La Flor del amor - Blossom of love (भाग ७)

Submitted by कविन on 24 July, 2020 - 23:57

भाग ६
_________________________
भाग ७:-

जाईचा फोन बराचवेळ वाजत होता आणि ती अंघोळीला जाऊन बसली होती. फोन उचलून बघितला तर प्रणव कॉल करत होता कळलं.

फोन उचलून हॅलो म्हंटल्याबरोबर त्याचा पहिला शब्द होता "Thank god."

मला म्हणे, "पोहोचल्याचा मेसेज नाही, व्हॉट्स ॲपला रिप्लाय नाही, कॉल लावायला गेलो तर तुझा फोन स्विच्ड ऑफ येतोय. शेवटी जाईच्या नंबरवर लावला कॉल."

ओह! शिट बॅटरी डाऊन होती येतानाच. चार्ज करायला विसरले आल्यावर. तो डेड झाला असेल. बॅगेतून काढूनही नाही ठेवलाय. आणि त्या फोनच्या वरताण आत्ता मूड डेड झालाय. बॅक ऑफ द माईंन्ड हे सगळं डोक्यात येऊन गेलं पण त्याला सांगताना फक्तं, "सॉरी, बहुतेक बॅटरी डाऊन." इतकंच बाहेर आलं.

"नीट पोहोचलीस ना?" त्याच्या आवाजातल्या काळजीने जरा धाकधूकलं. ईसीजी रिडींग्ज फ्लॅट सरळ रेषेवरुन परत बंपी वेवी व्हायला सुरुवात झाली.

"हो. अमोघने व्यवस्थित अगदी घरापर्यंत सोडलं. बाकी प्रिया कशी आहे आता? तू आलास का घरी?" माझ्या नॉर्मल व्हायला लागलेल्या ईसीजीने घुश्श्यात बोलायचच्या फुग्याला टाचणी लावत विचारलं.

"मॅड आहे ती एकदम. 'पिकनिक नंतर तू घरी यायचंच आहेस' असं गेल्या आठवड्यात म्हणाली होती मला. मी तुम्हाला घरी सोडायचय कारण सांगून नाही जमणार म्हणालो होतो तिला. त्यावर "नेऊनच दाखवेन बेट लाव हवी तर" म्हणाली होती.

"मी विसरुनही गेलो होतो, पण तिचं म्हणणं खरं करून दाखवण्यासाठी तिने हा सगळा फार्स केला. मला लक्षात यायला हव होतं, इतकं तर ओळखतो मी तिला पण डोकं कुठे गहाण पडलं होतं माहित नाही. आलं नाही खरं लक्षात." त्याच्या या बोलण्यावर मी काय कसं रीॲक्ट होऊ न कळून फक्तं, "Its ok" म्हंटलं

"No, its not ok. त्या चक्करेच्या नादात तुला ती जागा नाही दाखवली, तुला दुसऱ्याच कोणाबरोबर घरी पाठवलं. This is not so fair with you. Sorry." त्याने पडेल आवाजात ऐकवलं.

"Don't be sorry. परत जाऊ कधीतरी" पडेल आवाजाने मऊ पडत मी म्हंटलं.
माझ्या वाक्यावर त्याने विचारलं, "आत्ता भेटूया?"

"काय?" अनपेक्षीत होता प्रश्न आत्ता यावेळी.

"पाच मिनिट फक्तं. प्लीज" परत मन मऊ लोणी व्हायला लागलं तरीही निग्रहं टिकवून ठेवत, त्याच्या आर्जवाला कानाआड करत मी म्हंटलं, "अरे दहा वाजत आलेत आता. उद्या भेटू"

"मी तुझ्या बिल्डींगच्या खाली आहे. प्लीज" त्याने परत विचारलं.

बिल्डिंगखाली आहे ऐकल्यावर इतकावेळ चिमटीत पकडून ठेवायचा प्रयत्न केलेला निग्रहं निसटून निखळून गेला. मी हो म्हणायच्याच तयारीत होते पण तेव्हढ्यात जाई बाहेर आली. फोन बाजूला घेऊन तिला, "खाली जाऊन येते प्रणव खाली उभा आहे" म्हंटलं तर तिने माझ्या हातून फोन काढून घेत त्यालाच वर यायला सांगितल.

