करोनाच्या केसेस सध्या फारच वाढत आहेत. अनलॉक झाल्यामुळे हे होणारच आहे आणि टाळता येणं अशक्य आहे. इतर काही आजारामुळे जरी कोणाला बरं वाटेनासं झालं तरी आधी सगळ्यांच्या मनात करोनाची शंका येते. अशा परिस्थितीत घरात कोणी आजारी पडलं आणि हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज वाटली तर नक्की काय प्रोटोकॉल असावा? आधी मनाची आणि इतर तयारी करून ठेवली असल्यास आयत्यावेळी शोधाशोध आणि धावाधाव कमी करावी लागेल.
उदा.
* आजारी व्यक्तीची ऑक्सीजन सॅच्युरेशन लेवल तपासावी (त्यासाठी घरात एक पल्स ऑक्सीमिटर आणून ठेवावा.)
* अॅब्युलन्स बोलावायची झाली तर कोणाला फोन करावा?
* नक्की कोणत्या हॉस्पिटलमध्ये जावे हे कसे कळेल? करोनासाठी काही वन कॉन्टॅक्ट पॉइंट आहे का? सध्या मुंबईत नक्की काय करावे लागत आहे? कोणत्या हॉस्पिटलमध्ये बेड अव्हेलेबल आहेत हे कसे कळावे?
* करोना नाही पण इतर काही आजार झाला आहे तर कोणत्या हॉस्पिटलमध्ये जावे हे कसे ठरवावे? प्रत्येक हॉस्पिटलला आपणच फोन करावा लागतो का?
असे अनेक प्रश्न आहेत. विशेषतः बातम्यांत जे दाखवत आहेत की फोन नंबर्स लागत नाहीत, हॉस्पिटलमध्ये घेत नाहीत इ. ते बघून टेन्शनच येतं.
याबाबत कोणाला काही माहिती, अनुभव असतील तर शेअर करूयात आणि काही फोन नंबर्स वगैरे असतील तर त्यांची देवाणघेवाण करूयात. कोणाला काही मदत लागली तरी इथे विचारणा करता येईल.
चांगला धागा!साधारण अशा
चांगला धागा!साधारण अशा तऱ्हेचे प्रश्न मलाही पडले आहेत.
आमच्या इमारतीत 1 पेशंट होता.पण त्याला आधी डायलिसिस साठी एका हॉस्पिटलमध्ये नेले.तिथे नेताना आधीchya hospitalche कारोना नसल्याचे सर्टिफिकेट घेतले. त्या जा ये मध्ये कुठेतरी याला संसर्ग झाला.त्याच्या बायकोने स्वतःला विलग करून घेतले.
ही झाली यांची कथा.पण मला झाला तर पुढे काय करायचेय इथपासून मनात प्रश्न आहेत.भीती अजिबात नाही,पण शंका आहेतच.होईल त्यावेळी पाहू.याबाबत फे.b.वरचे सायली राजाध्यक्ष यांचे अनुभव चांगले आहेत.
मी ऐकलय त्याप्रमाणे टेस्ट
मी ऐकलय त्याप्रमाणे टेस्ट पॉझीटीव्ह आली की ते करोना हॉस्पीटल्स सांगतात ( जी जनरली आपल्याला माहीत असतातच) पण बेड कुठे अव्हेलेबल आहे हे आपणच शोधायचे. एखादे डॉ वगैरे माहीतीत असतील तर जास्त बरे ( असं मला वाटतय ) . घरीच रहावे की हॉस्पीटलमध्ये हे मात्र ते सांगतात.
धनश्री, टेस्ट कुठे करावी? घरी
धनश्री, टेस्ट कुठे करावी? घरी येऊन करतात का? ते सांगतात म्हणजे कोण सांगतं?
टेस्ट कुठे करावी? घरी येऊन
टेस्ट कुठे करावी? घरी येऊन करतात का? ते सांगतात म्हणजे कोण सांगतं? <<< जी केस मी ऐकली आहे त्यात फॅ डॉक्टर कडे फॉलो अप होता तर टेस्ट कुठे करायची हे त्यांनी सांगीतले. टेस्ट तिथे जाऊन केली. हॉस्पीटल्स , जिथे टेस्ट केली त्यांनी सांगीतली पण जागा कुठे आहे हे पेशंटने शोधले.
बाकी जर आपली आपल्याला शंका येत असेल तर स्वतःच शोधावे लागेल किंवा सरळ कोविद हॉस्पीटल्स मध्ये फोन करुन विचारावे लागेल असं मला वाटतय.
http://stopcoronavirus.mcgm
http://stopcoronavirus.mcgm.gov.in/where-to-get-help
http://stopcoronavirus.mcgm.gov.in/key-updates-trends
हे बृहनुंबई मनपाचे संकेतस्थळ
धन्यवाद!
धन्यवाद!
चांगला धागा
चांगला धागा
खूप सारे प्रश्न मलाही पडलेत. घरी ज्ये ना असल्याने काळजीही वाटते.
मध्यंतरी एका कोरोना रुग्णाचे खाजगी हॉस्पिटलचे बिल कायप्पावर फिरत होते 22 की 25 लाखाचे. तेव्हा सगळीकडे चर्चा होती की खाजगी इस्पितळात जाऊच नये, मग रुग्णाला तो अधिकार आहे का? की जिकडे पाठविणार तिकडे जावे लागते. आणि मुख्य म्हणजे सरकारी दवाखान्यात नीट काळजी, स्वच्छता असेल काय?
हल्ली बऱ्याच जणांचे मेडिकल इन्शुरन्स असतो, पण जर इतके भरमसाठ बिल येणार असेल अन कुटुंबातील जास्त सदस्य पोसिटीव्ह आले तर तेही पुरणार नाहीत.
तसेच, कोरोना रुग्ण किंवा संशयिताला घेऊन जातात तेव्हा त्याने सोबत काय काय अन साधारण किती दिवसाचे सामान घ्यावे.
काही insurance कंपन्या 1
काही insurance कंपन्या 1 वर्षाचा covid insurance देत आहेत. दोन-तीन हजार रुपये भरून 2 लाखाचा इन्शुरन्स. Test पॉझिटिव्ह आली की तो result इन्शुरन्स कंपनीला पाठवायचा आणि ते 2 लाख रुपये तुमच्या अकाउंट ला क्रेडिट करतात, no questions asked. आता जर भारतात कोरोना positive explode झाले आणि insurance कंपनी तोट्यात जायला लागली तर मिळतील का माहिती नाही पण वरवर तरी ठीक दिसतंय हे product. पैशाचा प्रश्न थोडाफार सुटल्याचे तात्पुरते समाधान.
भरत धन्यवाद. फार महत्त्वाचे
भरत धन्यवाद. फार महत्त्वाचे नंबर्स आहेत. फक्त कोणी उचलायला हवेत आणि नीट मार्गदर्शन केलं पाहिजे.
आमच्याकडे शेजारील इमारतीत एक
आमच्याकडे शेजारील इमारतीत एक जण सापडल्यावर नगरपालिकेचे लोक आले होते. माहिती विचारून " कुणाला खोकला,ताप सर्दी, झाल्यास अमुक ठिकाणी जवळच आरोग्य केंद्र उघडले आहे तिथे जा" सांगून गेले.
कुणाला थेट खाजगी हास्पिटलात जायचे असले तरी अगोदर इकडे नोंदणी करुन जाणे योग्यच.
दुसरे म्हणजे आरोग्यसेतू app वर माहिती पाठवल्यास पुढे ते लोक कारवाई करत असतील.