https://www.maayboli.com/node/75404 ----> ( भाग १ )
https://www.maayboli.com/node/75434 ----> ( भाग २ )
https://www.maayboli.com/node/75471 -----> ( भाग ३ )
https://www.maayboli.com/node/75498 -----> ( भाग ४ )
https://www.maayboli.com/node/75522 ------> ( भाग ५ )
https://www.maayboli.com/node/75543 -------> ( भाग ६ )
https://www.maayboli.com/node/75574 --------> ( भाग ७ )
अनभिज्ञ
पुरूषोत्तमने तो मेल ओपन केला... नाव वाचून पुरूषोत्तमच्या पायाखालची जमीनच सरकली... मेंदूला मुंग्या आल्या... डोळ्यांसमोर त्या लॅपटॉप च्या उजेडात अंधारी आली... आणि
“आई घातली तू पुरूषोत्तम!!” स्वत:शीच बोलला.
पुरूषोत्तमने लॅपटॉप मध्ये वेळ बघितली ‘4:10’... आणि तो आवरायला तडक बाथरुम मध्ये गेला. ब्रश...प्रात:विधी...अंघोळ... आवरणं वगैरे
केलं.
कुठे निघणार होता पुरूषोत्तम? काय चाललं होत त्याच्या डोक्यात?
आवरून बाहेर आल्यावर पुरूषोत्तमने लॅपटॉप वरच्या मेल च्या विंडो वर नजर फिरवून थरथरत्या हातांनी लॅपटॉप बंद केला...
From :
Saumitra Dani < SaumitraDani411057@gmail.com >
To :
Purushottam Jogalekar < jogalekar.Purushottam@rediffmail.com >
Date: 20 June 2019
Time: 5:30 PM
Sub: विश्वामित्र
आणि ड्रॉव्हर मधली चावी आणि मोबाईल घेऊन तो बाहेर पडला... पहाट उजाडत होती. घरात कुणालाही कल्पना नव्हती पुरूषोत्तम घराबाहेर पडलाय...
पुरूषोत्तमची आई पहाटे पहाटे लवकर उठत असली तरी देखील, ती कधिची आवरुन देवघरात देवाचं करत बसली होती.
इकडे पुरूषोत्तमने गाडी सुरु केली आणि वेगाने कोथरुड मधून बाहेर पडला...
गाडी चालवता चालवता त्याच्या डोक्यातले विचार मेंदूसोबत खेळ खेळत होते. का मारतोय हा खुनी या लोकांना? कोण आहे हा खुनी? काय वाकडं केलय या लोकांनी? का .... ?
आणि याच विचारांत गाडी भरदाव वेगाने धावत होती. तेवढ्यात पुरूषोत्तमचा फोन वाजला...
आँ!! एवढ्या पहाटे? कोण फोन करतय?
पुरूषोत्तमच्या विचारांची तंद्री भंगली आणि शेजारच्या सीटवर हाताने चाचपडत त्याने मोबाईल कसाबसा हातात घेतला. गाडी चालवतच कानाला लावला...
“ पुरूषोत्तम, सो सॉरी अशा वेळी फोन केलाय तुम्हाला मागे बोलले होते ना की निवेदिता ही आर.टी.आय. ची कार्यकर्ती असल्याने ही केस पोलिसांच्या स्पेशल ब्रांच ला हॅन्डओव्हर केलीय आणि त्यांनी सांगितल होतं की हे सिरीअल किलिंगच आहे. पण आता नवी लिड अशी की त्यांनी अजून एक खुलासा केलाय!! हे सिरिअल किलींग ब्राम्हणद्वेषातून झालयं असा त्यांनी निष्कर्ष काढलाय!!”
आश्लेषा कर्णिक बोलतच होती...
“काय?!!!” पुरूषोत्तमचा आश्चर्यवाचक उद्गार...
“पुरूषोत्तम, सो सॉरी या वेळी फोन केलाय!! आम्ही अजुनही मुंबई मध्येच आहोत. भार्गव च्या मावशीकडे...”
आश्लेषा बोलत होती पण... पुरूषोत्तमने फोन कट केला... आणि गाडी चालवण चालूच ठेवलं.