फोन बंद करुन मलाही ओरडली. वेडी झाल्येस तू प्रेमात. कशात काही नाही आणि चालली लगेच बोलावल्यावर.

नशीब बेल वाजली आणि मी तिच्या ओरड्यातून सुटले.

दार उघडून प्रणवला घरात घेऊन तिने दार लावलं. माझ्याकडे अपराधी नजरेने बघत तो दाराजवळच्या खुर्चीवर बसला.

"प्रियाची तब्येत कशी आहे आता?" जाईने विचारलं

त्याने माझ्याकडे बघून परत खाली मान घालत खिशातून रुमाल काढत घाम पुसत उत्तर द्यायला तोंड उघडलं पण तोपर्यंत मी त्याने फोनवर मला सांगितलेलं सगळ सांगून टाकलं.

क्काय? जाईने इरिटेट होत विचारलं

"प्रणव दोन्ही हाताने कपाळ दाबत खाली मान घालूनच मान हलवून हो म्हणाला. मला कळायला हवं होतं तिचं वागणं आधीच पण मी ही फसलो", तो म्हणाला.

त्या दोघांचं बोलणं सुरु असताना मी उठून किचनमधे जाऊन तिघांसाठी हॉट चॉकलेट करुन घेऊन आले.

"Thanks", त्याने कप हातात घेत म्हंटलं

"मला वाटतं प्रियाला तू आवडतोस. तुझं लक्ष वेधायला ती अस करते किंवा तुला सांगायला की तू तिला आवडतोस, ती अस वागते." हॉट चॉकलेटचा सिप घेत जाई म्हणाली

"आज असं काही घडलं असेल अस.."
त्याला अर्थवट तोडत ती म्हणाली, "आजची घटना असं नव्हे, एकूणच. आपण सगळे जेव्हा जेव्हा भेटलोय मी ऑब्झर्व्ह केलय हे. मीच नाही तर सायुनेही केलय. काय सायु?"
तिच्या वाक्याने त्यानेही चमकून माझ्याकडे पाहिलं.

"हो खरय. म्हणजे मलाही जाणवलय असं. प्रियातर नेहमी सांगत असते तुमचे बाईक ॲडव्हेंचर किस्से आणि काय काय. आज अमोघही सांगत होता ते तुला तिच्यावरुन कायम चिडवत आलेत असं" मी मनात डाचत असलेलं शेवटी बोलूनच टाकलं.

कप टिपॉयवर ठेवत दोन्ही हात एकमेकांत अडकवून बोटं मोडत तो म्हणाला, "ते चिडवायचे हे खरय पण मी नेहमीच त्यांना तिथल्यातिथे उडवून लावलय आजवर. आणि कॉलेजच्यावेळी केलेल्या प्रत्येक ॲडव्हेंचरमधे अख्खा गृप एकत्र असायचा. तिच्या एकटी बरोबर म्हणून अशी एकही ट्रिप, ट्रेल काहीही नाही केलेय मी कधीच."

"तू नसशील दिलीस स्पेशल ट्रिटमेंट पण तिला आवडत असशील तू आणि तिने लावले असतील अर्थ स्वतःच्या मनाने काही. पण तू क्लिअर केलस का कधी?" जाई कोर्टात आर्ग्युमेंट केल्याच्या स्टाईलमधेच त्याला विचारत होती.

"तिला मी आवडतो हे माहिती आहे मलाही. पण मी नाही प्रेम करत तिच्यावर. आणि हे तिलाही स्पष्ट सांगून झालंय माझं. अमोघइतकीच ती ही एक मैत्रिण म्हणून जवळची आहे पण प्रेम नाहीये ते."
थोडा पॉझ घेऊन तोच पुढे म्हणाला, "तुम्ही मध्यंतरी घरी आला होतात अचानक, तेव्हा यावरुनच वाद झाला होता आमचा. आणि मी पुढेही कधी तिच्या प्रेमात का पडू शकत नाही त्याचंही कारण सांगितलय मी तिला. ती का तिचा हट्ट सोडत नाही हेच कळत नाही. चांगली मैत्रिण आहे माझी. मैत्री गमवायची नाही आहे मला पण प्रेमात नाही असं ठरवून पडता येत ना आपल्याला? कोण किती काळ ओळखतो यावर नाही ठरत प्रेमाची व्याख्या. हेच पटत नाही तिला."

