाणुन घ्यायला नक्की
या विषयी जाणुन घ्यायला नक्की आवडेल. पुढील भाग जरा मोठा लिहा.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत..
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत..
आज च लिहनार आहे पुढील भाग
आज च लिहनार आहे पुढील भाग
अनुभव शेअर केल्याबद्दल
अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद.