सर्वांना नमस्कार!
परभणीमध्ये गेल्या महिन्यामध्ये विद्यापीठाचा परिसर नुकताच मॉर्निंग वॉक व रनिंग करणा-यांसाठी खुला केला होता. तेव्हा खूप दिवसांनी तिकडे रनिंग चालू केलं. लॉकडाउनच्या काळात सायकलिंग बंद होतं. त्यामुळे त्या दिवसांमध्ये अंगणामध्येच आठवड्यातून दोन- तीनदा टायमर लावून रनिंग करत होतो. परिस्थिती काही काळ ठीक झाल्यावर रोडवर थोडे दिवस सायकलिंग केलं आणि विद्यापीठाच्या परिसरात रनिंग करण्याचा आनंद घेतला न घेतला तोच घरासमोरच कंटेनमेंट झोन आला. सरकारचे नियम काहीही असले तरी परिस्थितीचं गांभीर्य समजून घेऊन काळजी घेणं प्रत्येकाचं काम आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या संदर्भात काळजी घेण्याच्या उद्देशाने घराबाहेर पडणं बंद झालं. परत एकदा अंगणामध्येच रनिंग सुरू केलं. पण पावसामुळे अंगणात चिखल झाला होता व पावसाळी किडे (पैसे) पायाखाली येत होते. त्यामुळे गच्चीमध्ये रनिंग सुरू केलं. लॉकडाउनच्या काळात इनडोअर रनिंग आणि इनडोअर वॉक्स + कोअर स्ट्रेंदनिंग + योग हे व्यायाम करत होतोच.
२२ जूनपासून एक गोष्ट सहज ठरवली की, शक्य तितकं रोजच्या रोज रनिंग करायचं. माझ्यासाठी रोज रनिंग ही गोष्ट अजिबात सवयीची नव्हती. शक्यतो दोन दिवसाआड म्हणजे आठवड्यातून दोन- तीनदा रनिंग करणं हेच मला सोपं वाटत होतं. पण २२ जूनपासून मनात आलं की, रोज रनिंग करावं. फक्त गच्चीमध्ये रनिंग करताना दर पंधरा पावलांनंतर यू- टर्न असल्यामुळे स्लो रनिंग होतं आणि अंतर कमी भरतं. बाहेर पळताना ६ मिनिटांमध्ये १ किमी असा पेस असेल तर घरी पळताना यू- टर्न्समुळे वेग कमी होतो व १ किमीसाठी साधारण साडेसहा मिनिट लागतात. त्यामुळे त्या हिशेबाने जास्त वेळ पकडून रोज ४० मिनिट म्हणजे साधारण ६ किमी असं रनिंग गच्चीत सुरू केलं होतं. बंदिस्त जागेतल्या रनिंगबद्दल लोकांना शंका असतात. पण माझा अनुभव होता की, ४२ किमी मॅरेथॉन पळाल्यानंतरही इनडोअर रिकव्हरी रन केला होता अर्धा तास. तेव्हा पाय मोकळे झाले होते. शिवाय बंदिस्त जागेत पळतानाही तितकाच घाम येतो व थकायला होतं. त्यामुळे असे रनही रन असतात हे माहिती होतं. शिवाय स्लो रन हे रनिंगमधलं एक महत्त्वाचं व्हेरिएशन आहे हेही माहिती होतं. असे रन सुरू केले. मोबाईलमध्ये टायमर लावून व गाणी ऐकत रनिंग करत गेलो. त्याबरोबरच बाकी व्यायामही आलटून पालटून करत होतो- घरात व अंगणात वॉकिंग + योग प्राणायाम + स्ट्रेंदनिंग असे.
