एक वाटी अख्खे ( सालासकट) मूग
एक मध्यम कांदा बारीक चिरून
एक मध्यम टॉमेटो बारीक चिरून
दोन लवंगा, एक इंचभर दालचिनीचा तुकडा, २ हिरवे वेलदोडे
तेल, हळद, हिंग, मोहरी, मीठ, कढीपत्ता
आमचूर / लिंबाचा रस यापैकी एक
सिंडरेलाच्या वाढदिवसानिमित्त अजून एक मुगाची पाककृती. मागच्या दोन पाककृतींवर मुगाची सालं काढण्यावरूनच चर्चा झाली होती चिकार. म्हणून ही सालं न काढता पाककृती.
वाटीभर मूग भरपूर पाण्यात भिजवून घ्यावेत ४-५ तास तरी. हा वेळे कृतीमधे धरलेला नाही.
भिजलेले मूग निथळून परत थोडे ( मूग बुडतील एवढेच) पाणी , चवीपुरते मीठ आणि पाव टीस्पून हळद घालून प्रेशर कूकरमधून शिजवून घ्यावेत. दोन शिट्टया पुरतील. अगदी गाळ नाही करायचेत.
कढईत तेल तापवून आधी लवंग दालचिनी वेलदोडे घालून ३० सेकंद परता.
मग मोहरी , कढीपत्ता , हिंग घाला. लगेच बारीक चिरलेला कांदा घालून परता.
कांदा मऊ झाला की बारीक चिरलेला टॉमेटो घालून परता .
टॉमेटो शिजत आले की शिजवलेले मूग घाला.
उसळीपेक्षा जास्त पात़ळ आणि मिसळीपेक्षा दाट अशी कंसिस्टंसी असते. आपापल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता.
आमचूर असल्यास लगेच घाला. लिंबाचा रस असल्यास एक उकळी आल्यावर घाला. आंबटसर चव आली पाहिजे.
पोळीबरोबर किंवा भाताबरोबर पण खाता येईल.
वेगळीच आहे रेसिपी. छान वाटतेय
वेगळीच आहे रेसिपी. छान वाटतेय.
वेगळी आहे रेस्पी जरा. आहेत
वेगळी आहे रेस्पी जरा. आहेत मूग घरात. उद्या परवा पाहातो करून.
रेसीपी आवडली. पण 'खाट्टा मग'
रेसीपी आवडली. पण 'खाट्टा मग' की 'खट्टा मुग'??
छान आहे रेसिपी. मागची
छान आहे रेसिपी. मागची खोबऱ्याच्या वाटणातली मूग कृतीही करून पाहिली होती. तीही आवडली होती. हीही करून पाहीन. उस्तवार कमी आहे.
गुजराती लोक ताकात / कढीत
गुजराती लोक ताकात / कढीत करतात
वेगळी रेसिपी. मी परवाच मूग
वेगळी रेसिपी. मी परवाच मूग करुन झाले पण मी सारखे मूग खाऊ शकते. तुमची ती बिरडं स्टाइल रेसिपी केली होती (सालं नं काढता) आवडल्याचं कळवलंय तिथेही. ही पण इंटरेस्टिंग वाटते. मुलं कदाचीत खाणार नाहीत असा एक फील येतोय पण त्यांना काय उकडेलेले मूग पण देता येतात. कुणी केले तर फोटो टाका बरं.
अरे वा! बर्याच वर्षांनी
अरे वा! बर्याच वर्षांनी बड्डे गिफ्ट दिलं की शोन्वाक्कांनी. पण दर वेळी काय मला मूग गिळायला लावता? वेगळी दिसतेय रेसिपी, करण्यात येइल लवकरच.
डाळकांदा म्हणजे तो हाच का?
डाळकांदा म्हणजे तो हाच का?
डाल कांदा तुरिचा करतात
डाल कांदा तुरिचा करतात