तुम्हाला कोणाला cube root of 61,629,875 and the seventh root of 170,859,375 याचे उत्तर कॅल्क्युलेटर न वापरता काढता येईल?
अच्छा थोडा वेळ घ्याल.. पण काढता येईल म्हणता..
बरं मग एखाद्या 201 आकडी संख्येचा 23rd root सांगता येईल ??
हे थोडे वेळ घेऊनही अवघड वाटतेय ना.. २०१ आकडी संख्या बघायला कशी वाटेल याचा विचार करूनच गरगरायला होतेय ना. मग ते 23rd root वगैरेंवर तर जायलाच नको.
पण या अवघड गणितालाही अवघड करायला समजा मी तुम्हाला याचे उत्तर काढायला फक्त मिनिटभराचा वेळ दिला तर.....
तर तुम्ही हा पकवतोय म्हणत धागा ईथेच सोडून पळून जाल. आणि तसे होऊ नये म्हणून सांगतो एका बाईने हे तब्बल चाळीसेक वर्षांपूर्वी करून दाखवले आहे. अवघ्या ५० सेकंदात याचे उत्तर दिले आहे. आणि मग ते उत्तर बरोबर आहे हे पडताळून बघायला तेव्हाच्या काळी भला मोठा कॉम्प्युटर प्रोग्राम रचावा लागला होता. - ईति विकीपेडीया
ईतकेच नाही तर दोन रॅंडमली सिलेक्ट केलेल्या १३ आकडी संख्या. अनुक्रमे,
7,686,369,774,870
आणि
2,465,099,745,779
यांचा गुणाकार करत तिने त्याचे अचूक उत्तर दिले होते. जे आले होते, 18,947,668,177,995,426,462,773,730
आणि यासाठी तिने वेळ घेतला होता, पुन्हा एकदा, फक्त 28 seconds !
मानवी कॉम्प्युटर म्हणून ओळखल्या जाणारया या अचाट भारतीय बाईचे नाव होते शकुंतला देवी !
आणि या कामगिरीसाठी त्यांचे नाव गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले होते. जो मोडायला कदाचित त्यांनाच फिरून जन्म घ्यावा लागेल
ज्यांच्यावर आता पिक्चर येतोय आणि तिचा रोल करतेय खुद्द विद्या बालन !
ट्रेलर ईतका झ्याक जमलाय की ३१ जुलैपर्यंत वाट बघणे अवघड वाटू लागलेय. तुम्हीही एकवार बघून घ्या.
लिंक - https://youtu.be/8HA1HRufYso
वर खुद्द विद्या बालन म्हटलेय कारण तिचे कहाणी आणि डर्टी पिक्चर या आधी पाहिलेत, आणि नुकताच तुम्हारी सुल्लू पाहिल्यानंतर तर शंभर टक्के सांगू शकतो हा रोल तिच्यापेक्षा चांगला दुसरा कोणी करूच शकत नाही.
थिएटरलाच बघायला आवडला असता कारण काही टाळ्याखेचक दृश्य आणि संवाद यात नक्कीच असणार. ट्रेलर बघूनच फार हॅपनिंग कथानक वाटतेय. पण आता चित्रपट प्राईमवर रिलीज होतोय तर तिथेच आल्याआल्या गोड मानून बघावा लागणार
त्यांचा जन्म १९२९ चा. मुलींच्या शिक्षणाची बोंब. त्यांचेही शिक्षण असे बहुधा झालेच नाही. तरीही ही अदभुत प्रतिमा. याला दैवी देणगी म्हणावे तरी अविश्वसनीयच वाटावे.
ट्रेलरने प्रभावित होऊन थोडे गूगल करताना आणखीही काही रोचक माहिती त्यांच्याबद्दल सापडली.
1. Shakuntala Devi had contested Lok Sabha elections against Indira Gandhi from Medak.
2. She was also an astrologer and author of several other cookbooks and novels.
3. She was a pioneer of the study of homosexuality in India.
आणि हे पाहता त्यांचे ओरिजिनल कॅरेक्टर विद्या बालनने ट्रेलरमध्ये साकारलेय तसेच बिनधास्त असावे असे वाटतेय.
