जुना किस्सा आहे. दिवाळीच्या वेळचा. दोन जवळच्या मैत्रीणी. दोन्ही बहिणी. एक विवाहीत एक अविवाहीत. गेल्या पिढीपासून आमचे फॅमिली रिलेशन्स आहेत. घरी कधीतरी जाणे होते. असो मुद्द्यावर येतो.
त्यांच्या आईने स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. कमावती बाई पण मागील पिढीतील टिपिकल संस्कारी आई. साडीतच राहणे वगैरे.
स्वेच्छानिवृत्तीनंतर मात्र स्वेच्छेनेच ड्रेसेस घालायला सुरुवात केली. व्हॉटसपवर मैत्रीणींचा ग्रूप बनवून फिरायलाही जाते. आम्हीही मजेत चिडवतो काकू मॉडर्न झाल्या. तिच्या दोन मुलींनाही मॉडर्न आईचे कौतुक वाटते.
आणि मग काकूंनी दिवाळीत स्वत:साठी बिनबाह्याचा स्लीव्हलेस, टाईट फिटींग वगैरे तरुणींना शोभेल असा ड्रेस घेतला.
कौतुक ओसरले आणि वादाची ठिणगी पडली. दोन्ही मुलींनी आक्षेप घेतला.
विवाहीत मुलीने तरी "मोठ्या मनाने" कधीतरी एकदा घाल आणि हौस पुरव अशी परवानगी दिली.
छोट्या बहिणीचे मत पडले ताई तुला काय जातेय बोलायला. मला तिच्यासोबत कॉलनीत राहायचे आहे. कसं वाटते ते. चार लोकं बघतील. बोलतील. ब्लाह ब्लाह ब्लाह....
त्यांची चर्चा चालू होती आणि मी फराळ करत होतो. बहुधा मी सुद्धा त्यांच्या हो ला हो मिळवत काकूंना दोन उपदेशाचे बोल सुनवावेत अशी अपेक्षा होती.
पण मी म्हणालो त्यांची लाईफ त्यांची चॉईस. तुम्ही सुद्धा किती मॉडर्न ड्रेस घालता..
अरे हो, त्या दोघी बहिणी बरेचदा गुडघ्याच्या चार बोटे वर स्कर्ट घालतात.
मग त्यांनी मुद्दा बदलायचा प्रयत्न केला. अरे पण तिला शोभायला नको का?
मी मनातल्या मनात म्हटले, तुम्हाला शोभते हे तुमचे तुम्हीच ठरवले कि तिला विचारायला गेलात. आता तिला काय शोभतेय ते त्यांचे त्यांना ठरवू द्या की ....
पण उघड काही बोललो नाही. दिवाळीला वाद नव्हता घालायचा. म्हणून दोन चकल्या उचलल्या आणि निघालो तिथून.
जाताना मात्र एक विचार मनात आला - आईने मॉडर्न कपडे घातले तर त्याची मुलांना लाज का वाटावी?
कदाचित मातृदेवो भव: म्हणताना आपण एक प्रकारचे दैवत्व जपण्याची जबाबदारी तिच्या खांद्यावर टाकली आहे जी तिची स्वत:ची आवडनिवड स्वत:ची हौसमौज मारून टाकतेय.....
आई सोबत मातृदिनी सेल्फी काढून सोशल साईटवर अपलोड करण्यापासून, आईला स्वयंपाकात मदत करणे, तिचे पाय चेपणे, तिचा वाढदिवस साजरा करणे, तिची म्हातारपणी काळजी घेणे वगैरे सारे काही आपण तिच्या कधी न संपणरया ऋणाची परतफेड वगैरे म्हणून करत असू...
पण एवढे सारे करून जर आपण तिला तिच्या मनाप्रमाणे जगू देत नसू तर काही अर्थ नाही.
या मातृदिनी हा विचारही नक्की करूया
धन्यवाद,
ऋन्मेष
स्त्रियांच्या सबलीकरणासाठी एक
स्त्रियांच्या सबलीकरणासाठी एक पिढी खर्च झाली
परंतु
अशा
सबला स्त्रियांबरोबर वागावे कसे हे पुरुषांना शिकवलेच गेले नाही ही खरी शोकांतिका आहे. >>>>++११११ पटलं एकदम
टोटल बनावट किस्सा असल्यासारखे
टोटल बनावट किस्सा असल्यासारखे लिखाण. ओरिजिनल आयडीचा पहिला प्रतिसाद येण्यासाठी सहा प्रतिसाद आधी यावे लागले.