एव्हाना पुरूषोत्तम त्याच्या हिंजवडीच्या ऑफीस च्या वास्तूत आपलं कार्ड फिरवून आला होता. गाडी पार्किंग मधे पार्क केली.
लॅपटॉप उघडला...
पुरूषोत्तमचा धर्माच्या बाबतीत फार काही अभ्यास नव्हता... तरी देखील पुन्हा त्याने जुने मेल्स ओपन केले. आणि थोडीफार माहिती गुगल वर सर्च करून पंधरा मिनीटांत त्याने आश्लेषा कर्णिक ला एक टेक्स्ट मेसेज केला.
TO: आश्लेषा कर्णिक डेकिन
गेल्या काही दिवसांपासून मला काही व्यक्तिंचे सप्तर्षीं च्या नावाचे सब्जेक्ट असलेले मेल्स येत होते. मला रोजच्या व्यापातून याकडे लक्ष देता आलं नाही. आणि आज लक्षात आलय म्हणून एकाचा जीव वाचवायला चाललोय.
जबो ------------------ अ ---------------1
गोरा ------------------ भा ---------------2
चंओ ------------------ गौ ---------------3
निकुं ------------------ ज ----------------4
पवि ------------------ का ----------------5
तिप ------------------ व -----------------6
सौदा ------------------ वि ----------------7
आणि सेंड बटणावर टच केलं. त्याने मोबाईल मध्ये वेळ पाहिली ‘5:19’
“आज मात्र उशीर होणार नाही!!” पुरूषोत्तमने स्वत:च्याच मनाला ठासून सांगितलं.
मोबाईल आणि लॅपटॉप गाडीतल्या सीटवरच टाकून गाडी लॉक करून वार्याच्या चपळाईने लिफ़्ट मधे घुसण्यासाठी पळाला... पहाट असल्याने कोणाचीही शिफ्ट सुरू नव्हती... आणि नाईट शिफ्ट पलीकडच्या बिल्डिंग मध्येच होती.
पुरूषोत्तम च्या नेहमीच्या वर्किंग फ्लोअर वर लिफ्ट चा दरवाजा उघडला... पुरूषोत्तमने केबीनकडे धाव घेतली...
त्याच्या केबीनकडे नाही... त्याच्या बॉस च्या केबीनकडे...
लॉक फिरवून धाड्कन दार उघडलं!! समोरच दृष्य पाहून पुरूषोत्तमला धडकीच भरली...
बॉस उर्फ सौमित्र दाणि समोर चेअर वर बसले होते...टेबलावर डोकं ठेवल होतं... आणि त्यांच्या अंगातून वाफा येत होत्या... शरीर भाजलं गेल होतं... काळसर पडल होतं... गुलाबी त्वचा दिसत होती...
पुरूषोत्तमला काय करावं ते कळेना ...
मुळात काय करावं हे कळायला काय झालयं हे लक्षात याव लागतं!!
पुरूषोत्तम बॉस च्या जळत्या डोक्यापाशी आला. एक मिनीटभर पाहीलं आणि पुरूषोत्तमच्या डोक्यात काय आलं माहीत नाही पण त्याने टेबलावरचा कॉडलेस उचलला आणि आपल्या स्वत:च्या घरी लॅंडलाईनवर फोन लावला.
पुरूषोत्तमच्या आईने फोन उचलला...
“आ...आ...आई...आई आ...पलं…आपलं गो” पुरूषोत्तमने घाबर्या घुबर्या स्वरात विचारलं...
पुरूषोत्तम घामाने नखशिखांत निथळत होता.
“अरे पुरूषोत्तम, काय झालयं बोल ना रे नीट” आई काळजीच्या स्वरात म्हणाली
आईला त्याचा स्वर लक्षात आला होता.
“आई आपलं गोत्र काय आहे?” पुरूषोत्तमने आपला सारा धीर , सारी शक्ति एकवटून विचारलं.
कानात प्राण आणून तिकडून येणार्या उत्तराची वाट पाहू लागला.
“अत्रि!” आई म्हणाली.