आणि एक एक दिवस उलटत गेला आणि हळु हळु रोज रनिंग करण्यामध्ये मनात जी भिती होती किंवा जो अडथळा होता तो दूर होत गेला. पहिले १५ दिवस रोज ४० मिनिटच पळत राहिलो (म्हणजे साधारण ६+ किमी) आणि पंधरा दिवसांचं सातत्य व आत्मविश्वास आल्यानंतर रोज ५३ मिनिट म्हणजे ८ किलोमीटर रनिंग चालू केलं. अर्थातच पायांवर ताण पडू नये म्हणून दिवसातून दोनदा स्ट्रेचिंग आणि पायाची काही आसनं करत राहिलो. त्यामुळे एखाद्या वेळेस पाय थोडे दुखले तरीही मोकळे होत गेले. आज रोजच्या रनिंगला १ महिना पूर्ण झाला व गेल्या ३१ दिवसांमध्ये रोज रनिंग करत आज २१० किलोमीटर पूर्ण झाले! ह्याआधी मी एका महिन्यात जास्तीत जास्त १७ दिवस पळालो होतो व २०१९ ह्या पूर्ण वर्षामध्ये ६१० किलोमीटर पळालो होतो. त्या तुलनेत गेल्या ३१ दिवसांमध्येच २१०! मुख्य म्हणजे आता रोज रनिंग करताना रनिंगचा नवीन आनंद मिळतो आहे. पाय खूप मोकळे झाले आहेत. रोज रनिंग म्हणजे वॉकिंगला रनिंगमध्ये न धरता केलेलं रनिंग. त्याबरोबर अर्थातच रोज ४-५ किलोमीटर वॉकही करत गेलो. आणि शक्यतो रनिंगच्या आधी ११ मिनिट म्हणजे साधारण १ किलोमीटर असा वॉर्म अप वॉकही करत राहिलो. इतकं वॉकिंग करत राहिल्यानेही पाय मोकळे राहिले असतील.
Check out my 8.4 km Run on Strava: https://www.strava.com/activities/3798874385?utm_source=com.google.andro...
माझे रनिंग, सायकलिंग, ट्रेकिंग व मेडीटेशनचे अनुभव इथे उपलब्ध- www.niranjan-vichar.blogspot.com
४.५ किलो वजन कमी
वजन कमी करायचं हा हेतुच मनात नव्हता. कारण एखाद्या टारगेटसारखं वजन कमी करण्यापेक्षा वजन कमी असलेली जीवनशैली जास्त महत्त्वाची असते. त्यामुळे तसा विचार मनात नव्हताच. पण ५९.५ किलो असलेलं वजन रोजच्या रनिंगमुळे महिन्याभरात साडेचार किलो कमी झालं आहे. आणि रोजच्या रनिंगचा परिणाम म्हणजे पोटाची अपचनाची तक्रार कमी झाली आहे. आणि आता रनिंग खूप जास्त सोपं झालं आहे. असंच पुढे करता आलं तर सायकलिंग जितकं सहज वाटतं, काहीसं तसं रनिंग सोपं होत जाईल. रनिंग रोज करण्यामध्ये जो मानसिक अडथळा होता, तो दूर झाला. रनिंगचं हे सातत्य माझ्या बाबतीत खूप समाधानकारक आहे! इनडोअर रनिंग किंवा बंदिस्त जागेतलं रनिंग हा एक चांगला पर्याय आहे. बाहेरच्या निसर्गरम्य भागातल्या रनिंगची "जागा" तो घेऊ शकत नाही हे खरंच. पण तरीही अगदीच गॅप पडण्याच्या ऐवजी रनिंग चालू राहतं हेही खूप आहे. फक्त बंदिस्त जागेत जीपीएस काम करत नाही व दर अर्ध्या किलोमीटरने मिळणारे app चे अंतराचे अपडेटस कळत नाहीत. म्हणून हे रनिंग साग्रसंगीत म्हणजे १० किंवा १५ गाणी व टायमर लावून करता येऊ शकतं.
आज काल खूप जण सायकलिंग किंवा रनिंग हेसुद्धा एक प्रोफेशनल टारगेट असल्यासारखे धाव घेताना दिसतात. ऑफिसच्या कामात जशी आकड्यांची डेडलाईन असते तसं टारगेट ठेवल्यासारखे काही जण सायकलिंग किंवा रनिंग करताना दिसतात. पण ह्यापेक्षाही प्रोसेस एंजॉय करणं, त्या प्रोसेसमध्ये नवीन गोष्टी शिकत राहणं हे जास्त महत्त्वाचं. आणि योग्य प्रोसेस करत गेलो की, आपोआप खूप काही शिकायला मिळत जातं. आणि स्पर्धा असेल तर ती स्वत:सोबत असावी व स्वत:च्या सातत्यासोबत असावी.
आपल्यापैकी जे जण सुरक्षिततेचे नियम तोडत नाहीत आणि व्यायाम करताना सोशल डिस्टंसिंग बाळगतात त्यांनाच Kudos. आपण सर्वांना Happy and safe fitness. करायचे असतील तर घरामध्येही भरपूर व्यायाम करता येतात. त्यासाठी सर्वांना शुभेच्छा. हे वाचल्याबद्दल धन्यवाद.
