Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 20 June, 2020 - 11:33
*****
श्रीदत्त सोनार
मज दे आकार
फुंक हळूवार
मारूनिया॥
जाळ वळवून
तपे तापवून
किंचित ठोकून
आणे गुणी॥
वितळवी मुशी
दे दोष जाळून
सद्गुण घालून
किंचितसे ॥
करी घडवणं
देऊन आकार
नाम अलंकार
अनाम्याला ॥
नीट घडवितो
परी कर्मागत
जगण्या प्रारब्ध
वाट्याचे ते ॥
जगात विक्रांत
जरी मिरवितो
स्वरूप ठेवतो
परी ध्यानी ॥
****
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह!!
वाह!!
>>>जगात विक्रांत
जरी मिरवितो
स्वरूप ठेवतो
परी ध्यानी ॥>>>> सुंदर
छान कविता!
छान कविता!
(बारा बलुतेदार सगळेच जर घ्यायचे झाले तर लोक कसे स्वीकारतील अशी शंका आली मनात!
जैसा किडाळाचा दोषु जाये । तरी
जैसा किडाळाचा दोषु जाये । तरी पंधरे तेंचि होये ।
तैसें जीवा ब्रम्हत्व आहे । संकल्पलोपीं ॥ ८२ ॥ज्ञाने. अ. सहावा.
सुंदर लिहिलंय
Kya bat!
Kya bat!
Can i share with ur name on it?
धन्यवाद सामो,अजिंक्यराव,शशांक
धन्यवाद सामो,अजिंक्यराव,शशांक ,नानबा .
नानबा you can share .
अजिंक्यराव बारा बालुतेदार
अजिंक्यराव बारा बालुतेदार कुठे उरलेत आता ?