खेळ: भाग १: https://www.maayboli.com/node/75151
गेल्या अनेक दिवसांपासून लाटकरांच्या मनात असलेला विचार त्यांनी बोलून दाखवला होता. एन्काउंटर स्पेशालिस्ट असा शिक्का, त्यामागोमाग येणारे हेवेदावे, अंतर्गत राजकारण, होणारी बदनामी या सर्वांची कल्पना त्यांना होतीच. म्हणूनच "एथिकल शूटर" ह्या उपाधीचा शोध त्यांनी मनातल्या मनात लावून ठेवला होता. यासोबत येणाऱ्या संभाव्य धोक्यांची कल्पना त्यांना होतीच, पण नियंत्रित वातावरणात त्यांचा बेत यशस्वी होऊ शकतो हे देखील त्यांना नीट माहित होतं.
रंग्याबद्दल वृत्तपत्रातून वाचून दादूला देखील चीड यायचीच.
"रंग्याबद्दल तुला काय काय माहिती आहे?"
"पेपरातून वाचलंय तेवढंच.. त्याच्यामागे कुणीच नाही. बायको होती, पण ह्याच्या वागण्यामुळे सोडून गेलीय एवढं कळलंय"
"याच गोष्टीचा फायदा घेऊन कायद्याला न घाबरता रंग्या गुन्हे करतोय. सापडला तरी वकील ह्याला सोडवतीलच. आणि पुन्हा हा गुन्हे करायला मोकळा होणार"
"एनकाऊंटर का करीत नाहीत मग तुम्ही याचा?"
"त्याचं असं आहे दादू, गोळ्या मोजून झाडायच्या, मग पंचनामे, चौकशी, मग त्याने कसा वार आधी केला हे सिद्ध करायचं, ह्या सगळ्या भानगडी निस्तरता निस्तरता आमच्या नाकी नऊ येतात. आधीच माझी चौकशी सुरु आहे, त्यात आणि हे लचांड नको. शिंदे, पुढच्या कोपऱ्यावर उतरवा ह्याला. बरं का दादू, ह्यावेळी सोडतोय, पण पुन्हा सापडू नकोस."
"पण साहेब... तुम्ही तर रंग्याला मारायचा चान्स देणार असं वाटलेलं मला"
"गुंड व्हायचंय का तुला? शाळा शिक, मोठा अधिकारी हो. मारण्यात मजा वाटते असा तुझा समज असेल तर डोक्यातून काढून टाक."
"साहेब, मला तर व्हायचंय शेतकरी आणि त्यासाठी लागतो पैसा. रंग्याला मारायला तुम्ही नाही, पण कुणीना कुणी नक्की पैसे देईलच. फक्त तो माणूस सापडला पाहिजे."
"म्हणजे तू मुद्दाम होऊन चौकीत आला होतास?"
उत्तरादाखल हलकेसे हसून दादू गाडीतून बाहेर पडत होता.
रंग्या त्यादिवशी लाटकरांच्या तावडीतून सुटला खरा, पण पुढच्या महिनाभरात त्याचा भर मध्यरात्री नेहमीच्या गुत्त्यातून बाहेर येताना खून पडला होता. खुनाचे हत्यार असलेले देशी बनावटीचे पिस्तूल गुत्त्याच्या मागच्या बाजूला सापडले. हातांचे ठसे अर्थातच नव्हते. हा खून पूर्व वैमनस्यातून विरोधी गॅंगच्या लोकांनी केला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता.
आणि दादाराव आपल्या कर्जाचा पहिला हप्ता फेडायला त्याच्या गावी निघाला होता.
दादारावच्या बापाने गावातल्याच सावकाराकडून शेतीवर वेळोवेळी बरीच रक्कम कर्जाऊ घेतली होती. कर्जाची रक्कम लाखाच्या वर गेली तशी वाणीशेठ सावकाराने जमिनीवर कब्जा केला. तसा त्याचा तुकडा लहानच होता पण दादारावचा आपल्या शेतावर खूप जीव होता. इन मिन दोन एकरात छोटीशी विहीर, त्याजवळच बांधलेलं मातीचं खोपटं. दादुने स्वतः खपून खोली वाढवून करून घेतलेला शेताचा बांध, शेताच्या सभोवार लावलेली अनेक झाडं बघून दादू फार खुश व्हायचा. पन्नास हजाराचं पुडकं पिशवीत खोल कोंबून दादू गावात पोचला आणि तडक वाणिशेठच्या दुकान कम पेढीवर पोचला. वाणिशेठ सावकार असला तरी बऱ्यापैकी इमानदार होता. त्याने दादाराव पाटलाच्या बापाचा म्हणजे एकनाथराव पाटलाचा कागद शोधला. एकूण एक लाख ३२ हजार रक्कम एकनाथ पाटलांनी घेतली होती. त्यातली पन्नास हजार वजा करतानाच वाणिसेठ विचारता झाला-
"काय दादू, एकलाच आलास? एकनाथ कुठं आहे?"
"आबा कामावर गेल्यात, त्यांना सुट्टी मिळाली नाही."
"पन्नास हजार एकरकमी आणलेस मोठा साहेब झालास कि काय शहरात?"
दादुने या गोष्टीचा विचार केला नव्हता, पण त्याच्या डोक्यातली चक्रे सुसाट चालत होती.
