New OCI/OCI Renewal करून घेणे, त्यातल्या समस्या, उपाय व अतिरिक्त माहीती...

Submitted by परदेसाई on 15 January, 2020 - 11:40

https://ociservices.gov.in/welcome

इतरत्र असलेली OCI Renewal माहीती एकत्रित करून ठेवलेली आहे....
Submitted by परदेसाई on 22 October, 2019 - 09:46
पुनश्च OCI....
या वर्षी भारतात सुट्टीसाठी जाणार्‍या बर्‍याच (OCI असलेल्या) लोकांना विमानतळावरून परत पाठवले गेले अशी बातमी आहे.
कालच एका जवळच्या मित्राच्या भाचीला ही परत पाठवले गेल्याचे तो सांगत होता, तेव्हा खरे असावे.
मुळ नियमः OCI आयुष्याची वीस वर्षे पूर्ण होण्या आधी घेतले असले तर २० वर्षे पूर्ण झाल्यानंतर किंवा....
५० वर्षे पूर्ण होण्याआधी घेतले असले तर ५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर, OCI Renew करणे गरजेचे आहे.
.... Part-B
१. हा नियम पहिल्यापासूनच आहे पण त्याची अंमलबजावणी होत नव्हती.
२. भारतात Immigration Officer ला विचारले असता, कशाला आजून पैशे खर्च करताय? असे उत्तर ३/४ वर्षांपूर्वी मिळाले होते.
३. अजूनही भारतात Immigration Officer ने या डिसेंबर मधे अडवले नाही..
४. ज्या लोकाना विमानतळावरून परत पाठवले गेले , त्याना विमान कंपन्यानी परत पाठवले (असावे).
५. सध्या हा नियम १ जून २०२० पर्यंत शिथील करण्यात आलेला आहे अशी बातमी वाचली (पण पुन्हा हा प्रश्न येणारच आहे).
६. OCI चा गोंधळ नको म्हणून On -Arrival Visa Online घ्यायला किमान ४ Business days द्यावे लागतात.
७. OCI Renew साठी Online Site आहे, पण ती नीट चालत नाही... (गेल्या ४ वर्षात ३/४ प्रयत्न करून सोडुन दिले आहेत).
OCI Renewal..
१. Part-A, Photo/Image Upload, Part-B अश्या तीन Steps आहेत.
२. प्रयत्न सुरू करण्यापूर्वी आपल्या घरातल्या सगळ्यांचे पासपोर्ट, सगळ्यांचे OCI, आणि सगळ्यांचे जुने भारतीय पासपोर्ट हाताशी ठेवा.
३. Part-A केव्हाही भरता येतो. तो भरल्यानंतर मिळालेला Temporary ID जपून ठेवा.
४. Photo/Image Upload इथे सगळ्यात मोठी गोची आहे. Photo/Image वर बरेच नियम आहेत. (Pizel size, aspect Ration, file size) इत्यादी. हे सगळे करूनही जवळपास २ तास घालवले तरी Photo/Image Upload होत नव्हती. याच कारणासाठी मी प्रयत्न सोडला होता.
५. सगळे काही ठिक असूनही, Submit केले तर पुन्हा Photo/Image Upload पान परत येते, आणि एकही Error message दाखवला जात नाही (तुम्ही गाढव आहात, तुमचा Photo चुकीचा आहे, फालतूगिरी करू नका, आम्ही झोपलो आहोत असले काहीही नाही).
६. Internet वर बर्‍याच लोकांनी प्रश्न विचारले आहेत, पण कोणत्याही साईटवर त्याचे नीट उत्तर नाही.
७. एका ठिकाणी उत्तर मिळाले.. ( भारतात Business Hours असतील तेव्हाच Photo/Image Upload करता येते)...
८. आज इथे अमेरिकेत पहाटे ५:५० ला Photo/Image Upload झाली.
९. Part-B आज सुरू केला आहे. ८ वाजता प्रयत्न केला पण पुर्ण झाला नाही. कदाचित भारतात Business Hours असतील तेव्हाच होणार असेल. उद्या पहाटे परत करून बघणार आहे.
....
....
Internet वर अशी साईट (फक्त Business Hours मधे चालणारी) बघितली नव्हती.. ..
आणि असली तरी 'We are sleeping , come tomorrow,' किंवा 'कल आना' असा Message द्यायला काय होते कळत नाही....
असो.. 'मेरा भारत महान..' असल्याने पुढे प्रयत्न करण्यात येतील...
...
याचा कुणाला उपयोग झाला तर झाला म्हणुन लिहीले आहे.. आणि तुम्हाला काही आतल्या गोटातून माहिती मिळाली असेल तर मला सांगा म्हणजे माझाही त्रास / त्रागा कमी होईल...
Submitted by सुनिधी on 6 January, 2020 - 13:16
मी मागच्या वर्षात दोन वेळा हे उद्योग केले होते. आता मागच्या १-२ महिन्यांत प्रोसेस पुन्हा बदलली आहे. मेधा म्हणते तसे आता सुरूवातीलाच ओरिजिनल ओसीआय पाठवावे लागते. पूर्वी अ‍ॅप्लाय करताना फक्त कॉपीज पाठवून अगदी नंतर ओरिजिनल पाठवावे लागे व त्यानंतर दोन आठवड्यात नवीन ओसीआय येत होते. माझा दोन्ही वेळचा अनुभव असा होता की ही प्रोसेस किचकट आहे पण सीकेजीएस शी संपर्क करून सर्व शंकांबद्दल कन्फर्म माहिती काढून केले की व्यवस्थित होते. सीकेजीएसचे मेल ला उत्तरे देण्याबद्दल आणि फोनवरही माहिती देण्याबद्दल अनुभव चांगले आहेत.
https://www.in.ckgs.us/resources/pdf/Press%20Release%20OCI%20Reissuance.pdf
https://boi.gov.in/content/overseas-citizen-india-oci-cardholder
या पानावर नोट सेक्शन मधला १ बघा.
OCI card holders shall now be given Immigration clearance on the strength of their valid forign passport and OCI Registration Certificate (OCI booklet, popularly known as OCI card).

