Resin art - coaster for beginners

Submitted by म्हाळसा on 1 August, 2020 - 15:28

मी केलेला पहिला प्रयोग. अख्खे मसाले घालून बनवलेले रेझिन कोस्टर. खाली दिलेली लिंक बघून बनवलंय.

https://youtu.be/XeYIpmmRXPc

F6982E21-408C-4BEE-9761-B2796D375E02.jpeg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

म्हाळसा मस्तच..
मी पण काही काळाने रेझिन मिनिएचर ट्राय करून बघणार आहे..
तुम्ही कोणते रेझिन वापरले??

हो मी 1 - 2 वेळा वापरलय रेझिन मिनिएचर साठी... Happy त्यांचे मोल्डस घेऊन आता बनवायचय.. सध्यातरी राहून गेलंय कारण ते मोल्ड भारताबाहेरून मागवावे लागतात..

मला फोटो दिसत नाहीये.पण युट्युब फिल्म पाहिली.सुंदर आहे.
(दुसऱ्या ब्राऊजर वर दिसला.छान दिसतंय मसाला कोस्टर.थोडे अजून डेन्सीटी ने पण चालले असते का?

sneha1, चिन्नू, mi_anu - प्रतिसादांसाठी धन्यवाद.
mi_anu >> जास्त मसाले घातले असते तर तितकच जास्त रेझिन घालावं लागलं असतं.. मसाले रेझिनवर तरंगायचीही शक्यता दाट असते. म्हणून थोडंसं सुटसुटीतच राहू दिलंय.

छान प्रयोग... मलाही असे प्रयोग करायला खूप आवडतात.
लगेचच हे करून बघावे वाटतं आहे.

खूप छान
तिनी एक ईपॉक्सी रेझिन आणि दुसरं काय अ‍ॅड केलं ते समजलं नाही.
प्लीज सांगणार का?

तिनी एक ईपॉक्सी रेझिन आणि दुसरं काय अ‍ॅड केलं ते समजलं नाही>> ईपॉक्सी रेझिन आणि हार्डनर मिक्स केलंय. दोन्ही गोष्टी १:१ रेशिओ मधे घेतल्यात.

लगेचच हे करून बघावे वाटतं आहे>> नक्की करून बघा. शक्यतो आर्ट रेझिनच वापरा.