लॉक्डाऊन मुळे गेले तीन महिने सलुन बंद असल्यामुळे दाढी अन केस कापण्याची जी पंचाईत झाली आहे ती तोंड दाबुन बुक्क्यांचा मार या टाईप मधली आहे. ज्यांच्याकडे दाढी आणि केस कापण्यासाठी ट्रिमर/क्ल्पिअर नाहीत अथवा या कामासाठी जे सर्वस्वी सलून वर अवलंबुन आहेत अशांसाठी हा मोठा गुंतागुंतीचा काळ आहे. डोक्यावर आणि गाल, हनुवटी, ओठांवर वाढलेले जंगल यामुळे आता आरशात बघायची पण भिती वाटु लागली आहे आणि वर या अवतारामुळे घरातल्यांच्या नजरेला नजर भिडवण्याची पण चोरी झाली आहे.
आता पटकन उठुन सलुन मधे जाणे जरी शक्य नसले तरी केशकर्तनकारस घरी बोलावुन हजामत करुन घेणे या कोरोनाच्या काळात अत्यंत रिस्कि वाटत आहे. शिवाय सलुन वाल्यांनी त्यांची सेवा दाम दुप्पट भावाने वाढवली असताना त्यासाठीचे वर्षिक बजेट न परवडणारे वाटु लागले आहे.
अशावेळी बाजारात उपलब्ध असलेली ट्रिमर नामक साधने उपयोगास येतील म्हणुन खरेदी करायला जावे तर त्यामधे ५०० रुपयांपासुन २-३ हजार रुपयांपर्यंत व्हेरिअंट उपलब्ध आहेत त्यामुळे नवख्या माणसाला त्यापैकी कोणते घ्यावे हा प्रश्न पडावा. इंटरनेटवर बरेच व्हेरिअंट आणि ते कसे वापरावे याचे व्हिडिऑ पाहिल्यावर लक्षात आले की ट्रिमर कम बॉडी ग्रुमिंग एक्विपमेंट असेल तर आपले आणि मुलांचे केस तरी आपण घरच्या घरी कापु शकतो.
माबो वाचकांपैकी कोणी हे इक्विप्मेंट वापरत असल्यास भारतात कोणते ट्रिमर्/बॉडी ग्रुमिंग इक्विप्मेंट लवकरात लवकर उपलब्ध असेल आणि वापरास चांगले हे सांगु शकाल काय..?
फिलिप्स बेस्ट आहे पुरुष
फिलिप्स बेस्ट आहे पुरुष माणसांसाठी.
@mi_anu, अहो त्या फिलिप्साचेच
@mi_anu, अहो त्या फिलिप्साचेच कितीतरी मोडेल्स आहेत.. एका गोष्टीसाठी एवढे मोडेल्स बघुन मला तर काहिच कळेनासं झालं की कोणता घ्यावा
Htc at 527
Htc at 527
बघून सांगते सापडला की
बघून सांगते सापडला की
काळा आणि डोक्याशी निळा आहे ☺️☺️
फिलिप्स सिरीज7000
फिलिप्स सिरीज7000
काळा आणि डोक्याशी निळा आ
काळा आणि डोक्याशी निळा आ
--हा होता ह्यांच्याकडे
माझ्याकडून वीरगती ला प्राप्त झाला त्यांचे केस कापून देताना
जग जरी फिलिप्स ला चांगलं म्हणत असलं तरी आम्हाला चांगला अनुभव नाही , दोन trimmer तुटलेत
मोसर - मेड इन जर्मनी
मोसर - मेड इन जर्मनी
https://www.amazon.in/RF-666-Long-Wired-Electric-Trimmer/dp/B07VCGSN8J/r...
किल्ली, तुझ्या ह्यांचे केस
किल्ली, तुझ्या ह्यांचे केस जास्त घनदाट असावे(कोणते तेल शांपू वापरतात ☺️☺️)
तुझ्या ह्यांचे केस जास्त
तुझ्या ह्यांचे केस जास्त घनदाट असावे--- हो,
कारण मी जास्त डोकं खात नाही
(No subject)
@बिपीन चन्द्र हर.. : तुम्ही
@बिपीन चन्द्र हर.. : तुम्ही सांगितलेलं मशिन पण भारि दणकट दिसतंय... पण स्वत:च स्वत:वर चालवु शकतो का हे..? थोडं मोठं वाटतंय हे
फिलिप्स 3000 सीरीज. हा चांगला
फिलिप्स 3000 सीरीज. हा चांगला आहे. केसांची हवी तशी लांबी adjust करता येते.
braun चे प्रॉडक्ट्स मेन्स
braun चे प्रॉडक्ट्स मेन्स ग्रूमिंग साठी बेस्ट आहेत.