दर वेळी पासपोर्ट बदलला म्हनुन re-issue ची गरज नाही. (exception 20 and 50 age)

भारतीय पासपोर्ट सरेंडर केला तरी, तो पासपोर्ट लागतो? <<< नाही...
पण विचारलेले प्रश्न इतके संदिग्ध आहेत, की कळत नाही.... उदा...
Did you have Dual Nationality...?
इथे Except India विचारलेले नाही. त्यामुळे मी आधी हो म्हटले.. म्हणुन पासपोर्ट नंबर विचारला.... मी घाबरून जाऊन जुना पासपोर्ट शोधला.
नंतर मी विचार करून 'नाही' म्हणालो..

एका ठिकाणी OCI Reference No. विचारला (तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा)... आता OCI Reference No. कुठे सापडला नाही.
(12 Alpha Numeric) मग मी File No. वापरला... जो १२ अक्षरांचा होता...

असल्या भानगडी बर्‍याच आहेत.. त्यामुळे गोंधळ उडतो...

चला... आता १ भाग पूर्ण झाला....
आता in.ckgs.us वर इतर मारामारी करू...
अर्ज Online भरा. मग एक Web Reference दिला जाईल.. तो जपून ठेवा.
आता बर्‍याच गोष्टी छापुन ठेवायला लागतील...
१. म्हणजे Affidavit in Lieu of Originals.. हे नोटरी समोर सही करून घ्यायचे आहे.. त्यात US passport copy पाठवतो/ते असे म्हटले आहे.
२. २ फोटो
३. Address Proof म्हणुन Driving License ची कॉपी.
४. CKGS ने दिलेला Payment Receipt Number/Web reference No
५. मनिऑर्डर/ बँकर चेक...
६. Fedex Label... कागद पाठवताना Fedex पाकिटावर लावायचे आहे.
७. CKGS label ... कागद पाठवताना Fedex label वर लावायचे आहे.
शिवाय...
१. OCI Renew चा छापील अर्ज सही करून..
२. OCI चे पहिले आणि शेवटचे पान कॉपी आणि सही करून.
३. Passport ची कॉपी सही करून..
४. Original OCI हे ही पाठवायचे आहे...

