Submitted by द्वैत on 25 June, 2020 - 12:06
यार आले ...
नाही घरी कुणीही.. पाहून यार आले
संकेत वादळांचे घेऊन यार आले
फिरतात घेउनी ज्या डोईवरी प्रतिष्ठा
बाहेर उंबर्याच्या ठेऊन यार आले
संपर्कक्षेत्र ह्यांचे भलतेच "स्ट्रॉंग" आहे
ठेचाळलो कुठे की धावून यार आले
जेव्हा गढून गेलो चिंतेत मी उद्याच्या
अत्तर जुन्या स्मृतींचे लावून यार आले
लिहिण्या नवीन काही मी लेखणी उचलली
घटकेत कागदावर उतरून यार आले
"द्वैता" खरी कमाई नक्की कशात आहे ?
मैतास ज्या कुणाच्या लोटून यार आले
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तिसरं कडवं नाही आवडलं. कदाचित
तिसरं कडवं नाही आवडलं. कदाचित वेगळ्या शब्दांमुळे असेल, पण बाकी सगळी आवडली..
>>>जेव्हा गढून गेलो चिंतेत मी उद्याच्या
अत्तर जुन्या स्मृतींचे लावून यार आले<<<
हे मस्त..
धन्यवाद निरु
धन्यवाद निरु
मस्तच रे अत्तर शेर एकदम झकास
मस्तच रे अत्तर शेर एकदम झकास
अत्तर, कागद, मस्त! <<'कडवे?'
अत्तर, कागद, मस्त!
<<'कडवे?'
धन्यवाद बेफिजी, कडवे?? नक्की
धन्यवाद बेफिजी, कडवे?? नक्की कळले नाही आपण काय सुचवू इच्छिता ते
पहिल्या प्रतिसादात शेराला
पहिल्या प्रतिसादात शेराला कडवे म्हणण्यात आले आहे
अच्छा ..
अच्छा ..