हा एक टाईमपास खेळ आहे.
ह्यात हिंदी गाणी मराठीत भाषांतर करून लिहायची / गायची आहेत, जमेल तशी.
फा वे टा धाग्यावर उल्लेख केल्याप्रमाणे ही अशी गाणी (बे,) सुरात गायला मजा येते मला.
बघुया किती जमतय आपल्याला.
१. डोळ्यात तुझ्या विचित्र विचित्र अदा आहेत
हृदयाला बनवील पतंग श्वास तुझी ही हवा आहे
(आखो मे तेरी अजब सी अजब सी अदाए है - ओम शान्ती ओम)
२. माझ्या रंगात रंगणारी परी आहेस की पऱ्यांची राणी
की आहेस माझी प्रेमकहाणी
माझ्या प्रश्नांचं उत्तर दे गं बाई
दे ना
(मेरे सवालो का जवाब दो - मैने प्यार किया)
३. तू जवळ आलास आणि हसलास
तू माहिती नाही कितीतरी स्वप्ने दाखवलीस
आता तर माझं हृदय
जगात नाही झोपत नाही
काय करू देवा
कसंतरी होतंय
( कुछ कुछ होता है)
4. एवढं प्रेम करू नको
मी बुडून जाईन कुठेतरी
परत किनाऱ्यावर यायचं
मी विसरुन जाईन कधीतरी
पाहिलाय जेव्हापासून चेहरा तुझा
मी तर झोपुच शकलो नाही
बोल ग ना जरा
हृदयात जे आहे लपलेलं
मी कुणाला सांगणार नाही
( बोल दो ना जरा - एम एस धोनी)
बाकी आठवतील तशी प्रतिसादात लिहिते.
सुरुवात करतो
सुरुवात करतो
https://youtu.be/AX8Ik8QHk1E
अंडे का फण्डा ओर्जिनल वर्जन
आणि हे माझे स्वरचित फेव्हरेट मराठी जे मी आजही गातो.
अंड अंड अंड अंड अंड....
ये शिकवतो तुला.. अंड्याचा धंदा
हा नाही काही मामुली धंदा..
पाच हजार आहेsss
रोजचा गल्ला
अरे पाच हजार आहेsss
रोजचा गल्ला
अंडे जर का नसते
तर कोंबड्याही नसत्या...
अरे नसत्या रे नसत्या रे नसत्या रे नसत्या रे नसत्या...
जर कोंबड्याच नसत्या तर पार्ट्या झाल्या नसत्या..
अरे नसत्या रे नसत्या रे नसत्या रे नसत्या रे नसत्या...
जर पार्ट्या झाल्या नसत्या.. तर पोरी आल्या नसत्या
जर पोरी आल्या नसत्या.. तर कोण पटल्या असत्या
--+---
आता मूळ गाणे ऐकून त्या चालीत हे गाऊन बघा
अवांतर - ये कोई मामुली धंदा नही है बाबा. पाच हजार रोज का गल्ला है... या संदर्भासाठी वास्तव बघा
तु काही सान्गु नको, तरि मी
तु काही सान्गु नको, तरि मी ऐकलं
साथी प्रेमाचा तू मला निवडलं
पहिला नशा पहिला मद
नवे प्रेम हे
नवि प्रतीक्षा
झाले माझे हाल
ह्रुदय बेजबाबदार
मी चांदणी गोड गाणे, मी
मी चांदणी गोड गाणे, मी वसंतातील उखाणे,
छानसा आळोखा देउन, एक नजर माझ्यावर टाक.
रुपलावण्यखाणे, आहेस माझा प्राण मी जाणे
पण दे टाकुन माझे ५ रुपय्ये पाऊण आणे.
अरे वेड्या जाणुन घे, धन-मान सारे झूठ रे
पटले मला मिथ्य दुनिया, प्रीत तुझी अचला रे
<
<
तुझ्यासाठी बैरागी मी होइन
जंगलात वणवणुन जाइन
बघ जरा हा मासला -
>
बममुकच ए बिन बममुकच ए बिन बममुकच ए बिन बममुकच
बघ (काळरुपी) चोर आला लुबाडाया
जाग जरा वेड्या जाग जरा!