यात Copy केलेल्या सगळ्या कागदांवर Self Attestation म्हणून सह्या करायच्या आहेत..
Fedex ची दोन लेबल सोडता बाकी सगळे Fedex पकिटात भरून Fedex वाल्याकडून लेबलं लाउन पाठवण्याचा विचार आहे..

Submitted by परदेसाई on 7 January, 2020 - 16:23

मॅरेज सर्टिफिकेटही असेल लिस्ट मधे <<< ते फक्त भारतीय नवरा , अभारतीय बायको किंवा अभारतीय नवरा भारतीय बायको यांच्या साठी आहे..

मनिऑर्डर साठी... Cox & Kings Global Services USA LLC असा Recipient असणे आवश्यक...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अर्ज पोहोचल्यावर CKGS हे अर्ज पोहोचल्याचे Email + Text Message ने कळवले.
त्यानंतर Your Application has been ‘Processed’ at the CKGS Application Center and 'In Transit' to the Consulate हे ही आले.
काल.... Application is ‘Under Process’ at the Consulate... पूर्ण.. हे झाल्यावर २/४ दिवसात OCI येते म्हणतात..

अजून एक...
मुलगा/मुलगी जर २० वर्षांखाली असताना OCI काढले, आणि आता २१-२४ चे झाले पण पासपोर्ट नंबर बदललेला नाही, तर Renewal करता येत नाही.
तोच नियम मोठ्यांसाठी... ५० वर्षांखाली असताना OCI काढले, आणि आता ५१-५९ चे झाले पण पासपोर्ट नंबर बदललेला नाही, तर Renewal करता येत नाही...
त्यासाठी पासपोर्ट बदलेपर्यंत थांबावे लागते... (CKGS करून फोनवर मिळालेली माहीती)...

धन्यवाद. २० नंतर पापो. बदलेतोवर रिन्यु करता येणार नाही पण प्रवास करता येईल ना?

>>बहुतेक काम पूर्ण झाले.. CKGS ने OCI मला पाठवल्याचे म्हटले आहे..<<
नेमका मेसेज काय आहे? मला खालील टेक्स्ट आला, पण सिकेजिएसच्या वेब्साइट वर ट्रॅक केलं तर अजुन काहि स्टेजेस बाकि आहेत. सॉर्टिंग हि जवळपास मधली स्टेज आहे...

OCI Card has reached CKGS sorting facility where it is being processed for delivery

परदेसाई अभिनंदन.
पहिली पायरी ऑनलाईन फॉर्म भरायचा ना? जमल्यास तो दुवाच हेडरमधे द्याल का? म्हणजे सरळ तिथे जाता येईल.

२० खालील मुलांचा पापो बदलला तर ओसिआय परत काढायचा नियम (टेंपरवारी)एंट्रीला शिथिल केलाय. भारतात एक्झिटला पण काउंटरवर जाऊन इमिग्रेशन करतात आणि त्यावेळी तो हापसर काहीतरी करायला सांगतो असं ऐकलं.
इ-व्हिसा २५ डॉ. मध्ये मिळतो आणि घर बसल्या मिळतो. त्यामुळे मुलं घरातील कुत्री मांजरी सगळ्यांचा इव्हिसा काढाच.
मी यापुढे मुलांचा कदापि ओसिआय काढणार नाहीये. २० च्या पुढे गेली आणि मला त्यांना भारतात घेऊन जायची फारच खाज आली/ माझ्या मातृभूमीची आस फारच उफाळून आली तर एकदा खटपटी करून फार तर त्यांना ओसिआय काढून देईन. मग त्यांना काय करायचे ते करतील. तो पर्यंत माझी ५० आली असेल. मग मलाच परत काढावा लागेल.
रम्य ती एंबसी!

Your OCI Card picked up by FedEx.

Your AWB Number is .........
आता हे सोमवारी पोहोचेल असे फेडेक्स म्हणते..

https://ociservices.gov.in/welcome इथे अर्जाची सुरूवात करायची..

नविन ओसिआय घरी आल्याची बातमी आली. कागदपत्रं मंगळवारी ड्रॉप केली होती, म्हणजे ५ बिझ्नेस डेजच्या आत सिकेजिएसने काम कंप्लिट केलं. ब्रावो!

सीकेजीएसनी ३ दिवसात काम पुर्ण करुन एम्बसीला पाठवले व जुलै ३ ला (मागील शुक्रवार) ' प्रोसेस अ‍ॅट एंबसी' स्थितीत गेले आहे व अजुनही तसेच आहे. आशा आहे पुढील आठवड्यात काम पुर्ण होईल. (मागच्या वेळेस त्यांनी घोळ केला होता व ७ महिने लावले होते म्हणुन जरा भिती वाटते). पण आता अर्जदाराला टप्पे कळवायची व्यवस्था खूपच चांगली आहे.
डिसेंबरमधे तिकीट आहे तरीही प्रवास करता येईल ही आशा नाही पण डिसेंबर पर्यंत "जुन्या पासपोर्ट बरोबर जुने ओसीआय चालेल" असे वेबसाईटवर लिहिले आहे. (मी तरीही कन्येचे पाठवले आहे म्हणा).

परदेसाई व राज, तुमचे कुठे पाठवले होतेत?

ओके. थँक्स.
आमचं सॅन फ्रा. आहे. तिथे ६० दिवस लागतील लिहीलंय त्यामुळे वेळ लागेल बहुधा.

OCI चे payment अजूनही मनीआॅरडरनेच करावे लागते का? Online payment नाही करता येत का?

१८ वर्षाखाली हो.
मुलाचा पासपोर्ट बदललेला त्याचा परत ओसिआय करायची ताकद न्हवती तर ऑनलाईन व्हिसा काढून गेलेलो. मुंबईला उतरल्यावर व्हिसा दाखवला आणि ओसिआय आहे हे ही सांगितलं. तो ऑफिसर म्हणाला की व्हिसा काढलात बरं केलंत. आम्ही एंट्रीला जुन्या पापो चं ओसिआय अलाऊ करतो पण एक्झिटला अडकवतो. आणि मग तुम्हाला पैसे भरायला लागतात. तो त्रास वाचेल तुमचा. Biggrin

मुलाचा पासपोर्टचे नूतनीकरण झाले की परत नवीन oci कार्डसाठी दाखला द्यावा लागतो का?

>>>>
नाही. धाग्यामधिल हा भाग पहा.
************
https://www.in.ckgs.us/resources/pdf/Press%20Release%20OCI%20Reissuance.pdf
https://boi.gov.in/content/overseas-citizen-india-oci-cardholder
या पानावर नोट सेक्शन मधला १ बघा.
OCI card holders shall now be given Immigration clearance on the strength of their valid forign passport and OCI Registration Certificate (OCI booklet, popularly known as OCI card).

दर वेळी पासपोर्ट बदलला म्हनुन re-issue ची गरज नाही. (exception 20 and 50 age)
************

तसेच
https://ociservices.gov.in/
इथे FAQ मधिल १६ नं वाचा.

यावर पुर्वी चर्चा झाली आहे इथेच. हा धागा वाहता नको होता.
मी दोन वेळा minor मुलाचा जुना पासपोर्ट , नवा पासपोर्ट , OCI card असा प्रवास केला काहि problem आला नाही. Mumbai airport.

फी करता मी कॅशिअर्स चेक पाठवला.
टवणे, १८ च्या आत मुलांचे ओसीआय बदलावे लागते. (सध्या ३१ डिसेंबरपर्यंत जुन्या पासपोर्टवर प्रवास चालेल असा बदल सरकारने केला आहे). मी तरीही मुलीचे पाठवले आहे बदलायला. ३ जुलैपासुन कांसुलेटकडे आहे. २ महिने लागतील असे म्हणत आहेत म्हणुन सध्या निवांत बसले आहे.

Pages

Back to top