Submitted by प्रगल्भ on 28 June, 2020 - 03:00
तुझ्या भोवती सडा
जेव्हा फुलांचा असेल
त्यांत पारिजात एक
माझाही दिसेल
लहर वार्याची फुलाला
लेऊनी जात असेल
अल्लड पोरीपरी ती
तुला पळवेल
घ्यायला येशील गंध
लांबूनी गं त्याचा
न गंध त्यात, रंग
केशरी उरेल
-प्रगल्भ कुलकर्णी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान.
छान.
मानामनापा धन्यवाद सामो सर.
मानामनापा धन्यवाद सामो सर. गझल कशी असते, मला शिकवाल क. मला वृत्ते आणि मुक्तछंद कसंं असतंं माहीत नाहीये. कसं शिकू मी?
Beautiful composition. Write
Beautiful composition. Write more.
उमा खूप खूप धन्यवाद!! ताई
उमा खूप खूप धन्यवाद!! ताई प्लीज सांगाल का वरील गीताला कविता म्हणावी का गझल म्हणावी. मी फक्त लिहित जातोय... इंटरनेट वर बरच शोधलं, मराठी गझल शिकण्यास काहीच मिळालं नाही. आणि मी गझल लिहायचा पुर्ण प्रयत्न करेन.
इथे वाचाhttps://www.maayboli
इथे वाचा
https://www.maayboli.com/node/21889
https://www.maayboli.com/karyashala
आभार!! भरत दादा
आभार!! भरत दादा
छान लिहिली आहे
छान लिहिली आहे
गझलेची बाराखडी - सुरेश
गझलेची बाराखडी - सुरेश भट
https://www.sureshbhat.in/gazalechibarakhadi
धन्यवाद यतिन सर...
धन्यवाद यतिन सर...
खुप खुप आभार भरत सर...आता
खुप खुप आभार भरत सर...आता पुढची गझल हे सगळं वाचल्यावर मगच लिहिणीणार आहे.
मायबोलीच्या गझल ग्रुपवर क्लिक
मायबोलीच्या गझल ग्रुपवर क्लिक केलंत तर असंख्य गझला दिसतील.
सुरेश भटांचे कवितासंग्रहही वाचायला हवेत.
वैभव जोशी ला देव मानलं आणि
वैभव जोशी ला देव मानलं आणि त्याचा गाव गाठण्याचा प्रांजळ प्रयत्न करतोय. त्याची भेट होईल न होईल. निदान जशी शागिर्दाला तळमळ असते की गुरूने आपल्याला शिकवाव... तीच तळमळ घेऊन इथे आलो. वैभव जोशीचा 'खजिना' नावाचा कार्यक्रम पाहीला. होस्ट स्पृहा जोशी आहे. त्याच्याकडून कळलं मायबोली नावाची साईट आहे. मग दुसर्या दिवशी त्याला फेसबुक वरती पत्र पाठवून फेसबुक डीअॅक्टीव्हेट केलं आणि मायबोली वर साईन अप!! गझल शिकायची आहे याच उद्देशाने आलो. बाकीच्यांचही वाचतोय. पण काही काही जण फारच दाहक गझला लिहीतात राव. म्हणजे जो आधी माझा समज होता की प्रेयसीच्या विरहातून केलेली गझल असते तो साफ पुसला गेल. इथे अत्याचारवर गझल होतेय, अन्यायावर गझल होतेय. हा एक वेगळा प्रकार असतो का हो गझले मधला?
हो .सामाजिल आशयाच्या गझलाही
हो .सामाजिल आशयाच्या गझलाही असतात .
सुरेश भटांचे काव्यसंग्रह ओके!
सुरेश भटांचे काव्यसंग्रह ओके! माझ्याकडे फक्त रंग माझा वेगळा एवढच आहे अत्त्ता.