४-१० वर्षाच्या मुलांचे कॉमन आजार, दुखणी आणि त्यावर उपाय

Submitted by लाजो on 3 June, 2012 - 18:43

४-१० वर्षाच्या लहान मुलांची कॉमन बारिकसारीक आजारपण, दुखणी, जखमा इ इ बाबत अनुभव आणि त्यावर सहज उपलब्ध असलेले घरगुती उपचार -

लहान मुलांना काही झाले अगदी खरचटले, पाय मुरगळला किंवा सर्दी पडसे झाले तरी आम्हा पालकांचा जीव अर्धा होतो. मुलांना डॉक्टरकडे नेणे महत्वाचे आहेच पण कधी कधी बारिकसारीक गोष्टींसाठी डॉक्टरकडे नेण्याची आवश्यकता नसते किंवा अवेळी जेव्हा डॉक्टर / केमिस्ट उपलब्ध नसतिल अश्या वेळेस काही घरगुती उपायांनी तात्पुरता थोडा आराम मिळु शकतो. काही उपाय जे मोठ्यांना लागु होतात ते लहान मुलांना चालतिलचं असे नाही किंवा लहान मुलं ते करु शकतिल असे नाही जसे वाफारा घेणे, गुळण्या करणे इ इ . मग अश्या वेळेस काय करावे? घरच्या घरी पटकन काय द्यावे???

उदाहरणार्थ, रात्रीची वेळ, पोट अचानक बिघडले.. २-३ वेळेस शी/ओकारी झाली ... डॉक्टर सकाळपर्यंत भेटणार नाहित....मग काय करावे? बोट भाजले.... बर्नॉल ची युज बाय डेट एक्पायर झालिये... काय करावे?

अश्या परिस्थितीत आपणच कधी कधी जरा गोंधळलेलो असतो आणि मग घरगुती उपाय पटकन सुचत पण नाहीत. मग इकडे धाव घ्यावी लागते कारण मायबोलीवर लग्गेच मदत मिळेल याची खात्री असते आणि ती मिळतेच. अर्धा जीव तिथेच भांड्यात पडतो. इथल्या सर्वांचा आधार वाटतो Happy

म्हणून या धाग्यावर असे घरगुती उपचार नोट करुन ठेऊ जे, वेळ न येवो, पण कधी लागलेच तर उपयोगात आणता येतिल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खाज कमी होण्यासाठी आमच्या डॉकच्या नर्सने सांगितलेला उपाय - पाण्यात बेकिंग सोडा घालून मिश्रण करायचे. लावले की आराम पडतो.<< माझ्या लेकीला मच्छर चावून जबरदस्त अ‍ॅलर्जी येते. आजवर किमान पाच डॉक्टर आणी हजारोच्या ब्लड टेस्ट करून झाल्यावर निघालेले हे निदान!! तिला असं लावून बघते काही उपयोग होतो का...

बेकिंग सोडा उपाय +१
लहान मुलांच्या टबात थोडा सोडा टाकायचा, आणि थोडावेळ खेळू द्या असं सांगितलेलं. आंघोळीच्या पाण्यातही घालू शकता.

माझी मुलगी ३.५ वर्षाची आहे ़ तिला १/२ दा शीला खडा झाला होता ़ त्या नंतर ती बरेच वेळा पोटात दुखते म्हणते ़गॅसेस पण होत आहेत ़ ती एकुणच सर्व भाज्या खात नाहि ़ सुप तर त्याहुनहि नाहि ़ डाॅक्टर म्हणत आहेत खड्यामुळे पोटात दुखते ़ तरी मला खुप टेन्शन येते ़ कुणाला मुलाच्या बाबतीत असा अनुभव आहे का ?

माझी भाची ४ वर्षांची आहे. ती दर १५-२० दिवसांनंतर आजारी पडत असते. तिला रोटाव्हायरसची लस देऊनही ते इन्फेक्शन झाले. गोवराची लस दिलिय तरी काल गोवराची लक्षणे दिसत आहेत. आज ब्लड टेस्ट मध्ये नक्की गोवर आहे की स्कार्लेट फिव्हर आहे ते कळेल. तिला धुळ, धुर असा अ‍ॅलर्जीचा त्रास असल्याने सर्दी कायम असते. शेंगदाणा, दुध याचीही अ‍ॅलर्जी आहे. खाण्यापिण्याचे नखरे आहेत.

तिची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय करता येईल? अशा प्रकारच्या त्रासावर चांगली ट्रीट्मेंट देणारे लहान मुलांचे डॉ माहित आहेत का?

माझी मुलगी 13 महिन्यांची झाली .दिवसभरात 1 घासपन वरच खात नाही...कालपासून तर माझी खुप चिडचिड होतेय, 1-1 मिनीटात दुध मागते.ती वरच दुधपण नाही पित...तीला वरचा आहार कसा आणि काय सुरू करू?

माझा मुलगा २ वर्षांचा आहे. रात्री लवकर झोपतच नाही. १२ वाजेपर्यंत मोबाइल बघ, पुस्तक बघ, बाहेर चल असं करत रहातो. दुपारी २ वाजता झोपतो. ४-५ वाजेपर्यंत.म्मग रात्री साधारण दहा-साडेदहाला तरी झोप यायला हवी. पण नाही. आणि मी तर पेंगत असते. काही उपाय?

सस्मित, संध्याकाळी त्याला बागेत वगैरे घेऊन जा. मोकळ्या हवेत दमेपर्यंत खेळला तर झोप येईल. रात्री ८-९ वाजेपर्यंत जेवणं आटोपून दिवे बंद करा. मोठे आवाज होणार नाहीत याची काळजी घ्या. धावपळीचे खेळ खेळण्यापेक्षा गोष्ट सांगणे किंवा बैठे खेळ खेळायला लावा.
दुपारी २ तास झोप झाली की उठवून बघा.
हे सर्व सलग अनेक दिवस try करा.

रात्री ८-९ वाजेपर्यंत जेवणं आटोपून दिवे बंद करा. मोठे आवाज होणार नाहीत याची काळजी घ्या. धावपळीचे खेळ खेळण्यापेक्षा गोष्ट सांगणे किंवा बैठे खेळ खेळायला लावा.
दुपारी २ तास झोप झाली की उठवून बघा.> हे सगळ्ं झालंय करुन.
फक्त ते बाहेर रोज नेता येत नाही. पण बरेचदा बाबा लवकर आला की नेतोच.

दुपारी २ वाजता झोपतो. ४-५ वाजेपर्यंत>> आयडियल नॅप टाइम १२ ते २ आहे , हा बदल करुन बघा, सकाळी किति वाजता उठतो? सकाळी ८ -९ नतर आणि दुपारच्या नॅपनतर ५ वाजता उठत असेल तर रात्री ११-१२ वाजताच झोपणार.

सस्मित, कोमट तेलाने संध्याकाळी मालीश कर, खेळल्यानंतर. मग थोडा वेळ खेळू देऊन कढत पाण्यानी आंघोळ घालायची. रोज मालीशची वेळ पाळायची.

रात्री उशीरा झोपल्यामुळे सकाळी पण साडे नौ दहाला उठतो.>> ब्रेक द सर्कल ! काहीही झाल तरी २ विक हे रुटिन तोडु नका. २ ते मॅक्स ३ विक मधे मुल रुटिन अ‍ॅक्स्टेप्ट करतात.
स्किप द नॅप टाइम फॉर ४-५ डेज, बाहेर खेळायला न्या, खेळुन झाल की आघोळ, जेवण की झोप , आणखी एक ! काहिवेळेस आपण आपल्या कामाच्या सोईसाठी मुलाच्या वेळा बदलतो ते टाळा. ( तुम्ही करत असाल अस म्हणत नाही पण हे होत केल जात)

काहिवेळेस आपण आपल्या कामाच्या सोईसाठी मुलाच्या वेळा बदलतो ते टाळा.> असं काही नाही होतंय. त्याचं त्यानेच सुरु केलंय.
चिन्नु, बघते प्रयत्न करुन.

माझा प्रश्न आजाराविशयी नाही. पण मला विचारायचे आहे कि मुल लहान असताना आपण johnson किन्वा himalaya चे products वापरतो.
पण साधारण ५ वर्शापुढील मुलान्साठी कुठाली पावडर, क्रिम आणी शाम्पु वापरावा?

