स्पर्श: जाणीव....पहिली....(भाग १)
स्पर्श म्हटलं की आपण मानवी भावभावनांच्या अत्युच्य अविष्काराकडे मन ओढ घेतं. सगळ्यात पहिला आठवतो तो आईचा स्पर्श. अजाण,म्हणजे जगाशी ओळख नसतानपासून जाणिवेची जाणीव होईपर्यंतचे हे हृदयाच्या आतपर्यंत पोचलेले ,झिरपलेले मर्म,ममत्व. आईपश्चातही आपण नाही विसरू शकत.
दुसरा स्पर्श जोडीदाराचा. आयुष्यातले ते सुवर्णक्षण, मृदू मुलायम क्षण सुखावणारे ,मुग्ध करणारे,प्रेम,जाणीव सगळंच,धुंद करणारे. नवपरिणीत मिठीत समावताना अवघे विश्व विसरायला लावणारे. वाढत्या वयाबरोबर अधिक समृद्ध होतात हे स्पर्श. अधिक समजूतदार होणारे. स्पर्शातून मनाचे मित नंतर उलगडत जाते. जसे जसे प्रौढत्व येते तसे स्पर्शही प्रौढ होत जातात.
आईच्या स्पर्शाबद्दल तर आपण नेहमीच बोलतो.पण बाळाचा स्पर्श? बाळ उदरात वाढत असल्यापासून आईला त्याच्या स्पर्शाची जाणीव असते. आत होणारी वाढ ही जरी डोळ्यांना दिसणारी नसेल तरी स्पर्शातून आई प्रत्येक क्षणी ते मापत असते. पूर्ण वाढ झालेल्या बाळाचा जन्मपूर्व स्पर्श.त्याच्या डोक्याचा, पायाच्या तळव्यांचा स्पर्श .काय जाणीव असते ती. बाळ आत फिरत असतं. त्यावेळेला त्याची बदलणारी दिशा, हातांची हालचाल. आई अंघोळ करताना पोटावर गरम किंवा गार पाणी पडल्यानंतर त्यावर येणारी बाळाची आतून प्रतिक्रिया,किती लिहू? अनेक बारीक बारीक गोष्टी आहेत या विषयाच्या. एक आई म्हणून खूप काही उर्मी दाटते.आणि आता बाळ मोठं झालं तरी त्या स्पर्शाच्या जाणिवेतून बाहेर येत नाही. आणि नन्तर त्याला वाढवताना सामाजीकतेची सजगता या स्पर्शाच्या कक्षा ठरवते. पण मन? त्याला कोण आळा घालणार?
स्पर्शाची तुटणारी नाळ अस्वस्थता देते.
बाळ मोठं होतंय, त्याचे निर्णय ते घेतंय,स्पर्श ओझरता होतोय..प्रत्येक आई यातून गेली आहे. आणि हे अपरिहार्य आहे.
स्पर्श प्रौढ होतात. त्यांची जाणीव प्रौढ होते.अधिक सुखदायी होतात.व्यक्त होतात. फुलतात, माणसागणिक स्वभाव बदलतात,स्पर्शाचेही बदलतात.
स्पर्श जगायला उमेद देणारं एक मोठ्ठ डबोलं आहे. दुःख झालेल्याला सांत्वन असतं, आनंदाला बहर देत असतं.असे असतात स्पर्श.लिहू तेव्हढं कमीच.म्हणून थोडथोड्या भागात लिहायचा विचार आहे.
आज आहे ते थोडं वैचारिक आहे. उद्या कौटुंबिक आणि सामाजिक अंगाने लिहीन.
रोहिणी बेडेकर
22.05.2019
छान सुरवात. पुढील स्पर्श
छान सुरवात. पुढील स्पर्श जाणिवेच्या प्रतीक्षेत .…
छान लिहिलयं...
छान लिहिलयं...
स्पर्श! खूप सुंदर आणि वास्ट
स्पर्श! खूप सुंदर आणि वास्ट विषय.. लेख आवडला..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटो दिसत नाहीये..
सुंदर...
सुंदर...
छान ....
छान ....
मस्त सुरूवात !
मस्त सुरूवात !
खूप खूप आभार कुटुंबीय...
खूप खूप आभार कुटुंबीय...
मन्या s, बहुतेक मोबाईल अँप वरून इमेज पोस्ट करता येत नाहीय...