सुटकेस भाग १: https://www.maayboli.com/node/74331
सुटकेस भाग २:https://www.maayboli.com/node/74354
सुटकेस भाग ३:https://www.maayboli.com/node/74399
सुटकेस भाग ४:https://www.maayboli.com/node/74471
सुटकेस भाग ५:https://www.maayboli.com/node/74477
सुटकेस भाग ६:https://www.maayboli.com/node/74502
------------------------------------------------------
बेल वाजली.
मी पुढे होऊन दरवाजा उघडला. राजनभाई पुढे ऊभा होता. आणि त्याचे दोन चमचे.
"भाई, आपको यहा नही आना चाहिये था!" मी दरवाजात म्हणालो.
"सलाम भाभीजी" म्हणत तो आत आला. बायको या एकंदर प्रकाराने अवाक झाली.
"भाई निचे चलके हम बात करते है" मी त्याला समजावले.
"पैले वो दस लाख की थैली दे.. फिर हम निचे जाएंगे"
"मै सच कह रहा हू.. बंबईमे कीसीने चुरा ली.."
भाई खुर्चीवर बसला. बाकी दोन चमचे सोफ्यावर सुस्तावले.
"कोण आहेत हे लोक? कसले दहा लाख?" बायको चिंताग्रस्त होत म्हणाली.
"तू आता जा, मी तुला नंतर सगळं सांगतो.." मी म्हणालो.
"नही" भाईने पिस्तुल हातात घेत म्हटले. "वो यही रूकेगी.."
"भाई?"
"तुने अहमदाबाद जाकर जो कांड किया है? तुझे लगता है वो इतना आसान है.." पिस्तुल चिऊवर रोखत तो म्हणाला. " सवाल एक करोड दस लाख का है. वो पाने के लिए मै कुछ भी कर सकता हू.."
"लेकीन आपही ने कहा था.. आदमी को जिंदा रखना पडता है तभी पैसा मिलता है.."
"तो तुझे कहा मार रहा हू.. तेरी बच्ची को मार रहा हू..."
"रूको मै देता हू.."
भाई थोडा रीलॅक्स झाला.
मी बायकोला आणि चिऊला आतल्या खोलीत बंद केले. आणि कपाटातली बॅग घेऊन हॉलमध्ये आलो. आतल्या कप्प्यात त्यानेच दिलेले चकचकीत पिस्तुल होते.
"भाई आपने यहा आके बहोत बडी गलती कर दी"
धाड..... धाड.....धूडूक...धाड...ढिचीक..
वायूच्या वेगाने गोळ्या चालल्या. एक माझ्या हाताला चाटून गेली. मात्र ते तिघे रक्ताच्या थारोळ्यात स्पष्ट दिसत होते.
बायकोने बाहेर डोकावले. आजवरच्या आयुष्यात तिला बसलेला हा सर्वात मोठा धक्का होता.
आवाज ऐकून शेजारी पाजारी धावत आले पण आत यायची कुणाची हिंमत झाली नाही.
किती वेळ गेला कुणास ठाऊक पण पोलीस येऊन त्यांनी कधी बेड्या ठोकल्या आणि स्टेशनला घेऊन आले माझे मलाच कळले नाही.
एका अंधाऱ्या खोलीत बंदिस्त मी. दिवस की रात्र काहीच कळेना. अखेर आपण यात सापडलोच. पुर्ण गळ्यापर्यंत रूतलो. सुटकेचा आता कुठलाच मार्ग नाही. कदाचित ही अंधार कोठडीच मरेपर्यंत आपल्याला जखडून ठेवणार. आशेचा किरण आपल्या नशीबी नाही.
करकरत दरवाजा उघडला गेला.
एक हवालदार मला घेऊन दुसऱ्या एका खोलीत आला. तिथे स्वच्छ प्रकाश होता. टेबल होते. आणि दोन खुर्च्या. समोरासमोर.
मी एका खुर्चीवर बसलो. आणि हवालदार निघून गेला. तिथे ठेवलेल्या मगातले भरपूर पाणी पिलो. थोडी हुशारी आली. डोकं हलकं हलकं वाटायला लागलं.