पुढच्याच क्षणाला पुरूषोत्तमच्या शर्टात कॉलर आणि मानेच्या गॅप मधून काहीतरी शिरलं...गुळगुळ जाणवाली आणि... सिवीयर शॉक!! पाठीपासून सगळ्या दिशेला पसरत सारं शरीर जाळणारा शॉक! मेंदूचे विचार थांबवणारा शॉक!! हृदयाची धडधड थांबवणारा शॉक!!
पुरूषोत्तमच्या हातातून फोन टेबलवरच पडला...
पुरूषोत्तमने मागे वळून दोन पावलं पुढे टाकली आणि जमिनीवर कोसळला...
त्याला समोरच्या व्यक्तिचा चेहरा दिसला!
पण ओळखीचा वाटला नाही...
कारण शॉकच तेवढा सिवीयर होता. पुरूषोत्तमच शरीर जळत होतं... शरीराच्या आत देखील वेदनांच वादळ उठल होतं... घोंगावत होतं...
पुरूषोत्तमचा देह जमिनीवर पडला... आणि प्राण शरीरातून निघण्यापूर्वी एक ब्लॅक अॅंड व्हाईट फोटो त्याच्या डोळ्यांसमोर आला... स्मृति ब्लॉक करणार्या त्या शॉक च्या वेदनांना चिरून आला...
तोच फोटो जो त्याने ज्ञान प्रबोधिनीत असताना पाचवी च्या वर्गाच्या भिंतीवरून बाहेर आलेल्या पट्टीवर पाहिला होता... आणि लाल लाल अक्षरांमध्ये लिहिलेलं नाव...
“भगिनी निवेदिता”
आणि तोंडातून एकदम हळू आवाजात एक नाव बाहेर पडल.
"निवेदिता"
आणि पुरूषोत्तमचे डोळे उघडे ते उघडेच राहीले.
इकडे टेक्स्ट मेसेज वाचल्यावर आश्लेषा ला काहीच अर्थ लागेना... तिने पुरूषोत्तमला खूप कॉल्स केले... पण फोन गाडीत...
आणि पुरूषोत्तम फोन रिसीव्ह करत नाहीये... काहीतरी गडबड आहे या भावनेतून आश्लेषा न राहवून भल्या सकाळी त्या स्पेशल ब्रांच च्या पोलिसांकडे जाण्यासाठी उठली...
खरच कोण करत होतं सगळ? का मारलं या लोकांना? पुरूषोत्तमचा खून हा निव्वळ योगायोग की...
हे कसलं अघटीत काळचक्र सुरू होतं... सुरू होतं का संपल होतं... संपल होतं का पुन्हा नव्याने पुरूषोत्तमच्या ‘अत्रि’ पासून सुरू झालं होतं?
काय मिळणार होतं खुन्याला या सप्तर्षींच्या वंशजांना म्हणजेच त्या सप्तर्षींपैकीची ज्यांची गोत्रे होती... त्यांना मारून... बर आता हे इतके दिवस मुंबई मध्ये सुरू होतं... आता पुण्यात सुरू झाल होतं का... आता कुणाला ‘पुरूषोत्तम जोगळेकर’ या नावाने ‘अत्रि’ सब्जेक्ट असलेला मेल गेला असेल का?
नुसते प्रश्नच प्रश्न!! सगळंच ‘अनभिज्ञ’!!
मग ‘अभिज्ञ’ काय होतं?
सध्या तरी मृत्यु!!
आणि ज्या केबीन मधे पुरूषोत्तम आणि त्याचा बॉस या दोघांचे मृतदेह जळलेल्या अवस्थेत पडले होते... तिथे एक ऑडिओ टेप वाजली...आणि सारखी रिपीट होत होत राहिली...संस्कृत मधून... सुभाषित अथवा श्लोक अथवा कोणत्यातरी स्तोत्राच्या ओळी?
का पाण्डुपत्नी गृहभूषणं किं रामशत्रुः किमगस्त्यजन्म |
कः सूर्यपुत्रो विपरीत पृच्छा कुन्तीसुतो रावणकुम्भकर्णः ||
हे नक्की काय होतं?
पाण्डु , पाण्डुपत्नी म्हणजे कुंती, राम , रामाचा शत्रु रावण, अगस्ती, सूर्य, सूर्याचा पुत्र कर्ण.
एवढ्या सगळ्या व्यक्तिंचा काय संबंध?
का .... ‘किमगस्त्यजन्म’
अगस्ती चा जन्म कसा झाला...
अगस्ती?
प...प...प...पण अगस्ती तर...
समाप्त
©प्रगल्भ कुलकर्णी
(19 जुलै 2020)
[ टीप:- हा भाग @प्रभुदेसाई यांच्या सुचनेवरून सर्वांसाठी खुला ठेवत आहे. आधीचे भाग वाचायचे असल्यास ‘कथा/कादंबरी’ या भागात आपण समाविष्ट व्हावे ही विनंती. सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद... मी काही क्लू दिलेले आहेत या भागात... एका अर्थी हा भाग ‘समाप्त’ च आहे. मी माझा शब्द पाळलाय... पाळतो आहे... पाळणार आहे... सर्व वाचकांचे सहृदय आभार...]
ऋनिल, तो धागा मी ही वाचला
ऋनिल, तो धागा मी ही वाचला होता, मला नाही वाटत त्यांना तिकडे कोणी मुद्दाम त्रास दिला, रादर यांनी तो स्वतःहून करून घेतला असे वाटले, अर्थात हेमावैम
सोशल मीडियावर सगळे काही गुडी गुडी नसते, ईथे बरे वाईट प्रतिसाद येणारच. जर कौतुक आवडते तर वेळप्रसंगी टीकाही सहन करता यायला हवे. मला तर ह्यांचे ताई दादा अन लडिवाळ प्रतिसाद बघूनच अंदाजा आला होता की कदाचित हे बाळ लवकरच रडणार.
असो, या कथेविषयी बोलायचे तर मला हा फसलेला प्रयत्न वाटतो, कदाचित म्हणून उत्तरे देण्यापेक्षा पळवाट सोपी वाटली असेल लेखकाला.☺️
शेवटचा भाग इथे प्रकाशित करून
शेवटचा भाग इथे प्रकाशित करून मायबोलीला टाटा करायचा हे लेखकाचं आधीच ठरलं होतं.
VB टिका सहेतूने केली जात असेल
VB टिका सहेतूने केली जात असेल तय चांगलचं आहे पण खुपदा केवळ jelousy तून केली जाते आणि लेखकांना विनाकारण त्रास दिला जातो.
आठवा. ह्या दोन वर्षात किती लेखक गायब झालेत? नावे सांगायला तर एक यादी तयार होईल..
हो, हे खरंय, पण यांच्या
हो, हे खरंय, पण यांच्या बाबतीत असे झाले नाही म्हणजे किमान मलातरी असे वाटते.
अन जर प्रगल्भ रोमात वाचत असेल तर मी हेच सांगेन की ही पळवाट आहे, कुणाही मुळे आपले नुकसान होऊ द्यायचे नाही, गोडासोबत तिखट आंबट कडूही चाखावे☺️ इकडे तुमचे लिखाण सुधारायला भरपूर वाव आहे कारण बहुतांशी वाचकही चांगल्या दर्जाचे आहेत, ते जर काही सुचवत असतील तर त्याचा उपयोग नक्की होऊ शकतो.
काही अपवाद वगळता योग्य प्रतिसाद मिळतात इथे
बाकी त्याचे प्रतिसाद मजेशीर
बाकी त्याचे प्रतिसाद मजेशीर असायचे ☺️
मलाही नाही वाटत कि प्रगल्भ वर
मलाही नाही वाटत कि प्रगल्भ वर बुलींग झालं म्हणून. उलट त्याच्या गोष्टीं सगळेजण वाचत होते प्रतिसाद ही देत होते. रुळत ही होता तो. अचानक काय झालं?
मलाही नाही वाटत कि प्रगल्भ वर
मलाही नाही वाटत कि प्रगल्भ वर बुलींग झालं म्हणून. उलट त्याच्या गोष्टीं सगळेजण वाचत होते प्रतिसाद ही देत होते. >>>>> +++११११
सगळ्यांसोबत ओवरफ्रेंडली व्हायच्या नादात स्वत:च स्वत:ला बुली करुन घेतलं बहुतेक. माबोवर कुठलाच लेखक आपल्याच लेखनाचा एवढा कीस पाडत नाही. प्रतिसाद हे फक्त पोचपावती असतात. त्यात discussion करायची गरज नसते. आणि लोक वाचतायंत, प्रोत्साहन देतायत तर चांगलं लिहायचं सोडून बुवा पळाले.
हा हा हा
हा हा हा
प्रत्येक प्रतिसादात "हा हा हा
प्रत्येक प्रतिसादात "हा हा हा" फारच मजेशीर वाटायचं.
कॉलेज मध्ये होते ते...
कॉलेज मध्ये होते ते... त्यांना थोडे समजून घेऊया... जगात कसे वागायचे... कशा प्रकारे विविध लोकांशी कसे डील करायचे हा अनुभव अजून नसेल त्यांना...
त्या धाग्यावर बुल्लिंग नाही
s mpaditस
s mpaditस
s mpaditस
Submitted by च्रप्स on 24 July, 2020 >>
हे काय आहे.
संपादित... असे आहे ते...
संपादित... असे आहे ते...
s mpaditस
s mpaditस
Submitted by च्रप्स on 24 July, 2020 >>
हे काय आहे.
नवीन Submitted by वीरु on 24 July, 2020 - 01:08
संपादित... असे आहे ते...
नवीन Submitted by च्रप्स on 24 July, 2020 - 01:20
>>>>>>>
माबो भाषेला नवीन देणगी.
बापरे हा हा हा हा हा हा
बापरे हा हा हा हा हा हा किती प्रतिसाद
माझ्या प्रिय वाचकांनो पाउण तास लागला वाचायला सगळे प्रतिसाद
अर् अर किती ते तर्क, वितर्क , कुतर्क , प्रतितर्क हा हा हा हा
मला असं वाटतय की माझ
मला असं वाटतय की माझ पुनरुत्थान झालय
जिजस ला २ दिवस लागले तिसर्या दिवशी तो परत आला
मला श्रावणाची कामं होती
घरची
भांडी घासणे, दोन वेळच भाजी आणी आमटी बनवणे
आधे मधे फरशि पुसणे
कोविड मुळे मावश्या येत नाहियेत...
त्यामुळे जरा जास्त दिवस लागले
"नुसते प्रश्नच प्रश्न!! सगळंच
"नुसते प्रश्नच प्रश्न!! सगळंच ‘अनभिज्ञ’!!
मग ‘अभिज्ञ’ काय होतं?
सध्या तरी मृत्यु!!" ----> पुनरुत्थान!!
एवढा साधा क्लु होता...
मे केव्हा ना केव्हा येऊन ‘अभिज्ञ’ लिहीणार आहे ( वेगळी कादंबरी पुढचा भाग म्हणून )
पण तुम्ही सगळे नाही त्या गोष्टींत गुंतून गेलात ...
रडणार बाळ , पळून गेले बुवा ... पार अब्रु काढलीत
मी मुद्दाम असा शेवट केला होता
मला माझि किमान वाचक संख्या ( माझी लायकी) बघायची होती.
कमेंट्स करणारे किमान वाचक मिळाले मला खुश आहे २० - २२ लोक+
मिळालित पहिल्याच प्रयत्नात
मोठे व्हा.. इतकेच
मोठे व्हा.. इतकेच
मी काही प्रत्येकाला प्रतिसास
मी काही प्रत्येकाला प्रतिसास देत बसणार नाहीये
नाहीतर काही लोक म्हणतात " स्वतःच्याच लेखननाचा किस पाडला "
ब्राम्हणद्वेश वाटावा असा आडनावे सोडून अजून एक धागा आहे जो अभिज्ञ मध्ये दर्शवला जाइल
आणि साधी गोष्ट कितीही स्पेशल ब्रांच चे पोलिस असले तरी काहि वेळा चुकिच्या लिड्स मिळत असतात
त्यातलाच हा एक भाग , आणि तो ही कसा आला ते अभिज्ञ मध्ये कळेल
दुसरी गोष्ट मरताना कोणाच्याही डोळ्यांसमोर त्या मरणार्याची प्रिय व्यक्ति येत असते हे सायन्स सांगत!!