त्यांच्याच भाषेत सांगायचे तर,
अगर अमेझिंग हो सकती हू, तो नॉर्मल क्यू बनू
कडक !
ट्रेलर बघून घ्या तुम्हीही. पुन्हा एकदा लिंक देतो
https://youtu.be/8HA1HRufYso
धन्यवाद,
ऋन्मेष
हो खरे आहे
हो खरे आहे
मी सुद्धा आता एक विडिओ चेक केला
ईंग्लिश बोलायचा ॲक्सेंट बघा...
https://youtu.be/B8FhngvxiBE
अशक्य आहे हि बाई.
सायन्सच्या पलीकडचा च्मत्कार आहे.
बाकी मॅथ्स सॉल्व्ह करताना हि बोलतेही चटपटीत. हा विडिओ पाहून वाटत नाही की विद्या बालनने चुकीचे कॅरेक्टर पकडलेय
https://youtu.be/lj9TbqqHLuI
https://youtu.be/lj9TbqqHLuI
यामध्ये आहे अगदी त्याप्रमाणे बोलते एका सीन मध्ये.
बाकी डान्स वगैरे बद्दल काही माहिती नाही
येस्स
येस्स
दॅटस माय आन्सर.. अब तेरा कम्युटर क्या बोलता है बता... दॅट्स हर ॲटीट्यूड
मी शेअर केलेल्या लिंकमध्येही हा दिसलाय..
ट्रेलरम्ध्ये दाखवलेले आन्सर लेफ्ट टू राईट हवेय की राईट टू लेफ्ट हे सुद्धा तिचीच स्टाईल आहे...
विद्या ताकदीची अभिनेत्री आहे.
विद्या ताकदीची अभिनेत्री आहे. कॅरेक्टरला न्याय देते.
शकुंतला देवींची मुलगी सांगू
शकुंतला देवींची मुलगी सांगू शकेल कसं काम केलय ते. म्हणजे खऱ्या कॅरेक्टर च्या कितपत जवळ जातय
शकुंतला देवींची मुलगी सांगू
शकुंतला देवींची मुलगी सांगू शकेल कसं काम केलय ते.
>>>>>>
बहुतेक त्यांच्याशी सल्लामसलत केली असेलच.
मलाही आधी वाटलेले की गणितात हुशार म्हणजे फर्स्ट बेंचवर बसणारी चष्मीश मुले.
त्यामुळे पचवायला जड गेलेलेच, पण विद्या मात्र जाम आवडली.
आणि आता त्यांचे विडिओ बघतोय तेव्हा त्यांची स्टाईल उचलूनच तिला आणखी प्रेझेंटेबल केलेय विद्याने हे कळतेय.
झालाय रीलीज
झालाय रीलीज
जे बघतील त्यांनी झरूर लिहा.
मस्त पिक्चर आहे. मला आवडला.
मस्त पिक्चर आहे. मला आवडला. उत्कंठावर्धक आणि वेगवान. मी रात्री अगदी झोपताना थोडीशी सुरुवात बघूया म्हटले. पण मध्ये थांबावे कुठे हे कळलेच नाही.
शकुंतला देवींच्या मॅथेमॅटीक्सगिरीसोबत ईमोशनल फॅमिली ड्रामाही तितकाच वा किंबहुना जास्त वेटेज राखून आहे चित्रपटात. पण सगळेच कलाकार चांगले आणि विद्या अफाट असल्याने छान जमलेत प्रसंग. त्यात मी कर्क राशीचा असल्याने मला तर ईमोशनल प्रसंग नेहमीच भावतात. पण विशेष म्हणजे डोळ्यातून पाणी यावे वगैरे प्रसंग नसतानाही भावले.
फेमिनिझम बाबत तर एक स्वतंत्र लेख लिहावा कोणीतरी हा चित्रपट बघून. व्हॉट ए ग्रेट कॅरेक्टर आणि काय सुंदर बेअरींग पकडले आहे विद्याने सुरुवातीपासूनच. तिने मांडलेले विचार पचनी पडणे अशक्यच होते त्या काळातील लोकांना. ईनफॅक्ट पाश्चात्य पुरुषांनाही न झेपणारी स्त्री होती ती हे विशेष आवडले.