- निरंजन वेलणकर
माझे रनिंग, सायकलिंग, ट्रेकिंग व मेडीटेशनचे अनुभव इथे उपलब्ध- www.niranjan-vichar.blogspot.com
फारच छाम न
फारच छान
गाणी ऐकत चाललं किंवा रनिंग केलं तरी ते जाणवत नाही. मस्त वाटतं हा माझा अनुभव आहे.
फारच छान... प्रेरणादायी वाटले
फारच छान... प्रेरणादायी वाटले.
छान लेख.
छान लेख.
गाणी ऐकत चाललं किंवा रनिंग केलं तरी ते जाणवत नाही. मस्त वाटतं हा माझा अनुभव आहे.>+१
मीही कोरोनामुळे घरातच चालायला सुरूवात केली. बाहेर ओळखीचे लोक समोर आले कि मास्क काढून बोलायला लागतात.
फारच छान.
फारच छान.
सर्वांना धन्यवाद!
सर्वांना धन्यवाद!
खरच प्रेरणादायी आहे.
खरच प्रेरणादायी आहे.
कोरोनाच्या अगदी सुरवातीच्या
कोरोनाच्या अगदी सुरवातीच्या दिवसात एका पठ्ठ्याने बाल्कनी मध्ये धावून पूर्ण मॅरेथॉन इतके अंतर (42km)धावल्याचे वाचले होते.
लोकडाऊन च्या सुरवातीच्या आठवाडयात बऱ्याच जणांनि घरी धावायला सुरवात केली होती.
पण छोट्या अंतरात शार्प टर्न घेणे गुडघ्यांना त्रासदायक ठरू शकते. त्यात आधीपासून काही इंज्युरी किंवा कंडिशन असल्यास (जसे फ्लॅट फूट किंवा धावताना पाऊल वळलेले पडणे) तर त्रास होण्याची शक्यता खूप वाढते.
त्यामुळे घराच्या घरी धावून आपण आपल्या व्यायामात खंड पडू देत नाही आहोत असे समाधान मिळत असले तरी असे धावणे टाळणे इष्ट.
त्यापेक्षा कोअर स्टेंग्थ वाढवण्याचा व्यायाम, अगदी जोर/बैठका, इनडोअर सायकल, शक्य असल्यास जिने चढणे, दोरीच्या उड्या लवचिक पणा वाढवण्यासाठी योगासने वगैरे व्यायाम करावेत
पहिल्याच दिवशी सलग 40 मिनिट
पहिल्याच दिवशी सलग 40 मिनिट धावणे सवय असल्या शिवाय शक्य नाही
मी वॉकिंग करतो 1 तास 11 मिन मध्ये 1 किलोमीटर.
पण 5 ते 7 मिन पेक्षा जास्त वेळ सलग धावले की दम लागतो.
मार्गी छान प्रेरणादायी
मार्गी छान प्रेरणादायी लिहिलंय.
हेमंत , 1 तास 11 मिन मध्ये 1 किलोमीटर. काहीतरी घोळ होतोय.
त्यांना म्हणायचे आहे कि ते एक
त्यांना म्हणायचे आहे कि ते एक तास वॉकिंग करतात... त्यांचा वेग एक किलोमीटर ला अकरा मिन आहे...
बरोबर 11 मिनिटात 1 किलो मीटर
बरोबर 11 मिनिटात 1 किलो मीटर
त्यांना म्हणायचे आहे कि ते एक
त्यांना म्हणायचे आहे कि ते एक तास वॉकिंग करतात... त्यांचा वेग एक किलोमीटर ला अकरा मिन आहे...>> आता कळले मला
1 तास 11 मिन मध्ये 1 किलोमीटर.>> वाचून वाटले किती हळू चालत असतील! मग आमच्या गल्लीतले एक आजोबा आठवले ९०+ वय होते त्यांचे. अतिशय हळू चालत असत. पण रोज न चुकता सकाळी फिरायला जायचे. तसे असेल म्हणून नाही विचारले.
ओह च्रप्स , असं होय. पण मग ते
ओह च्रप्स , असं होय. पण मग ते वाक्यात अर्धविराम, कॉमा असं काहीतरी हवं ना. असो. सोनलिस्ट भारी थिंकिंग :-
प्रतिक्रियांबद्दल सर्वांना मन
प्रतिक्रियांबद्दल सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद!