सगळ्या गोष्टींचा उलगडा अभिज्ञ मध्ये होणार आहे
आणि निलिमा तुम्हाला दुर्वास का वाटल याच कारण तुम्ही दिलं नाहित
उगाच कर्ण , सुर्य , कुंती यांचे उल्लेख आले म्हणून ??
जाउदे ..
माझ्या डोक्यातली कथा खूप वेगळी आणी लांबच्या पल्याची आहे...
सप्टेंबर मध्ये रिलीज करण्याचा प्रयत्न करेन
किमान तोवर तरी माझी अशी धिंड काढू नकात
मला वेळ हवाय
एवढा साधा क्लु होता...
एवढा साधा क्लु होता...
मे केव्हा ना केव्हा येऊन ‘अभिज्ञ’ लिहीणार आहे ( वेगळी कादंबरी पुढचा भाग म्हणून )
मी मुद्दाम असा शेवट केला होता
मला माझि किमान वाचक संख्या ( माझी लायकी) बघायची होती.>>>>> म्हंजे तू कशाची उकल करणारच नाहीस का? हाय रे माझ्या कर्मा! अशाच टाईप दुसरी कथा लिहीणार? डोक्याचा पार "श्वेतांबरा" केलास रे
ब्राम्हणद्वेष वगैरे फालतु
ब्राम्हणद्वेष वगैरे फालतु लिहिणार असाल तर न लिहिलेले उत्तम.. एवीतेवी जातीयतेमुळे मायबोली गढूळ झालीच आहे, त्यात तुमची भर नको. इतरांचं माहीत नाही पण मी नक्की धिंड काढीन...
जरा जग बघा.. जातीच्या चाकोरीतून बाहेर पडा.. थोडा त्रास होईल आपण आपल्या डोळ्यावर चढवलेली झापडे, गृहीतके सोडायला, पण बरं वाटेल हे नक्की.
श्वेतांबराचा सीझन २ नव्हता
श्वेतांबराचा सीझन २ नव्हता आला.
ज्यांनी काही तर्क लावले
ज्यांनी काही तर्क लावले कुसुमिता १२३४ , भरत , चीकू , रूनिल इ.
तुमच खुप खुप कौतुक कारण तुमची विचारशक्ति दिसली (जागी झाली) - पण एकही विचार बरोबर नाहीये
मी फार काही बोलणार नाहीये
नाही बोललो तरी बदनामी
आणि बोललो तरी बदनामी
जाता जाता एवाढच म्हणेन
वाट बघा अभिज्ञ ची
आणि 'केमिस्ट्री' इथे संपली आहे ... आता इथून पुढे ' आस्ट्रोनॉमी'
( मी जे काही लिहितो ते अभ्यास करून लिहितो खरंच.
केमिस्ट्री चा २ आठवड्यात अभ्यास झाला म्हणून
अनभिज्ञ लिहिता आली
पण अस्ट्रोनोमी हा खूप खोल विषय आहे.
वेळ लागेल मला अभिज्ञ
लिहून इथे प्रकाशित करण्यासाठी. )
हा क्लु कुणाला कळाला तर खूप खूप कौतुक
बाय...
अजिंक्यराव धीर धरायचा की जरा.
अजिंक्यराव धीर धरायचा की जरा... काय घाई आहे विडंबन लिहायची हा हा हा
वाटत असेल तर मी तुम्हास अभिज्ञ लिहावयास देईन
माझे जे काही चार चाहते होते..
माझे जे काही चार चाहते होते...
यतिन ला माझ्या कविता, आणि गझलांचे प्रयत्न आवडतात
तो सोडल्यास
पिसलिली , सहस्त्रबुद्धे आणि चिमुरी
यांपैकी सहस्त्रबुद्धे सोडल्यास कोणिही वाचलेल म ला कळत नवत म्हणून असा शेवट !