"काका, तिकडं मुंबईत, दुसऱ्याच्या नावावर तिसऱ्याला बरंच काम करता येतं. पाच रुपये रोजाने मी एका बेवड्या हमालाचा शिक्का मिळवून मी हमाली केलीय गेले ६ महिने. त्याचेच हे पैसे. बरं मला सांगा, आता अजून किती रक्कम फेडायची राहिली?
"असं बघ, रुपयाला चार आणे व्याज, या हिशोबाने एका वर्षात व्याज होतं ३३ हजार. एक लाख पासष्ट हजार एकूण, वजा हे केले ५० हजार. एक लाख पंधरा हजार उरलेत."
"काका, असं करा मला दहा हजार द्या अजून. तुमचे एक पंचविस आणि त्यावरचं व्याज मी पुढल्या वर्ष भरात परत करीन. शेती तुमच्याकडेच ठेवा, विकू नका."
"असं म्हणतोस, चालतय मला! पण ह्या दहा हजाराचं करशील तरी काय?"
"माळवं "
दुसऱ्या दिवशी दादूला दहा पैकी आठ हजाराचा भाजीपाला खरेदी करून तो मोठ्या पोत्यात बांधून घेऊन जाताना सगळ्या गावाने पाहिला.
क्रमश:
-राव पाटील!
मस्त लिहिताय..
मस्त लिहिताय..
पाच रुपये रोजाने हमाली × सहा
पाच रुपये रोजाने हमाली × सहा महिने = पन्नास हजार
पुढील भागाच्या प्रतीक्षेत!!
मस्त!
मस्त!
@अज्ञातवासी, मला वाटतं रोज पाच रुपयांंच्या बदल्यात हमालाचा बिल्ला वापरायला मिळाला असं म्हणायचं असेल.
मस्त वेगवान मांडणी
मस्त वेगवान मांडणी
छान सुरुय कथानक
@अज्ञातवासी, मला वाटतं रोज
@अज्ञातवासी, मला वाटतं रोज पाच रुपयांंच्या बदल्यात हमालाचा बिल्ला वापरायला मिळाला असं म्हणायचं असेल.>> बरोबर!
अच्छा असं वाक्य अभिप्रेत होतं
अच्छा असं वाक्य अभिप्रेत होतं होय...
थँक्स वावे !
पाच रुपये रोजाने हमाली × सहा
पाच रुपये रोजाने हमाली × सहा महिने = पन्नास हजार Lol
पुढील भागाच्या प्रतीक्षेत!! +1111
Submitted by अजय चव्हाण on 19
Submitted by अजय चव्हाण on 19 June, 2020 - 21:10>> नसलेल्या जोकवर हसता राव तुम्ही, आणि असलेला जोक सहन होत नाही ह. घ्या
रच्याकने धन्यवाद, पूढील भाग उद्याच. परवापर्यंत कथा पूर्ण करण्याचा मानस आहे. बघू!
तो बिल्ला ७८६ क्रमांकाचा असेल
तो बिल्ला ७८६ क्रमांकाचा असेल. (आठवा सिनेमा दिवार आणि पुढील प्रगती)
इथिकल शुटर, मला DJ सिनेमा आठवला.
भेळ करू नका अजिंक्य राव.
रच्याकने कथा छान चालू आहे. माझ्या वरील प्रतीसादांना घ्या.
पुभाप्र
DJ सिनेमा आठवला.>> बघितला
DJ सिनेमा आठवला.>> बघितला नाहीये, पण imdb वर वाचल्या दोन ओळी. नाही होणार तसली भेळ. अर्थात थोडा मसाला असेल, पण म्हटलं करू ट्राय! तद्दन दाक्षिणात्य प्रसिद्ध चित्रपटाची पटकथा वाटणार नाही एवढी अपेक्षा मी स्वतःकडून नक्कीच ठेवतोय, तुम्हीही ठेवा!
रच्याकने धन्यवाद!
दोन्ही भाग अप्रतिम झालेत....
दोन्ही भाग अप्रतिम झालेत.... काहीतरी नवीन आणि खुमासदार वाचायला मिळालं..... पु भा प्र
राव, मी काय जोकवर हसलो नाही..
राव, मी काय जोकवर हसलो नाही.. मलाही तोच प्रश्न पडलेला आणि मी मनातल्या मनात कॅलक्युलट केलं होतं...आणि सेम पिंच म्हणून लाईक + स्माईल..ते ही स्मितहास्य...
जोकवर हसायचचं असतं तर दुसरी स्माईली टाकली असती...
हमाली करून रोज पाच रुपये
हमाली करून रोज पाच रुपये कमवले जातील असं वाटलं? सो स्वीट.
काहीतरी नवीन आणि खुमासदार
काहीतरी नवीन आणि खुमासदार वाचायला मिळालं.
>>>>+१
चांगलं लिहिताय .
चांगलं लिहिताय .
मलाही 'गाॅडफादर' आठवली.
मलाही 'गाॅडफादर' आठवली.
पुभाप्र.
धन्यवाद सर्वांना!
धन्यवाद सर्वांना!
गॉडफादर: _/\_ काय नाव घेतलं तुम्ही.. एकेकाळी गारुड होतं माझ्यावर त्या कादंबरीचं!
छान. उत्कंठावर्धक.
छान. उत्कंठावर्धक.
DJ चित्रपट बघण्यात आला.
DJ चित्रपट बघण्यात आला. सुरुवात थोडी फार सारखी वाटली खरी, पण कथानक बऱ्यापैकी वेगळे शिजणार आहे. दिरंगाई बद्दल क्षमस्व..
भाग ३: https://www.maayboli.com/node/75337