Submitted by शिवप्रीत on 9 May, 2020 - 03:02
होय. बऱ्याच संगीत प्रेमींना ठाऊक नसणार...
आपल्याला फक्त माहीत असेल की रफिजींनी "शोधिसी मानवा" हे मराठी भाषेतील भाव गीत गायले तेही अत्यंत मराठी गायकासारख्च...पण त्यांनी एक पूर्ण अल्बम मराठीत केलंय...त्यात जवळपास दहा बारा गाणी असतील. त्यातली सगळीच गाणी अप्रतिम आहेत. मी तर ती गाणी माझ्या लहानपणापासून ऐकत आलोय. हा छंद जीवाला लावी पिसे, नको भव्य वाडा, हसा मुलांनो हसा, माझ्या विरण हृदयी(ब्रेकअप वल्यांसाठी), नको आरती की नको पुष्पमाला...आणि बरीच...
मला खंत याच गोष्टीची आहे की बर्यांच लोकांना माहीत नाही...कधी आजकालच्या गायकांना सुद्धा ते गाताना पाहिलं नाही...
खाली YouTube Link आहे. मराठी रफिंचा आस्वाद घ्या!!
https://youtu.be/3uPAspK_7T8
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रफीचा आवाज समहाउ कधीच आवडला
रफीचा आवाज समहाउ कधीच आवडला नाही मराठी गाण्यात तर अजुन कृत्रिमते ची भर पडल्याने अजुनच नाही.
हि सर्व गीते म्हणजे
हि सर्व गीते म्हणजे
गीतकार : वंदना विटणकर, गायक : मोहम्मद रफी, संगीतकार : श्रीकांत ठाकरे,
अशी ती त्रयी होती. एक कसेट (अल्बम) निघाली होती तेंव्हा त्या काळात. हि सर्व गाणी त्यातीलच. रफींच्या आवाजात मराठी गीते ऐकताना एक फारच वेगळी गोडी वाटायची/वाटते.
अगो पोरी संभाल दर्याला
अगो पोरी संभाल दर्याला तुफ्फान आयलय भारी. हे ही गाणं रफी आणी पुष्पा पागधरेंनी गायलय.
हा छंद जीवाला लावी पिसे..ऐकलं
हा छंद जीवाला लावी पिसे..ऐकलं तर अजून भारीच वाटेल...जशी हिंदी मध्ये रफी साहेबांची आवाजाची जादू दिसतेस...अगदी तसेच काही!!!