शिळ्या कढीला ऊत आणण्यासाठी काहीतरी पांचट किस्से सांगायचे आणि आधी घडलेल्या चर्चेत जी बाजू मांडता आली नाही ती उशिरा आलेल्या शहाणपणातून मांडायची असे काहीतरी वाटले.
या विषयावर २०१० पर्यंत खूप चर्चा होऊन गेल्या आहेत.
आईचा मॉडर्न ड्रेस पाहता
आईचा मॉडर्न ड्रेस पाहता मुलींनी घेतलेले ऑब्जेक्शन हा मुद्दा आहे
>>>
ह्याचा आईला देवी मानण्याशी काय संबंध?
सांगितलेही असेन. मला माहीत नाही.
>>
तुम्हाला माहीत नाही म्हणता! मग त्याहून पूर्ण माहिती न घेता बादरायण काहीही लावून मातृ दिन अन मातृ देवता आदी आदी ... निरर्थक कळफलकविलास!!
ओरिजिनल आयडीचा पहिला प्रतिसाद
ओरिजिनल आयडीचा पहिला प्रतिसाद येण्यासाठी सहा प्रतिसाद आधी यावे लागले.
-->>> थोडा मिष्टेक हुआ है आप से . तीन हो सहा नाही .
>>>>काल-परवा मदर्स डे झाला.
>>>>काल-परवा मदर्स डे झाला. 90% लोकांच्या वॉलवर "जेव्हा घरात 4 सफरचंद असतात आणि 5 माणसं.. तेव्हा मला भूक नाही असं सांगते ती आई". WTF.. का बरं? या आईला चारही सफरचंदाचे तुकडे करून किंवा ज्यूस करून समान वाटा घेता येणार नाही का? कश्याला उगाच मखरात बसवून तिला स्वतःला माणूस म्हणून स्वतःच्या बेसिक आवडीनिवडी, तहान-भूक-शी-शू-आराम-झोपेची गरज वगैरे नाहीच्चेत असं धरून चालायचं?>>> खरे आहे हे. प्रतिसाद फार आवडला.
टोटल बनावट किस्सा असल्यासारखे
टोटल बनावट किस्सा असल्यासारखे लिखाण. >>> हेतू तोच होता की किस्सा बनावट वाटावा. संबंधितांची ओळख लपून राहते.
तुम्हाला माहीत नाही म्हणता!
तुम्हाला माहीत नाही म्हणता! मग त्याहून पूर्ण माहिती न घेता >>>>>> पुन्हा तेच म्हणेन. मुलींच्या विचारांवर धागा आहे. आईची त्या विचारांवर काय प्रतिक्रिया होती त्याचा ईथे काही संबंध नाही मग ते मला माहीत असो वा नसो काही फरक पडत नाही.
मुद्दा ईतकाच आहे की स्वतः मॉडर्न कपडे घालणारया मुली, किंवा मग मुलेही जे आपल्या गर्लफ्रेंडला खुशाल मॉडर्न कपडे घालू देतात त्यांचे विचार आई ने तिचे आई ईमेज जपली पाहिजे यापाशी येऊन का अडकतात?
आणि कपडे हे एक उदाहरण आहे.
वर प्रतिसादात आलेले सफरचंदाचे जसे दुसरे..
हेतू तोच होता की किस्सा बनावट
हेतू तोच होता की किस्सा बनावट वाटावा. संबंधितांची ओळख लपून राहते. >>> यालाच म्हणतात का, पडलं तरी नाक वर?