तू जवळ आलास आणि हसलास
तू जवळ आलास आणि हसलास
तू माहिती नाही कितीतरी स्वप्ने दाखवलीस
आता तर माझं हृदय
जगात नाही झोपत नाही
काय करू देवा
कसंतरी होतंय
तु नजीक आला आणीक हसला
न कळे हे तुजला स्वप्नी मज रुंजला
आता हृदय माझे न जागे न झोपे
काय करु देवा कसतरी होते.
हे चालुन जावे तालात बसतय नीट
हम्म
हम्म
सामो, जेम्स आणि ऋ ,
भारीच जमलंय
बरेचदा spontenously काहीतरी भाषांतर करते आणि गाते तालात कसंतरी बसवून नंतर विसरून जाते मी
माझ्यावर कोणी, हिरवा रंग
माझ्यावर कोणी, हिरवा रंग टाकला...
माझ्यावर कोणी, हिरवा रंग टाकला...
माझ्याच खूशीने माझा...
प्राण घेतला... हो... प्राण घेतला.
(जीव घेतला पण चालेल...)
ती - चल (राजसा) चंद्राच्याही
ती - चल (राजसा) चंद्राच्याही पलीकडे
तो - (एका पायावर)आहे मी तैय्यार गडे
ती - चांदण्या राती दिन हरवुनी जाण्याचे
विसरुनी भान या जालीम जगाचे
ती - चल राजसा चंद्राच्याही पलीकडे
तो - (एका पायावर)आहे मी तैय्यार गडे
ती - धुंद यामिनी,मज सांभाळ राया
झोप लागेल जरी सावध कराया
ती - चल (राजसा) चंद्राच्याही पलीकडे
तो - (एका पायावर)आहे मी तैय्यार गडे
ती - अपुरे पडले जीवन अपुले तरीही
पथ ना प्रीतीचा अधुरा हा राही
ती - चल राजसा चंद्राच्याही पलीकडे
तो - (एका पायावर)आहे मी तैय्यार गडे
____________________________________
चलो दिलदार चलो, चाँद के पार चलो
हम हैं तैय्यार चलो
चलो दिलदार चलो, चाँद के पार चलो
हम हैं तैय्यार चलो
आओ खो जाये सितारों में कहीं
आओ खो जाये सितारों में कहीं
छोड़ दे आज ये दुनिया ये ज़मीं
दुनिया ये ज़मीं
चलो दिलदार चलो, चाँद के पार चलो
हम हैं तैय्यार चलो
हम नशे में हैं संभालो हमें तुम
हम नशे में हैं संभालो हमें तुम
नींद आती है जगा लो हमें तुम
जगा लो हमें तुम
चलो दिलदार चलो, चाँद के पार चलो
हम हैं तैय्यार चलो
जिंदगी ख़त्म भी हो जाये अगर
जिंदगी ख़त्म भी हो जाये अगर
ना कभी ख़त्म हो उल्फ़त का सफ़र
उल्फ़त का सफ़र
चलो दिलदार चलो, चाँद के पार चलो
हम हैं तैय्यार चलो
चलो दिलदार चलो, चाँद के पार चलो
हम हैं तैय्यार चलो
चलो दिलदार चलो, चाँद के पार चलो
किल्ली, सुंदर धागा आहे.
किल्ली, सुंदर धागा आहे. क्रिएटीव्हिटी / सृजनशीलता चौखुर उधळू द्या
बस इतना है तुमसे केहना
बस इतना है तुमसे केहना
मराठीत -
फक्त इतकंच सांगायचंय तुला..
"विचार हजार वेळा केला की,
तुला सांगू की, तु माझी मैत्रिण नाही तर
प्रेयसी आहेस..
पण स्वप्न तुटण्याची भीती मनातून कधी गेलीच नाही...
साकारली होती तुझी प्रेमकविता मी
पण कधी ओठावर माझ्या आलीच नाही..
आता फक्त इतकंच सांगायचयं तुला.."
मी असेल किंवा नसेल कदाचित
तु कुठेतरी माझ्यात शिल्लक राहशील ना?
जरी झोप शेवटची आली मला..