जरावेळाने एक सुटाबुटातला ऑफिसर त्या खोलीत आला. त्याने दार लावून घेतले. त्याच्या हातात कसलीतरी फाईल होती. समोरच्या खुर्चीवर तो बसला. आणि म्हणाला,
"तो तुम हो जगदीश खत्रे. मै कमल कुमार. क्राईम ब्रॅंच मुंबईसे आया हू... थोडा लेट हुआ. वहासे यहा आनेतक... लेकीन चलता है. So, tell me your story. शुरूसे..."
"मुझे अपने वकीलसे बात करनी है." मी म्हणालो.
त्याने हबकून माझ्याकडे पाहिले.
"फिल्मे बहोत देखता है क्या? तेरेको क्या लगा.. मै इधर बैठके क्या च्युतिया काट रहा हू? ईधर तेरेको कुछ भी नहीं मिलेगा. देख... प्यारसे बात कर रहा हू... प्यार से ही जवाब दे दे बेहतर रहेगा"
"वो मेरा कानूनी अधिकार है.. आप ऐसे कैसे मुझे रोक सकते है.?"
"शायद तुझे अलग ढंगसे समझाना पडेगा.." तो रिव्हॉल्व्हर काढत म्हणाला. "मै यहा तेरे मौत का फर्मान लेके आया हू.. बहोत आसान है तुझे मारना.. तुझे अभी गाडीमे डालके कहीभी ले जाएंगे.. और बाकी तुने इनकाऊंटर क्या होता है सुना ही होगा.."
"कौन हो आप?"
"अब आया ना लाइन पे... मै राजनभाईके लिए काम करता हू... तेरा स्टोरी मालूम है मुझको... बस देखना चाहता हू तू कितना सच बोलता है?"
"लेकीन राजनभाई को तो मैने अभी मारा.."
तो खो खो हसायला लागला..
"अबे कौनसा माल फुका है तुने... राजनभाई को मारेगा?? हलवा समजा है क्या... अंडरवर्ल्ड का मजाक बना दिया .. साला.."
"फिर वो कौन था?"
"नाम नहीं पुछा उसका कभी? अस्लम शेख... राजनभाई पंटर था... चुतिया था साला.. अच्छा हुआ उडा दिया.."
तो थोडं पाणी पिला.. मग सिगारेट पेटवली. धूर सोडत म्हणाला..
"राजनभाईने बोला है. तेरेको उडानेके लिए. अगर तुझे जिंदा रखा.. तो उसे सॉलिड रिझन चाहिये.. जो तुझे अभी देना है.. नही तो..." रिव्हॉल्व्हर टेबलावर ठेवत तो गरगर फिरवत म्हणाला..
"क्या मुझे एक सिगारेट मिल सकती है.."
"शुअर... " त्याने पाकिट पुढ्यात टाकले.
मी सिगारेट पेटवली. आणि एक कश घेतला.
"कहा मिलेगा ये राजनभाई?"
"दुबई मे.. जाएगा?"
"वैसे मेरी गलती क्या है? जिससे मुझे मौत की सजा मिल रही है?"
"तु ही बता?"
"वो सुटकेस.. जो मैने टोयोटा कारसे उठायी थी!"
"बिलकुल सही.. अगर तुने उठायी नही होती तो आज तू यहा नही होता."
"लेकीन मैने उसे वापस करने की पुरी कोशीश की..."
यावेळी त्याने माझ्याकडे पाहिले.
मी त्याच्याकडे पाहिले. आणि म्हणालो,
"यानी वो जो दो लुख्खे आये थे पहली बार सुटकेस लेने... मुझे पक्का मालूम है.. वो राजनभाईनेही भेजे थे.."
"ये भी सही है. अब सवाल है.. तुझे ये कब मालूम पडा और कैसे?"
"पहले यतो मै ये साफ करना चाहता हू की.. मैने आपकी सुटकेस उठायी.. और आप लोगोने मेरा फायदा.. हिसाब बराबर हुआ..."
"ठिक है. ये भी मान लिया..."
"दुसरी गलती मैने की... अस्लम शेख को उडा दिया.. मेरे पास कोई चारा नही था.."
"नही रे.. वो गलती नहीं है. वो खुद चुतिया था. इसिलिए मारा गया.. राजनभाईभी बोले.. अच्छा हुआ च्युतिया लुडक गया.."