सविस्तर नंतर... अजून झोपेत आहे मी
बघतेय सिनेमा
बघतेय सिनेमा
बघतेय सिनेमा
बघतेय सिनेमा
>>>
मी सुद्धा पुन्हा बघतोय आता टीव्हीला कनेक्ट करून
कारण ट्रेलरनध्ये मॅथेमॅटीक्स बघून मुलीला बघायचा होता
पण त्यांच्या फॅमिली ड्रामा बद्दल प्रश्न विचारून भंडावून सोडतेय. अश्यात ते फ्लॅशबॅक पुढे मागे दाखवल्यामुळे तिला समजावताना आणखी भंजाळून जायला होतेय.
आवडला सिनेमा.. विद्या बालन ने
आवडला सिनेमा.. विद्या बालन ने खूप छान अभिनय केलाय.
बघितला एकदाचा. विद्याचा अभिनय
बघितला एकदाचा. विद्याचा अभिनय, दोनचार चूरमुरीत संवाद यापलिकडे काही नाही. गणित विषयाचा तर कुठेच मागमूस नाही.
झाला दुसरयांदा पाहून. शेवटचे
झाला दुसरयांदा पाहून. शेवटचे गाणेही मस्त आहे. थिएटरला असतो तर ते पुर्ण बघूनच खुर्ची सोडली असती.
मुलीचे शेवटचे स्वगत डायलॉग आवडले. तिच्या आणि आईच्या नात्याला उलगडणारे.
दोघींनी आपापल्या आईबाबत एकच चूक केली असते. शकुंतला देवीने आपल्या आईला नेहमी आई म्हणूनच बघितले असते, एक बाई म्हणून कधीच समजून घेतले नसते. तसेच तिच्या मुलीनेही आपल्या आईला नेहमी एक आई म्हणूनच बघितले असते, तिला एक गणितातली जिनिअस म्हणून कधी समजूनच घेतले नसते.
कथेतील हा भाग मला कोणत्याही स्वत:चे करीअर असणारया आईशी रिलेट होईल असे वाटते. जगाने जे आईने अमुकतमुकच वागावे याचे नितीनियम बनवले आहेत ते तपासून बघायची गरज तेव्हाही होती, आजही आहे.
फार उथळ आहे चित्रपट, गणितं
फार उथळ आहे चित्रपट, गणितं फार कमी आहे
चित्रपटाची चांगली बाजू म्हणजे
चित्रपटाची चांगली बाजू म्हणजे
ऋ म्हणत आहेत, त्याच्याशी सहमत
Drama फारच आहे
Maths वरवर आहे , कौटुंबिक करून टाकलंय पार
Drama फारच आहे
Drama फारच आहे
Maths वरवर आहे , कौटुंबिक करून टाकलंय पार >>> + १००००
विद्याच सतत हसत राहणं आवडलं नाही .
अनु मात्र आवडली . छोटी आणि मोठी . सान्या , सरळ केसांमुळी वेगळीच आणि गोड दिसते .
सामान्य वाटला चित्रपट
सामान्य वाटला चित्रपट
सर्व कुटुंबाबरोबर आज पाहिला
सर्व कुटुंबाबरोबर आज पाहिला.खूप आवडला.वॉर्डरोब सुंदर.सान्या मल्होत्रा सुंदर दिसते, सर्वांचा अभिनय छान जमलाय.
एक पूर्ण सुशील नसलेलं ग्रे पण महत्वाकांक्षी कॅरेक्टर विद्या ने परफेक्ट रंगवलंय.I don't care if it is 100% true or not.
मध्ये मध्ये तुम्हारी सुलू आणि डर्टी पिक्चर ची आठवण येते.
दिलेला मेसेज सुंदरच आहे.
( दुसरं म्हणजे पिक्चर मधले पुरुष टिपिकल दाखवलेले नाहीत.बाकी लिहायला नको.स्पॉयलर नकोत.पण एकदा नक्की बघा.)