"Its ok.", जाईने त्याचा रिकामा कप उचलून आत नेत म्हंटल.

"I don't love her", त्याने माझ्याकडे बघत म्हंटलं

"जेवला नसशील, काही आणू खायला?", मी त्याच्या वाक्यावर काही प्रतिक्रिया न देता विचारलं.

"नाही. भूक नाहीये. हॉट चॉकलेटचीच गरज होती. Thanks", तो म्हणाला.

इतक्यात कप विसळून बाहेर येत जाईने विचारलं, "हा अमोघ कसा मुलगा आहे रे?"

मी तिचा हात दाबून तिला गप्प करायचा प्रयत्न करतेय त्याकडे दुर्लक्ष करुन तिने कांदेपोहे लंच डेट आमंत्रणाबद्दल सांगून टाकलं

"मी आमंत्रण रिजेक्ट केलय", मी घाईघाईने सांगून टाकलं

"अग हो पण मला वाटतं काही हरकत तर नव्हती ॲक्सेप्ट करण्यात. मी पण तर कॉफी डेट्सवर जाते की मॅरेज पॉर्टलवर सर्च करुन. फक्त माझं नाशिकला सेटल व्हायचं फिक्स आहे म्हणून मी तिथल्या रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करते इतकंच." तिने मुद्दा लावून धरत ऐकवलं

"अगं पण .. ", मी तिला हात धरुन थांबवत
पुढे काही बोलणार इतक्यात तिने डायरेक्टच बोलून टाकलं, "प्रणव, तूच सांग हिने कोणाला पटवलं नाहीये की कोणी हिला प्रपोज केलं नाहीये तर काय हरकत आहे म्हणते मी?"

"इनफ जाई. आपण याविषयावर नंतर बोलू." "गूड नाईट प्रणव", मी त्याला लिटरली खुर्चीतून उठवत म्हंटल.

"Do you like him?", त्याने दाराच्या चौकटीत उभ राहून विचारलं

"No. I don't. Good night", मी त्याला बाय करुन दार लावत म्हंटल.

"काय गरज होती अमोघचा विषय काढायची" तो गेल्यावर तिला धोपटून काढत मी म्हंटलं. त्यावर तिने, "बघ आता हे कसं कॅटॅलिस्टचं काम करतं" अस मलाच ऐकवलं

बेडवर पांघरुणात शिरत मी जाईला म्हंटलं, "माझं ऑफीसच कॉंट्रॅक्ट अजून एक आठवड्याने संपेल. मला पे रोलवर जॉईन होण्यासाठी विचारणार आहेत असं जयच्या बोलण्यातून कळलय अनॉफिशिअली.
त्याआधी प्रणवने नाही प्रपोज केलं तरी मी त्याला प्रपोज करुन माझ्यापुरते क्लोजर घ्यायचं ठरवलय. त्याने नाही म्हंटलं तर मी परत नाशिकला जाणार आणि तिथेच जॉब शोधणार. तुलाही तर नाशिकलाच परत यायचय बाबाला मदत करायला. बाबाही सुपर खुश होईल हे ऐकून. मोस्टली बर्थडेच्या नंतर विचारेन."

"Thats better", गालावर थोपटत ती म्हणाली आणि मी, 'नाशिक की मुंबई' टॉसमधे मन जिंकेल की हरेल यावर विचार करत रात्र मात्र जागून काढली.

क्रमशः

भाग 8

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच.
म्हणजे जय नावाचा एक अँगल यायचा बाकी आहे जीवनात !!!!!

फोन बंद करुन मलाही ओरडली. वेडी झाल्येस तू प्रेमात. कशात काही नाही आणि चालली लगेच बोलावल्यावर. >> मी पण मैत्रिणींना असेच ओरडायचे..ते आठवले Wink

पुभाप्र

धन्यवाद जेम्स बॉन्ड, अवल, मनस्विता, प्रितम, मनिम्याऊ, सहेली आणि विनिता Happy

जय को बक्ष दो. त्याची गर्लफ्रेंड हे वाचेल तर ब्रेकअप करेल आणि विकेंड खराब जाईल त्याचा Lol

जयने फक्तं ऑफीस पे रोलवर घेण्याचा विचार आहे मॅनेजमेन्टचा हे तिला अनऑफिशिअली सांगितल आहे. तसही जॉब हा फॅक्टर तिला मुंबईत बांधून ठेवायला पुरेसा नाही हे तिने या आधीच्या भागात स्वत: सांगितलं आहेच.