कारण त्यांच्या कमेंट्स नव्हत्या या आधी
टेक केवर मा बो क र
" ब्राम्हणद्वेश वाटावा असा
" ब्राम्हणद्वेश वाटावा असा आडनावे सोडून अजून एक धागा आहे जो अभिज्ञ मध्ये दर्शवला जाइल
आणि साधी गोष्ट कितीही स्पेशल ब्रांच चे पोलिस असले तरी काहि वेळा चुकिच्या लिड्स मिळत असतात
त्यातलाच हा एक भाग , आणि तो ही कसा आला ते अभिज्ञ मध्ये कळेल " ---> अजिंक्य कृपया नीट वाचावे
मी बोललो चुकीची लीड मिळत असते ती का मिळाली हे सांगेन. आणि एका लेखकाच्या कादंबरी/ कथेला तुम्ही फक्त. कथा अथवा कादंबरी म्हणून स्विकारणार नसाल तर वाचक का म्हणवून घ्यायच
आणि काळजी नसावी मी काही फार मोठा माणूस नाहीये माझ्या एक दोन वाक्यांनी जातीय दंगली होतील.
मी प्रामाणिक प्रयत्न करतोय
माबो कराना एक थ्रिलर द्यायचा
Mabo वर खूप लव्ह स्टोरिज आहेत
सगळं गुडी गुडी , हलकं फुलकं..
मला काहीतरी वेगळं द्यायचं आहे
कौतुकाची अपेक्षा नाही मुळीच
निदान आडकाठी करू नये ही विनंती
कृपया कोणी सांगेल का
कृपया कोणी सांगेल का
जाण्याची नोंद केल्यावर परत कस यायचं
मला फार ताप झाला
शेवटी पासवर्ड चेंज करावा लागला फॉर्गोट म्हणून
आणि आलो ...
टाईप केलेला पासवर्ड आपोआप मराठीत टाईप होतोय
त्यामुळे मी इंग्रजी स्पेलिंग टाकलं तर सारखं चुकीचं दाखवत होत
शेवटचं सांगायचं राहिलय
शेवटचं सांगायचं राहिलय
जरी अजुनही कोणाला माझ्याबद्दल राग, चीड, शरम, कारुण्य वगैरे वाटत असेल तर
अत्रि भागाच्या सुरवातीच्या कंसात दिलेल्या ओळी वाचा आणि त्यांचा अर्थ समजून घ्या...
भेटू च अभिज्ञ च्या सोबत...
धीर धरावा कृपया
स्वतः साठी तरी
टाटा ...
मला काहीतरी वेगळं द्यायचं आहे
मला काहीतरी वेगळं द्यायचं आहे
कौतुकाची अपेक्षा नाही मुळीच
निदान आडकाठी करू नये ही विनंती
Submitted by प्रगल्भ >>
ये हुई ना बात|
लिहा तुम्ही, आवडेल वाचायला. कमी वयात चांगलं प्रभुत्व आहे तुमचं भाषेवर. त्यामुळे तुमच्याकडुन अपेक्षा आहेत. वाचकांच्या सूचनांचा राग नका करु. शुभेच्छा.
मी मुद्दाम असा शेवट केला होता
मी मुद्दाम असा शेवट केला होता
मला माझि किमान वाचक संख्या ( माझी लायकी) बघायची होती.>>>> ह्यांचं काहीतरी वेगळंच आहे. 'मीच माझा' गटातले दिसताय. आणि सगळं वाचकांनीच प्रेडिक्ट करायचं असेल तर यापुढे कथा विभागात न लिहिता शब्दकोडे विभागात लिहावे.
आणि 'तुम्ही तुमच्याच लेखनाचा कीस पाडता' या माझ्या मतावर मी ठाम आहे. आताही तेच केलयंत.
कौतुकाची आशा ठेवता त्याचप्रमाणे टीका सहन करण्याचीही तयारी ठेवा की. इथे लोकं आपला वेळ खर्ची घालून वाचायला येतात. इग्नोर करायचा ऑप्शन आहेच म्हणा. यापुढे माझा पास.
ता.क. तुमच्यासारखीच भाषा आणि 'मी मी' वाले विचार असणारं अजून कुणीतरी आहे बहुतेक माबोवर. :विचार करणारी बाहुली:
Pages