कोणते बिअर्ड ट्रिमर / हेअर क्लिपर घ्यावे..?? (भारतात)
Submitted by DJ.. on 25 June, 2020 - 00:33
लॉक्डाऊन मुळे गेले तीन महिने सलुन बंद असल्यामुळे दाढी अन केस कापण्याची जी पंचाईत झाली आहे ती तोंड दाबुन बुक्क्यांचा मार या टाईप मधली आहे. ज्यांच्याकडे दाढी आणि केस कापण्यासाठी ट्रिमर/क्ल्पिअर नाहीत अथवा या कामासाठी जे सर्वस्वी सलून वर अवलंबुन आहेत अशांसाठी हा मोठा गुंतागुंतीचा काळ आहे. डोक्यावर आणि गाल, हनुवटी, ओठांवर वाढलेले जंगल यामुळे आता आरशात बघायची पण भिती वाटु लागली आहे आणि वर या अवतारामुळे घरातल्यांच्या नजरेला नजर भिडवण्याची पण चोरी झाली आहे.
विषय:
शब्दखुणा: