संवाद सूत्र प्रथम अध्याय: व्हर्जन २.०
मला तू आवडतेस.
बssरं...
हसताना हे असे डोळे बारीक करतेस, ते आवडतं.
हम्मss..
हे असले, तांदूळ निवडण्यासाठीच खास बनवलेले,
बकवास फ्रेम्सचे चष्मे घालून वाचत बसतेस, ते आवडतं.
ऐकतेय.. चालू दे तुझं..
'मग ? काय काय झालं आज?' असं विचारलं की तुझ्या घरची, ऑफीसातली, काही खरी, बरीचशी काल्पनिक
गा-हाणी सुरु करत नाहीस, हे..
जोक फालतू वाटला की काही काळ चेहरा मख्ख ठेऊन, बर्याच नंतर, फुटल्यासारखी हसत बसतेस, हे एक..
मेलोड्रॅमॅटीक रुसव्यांच्या वगैरे भानगडीत न पडता डायरेक्ट शब्दांनी फटकावतेस, हे..
आणि वीकेंडला उगाच 'चल इकडं आणि चल तिकडं' असलं काही नसतं, हे पण..
कधी गेलोच तर, ट्रॅफिकमध्ये उलटे खतरनाक लूक्स देत, जागा दिसेल तशी स्कूटी दामटवत असतेस, हे अजून एक..
माझी एकूणच निर्णयक्षमता पूर्णतः गंडलेली आहे, हे मला कबूलपण करावं लागलं नाही, एवढं समजूतदार सत्तांतर करून घेतलंस, हे सुद्धा..!
पण मध्येच काही बिनसतं आणि बोलायचं बंद करतेस, तेव्हा जत्रेत बोट सुटलेल्या मुलासारखं होतं, हे माहितीये का तुला?
मग नंतर कधीतरी माझा विदीर्ण, फाटलेला चेहरा बघून
तुलाच भडभडून येतं आणि मी कोसळतो, हे??
लहानपणी आमच्या कुत्र्याच्या डोक्यावरून, कानांमागून, गळ्याखालून हलकं हलकं कुरवाळत राहिलो की ते डोळे किलकिले करून क्लांत होऊन माझ्या मांडीवर पडून रहायचं..
त्याला अमाप सुख होतंय एवढंच कळायचं..
आणि त्या बिचार्याला ते सांगताही यायचं नाही.
मागताही यायचं नाही..
अशा कितीतरी विषारी वेळा येऊन गेल्या असतील की फक्त मागता नाही आल्यामुळं, त्याला ते मिळालं नसेल..
आणि त्या त्या वेळी त्याला कळलंही नसेल की त्याचं नक्की काय चुकलं ते..!
तुझ्यापुढं कोसळताना मला कळतं, तेव्हा त्याचं काय होत असेल ते..
पण मग नंतर थंडावा घेऊन येतात, पश्र्चातापदग्ध होऊन, काहीही न राखता, तू उधळून दिलेल्या सलगच्या सलग
फेसांडत्या रात्री आणि दुपारी..!
आणि नंतर ते खोल खोल श्र्वासांचं उफाण नॉर्मल झाल्यावर...
'कुठंही जायचं नाहीयेस आता उंडारायला'..'फटके मिळतील जरासाही हललास तर'... 'मी बोलतेय...आणि आता तू ऐकायचं आहेस"..."बधिरायस का? काय नुसतं हूं हूं करतोयस?"
या टाईपची काहीतरी तुझी कानाजवळ बराच वेळ चाललेली कुजबूज कम् अॅनॅलिसीस कम् कॅथर्सिस..
बाय द वे, तू असा सगळा निचरा करावास, म्हणून मुद्दामच मी अनावश्यक चुळबुळ करायला लागलेलो असतो, हे तुझ्या लक्षात आलं नाही का कधी??
एकदा विचारेन म्हणतो पण राहूनच जातं दरवेळी..
कारण मग पुन्हा पहिल्यापासून मला तू आवडायला
लागलेली असतेस..
मस्त लिहिलंय!! आवडलंच..
मस्त लिहिलंय!! आवडलंच..
... _/\_
... _/\_
असा सगळा निचरा करावास, म्हणून
असा सगळा निचरा करावास, म्हणून मुद्दामच मी अनावश्यक चुळबुळ करायला लागलेलो असतो, हे तुझ्या लक्षात आलं नाही का कधी?? ^^^^हे खूप आवडल.
लेख छान आहे.
@ मी_अस्मिता^^ आभार.. .._/\_
@ मी_अस्मिता^^ आभार.. .._/\_
छान लिहिलंय. मस्त.
छान लिहिलंय. मस्त.
चांगलंय
चांगलंय
छान जमून आलय
छान जमून आलय
आवडलं
आवडलं
खूप छान लिहिलंय...
खूप छान लिहिलंय...
काही काही वाक्यं आणि भावना : अप्रतिम...
खुपच छान, आवडलय
खुपच छान, आवडलय
Mastay
Mastay
@ अरिष्टनेमि, मोदी, pintee..
@ अरिष्टनेमि, मोदी, pintee.. धन्यवाद
धन्यवाद अजिंक्यराव, निरु, धनुडी आणि नानबा
आवडलं. छान लिहिलंय....
आवडलं. छान लिहिलंय....
आवडले!
आवडले!
साष्टांग दंडवत ह्या
साष्टांग दंडवत ह्या लिखाणासाठी !