Submitted by मनसखी on 15 May, 2020 - 12:26
बंध तोडून सारे हे आता
बेधुंद आता उडायचे आहे
हातात घेऊन स्वप्नांची पालवी
सत्यात आता फुलायचे आहे ....
झाले गेले सोडून सारे
नव्याने आता जगायचे आहे
घेऊन साथ आता स्वतःचीच
माझ्यातच मला खुलायचे आहे ....
चालताना वाटेत आता
माझेच मला सावरायचे आहे
येउदे काटे कितीही पायाशी
सुखाच्या शोधात दुःख पाहायचे आहे ....
विचारांची तोडून साखळी
आता स्वतःसाठी फुलायचे आहे
माझ्यातल्या माझ्यासाठी मला
हे बंध आता तोडायचे आहे .....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
Chan ahe as usual bt last
Chan ahe as usual bt last line jra edit kra pls
धन्यवाद @Urmila Mhatre
धन्यवाद @Urmila Mhatre
edit केल हा..
आवडली
आवडली
प्रत्येकाच्या आयुष्यात येतोच असा क्षण..
धन्यवाद @तेजो
धन्यवाद @तेजो
छान. तोडून टाका बंध सारे ....
छान. तोडून टाका बंध सारे .....
होय आज तशीच गरज आहे..@किशोर
होय आज तशीच गरज आहे..@किशोर मुंढे
छान कविता
छान कविता
धन्यवाद @ रूपाली विशे
धन्यवाद @ रूपाली विशे