खूप खूप cute आहे ही कथा. M&B च्या पुस्तकांची आठवण झाली. भाग पटापट येत आहेत त्यामुळे link तुटत नाहीये. त्यामुळे अजूनच छान वाटतेय.

जेव्हढी सायुला घाई नसेल तेव्हढी मला घाई लागली आहे प्रणवच्या प्रपोजची Wink
हा भाग संपूच नये असे वाटत होते. खूप मस्त.

निल्सन अगदी अगदी. सायुच्या स्वप्नातला प्रणव जरा बोल्ड आहे ना. प्रत्यक्षात त्याला कोणीतरी पुश करायला लागतं बहुतेक. हि नर्सरी काढायला त्याच्या बेस्ट फ्रेंड नी पुश केलं तसं. बघु आता जाईने अमोघ चा विषय काढल्यामुळे महाशय हलले असतील आतून.
बाकी गोष्ट एकदम सही चाललीये. मी तर पुरती गुंतून गेले सगळ्यांमध्ये, त्या तिघांबरोबर त्याच्या नर्सरी मधल्या फुलांमध्ये ही. सायु, जुईच्या बाबा मध्ये ही. Happy

धन्यवाद धनवंती, निल्सन, मामी आणि धनुडी Happy

धनुडी ऑब्झर्वेशन परफेक्ट. बारावीला आलेल्या अपयशातून (जरी डोक्यात हवा जाऊन आलेलं अपयश असलं तरी अपयश ते अपयशच) बाहेर यायला घरचे आणि मित्रमंडळ याबरोबरच समुपदेशकाची मदत लागली होती त्याला. बराच मोठा सेट बॅक असणार तेव्हा तो आणि फेल्युअरच फिअर मनात एका कोपऱ्यात स्कारसारख राहीलं असेलही त्यामुळे. प्रत्येक धाडस हे दहावेळा पावलं मागे घेऊन मग करण्याची or गळ्याशी आल्यावर करण्याचीही एक सवय लागते मग कधीकधी. तसही असेल त्याचं.
गमवायला काहीच नसतं तेव्हा धाडस करण्यासाठी पुढे होण्यातला वेग आणि धाडस केलं आणि उडी चुकली तर सगळच गमावण्याची भिती वाटताना पाऊल उचलणं यात फरक हा पडतोच.

पुढचा भाग शेवटचा भाग आहे. आज संध्याकाळीच पोस्ट करणार आहे. Happy

आज संध्याकाळीच पोस्ट करणार आहे. > अरे वा मस्तच .
पुढचा भाग शेवटचा भाग आहे > नको ग राणी , एवढ्या लवकर का ग संपवतेस. Sad

होगं, आज शेवटचा भाग म्हटल्यावर वाईटच वाटलं, पण असुदे जे असेल तसं, तुला पण गोष्ट संपल्यावर चुटपूट लागणारे कविन. Happy

धन्यवाद सामी, rr38 Happy

@धनुडी, हो. म्हणजे आता त्यांच्या विषयी रोज विचार करणं संपणार. डिटॅचमेंटची वेळ थोडी अवघड असतेच. पण कथा लिहीत असताना नोट्स काढत रिसर्च करत त्यांच्या दुनियेचा शोध घेण्याची प्रोसेस इतकी धुंदावणारी असते ती आता मी कथेहून जास्त मीस करणार. एका मैत्रिणीने सिक्वेल लिही म्हंटलय. Lol

पण माझ्या लेकीने नवीन टास्क दिलय मला. मी गूढ कथा लिहून पाहिली आहे पण मिस्टरी थ्रिलर ससपेन्स गुन्हेशोध कथा लिहिली नाहीये. ते लिहायला घे अस तिने मला ऐकवलय. फक्तं नरेटरला मारायचं नाही इतकीच अट आहे तिची Lol

मस्तच पुन्हा एकदा.
कविन, तुमची लेक ग्रेटच आहे.

(अवांतर - ते बायकांच्या आड्यन्सला रडवायला पोरबीर मारू नका हां पी यल... या चालीवर ते हीरो न हिरविणीला उगा वेगळं व्हायला लावू नका हां.. असं म्हणावंसं वाटतंय इतकं गुंतायला झालंय या गोष्टीत)