घरच्यांसोबत पहिला
घरच्यांसोबत पहिला
जितका वाईट असेल असे वाटले तितका नव्हता पण अनावश्यक लाऊड आणि मसाला भरलेला वाटला
मल्होत्रा गोड दिसलीय
विद्या बालन तुम्हारी सुलु टाईप वाटली, फारच स्टीरिओटाईप अभिनय होत चालला आहे
विद्या बालन तुम्हारी सुलु
विद्या बालन तुम्हारी सुलु टाईप वाटली, फारच स्टीरिओटाईप अभिनय होत चालला आहे
>>>>>>
शकुंतला देवीमध्ये ती जगाची पर्वा न करता बेदकारपणे जगणारी दाखवलीय. हा अॅटीट्यूड डर्टी पिक्चरमधील कॅरेक्टर सोबत जातो.
या उलट तुम्हारी सुलूमध्ये ती स्वप्नाळू पण घरच्यांचा विचार करत त्याला मुरड घालणारी दाखवली आहे. समोरच्या घरात राहणार्या एअर हॉस्टेसबद्दलही ती जे नजरेतून अप्रूप दाखवते ते बोलके आहे.
बाकी शैली म्हणाल तर येस्स. ती प्रत्येक अभिनेत्याची एक असते. दिलीपकुमारपासून ईरफानखानपर्यंत प्रत्येकाची संवादफेकीची एक शैली होतीच. पण त्यामुळे स्टिरीओटाईपचा शिक्का मारणे अन्यायकारक वाटते.
दुसरं म्हणजे पिक्चर मधले
दुसरं म्हणजे पिक्चर मधले पुरुष टिपिकल दाखवलेले नाहीत.
>>>>>
+७८६
दोघी मायलेकींना असे नवरे खरेच मिळाले असतील तर नशीबवान आहेत. नेमक्या प्रसंगात दोघांचे कॅरेक्टरही छान उभारलेत.
वर तुम्हारी सुल्लूचा उल्लेख आलेला. त्यातला नवराही छान होता
अगदीच सामान्य चित्रपट आणि
अगदीच सामान्य चित्रपट आणि बाळबोध मांडणी.
दोघींनी आपापल्या आईबाबत एकच
दोघींनी आपापल्या आईबाबत एकच चूक केली असते. शकुंतला देवीने आपल्या आईला नेहमी आई म्हणूनच बघितले असते, एक बाई म्हणून कधीच समजून घेतले नसते. तसेच तिच्या मुलीनेही आपल्या आईला नेहमी एक आई म्हणूनच बघितले असते, तिला एक गणितातली जिनिअस म्हणून कधी समजूनच घेतले नसते. >> सिनेमानेही तिच चूक केली आहे
फार नाही आवडला. तिकीट नाही पडले म्हणून ठीक.
शकुंतलादेवींना गणिताची दैवी देणगी होती हे जगाला ठावूक होते पण त्याचे करियर करताना येणार्या अडचणी फार त्रोटकपणे मांडल्या. गणितज्ञ ते ज्योतिषी हा करियर बदल एका वाक्यात संपतो. अंकगणित येत असले तरी ज्योतिषी म्हणून काय तयारी लागली असेल? एक मुलगी एकटीने सांभाळून हा करियर बदल कसा केली असेल? नंतर लेखनक्षेत्रात काय अनुभव आले? मुलीच्या व्यवसायात इंव्हेस्टर होताना काय काळजी घेतली असेल? वॉर्डरोब सुरेख म्हणून बघवला. इतका सुरेख की कपड्यांवरून स्थळ-काळाचा अंदाज येतो नाहीतर कथा तशी फारच कोलांट्या घेते...
अंकगणित येत असले तरी ज्योतिषी
अंकगणित येत असले तरी ज्योतिषी म्हणून काय तयारी लागली असेल? ...मला फार कुतूहल होते हे बघायचे प्राइम नाही आता , पण सीमंतिनी तुम्ही म्हणता तसे असेल तर उत्सुकता तितकी राहिली नाही !! गणिताचा प्रतिकूल परिस्थितीत केलेला प्रवास पण फार दाखवला नाही असे दिसतेय, विद्या खूप आवडते अदरवाइज.