तु स्वप्नात माझ्या येत राहशील ना?
फक्त इतकंच सांगायचंय तुला..
फक्त इतकंच सांगायचंय तुला..
कधी ग्रीष्मात सरी जर आल्या..
समजून घे त्या थेंबात मी आहे..
सकाळची कोवळी उन्हे कधी तुला सतावतील
तर समजुन घे त्या किरणांत मी आहे...
काही बोलू किंवा मी न बोलू
तु सदा ऐकशील ना मला..
फक्त इतकंच सांगायचंय तुला..
फक्त इतकंच सांगायचंय तुला...
हवेत विरलेलो स्पर्शून जाईन तुला मी..
असेल मनात तुझ्या तर थांबव मला..
थांबेल तुझ्यासाठी मी...
मी दिसेल किंवा न दिसेल तुला..
तरी अनुभवशील ना तु मला..
फक्त इतकंच सांगायचंय तुला..
फक्त इतकंच सांगायचंय तुला...
रैना बिती जाए...
रैना बिती जाए...
मराठीत -
ऋतु सरत चालले असेच तरीही श्याम येत नाही...
कसं सांगु मला हल्ली झोपच येत नाही..
वचन संध्याकाळच, संध्याकाळच वचन ते..
संध्याकाळीच विसारलास का रे...
संधीप्रकाशात जागीच अजुन तुझी राधा रे..
संध्याकाळ निघून गेली तरी श्याम येत नाही..
उघडे अजुन डोळे माझे पापणी लवत नाही...
सांग कुणी अडवलं का तुला..
का कुणाच्या नजरेत पडलास तु..
वैशाख्या राती अशीच मी प्रेमदिवानी..
तन मन तहानलेलं अन् डोळ्यात साचलेलं पाणी..
काळोख्या अंधारात दिव्याची वात अजुन संपली नाही..
झोपच कशी येईल मला अजुन तुझी आस सोडली नाही....
ऋतु सरत चालले असेच तरीही श्याम येत नाही..
वाह छान जमलीयेत गाणी, सामो
वाह छान जमलीयेत गाणी, सामो आणि अजय
धन्यवाद सामो
राधे का चोरीशी माझी मुरली
राधे का चोरीशी माझी मुरली
चोरलीस का गं प्रिये, .......... इतकी का आवडली?
का अशी खळबळ ...... माजविली SSS माजविली
देते देते म्हणतसे आणाभाका घेते
कुठे म्हणुन लपविली परी ना सांगते
खट्याळ कशी जणु धिटुकली
गं राधे का चोरीशी माझी मुरली
ना तुझी सवत ना तुझी वैरीणी
कान्ह्याची मुरली घाले मनमोहीनी
नाही करत तुझी चुगली SSS चुगली
गं राधे का चोरीशी माझी मुरली
माझी मुरली गातसे मिठ्ठी मिठ्ठी गाणी
राधा राधा ना कधी बोले तिची वाणी
तिचिया आधीन दुनिया सारी बाई
गं राधे का चोरीशी माझी मुरली
______________________________________________________________________
राधिके तूने बंसुरी चुराई - २
बंसुरी बजाई क्या, तेरे मन आई - २
काहे को रार मचाई, मचाई रे
राधिके तूने बंसुरी चुराई - २
देदूंगी कहे, क़समें खाये - २
कहाँ छुपाई, पर ना बताये - २
नटखट करत ढिठाई, ढिठाई रे
राधिके तूने बंसुरी चुराई - २
ना तेरी बैरन, ना तेरी सौतन आ आ सौतन
ना तेरी बैरन, ना तेरी सौतन
मेरी मुरलिया, मोहे सबका मन - २
करी तेरी कौन बुराई, बुराई रे
राधिके तूने बंसुरी चुराई - २
निस दिन तेरे गीत सुनावे -2
राधा-राधा रट न लगावे -2
सब जग करत सुनाई, सुनाई रे
राधिके तूने बंसुरी चुराई
@अजय - मस्त शब्दबद्ध केलीयेत
@अजय - मस्त शब्दबद्ध केलीयेत गाणी.