माझी मुलगी चार वर्षांची आहे.
काय चुकून नवऱ्याने तिला आंघोळ झाल्यावर candid पावडर लावली. काखेत, गळा, मान, पोट या घाम येणाऱ्या ठिकाणी लावली.
तिला प्रचंड रिएक्शन आलेली आहे. सगळीकडे लाल चट्टे आहेत. खूप खाज सुटली आहे. काही उपाय माहितीअसेल तर कृपया सांगावे.
कृपया सांगा काय करावे .

बापरे
डॉ कडे नेईपर्यंत साधे घरगुती उपाय,मीरा म्हणाली तशी चंदन पावडर, फार गरम नसलेले पाणी आणि बेसन(त्यात कोणतेही भरड दळण नसलेले आणि साय किंवा नुसती साय चोळून आंघोळ, कँडीड चे इफेक्ट थोडे विरल(डायल्युट) करणे इतके करता येईल.घरी साधी(अरोमा,सुगंध मिक्स नसलेली) चांगली मसाज तेले(जोजोबा,बदाम तेल) वगैरे असल्यास आंघोळीपूर्वी मऊ हलका मसाज करता येईल.
लवकर रिलीफ मिळू दे बाळाला.

धन्यवाद... तिला कोमट पाण्याने आंघोळ घातली. आता झोपली आहे.
सकाळी उलटी सुद्धा झाली होती म्हणून जरा टेन्शन आले आहे. डॉक्टर लांबूनच तपासणार आहेत कोरोना मुळं, फोन वरच सांगितलं त्यांनी तसं. बघू आता.
Once again thank you for your suggestions

काल माझ्या पाच वर्षाच्या लेकाला ट्रिपलच इंजेक्शन दिले. इंजेक्शन घेऊन तो शाळेत गेला तिथे काय ऍक्टिव्हिटीज होत्या त्या सगळ्या केल्या परंतु घरी आल्यानंतर त्याचा पाय दुखायला लागला. मी ऑफिसमधून घरी आल्यावर बघितलं तर तो पाय दुखतोय म्हणून एकाच पोझिशनमध्ये जवळजवळ चार तास तसाच बसलेला होता. त्याआधी डॉक्टरने दिलेली गोळी, बर्फाने शेकवणे वगैरे केलं होतं. त्यानंतर मात्र तो पायाला हातच लावून देत नाहीये. रात्री झोपण्याआधी पण त्याला गोळी दिलेली पण त्याचं दुखणं काय कमी झालेलं नाहीये. तो जागेवरून उठतच नाहीये, उचलून घ्यावे लागत आहे. उचलतानाही खूप रडतो. या आधीच्या दोन डोसला त्याला त्रास झाला नव्हता पण या वेळेस होतो आहे तर काय करू ते समजत नाहीये. तुम्हाला असा अनुभव आला होता का आणि तुम्ही काय उपाय केले होते?

निल्सन त्याला लगेच डॉकटर कडे घेऊन जा. घरगुती काही उपाय करू नका . कदाचित ज्या पायावर इंजेक्शन दिले त्या पायावर खेळताना काही लागलं वैगरे असू शकेल.

एक घरगुती उपचार माझ्या मुलांच्या डॉक्टरांनी sangitalela-

आता उन्हाळा सुरू होईल..मुलांचं थंड खाण्याच प्रमाण वाढत...जर बाहेरून आइस्क्रीम आणल किंवा खाल्ल तर घरी आल्यावर लगेच गूळ आणि हळद एकत्र करून त्याची छोटी गोळी बनवून खायला द्यायची.. आइस्क्रीम बाधत नाही..

आता बरं होईल हं असं सांगत मुलांचं लक्ष दुसरीकडे वळवा. डॉक्टरांनी नवीन उपाय दिलेले लागू व्हायला वेळ लागेल.

ट्रिपलच इंजेक्शन किंवा दुसरी कुठली लस असते त्यात त्या रोगाविरुद्ध लढण्याची शक्ती शरिरात निर्माण केली जात असते आणि मृत जंतू( एक साधा शब्द) लघवीवाटे बाहेर पडतात. हे साध्य करण्यासाठी इंजेक्शन घेतल्यावर दर तासा दीड तासाने साखर घातलेले कोमट पाणी पिणे उपयोगाचे ठरते. मग त्रास होत नाही. हे मुलांनाच नव्हे तर मोठ्यांनाही लागू आहे.

Pages

Back to top