पिक्चर मध्ये कोणतीही गीक
पिक्चर मध्ये कोणतीही गीक गोष्ट प्रचंड अतिसुलभीकरण करून दाखवतात आपल्याला माहितीच आहे.ओपन कंस1(ओम ओम ओम ओम केल्यावर एलियन येणे, मिशन मंगल इत्यादी.जास्त टेक्निकल मध्ये घुसले तर प्रेक्षक येणार नाहीत अशी भीती असेल ओपन कंस2(हेच प्रेक्षक मॅट्रिक्स, इनसेप्शन वगैरे आवडीने दुप्पट तिकिटात बघतात ही गोष्ट वेगळी.))क्लोज कंस 1 व 2
आमच्या कडेही असेच मत ऐकू आले .ओपन कंस3('म्हणजे काय? तिने नक्की हे केलं कसं?तिला चमत्कार येतात ओपन कंस4(चाईल्ड प्रोडीजी) क्लोज कंस 4 की वैदिक गणित पटापट शिकून केले?शाळेत गेली नाही तर कशी शिकली?वगैरे प्रश्न.) क्लोज कंस 3
या प्रतिसादात वाचनमूल्य फार नसले तरी सर्वात महान गोष्ट ही की मी सर्व कंस न चुकता बंद केले आहेत.एरवी एखादा उघडाच असतो.
अर्र्... तसं नाही मी_अस्मिता,
अर्र्... तसं नाही मी_अस्मिता, विद्या बालन आवडत असेल तर आवडेल. अल्लड १८-१९ वर्षाची ते वयस्कर स्त्री चांगली उभी केली आहे. आणि कौटुंबिक कथानके आवडत असतील तर आवडेलही. स्त्री प्रधान कथा पालकत्वाच्या भूमिकेतूनच बरेच वेळा सांगितल्या जातात ते मला पटत नाही. 'सरदार', 'गुरू (धीरूभाई)', 'गांधी', इ पुरूषप्रधान कथा असतात तेव्हा पालकत्व दुय्यम असते, त्यांच्या अचिवमेंटस महत्त्वाच्या असतात. असं का?
सिनेमाच्या गोष्टीतही जिनीयस बाईला का तिची अचिवमेंट धड मांडू देत नाही? असले प्रश्न न विचारता "बॉलिवूड है" म्हणून बघितला तर आवडेलही...
जाता जाता - शकुंतला देवी लंडनमध्ये जिथे राहिलेल्या दाखवल्या आहेत - ताराबाई बनारसे - तशा खरंच एक मराठी आजी लंडनमध्ये हॉस्टेल/हॉटेल चालवायच्या. त्यांच्या बद्दल "लंडनच्या आजीबाई" असं एक मराठी पुस्तक फार पूर्वी वाचल्याचं आठवत आहे. ती कथा ही सिनेमा बनवण्यासारखी आहे.
लंडनच्या आजीबाईंवर सिनेमा
लंडनच्या आजीबाईंवर सिनेमा नाही, पण नाटक आलंय.
त्यांच्या बद्दल "लंडनच्या
त्यांच्या बद्दल "लंडनच्या आजीबाई" असं एक मराठी पुस्तक फार पूर्वी वाचल्याचं आठवत आहे. >> त्यावर एक नाटकही आहे ना.
शाळेत गेली नाही तर कशी शिकली
शाळेत गेली नाही तर कशी शिकली?वगैरे प्रश्न.) >> XXL size चा सदरा लागतो काय? उघडाच आहे बरं हा कंस...
नाटकाबद्दल माहिती नव्हती. धन्यवाद.
<<<प्रतिसादात वाचनमूल्य फार
<<<प्रतिसादात वाचनमूल्य फार नसले तरी सर्वात महान गोष्ट ही की मी सर्व कंस न चुकता बंद केले आहेत.एरवी एखादा उघडाच असतो.>>> अनु हे भारिये, पण तुम्ही असे लिहिले म्हणून परत नीट बघितला प्रतिसाद. सगळे कंस नीट बंद केले आहेत पण शेवटचा कंस उघडला कुठे ते कळलेच नाही
Pages