मूळ भावना इन्टॅक्ट ठेउन, शाब्दिक ट ला ट फक्त न करता, अर्थपूर्ण.
हा धागा चक्क व्यसन लावणारा
हा धागा चक्क व्यसन लावणारा आहे.
जरा बरं जमलं की मस्त अभिमानी फील येतो व अजुन अजुन गाणी भाषांतरीत करावीशी वाटतात.
सर्वांनी निदान आपले एक आवडते गाणे घेउन ट्राय कराच. खूप धमाल येते.
तुमची mastery आहे सामो, येऊ
तुमची mastery आहे सामो, येऊ द्यात मजा येतेय
जाते रे मी
जाते रे मी
इतकी का घाई?
जीव धडधडतोय
तो का ग बाई?
मलाच मी घाबरले
मी प्रेम करायला लागले
स्वतःलाच एवढी घाबरशील
तर प्रेम कसे करशील?
>>>जाते रे मी
>>>जाते रे मी
इतकी का घाई?
जीव धडधडतोय
तो का ग बाई?>>> गोड!!!
गुलझार यांची परोपरीने क्षमा
गुलझार यांची परोपरीने क्षमा मागून .....
_________________________________________________
असेच फिरता फिरता कुठवर आलो आपण दूर सखे
मीठीत तुझिया तनामनाचे विरघळले (साखर-स्फटिक) जसे
केश मल्मली मोकळे तुझे हे, अथवा रजनी कृष्ण जशी
नजर तुझी आरस्पानी का रोहीणी अथवा चंद्राची
चांद जणू हा कडे तुझ्या करी चांदणी तुझी ही चुनर जशी
तव देहाचा सुगंध म्हणु की झुळुक हवेची कातरशी
सळसळ पर्णांची ही केवळ आभास तुझा ऊरी पदोपदी
कुजबुज नाही जरी तुझी ही हृदय न माने परोपरी.. ....................हृदय न माने परोपरी
श्वासाश्वासामधुनी चंदनी सुगंध धुमसे जराजरा
माझ्या प्रांगणात तुझ्या प्रीतीचा जणू धवल सडा
ढलता ढलता सांज आज ही होउन गेली मृदुल मृदुल .............. होउन गेली मृदुल मृदुल
असेच फिरता फिरता कुठवर आलो आपण दूर सखे
मीठीत तुझिया तनामनाचे विरघळले (साखर-स्फटिक) जसे
विरहव्यथा जरी तुझीच ती अन माझीही ती मूक व्यथा
कळे न अपुली तगमग जरी आलम साऱ्या दुनियेला
ये झुगारुनी तू परंपरा, ये पाडुन अडसर अपुल्यामधला
'प्रेमी आम्ही - प्रेमी आम्ही' सांगू या साऱ्या दुनियेला.
_____________________________________________
ये कहां आ गए हम
यूँ ही साथ साथ चलते
तेरी बाहों में है जानम
मेरे जिस्मोजां पिघलते
ये कहां आ गए हम
यूँ ही साथ साथ चलते
ये रात है या तुम्हारी
जुल्फें खुली हुई हैं
है चाँदनी तुम्हारी नज़रों से
मेरी रातें धूलि हुई हैं
ये चाँद है या तुम्हारा कंगन
सितारे हैं या तुम्हारा आँचल
हवा का झोंका है या
तुम्हारे बदन की खुशबू
ये पत्तियों की है सरसराहट
के तुमने चुपके से कुछ
कहा ये सोचता हूँ
मैं कबसे गुमसुम
की जबकि मुझको भी ये खबर है
की तुम नहीं हो कहीं नहीं हो
मगर ये दिल है की कह रहा है
तुम यहीं हो यहीं कहीं हो
मेरी सांस सांस महके
कोई भीना भीना चन्दन
तेरा प्यार चाँदनी है
मेरा दिल है जैसे आँगन
कोई और भी मुलायम मेरी
शाम ढलते ढलते
मेरी शाम ढलते ढलते
ये कहां आ गए हम
यूँ ही साथ साथ चलते
मजबूर ये हालात
इधर भी है उधर भी
तन्हाई के ये रात इधर
भी है उधर भी
कहने को बहुत कुछ
है मगर किससे कहें हम
कब तक यूँ ही खामोश
रहे और सहे हम
दिल कहता है दुनिया
की हर इक रस्म उठा दें
दीवार जो हम दोनों
में है आज गिरा दें
क्यों दिल में सुलगते
रहे लोगों को बता दें
हाँ हमको मुहब्बत है
मोहब्बत है मोहब्बत है
अब दिल में यही बात
इधर भी है उधर भी
गुलझार यांची परोपरीने क्षमा
दुकाटाआ
बहर आलाय प्रतिभेला.