@ सिम्बा सर, तुमचा रिप्लाय इथे बघून भारी वाटलं! हो, एकाने तर अल्ट्राही बाल्कनीत केल्याचं वाचलं होतं. तुम्ही म्हणताय ते खरंय. पण मी पळताना 8 शेपचे लूप्स घेतो, म्हणजे दोन्ही साईडने टर्न्स घेत राहतो. आणि सवयीने पाय चटकन वळतात. तितका त्रास होत नाही. आणि असं रनिंग हे केवळ एक प्रकारचा पर्याय म्हणून आहे फक्त. स्लो रनिंगचा एक प्रकार. आणि पाय वाकडा पडण्याचा धोका बाहेरही काही खडबडीत पॅचमध्ये/ दगडयुक्त रस्त्यावर असतोच. तुम्ही म्हणालात ते स्ट्रेंदनिंग योग हे करतोच.
@ हेमंत ३३ सर हो, मी रनिंग आधीपासूनच करतो. फक्त बंदिस्त जागेत मोठं अंतर करायला मानसिक पातळीवर कठीण जात होतं म्हणून सुरुवातीला ४० मिनिट हा टप्पा ठेवला होता. ग्रॅज्युअली तुम्हीही जास्त वेळ रनिंग करू शकाल. माझे सुरुवातीपासूनचे रनिंगचे अनुभव https://www.maayboli.com/node/68781 इथे लिहिले आहेत सविस्तर. धन्यवाद.
छान लेख
छान लेख
फारच छान लिहीलत. मीही
फारच छान लिहीलत. मीही सुरुवातीला हॉलमध्ये १० वगैरे केले. पण फार कंटाळवाणे होऊ लागले. आणि सिम्बा म्हणतात त्याप्रमाणे डाव्या तळपायात किंचीत दुखतय असं वाटल्याने बंद केले.
मग जीने चढणे आणि बाकी व्यायाम.
अजुनही रस्त्यावर दोनच वेळा गेले आहे.
आज काल खूप जण सायकलिंग किंवा रनिंग हेसुद्धा एक प्रोफेशनल टारगेट असल्यासारखे धाव घेताना दिसतात. ऑफिसच्या कामात जशी आकड्यांची डेडलाईन असते तसं टारगेट ठेवल्यासारखे काही जण सायकलिंग किंवा रनिंग करताना दिसतात. <<<<< ++++ ११११ ह्याचे फारच मजेशीर अनुभव आल्याने एकटेच पळणे आवडते.
घरातल्या घरात / गच्ची वर
घरातल्या घरात / गच्चीवर धावणे टाळावे हे बरे!
लॉकडाऊन मधे माझे धावणे जवळपास बंदच झाले होते. आता परत हळू हळू सुरु करत आहे. श्रावण महिनाभर रोज ५ किमी करायचे असे ठरवले आहे. बघू कसे काय जमते ते.
धावताना किंवा वेगात चालताना
धावताना किंवा वेगात चालताना पाय कसे पडायला हवेत .
टाचेवर वर जास्त भार हवा की पायाच्या पुढच्या भागावर.
की सपाट पाय पडायला हवेत.
काय योग्य आहे.
जिथे जमीन खालीवर आहे तिथे गुडघा दुखवण्याची जास्त शक्यता असते किंवा वळण घेताना गुडघा दुखावू शकतो.
सपाट चप्पल खालून वेगात चालेले की माझा पाय घोट्यात दुखतो हा माझा अनुभव आहे.
@ धनश्री जी, अच्छा! आपल्या
@ धनश्री जी, अच्छा! आपल्या रनिंगला शुभेच्छा!
@ हर्पेन जी, तसेही इनडोअर/ बंदिस्त जागेत पळणारे दुर्मिळच! सो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.
@ हेमंत ३३ जी शक्यतो रनिंगचं पोस्चर वॉकमधूनच डेव्हलप होत जातं. सुरुवातीला अनेक जण पूर्ण पाय फ्लॅट टेकवूनच पळतात. नंतर सुधारणा करू शकतात. चपलेनं पळताना पाय दुखू शकतो. त्यामुळे किंचितसा सैल शूज असेल तर चांगलं. सवयीने अशा ट्रॅकचं जजमेंट येत जातं. आपल्या रनिंगला शुभेच्छा!
धन्यवाद
धन्यवाद