तर ह्या सगळ्याची सुरुवात झाली साधारण वर्षभरापासून
अधूनमधून घरी काम करायला लागायचे त्यामुळं ब्रॉड बँड ची शोधाशोध सुरू झाली.
आधीच्या घरात बी एस एन एल ने उत्तम सेवा दिली होती त्यामुळे त्यांनाच विचारलं. महिनाभर पाठपुरावा झाला पण आताचा एरिया unserviceable म्हणुन रिजेक्ट झालं application
मग पर्याय चाचपडून झाले Idea wireless broadband (range नाही), Tikona broadband (उपलब्ध नाही) , एअरटेल, Hathway, Tata sky broadband (उपलब्ध नाही), टाटा दोकोमो ब्रॉड बंद
शेवटी यु ब्रॉड बँड ची सर्व्हिस मिळाली. तीन महिने चांगली चालली म्हणून सहा महिन्याचा रिचार्ज केला पण बोंबला ते खूप unreliable झालं (तासाला तीन वेळा Toggle व्हायचं)
त्यामुळं पॅक संपण्याआधी बंद करून टाकलं
कसेबसे deposit मिळालं परत.
सध्या Vodafone hotspot war काम चालू आहे पण Conference call
जीव टाकत त्याचं network
Jio ची range अजिबातच नाही
ह्या area मध्ये कोणी चांगली सेवा देतं का?
स्वागत कॉर्नर
कात्रज डेअरी मागे कात्रज पुणे
तुमच्या सोसायटीमधे कुणी वापरत
तुमच्या सोसायटीमधे कुणी वापरत असेल वायर्ड ब्रॉडबँड तर विचारून चेक करता येइल. जिओ-फाय/ जिओ सिम वाला मोबाईल इ. एखाद-स्पेसिफिक ठिकाणी स्थानापन्न करून काही जुगाड करता येऊ शकेल का (जिथे मॅक्स रेंज येतेय घरात)?
अर्थात माझं मत नेहेमीप्रमाणे वायर्ड ब्रॉडबँड ला आधी. पुढे ते वायफाय करून सगळ्या डिवायसेस ला कनेक्टीव्हिटी मिळते.
सोसायटी वाले १५ किंवा त्याहून
सोसायटी वाले १५ किंवा त्याहून जास्त लोक्स जर तयार असतील तर एखाद्या प्रोव्हायडरलार पकडून तुमच्या सोसायटी परेंत चांगलं ब्रॉडबँड आणता येतं.
आम्ही हे टाटा-स्काय ब्रॉडबँड करता केलं होतं. त्यांनी फायबर ले-आऊट करायला ८-१० दिवस घेतले ११ मजली बिल्डींग करता (४ फ्लॅट्स एका फ्लोर वर). नंतर ज्यांना हवंय त्यांना कनेक्शन देऊन अप करायला जेमतेम अर्धा तास फक्त!
धन्यवाद योकु
धन्यवाद योकु
सोसायटी 3G/4G वापरतात सगळे. सरकारी कर्मचारी, बँकेत काम करणारी मंडळी ती. आय टी मधला बापुदा मीच एकटा.
तीन मजली सोसायटी आहे. टाटा स्काय वाल्यांना ईमेल केला. म्हणाले आता सर्व्हिस नाही तिकडे येईल तेंव्हा कळवतो
तिकोना किंवा लोकल ब्रॉडबँड ची माहिती आहे का कोणाला ह्या एरिया मध्ये?
३जी/४़जी एका लिमिट पर्यंत ठीक
३जी/४़जी एका लिमिट पर्यंत ठीक, पण स्टेबल वायफाय ची सर त्याला नाहीच. असो...