Submitted by मनसखी on 21 May, 2020 - 00:43
रडले कि तू आठवतोस
हसले कि तू आठवतेस
विचारातही तूच असतोस
कृतीतही तूच घडतोस
मनात तू कायम साठून राहतोस
भावनांमध्ये दाटून येतोस
वळणावळणा वर खुलवत राहतोस
जगणे हे माझे फुलवत राहतोस
कोणीच नसले तरी तू असतोस
काहीच नसले तरी तूच दिसतोस
टप्याटप्यावर जाणवत राहतोस
क्षणाक्षणाला खुणवत राहतोस
कधी डोळ्यात पाणी ,कधी ओठात हसू
नकळत सगळ्यांना रमवत राहतोस
पुस्तका असा कसा रे तू ???
अलगद तुझ्याच दुनियेत घेऊन जातोस
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान कविता
छान कविता
Chan
Chan
धन्यवाद @ रूपाली विशे
धन्यवाद @ रूपाली विशे
धन्यवाद @ Urmila Mhatre
पुस्तक म्हणजे एक आत्मा जणू.
पुस्तक म्हणजे एक आत्मा जणू. जिवंत आत्म्याचा प्रवास. सुरुवात एका आत्म्यापासून ते दुसऱ्या आत्म्यापर्यंत. लेखकाचा आत्मा त्याचे विचार घेऊन लेखणीत उतरतो. लेखणी मधला शाई ने घेतलेला आत्मा. कागदावर. मग वाचकाच्या हातात. मग वाचकाच्या डोळ्याच्या माध्यमातून प्रवास करत थेट त्याच्या आत्म्यापर्यंत. असे अनेक विचार. अनेक आत्मे. अनेक मित्र...
खुपच सुरेख @शिवप्रीत
खुपच सुरेख @शिवप्रीत