शकुंतला देवी (विद्या बालन) Coming Soon...

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 July, 2020 - 11:53

तुम्हाला कोणाला cube root of 61,629,875 and the seventh root of 170,859,375 याचे उत्तर कॅल्क्युलेटर न वापरता काढता येईल?

अच्छा थोडा वेळ घ्याल.. पण काढता येईल म्हणता..

बरं मग एखाद्या 201 आकडी संख्येचा 23rd root सांगता येईल ??

हे थोडे वेळ घेऊनही अवघड वाटतेय ना.. २०१ आकडी संख्या बघायला कशी वाटेल याचा विचार करूनच गरगरायला होतेय ना. मग ते 23rd root वगैरेंवर तर जायलाच नको.

पण या अवघड गणितालाही अवघड करायला समजा मी तुम्हाला याचे उत्तर काढायला फक्त मिनिटभराचा वेळ दिला तर.....

तर तुम्ही हा पकवतोय म्हणत धागा ईथेच सोडून पळून जाल. आणि तसे होऊ नये म्हणून सांगतो एका बाईने हे तब्बल चाळीसेक वर्षांपूर्वी करून दाखवले आहे. अवघ्या ५० सेकंदात याचे उत्तर दिले आहे. आणि मग ते उत्तर बरोबर आहे हे पडताळून बघायला तेव्हाच्या काळी भला मोठा कॉम्प्युटर प्रोग्राम रचावा लागला होता. - ईति विकीपेडीया Happy

ईतकेच नाही तर दोन रॅंडमली सिलेक्ट केलेल्या १३ आकडी संख्या. अनुक्रमे,
7,686,369,774,870
आणि
2,465,099,745,779
यांचा गुणाकार करत तिने त्याचे अचूक उत्तर दिले होते. जे आले होते, 18,947,668,177,995,426,462,773,730
आणि यासाठी तिने वेळ घेतला होता, पुन्हा एकदा, फक्त 28 seconds !

मानवी कॉम्प्युटर म्हणून ओळखल्या जाणारया या अचाट भारतीय बाईचे नाव होते शकुंतला देवी !

आणि या कामगिरीसाठी त्यांचे नाव गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले होते. जो मोडायला कदाचित त्यांनाच फिरून जन्म घ्यावा लागेल Happy

ज्यांच्यावर आता पिक्चर येतोय आणि तिचा रोल करतेय खुद्द विद्या बालन !
ट्रेलर ईतका झ्याक जमलाय की ३१ जुलैपर्यंत वाट बघणे अवघड वाटू लागलेय. तुम्हीही एकवार बघून घ्या.

लिंक - https://youtu.be/8HA1HRufYso

वर खुद्द विद्या बालन म्हटलेय कारण तिचे कहाणी आणि डर्टी पिक्चर या आधी पाहिलेत, आणि नुकताच तुम्हारी सुल्लू पाहिल्यानंतर तर शंभर टक्के सांगू शकतो हा रोल तिच्यापेक्षा चांगला दुसरा कोणी करूच शकत नाही.

थिएटरलाच बघायला आवडला असता कारण काही टाळ्याखेचक दृश्य आणि संवाद यात नक्कीच असणार. ट्रेलर बघूनच फार हॅपनिंग कथानक वाटतेय. पण आता चित्रपट प्राईमवर रिलीज होतोय तर तिथेच आल्याआल्या गोड मानून बघावा लागणार Happy

त्यांचा जन्म १९२९ चा. मुलींच्या शिक्षणाची बोंब. त्यांचेही शिक्षण असे बहुधा झालेच नाही. तरीही ही अदभुत प्रतिमा. याला दैवी देणगी म्हणावे तरी अविश्वसनीयच वाटावे.

ट्रेलरने प्रभावित होऊन थोडे गूगल करताना आणखीही काही रोचक माहिती त्यांच्याबद्दल सापडली.

1. Shakuntala Devi had contested Lok Sabha elections against Indira Gandhi from Medak.

2. She was also an astrologer and author of several other cookbooks and novels.

3. She was a pioneer of the study of homosexuality in India.

आणि हे पाहता त्यांचे ओरिजिनल कॅरेक्टर विद्या बालनने ट्रेलरमध्ये साकारलेय तसेच बिनधास्त असावे असे वाटतेय.

त्यांच्याच भाषेत सांगायचे तर,
अगर अमेझिंग हो सकती हू, तो नॉर्मल क्यू बनू Happy
कडक !

