कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु झाला, काही काळ गेला आणि हे प्रकरण थोडक्यात आटपणारे नाही हे लक्षात आल्यावर गायक, वादक, कवितावाचन, stand up, स्किट करणाऱ्या कलाकारांचे झूम, फेसबुक वगैरेवर कार्यक्रम सुरु झाले. त्यांना एकूणच tv आणि वेबमधील सर्व मनोरंजनाच्या गोष्टींची तगडी स्पर्धा आहेच. अशा झूम किंवा फेसबुकवरच्या कार्यक्रमांच्या जाहिराती पुष्कळ पाहिल्या पण एकही कार्यक्रम बघण्याची फारशी उत्सुकता नव्हती.
त्यातच लेखक - तेजस रानडे , संकल्पना आणि दिग्दर्शन - हृषीकेश जोशी यांची नेटक उर्फ online live नाटक याची जाहिरात पाहिली. नेटकं \ नाटकाचे नाव मोगरा. नाटक सादर करणारे ५ कलाकार ( सर्व स्त्रिया ) त्यांच्या त्यांच्या जागी राहून काम करणार आणि प्रेक्षकांना ते online बघता येणार. यात एक विशेष म्हणजे नाटकाचे सादरीकरण एकेक शहरासाठी म्हणूनच असेल, तुम्ही तुमच्या शहरातल्या नेटकाचेच तिकीट काढायचे, ते बघण्यासाठी तुम्हाला online link पाठवली जाणार आहे.
ही कल्पना , नेटक हे नाव आणि हृषीकेश जोशी ( माझ्या अभिरुचीला) आवडतो, ज्याच्याकडून काही अपेक्षा कराव्यात असा वाटतो म्हणून या सर्व प्रकाराबद्दल उत्सुकता आहे. आमच्या शहरात १६ ऑगस्टला हे नेटक दिसणार आहे. कलाकारांपैकी वंदना गुप्ते आणि स्पृहा जोशी माहीत आहेत, इतर ३ बायका माहीत नाहीत. प्रोमो आणि जाहिरातींचे जे विडिओ बघायला मिळाले त्यात लेखक, दिग्दर्शक एका वाक्यापुरतेसुद्धा दिसले नाहीत. ५ कलाकार स्त्रिया फक्त बोलत होत्या, त्यातल्या १,२ उगीच लाडे लाडे प्रकारातल्या वाटल्या.
या नेटकाबद्दल 'मोगरा ही बाईपणाची कहाणी असून जगण्याकडे सकारात्मकतेने पाहण्याचा एक रंजक प्रयत्न आहे' अशी एका वाक्यात माहिती मिळाली. यात रंजक प्रयत्न हा भाग छान वाटलं तरी बाईपणाची कहाणी वगैरे वाचून, या नावाखाली नाटक सिनेमामध्ये जे जे काही Cliché असतात तेच पुन्हा बघायला लागणार या कल्पनेने पोटात एकदम खड्डा पडला ( बाई असूनसुद्धा). तरी हृषीकेश जोशी असल्याने काहीतरी हटके असेल अशी आशा आहे, तसेच अशा स्वरूपात नाटक करायचे म्हणजे संहितेवर बंधने असतील, तर ते सगळं कसं काय केलंय याची उसुकता असल्याने हे नेटक बघणार आहेच. पण एकूण परीक्षण किंवा तत्सम काही कुठे वाचायला मिळाले नाही.
माबोकरांनी कोणी पहिले आहे का, काही अजून माहीती आहे का ? पहिले असल्यास एकूण review कसा काय ?
माझ्या आतेबहिणीने पाहिलंय. ती
माझ्या आतेबहिणीने पाहिलंय. ती तरी म्हणाली की छान झाला प्रयोग. पण सविस्तर रिव्ह्यू विचारते आणि सांगते इथे.
शनिवारी कुठल्यातरी मला आत्ता
शनिवारी कुठल्यातरी मला आत्ता आठवत नाही पण ह्रुषिकेश जोशीची मुलाखत झमवरून होती सोनाली, प्रतिमा कुळकर्णी, श्रीरंग गोडबोले वा नी प्रश्न विचारले छान सगळी माहिती सांगितली.......
https://youtu.be/bAmKvbfbMeE
धन्यवाद वावे आणि मंजूताई
धन्यवाद वावे आणि मंजूताई
मी विचारलं बहिणीला. तिने
मी विचारलं बहिणीला. तिने कथानकही साधारण सांगितलं, पण तुम्ही बघणार असलात तर उगाच स्पॉइल नको करायला म्हणून नाही सांगत. पण एकंदरीत छान प्रयोग आहे वेगळा आणि चांगलं आहे नाटक नक्कीच.
पेपरमध्ये स्पृहा जोशीने
पेपरमध्ये स्पृहा जोशीने याबद्दल लिहिलं होतं ते वाचलं. असं नाटक पचनी पडणं थोडं कठीण आहे. आपलं इंटरनेट आणि काम करणाऱ्या कलाकारांचं इंटरनेट दोन्ही पूर्ण वेळ व्यवस्थित चालायला पाहिजे. पेपरमध्ये तीन अभिनेत्री बघितल्या, भार्गवी, स्पृहा आणि वंदना गुप्ते, बाकीच्या दोंघींची नावं कळली नाहीत. हृषीकेश जोशी करतोय म्हणजे चांगलंच असणार.
अभिषेक बच्चनने या नाटकासाठी हृषीकेशला ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या. ब्रीदच्या वेळी अभिषेक आणि हृषीकेश यांची मैत्री झाली.
नाटकासाठी आपण जेव्हडी माणसं जातो तेव्हडी तिकिटं काढतो. ऑनलाईन हे नाटक एका वेळी कितीजण बघू शकतात. त्यावर त्यांनी अंकुश कसा ठेवला आहे की तसं काही नाही.