मुद्दा ईतकाच आहे की स्वतः मॉडर्न कपडे घालणारया मुली, किंवा मग मुलेही जे आपल्या गर्लफ्रेंडला खुशाल मॉडर्न कपडे घालू देतात त्यांचे विचार आई ने तिचे आई ईमेज जपली पाहिजे यापाशी येऊन का अडकतात? >>>> मॉडर्न कपडे न घालू देण्यामागे आईवर अधिकार गाजवणे किंवा तिला कमी लेखणे ही एकमेव भावना असते का? इतरही कारणं असू शकतातच की. आईची टोन्ड बॉडी आणि सुंदर स्किन असेल तर मुलींना आईने मॉडर्न राहील तर अभिमान वाटेल किंवा कमीत कमी विरोध तरी करणार नाहीत. पण उगीच सुरकुतलेल्या शेपलेस दंडावर स्लीवलेस ड्रेस घालण्याची हौस असेल तर मुलींनी बरं दिसत नाही सांगावंच. फ्लॉज जवळची माणसं सांगणार, बाहेरचे तोंडदेखल कौतुक करून मागे हसण्याची शक्यता असते. मी किंवा माझ्या जनरेशनच्या खूप आया मॉडर्न कपडे घालतात, पण पार्टी किंवा फंक्शनसाठी तयार झाल्यावर मी मुलाला /नवऱ्याला विचारते की चांगलं दिसतं आहे ना किंवा लाऊड/ओव्हर वाटत नाही ना? . कधी कधी आपण आरशात बघण्यापेक्षा जवळच्या माणसाच्या डोळ्यात / प्रतिक्रियेत खरं काय ते बघावं. आपली आई छान दिसलेली राहिलेली मुलांना आवडतं.
मीरा..
मीरा..
प्रत्येक वेळेस प्रत्येक मुलीने आईला दिलेला सल्ला हा अधिकार गाजवण्यासाठीच असेल असे मानणे अयोग्य हे पटले. परंतु..
आईचे हात सुरकुतलेले आहेत का कसे.. आईची बॉडी टोंड आहे किंवा काय यावरून तीने कोणते कपडे घालावेत वा घालू नयेत हे सांगायचा अधिकार तिने मी कशी दिसतेय किंवा मला हे सूट होतंय का हे विचारल्याशिवाय कोणालाही नाही.. मग ती व्यक्ती घरातली असो वा बाहेरची.
याला बॉडी शेमिंग म्हणतात. आणि ते घरचे किंवा बाहेरचे कोणीही केले तरी चूकच. एखाद्या जाड बाईने आयुष्यभर जीन्स वापरुच नये, तिच्या आवडीचे कपडे घालूच नयेत की काय?
जर आईने आयुष्यभर समाजाच्या तथाकथित चौकटीत स्वतःला ठाकून ठोकून बसवले आहे तिने इतके वर्षांनी स्वतःच्या मनासारखे जगायचे (यात कपडे घालण्यापासून ते नॉनव्हेज खाण्यापर्यंत काहीही आले) ठरवले असेल तर तुम्हाला विचारलेलं नसताना त्यात बोलण्याचा काहीही अधिकार नाही. बाहेरची माणसं मागून हसतात की पुढून याने काय फरक पडतो? काही चीप लोक्स तुम्ही काहीही घातलं किंवा केलं तरी तुमची पाठ फिरताक्षणी तुमच्याविषयी काही ना काही बोलणारच. मग आयुष्यभर "कोण काय म्हणेल" हा विचार करत बसायचा का? एवढे वर्ष केलाच की आणि तो तिने.
Pपियू, सफरचंदाचा प्रतिसाद
Pपियू, सफरचंदाचा प्रतिसाद आवडला होता.
पियू प्रतिसाद आवडेश...
पियू प्रतिसाद आवडेश...
मीरा - जवळची माणसे एका विशिष्ट पर्स्पेक्टिव्ह ने बघत आलेली असतात त्यांचा फीडबॅक घेतला तर तो बायस्ड असणार.
हिरा.. तुमचं वाक्य वाचून
हिरा.. तुमचं वाक्य वाचून वाटतंय तुम्हाला लेटेस्ट प्रतिसाद आवडला नाही
Hats off to ऋन्मेऽऽष who
Hats off to ऋन्मेऽऽष who through his blogs on many interesting themes makes us think broadly. Thanks ऋन्मेऽऽष.
धन्य्वाद दिगोचि
धन्य्वाद दिगोचि
Pages