ट्रेलर बघून घ्या तुम्हीही. पुन्हा एकदा लिंक देतो
https://youtu.be/8HA1HRufYso

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑ, बिल्ड एरर आलीच का
दुरुस्त करते मागे जाऊन.(एक क्लोज कंस जास्तीचा होता Happy )

सगळे कंस आता बंद केलेत पण आधी कंस चार बंद व्हायला हवा मग कंस तीन. म्हणजे कंस बंद करण्याचा क्रम लिहिण्यात चुकला.

अनु, Happy Happy

शीर्षकात दोन कंस आहेत. त्यामुळे कंसाची चर्चा विषयाला धरून नसली तरी शीर्षकाला धरून आहे असे म्हणून शकतो.

ईथे कोणी आहे का ज्याने हा चित्रपट माझ्यासारखे दोन वेळा पाहिला.

अजिबातच नाही आवडला, विद्द्या इरीटेतिन्गली नाटकी वागते,बोलते,हसते. विद्द्यासारख्या उत्तम अभिनेत्रिकडून अनपेक्षित. फॅमिली ड्रामानेच सेन्टर स्टेज घेतल्याने मॅथ अगदीच तोन्डी लावण्यापुरत येत.

विद्या ची एक स्टीरिओटाईप स्टाईल बनते आहे.एका स्टाइल ने एक दोन चित्रपट यशस्वी झाले की प्रत्येक जण नकळत बनवतो.अमिताभ चे 'हांय', शाहरुख चे हात उंचावून पसरणे वगैरे.डर्टी पिक्चर, तुम्हारी सुलू, मिशन मंगल आणि शकुंतला देवी मध्ये विद्या ची स्टाईल साधारण एका प्रकारची आहे.आता त्या स्टाईल च्या भूमिका तिच्या साठी लिहिल्या जात असतील.पण हा साचा भविष्यात जाम मारक ठरतो.तिला या स्टाईल मधून आताच हळूहळू बाहेर पडायला, अगदी वेगळ्या भूमिका करायला हव्यात(मला बोलायला सोपं आहे.तिला असे रोल मिळायला हवे, मुळात रोल देणाऱ्याना ती तिची सिग्नेचर स्टाईल करणार नाहीय हे पटायला हवे.ते प्रेक्षकांना क्लिक व्हायला हवे.नाहीतर आहेच रिव्ह्यू मध्ये 'विद्या इज लॉस्ट.शी डझ नॉट सीम लाईक हरसेल्फ'. )

मला ती खूप आवडते अगदी , परिणिता , कहानी , भूलभुलैया पासून आता ती तिचे यातले पात्र 'जम्पी ' वाटले . High energy positive happy पात्र दाखवण्यासाठी त्याला जम्पी करावे लागते का , सतत वेगवेगळ्या पट्टीत बोलणे , डोळे मिचकावणे , हातवारे ...हे पूर्ण अनावश्यक वाटते. ते नंबर सांगताना (right to left ) ती आता पुढच्या क्षणी नाचेल असं वाटले. मुलीने तर विचारले आई म्युझिकल आहे का ?
म्हणजे शांत , एकाग्र , एकटी , मितभाषी असणारी व्यक्ती सुद्धा happy , positive, energetic असूच शकते की !!
पण शंकुतला देवी तशाच असतील म्हणून सोडून दिले.
लहानमुलासारखी देहबोली असणारे प्रौढ लोक खऱ्या आयुष्यात आपल्याला मनाने अस्थिर वाटतील . पण सिनेमात हाय एनर्जी दाखवतात. अर्थात मी फक्त ट्रेलर पाहिले आहे पण हा ट्रेंड दिसतो आजकाल सिनेमात.
तिचा आवाज फार मोठा प्लस प्वाइंट आहे त्यात आत्मविश्वास आणि गोड किणकिण आहे. विद्या कुठल्याही भुमिकेचे सोने करेल यात शंका नाही वर अनुने लिहिल्याप्रमाणे.

अजिबातच नाही आवडला, विद्द्या इरीटेतिन्गली नाटकी वागते,बोलते,हसते. विद्द्यासारख्या उत्तम अभिनेत्रिकडून अनपेक्षित. फॅमिली ड्रामानेच सेन्टर स्टेज घेतल्याने मॅथ अगदीच तोन्डी लावण्यापुरत येत. +१२३४५

Pages