तुझ्या ह्यांचे केस जास्त
तुझ्या ह्यांचे केस जास्त घनदाट असावे--- हो,
कारण मी जास्त डोकं खात नाही
>>>>
असा रूल नाहीये हं
आमच्याकडे चोहीबाजूने डोके खाल्ले जाते. तरी केसांचे जंगल वाढत चाललेय. बहुधा निसर्गनियमानुसार डोके स्वरक्षणासाठी स्वताहून केस उगवून त्याचे सुरक्षा कवच बनवते
अबाऊट धागा
मी सुद्धा हा विचार करत होतो ट्रिमर वा तत्सम मशीन घ्यायचा. फिलिप्सचा चांगला हे सुद्धा ऐकून होतो. पण ते चालवणार कोण हा प्रश्न होता? अखेर केसांना घरच्याघरी धक्का लावायची हिंमत नसल्याने तो विचार बारगळला.
आणि आता तर खूप छान वाटू लागलेत मोठाले केस मिरवायला. रोज घरात कापडी हेअरबॅड लाऊन फिरायचे. रोज केसांची नवीनवी स्टाईल करायची. आंघोळ करतानाही साबणाचा फेस लाऊन शेंड्या उभ्या करून आरश्यात बघायचे. केस जास्त त्रास देऊ लागले की तेल लाऊन चापून चोपवून छानसा भांग पाडायचा. पोरगी डोके खायला लागली की तिच्या ताब्यात डोके द्यायचे, ती केसांशी खेळत बसते. एक फोटोही शेअर करतो त्याचा.
दाढी मात्र आधी जे दोन महिन्यांनी बाहेरच करायचो ते आता दर आठवड्याला घरी करू लागलोय. थोडक्यात यंदा शेविंग क्रीम आणि आफ्टरशेव लोशन वगैरे नेहमीसारखे एक्स्पायरी डेट संपल्याने फेकून द्यावे लागणार नाही.
मला तर आता ऑफिस सुरू होईल तेव्हा असे वाढलेले केस घेऊन मस्त हेअरबॅंड लाऊन ऑफिसला जायची उत्सुकता लागून राहिली आहे. आशा करतो एच आर सुद्धा आता याला आडकाठी करणार नाही
ऋन्मेष : कसल्या कलरफुल
ऋन्मेष : कसल्या कलरफुल शेंड्या बांधल्यात...
@ ऋन्मेष ..... हे... हे .....
@ ऋन्मेष ..... हे... हे ...... शेन्ड्या भारी आहेत.
जग जरी फिलिप्स ला चांगलं म्हणत असलं तरी आम्हाला चांगला अनुभव नाही , दोन trimmer तुटलेत
ट्रिमर ने केस कट करताना आधी कात्रिने ते बरेच बारिक करावे लागतात. मग ट्रिमर छान चालतो. नाहीतर त्याची हालत फारच बेकार होते. माझ्या मुलाचे केस कट करताना कात्रिपण तुटता तुटता वाचली. तिची सगळी धार गेली.
HTC चा मिळतो D - MART मधे .
HTC चा मिळतो D - MART मधे . ३००/- रुपयात झक्कास काम करतो !
शेवर कोणता चांगला आहे?
शेवर कोणता चांगला आहे? ब्लेडसारखी दाढी होते का?
ट्रिमर ने केस कट करताना आधी
ट्रिमर ने केस कट करताना आधी कात्रिने ते बरेच बारिक करावे लागतात. मग ट्रिमर छान चालतो.
>>>
+७८६
म्हणजे नला अनुभव नाही. पण लॉजिकल आहे.
मी लॉकडाऊनमध्ये जेव्हा दोन तीन महिन्यांची दढी उतरव्ली तेव्हा आधी कात्रीने दाढीचे केस कापून घेतले आणि मगच ब्लेड फिरवला..
इथे मिळालेल्या माहितीवरुन आणि
इथे मिळालेल्या माहितीवरुन आणि मित्रांकडुन मिळालेल्या सल्ल्यांवरुन थोडा विचार करुन गेल्या विकांताला निर्णय घेतला आणि शेवटी ऑनलाइन मागवलेले फिलिप्स बिटी ३२२१/१५ मोडेल आज घरी आले. आता सफाचट मी होणार..!