"काळोख"

Submitted by am_Ruta on 11 June, 2020 - 08:11

आकाशी चांदण्या
मुक्तपणे सांडल्या,
त्यांच्या उरी मात्र
मिट्ट काळोखच दाटला...

मूकपणे वावरताना
काळजचा ठोका चुकला,
पदराला हात घातला गेला
या जाणिवेनेच जीव नकोसा झाला...

चरित्र लिहिता लिहिता
चरित्र्यावरच घाला घातला,
आशिर्वाद देणारा हातच लज्जास्पद
स्पर्श करायला धजला..

शरीराचा येथेच्छ आस्वाद घेऊन
राक्षस संतुष्ट झाला,
चोळा मोळा झालेला जीव मात्र
निपचीत पडून राहिला...

इतक्यावरच थांबेल
तर तो राक्षस कसला??
पुन्हा एकदा भक्ष करून त्या जीवाचा
शेवटी एकदाचा लचकाच तोडला...

हे कमी म्हणून की काय त्या दानवाने,
तो जीव निर्दयपणे जिवंत जाळला...

- am_Ruta

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दर्द आहे कवितेत. आणि भयानक सत्य ही. सुंदर रेखाटली आहे.

चारित्र्यावर होतं ना? लिहिताना चूक झालीअसेल का? ओळ १०?