"मतलब मैने ऑलरेडी आपका एक काम कर दिया है. तो मुझे और एक गलती माफ होनी चाहिये.."
"हा... " आता तो सरसावून बहला. "उसी के लिए मै यहा आया हू... जरा उस गलती के बारे मे बताव.."
"जतिनभाई... "
"कमाल है... उसकोभी तुने टपकाया... अबे हमकोभी नही पता था ये... खाली तुझपे शक था.. वाकई तेरा स्क्रू ढिला है. ये बहोत बडी गलती तुने की है."
"क्या करता.. वो सुटकेस उसके घरपे दिखाई दिया.. और मुझसे रहा नही गया.. बडे थंडे दिमाग से मैने उसे मारा है... और उसकी लाश को घर के पिछे जमीन मे दफनाया... मुझे तो खुदपेभी यकीन नही आ रहा है..."
त्याने चकचकीत रिव्हॉल्व्हर टेबलवर पुन्हा एकदा गरागरा फिरवले.
"राजनभाई तुझे माफ नही करेगा.." रिव्हॉल्व्हर लोड करत तो म्हणाला.
"और वो दस लाख.. जो बंबईमे चोरी हो गये?"
"वो अस्लम का आयडीया था.. बिलकुल च्युत्या जैसा.." रिव्हॉल्व्हर हातात त्याने घट्ट पकडले.
"लगता है तेरे पास कोई सॉलिड रिझन नही है." रिव्हॉल्व्हर त्याने माझ्या डोक्यावर धरली.
"और वो सुटकेस.. जतिनभाईके घरसे जो मैने उठायी थी.. वो अहमदाबाद के गटरमे अभी भी पडी हुयी है.. सिर्फ मै जानता हू वो कहा है. उसमे वाकई एक करोड रूपया है.. " मी हलके स्मित केले. "इसे मैने आखरी दाव के लिये बचा के रखा था.."
एव्हाना त्याचे रिव्हॉल्व्हर माझ्या कपाळावर टेकले होते. बोट ट्रिगरवर होते आणि त्याच्या चेहऱ्यावर एक हलके स्मितही.
समाप्त
हा माणुस नेमका होता तरी कोण?
हा माणुस नेमका होता तरी कोण?
कुछ समझ नहीं आया।
आता मला परत सुरवातीपासुन कथा वाचवी लागणार..
झकास!!! सिझन २ आणणार का?
झकास!!!
सिझन २ आणणार का?
कडक!
कडक!
मस्तच. शेवट आवडला. पण
मस्तच. शेवट आवडला. पण एवढ्यात कथा संपेल असं वाटल नव्हतं.
लै गोलगोल फिरवलंय राव आणि मग
लै गोलगोल फिरवलंय राव आणि मग आकाशात उडवून दिलंय.
पूरा स्टोरी पढ़के ऐसा लागत है
पूरा स्टोरी पढ़के ऐसा लागत है की जव्हेरगंज हमरा फिरकी ले रहा है।
शेवट आवडला!
शेवट आवडला!
हॅपी+१०१
हॅपी+१०१
कथा परत वाचुन काही फायदा झाला नाही. हा जगदीश नेमका होता तरी कोण?..
ते कुणीतरी उलगडून सांगा राव!
कडक. पुढचा सिझन येऊ दे.
कडक. पुढचा सिझन येऊ दे.
मस्त!
मस्त!
काहिहि .....
काहिहि .....
डोक्याला झिणझिण्या आल्या.
डोक्याला झिणझिण्या आल्या.
हा भाग पुन्हा वाचावा लागेल.
जमले नाही, तुम्ही टेस्ट मॅच
जमले नाही, तुम्ही टेस्ट मॅच नका खेळु
तुमचा आत्मा टी २० मध्येच आहे
जव्हेरगंज - तुमच सगळ्या
जव्हेरगंज - तुमच सगळ्या फॉर्मॅट मधील लेखन आवडतं.
टेस्ट मॅच, एकदिवसीय, टी२० कशातही लिहा
जव्हेरगंज - तुमच सगळ्या
जव्हेरगंज - तुमच सगळ्या फॉर्मॅट मधील लेखन आवडतं.