बहर आलाय प्रतिभेला.
सर्व गाणी छान जमलीत.
एवढी शक्ती आम्हा दे रे देवा
एवढी शक्ती आम्हा दे रे देवा
आत्मविश्वास कमी पडो ना
आम्ही चालावे चांगल्या रस्त्याने
चुकूनही चूक होवो ना
किल्ली, छान.
किल्ली, छान.
हृदयाच्या कप्प्यात तुला बसवुन
हृदयाच्या कप्प्यात तुला बसवुन
आठवणिंना तुझ्या मी वधु बनवुन
ठेविल मी हृदया जवळ
ठेविल मी हृदया जवळ
दिल के झरोके मे तुझको बिठाकर......
ये कहां आ गए हम - जावेद
ये कहां आ गए हम - जावेद अख्तरचं आहे.
भावानुवाद , स्वतंत्र धागा काढून लिहावा इतका छान जमलाय.
धन्यवाद भरत नंतर कोणीतरी
धन्यवाद भरत नंतर कोणीतरी सांगीतलं मला पण संपादित करता आले नाही.
तुमच्या अनुवादांवरून एका
तुमच्या अनुवादांवरून एका हिंदी सिनेगीतावरून फार फार पूर्वी सुचलेली एक कविता आठवली.
अचानक
कुणीतरी
समोर
आरसा बनून
उभं ठाकलं
आणि जाणवलं
चेहर्यावर
एक वाळवंट
आक्रमण करतंय.
...
त्याला थोपविण्यासाठी
दोन अश्रू
डोळ्यांत उभे.
हिंदी गीत ओळखता येतंय का बघा. कवितेत फक्त मुखडा आलाय.
थांबा विचार करु द्यात. फारच
थांबा विचार करु द्यात. फारच सुंदर भावानुवाद आहे.
__________
नाही येत.
आज सोचा तो आँसू भर आए
आज सोचा तो आँसू भर आए
मुद्दतें हो गयी मुस्कुराएं
भरत, सुंदर भावानुवाद आणि गाणं
भरत,
सुंदर भावानुवाद आणि गाणं
@भरत - मूळ गाण्याहून सुरेख
@भरत - मूळ गाण्याहून सुरेख झालाय हा भावानुवाद. खरं तर स्वतंत्र कविताच आहे. समोरच्या आरशामध्ये त्याला स्वतःचे प्रतिबिंब पाहून, कळले की विरहाग्नीत त्याचे हृदय व पर्यायाने, चेहरा, भाव किती शुष्क होउन बसलेले आहेत. आणि अशा मरुस्थलावरती आज तिच्या भेटीने, ढग दाटून आलेले आहेत, दोन थेंब पावसाचे पडलेले आहेत. वाह!!!
________________
दॅट रिमाईंडस मी - माझ्या कॉलेजमधल्या मित्राला मी १८ वर्षांनी भेटले तेव्हा मला काय वाटले ते. तो जसाच्या तसा वाटला मला. अर्थात किंचित बदल झालेला पण फार नाहीच. तेवढा तर होणारच. मला पहील्यांदा माझ्याकडून, आयुष्याने घेतलेल्या जकातीचे वाईट वाटले. माझा चेहरा पूर्वीसारखा राहीला असता तर किती बरे झाले असते असे वाटुन गेले. अर्थात आमचे नाते फार काँप्लेक्स आहे. माझ्यात व त्याच्यात मैत्री आहे, प्रेम आहे पण जास्त स्पर्धा आहे. त्या स्पर्धेची झलक इतक्या वर्षानंतरही डोके वर काढत होती हे गंमतशीरच म्हणायचे.
Pages