टेस्ट मॅच, एकदिवसीय, टी२० कशातही लिहा>>> +111111
माफ करा सर, पण शेवट काही
माफ करा सर, पण शेवट काही समजला नाही. कदाचित आपल्याला अपेक्षित अर्थ या पामराला कळलाच नसेल असही असु शकतं.
छान आहे पण...
छान आहे पण...
काहीच सुचत नसल्यासारखा शेवट झाला. किंवा मग मला काहीच कळले नसेल.
एकच गॅंग शेवटपर्यंत याला खेळवते आणि याच्या हातून त्यांचे मारले जायला हवे ते लोक व राहायला पाहिजेत तेही लोक मरतात एवढे कळले.
सर्वांचा खूप आभारी आहे.
सर्वांचा खूप आभारी आहे.
@ मन्या ऽ, जगदीश हा सर्वसामान्य मध्यमवर्गीय होता. तो डॉन वगैरे निघेल असे वाटले असेल तर, तसं काहीच नाही. हा मात्र पुढे जाऊन कदाचित तो बनेल.
@पाथफाईंडर, धन्यवाद. सिझन २, नसेल बहुधा. विचार नाही केला. कधी काही सुचले तर नक्की लिहीन.
@अजिंक्यराव पाटील, धन्यवाद. तुमच्या कमेंटमुळे लिखाणाचा हुरूप वाढतो.
@ज्वाला, मान्य आहे. खरंतर भरपूर वाढवायची होती. टायपिंगचा कंटाळा फार. मध्ये एकदा लय बिघडली. तेव्हाच ठरवले. संपवू एकदाची.
@मामी, खरंतर हेच मला अपेक्षित होते. तुमच्या कमेंटने शिक्कामोर्तब झाले. शेवट ओपन एंडेडच ठेवायचा होता.
@हॅपी, हाहा.. तुमची कमेंट खरंच हॅपी करून गेली.
@Cuty, thank you.
@नौटंकी, आभारी आहे. सुचले तर नक्की सिझन २.
@वावे, धन्यवाद
@उनाडटप्पू, साहजिकच आहे. सर्वांना आवडेल असं काही नसतंच.
@सस्मित, झिणझिण्या मी सकारात्मक अर्थाने घेतो. तेच हवे होते. मनापासून आभार
@बन्या, सल्याबद्दल आभारी आहे. आपण ही कथा पूर्ण वाचली याचे समाधान आहे.
@आसा. _/\_
@बोकलत _/\_
@वीरु, धन्यवाद. शेवट किचकट झाला असावा. तरी मी सोपा करायचा बराच प्रयत्न केला आहे.
@साधना, आभारी आहे. तुम्हाला बरोबर कळाले आहे. पण त्याच्यापेक्षाही अजून काही आहे.
एनी वे, कथा अर्धवट नाही सोडली. प्लॉट पूर्ण केला आहे. काही लूपहोल्स आहेत मान्य. पण शेवटापेक्षा माझे लक्ष कथा रंगवण्याकडे अधिक होते. अजून काही क्रमशः कथा लिहायचा विचार तर आहे. देखते है. जमल्या तर जमल्या!!
आभार!!
तुम्ही तुमच्या मनाला पटेल तसे
तुम्ही तुमच्या मनाला पटेल तसे लिहा हो, जितके खून पडायचे ते पडू द्या.. लोकांचं ऐकून काही करायला गेलं की ना धड आपल्या मनासारखं होत ना लोकांच्या! कडं कथेकडून अपेक्षा आहेत, पूर्ण करालच!
वेब सिरीज सारखा सिझन 2 येणारे
वेब सिरीज सारखा सिझन 2 येणारे आता
सस्मित, झिणझिण्या मी
सस्मित, झिणझिण्या मी सकारात्मक अर्थाने घेतो. तेच हवे होते. मनापासून आभार>>>>>>>>>>>>>>>>>>
भारी झाली कथा, तुमच्या
भारी झाली कथा, तुमच्या बाकीच्या नविन कथा सुद्धा वाचायच्या रहिल्या आहेत

वाचुन सांगते
छान आहे कथा. आवडली.
छान आहे कथा. आवडली.
फालतू कचरा मागे सारण्यासाठी
फालतू कचरा मागे सारण्यासाठी प्रतिसाद