लॉकडाऊन मध्ये मगरीचा बड्डे साजरा कसा करावा?
Submitted by तुमचा मेंढा on 25 April, 2020 - 21:00
तर गेल्या महिन्याभरात बरेच जणांच्या कुटुंबात कोणाचा ना कोणाचा तरी वाढदिवस या लॉकडाऊन काळात आला असेल. ईतरवेळी घरच्यांसोबत राणीच्या बागेत जाणे, वडापाव - भेळ खाणे, लोकलला उलटे लटकणे, अगदी आदल्या रात्री बारा वाजता कंबरेला फक्त फटाक्यांची माळ लावून नाच करणे अश्या प्रकारे आम्ही हा दिवस साजरा करतो. सध्या यातले काहीही करता येणे शक्य नाही. गेला बाजार मटण कापायचे म्हटले तरी बोकड कापू देईल याची खात्री नाही. अश्यात घरातल्या मगरीला रिबिनी बांधून तिला स्टार अट्रक्शन म्हणून खपवणे हाच पर्याय शिल्लक राहतो. पण जर बड्डे दस्तुरखुद्द मगरडार्लिंगचाच असेल तर...
येस्स! तर ईथेही तीच गोची झाली आहे.
यात एक चांगले आहे की हा मगरीचा मोस्ट शाकाहारी बड्डे एव्हर ठरण्याची दाट शक्यता आहे. पण मटणाबाबत जरी मगर नेहमीसारखी सळसळ न करता तडजोड करायला तयार झाली तरी आपल्या मालक कम पार्टनरने एफर्टस घ्यावेत अशी तरी तिची नक्कीच अपेक्षा असणार. मायबोलीकरांना हे वेगळे सांगायला नको कारण येथली अर्ध्या जनतेने काहीतरी पाळलं असेल, तर अर्ध्या जनतेला कुणीतरी पाळलं असेल.
तर प्लीज प्लीज प्लीज या काळात आपण सेलिब्रेट केले असल्यास ते अनुभव आणि केले नसल्यास आयडीया जरूर शेअर करा. धाग्याचा फायदा मलाच....
मी मदारी काळू वाटायला नको म्हणून आधी माझ्या डोक्यातील आयड्या लिहितो. (वाटाणाप्पा, आपले सरकार, महादेवाचा अभिषेक, शशीभूषण...अरे माझ्याच आयड्या मला आठवत नाहीये. ब्रेक, ब्रेक.)
१) गिफ्ट - आमच्याकडे आदल्य रात्री बाराचा बड्डे करायचे फार फॅड आहे. मगरीची बहीण शेजारीच दिली असल्याने तीही व्हिजिट देते, आणि मग मी कंबरेला फटाक्यांची माळ बांधून डान्स करतो.
मग आता काय करायचे विचार करता लक्षात आले की मटणाचे तुकडे लपवून ते बारा वाजता तिला शोधायला लावायचे, हा चांगला प्लॅन ठरू शकतो. पण नाही मिळालं तर चवताळून मलाच चावायची.
२) डेकोरेशन - बड्डे सेलिब्रेशन म्हटले की हे आलेच. अन्यथा ईतर पार्टी आणि बड्डे पार्टीमध्ये फरक तो काय?
मेल मगराचे फोटो सगळीकडे लावणे, घरभर पाणी पाणी करून त्यात लोळणे (होमली फिलिंगसाठी) असा उपाय आहे. तिच्या मानेला, कानाला (मगरीला कान असतात? धागा काढा.) रिबिनी लावणे हा प्रकार करता येईल.-
३) मटण - मटणवाल्याला ती चावल्याने हा पर्याय बाद. घरातले झुरळ पकडून तिच्या तोंडात टाकणे हाच पर्याय, कधीकधी पॉपकॉर्न म्हणून काही माझ्याही तोंडात येतात. तसही मी माणूस सोडून काहीही खाऊ शकतो. तरीही नेहमीपेक्षा वेगळी स्पेशल डिश असे काही असेल तर सांगा. झुरळ, ढेकूण, पाली आणि काही तुफानी करायचं असेलच तर रस्त्यावर फिरणारे वरआह असा मुद्देमाल आहे.
४) मी खूपSSSSS रोमँटिक आहे. किंग सारखा. किंग कोण? ते विचारू नका. तिच्यासाठी एक कविता लिहिलीये. नवीन धागा काढतो. तिच्याबरोबर 'हाय गर्मी' करत फ़रशी पुसण्याचा (डान्स करण्याचा) मानस आहे.
हुश्श, एका धाग्यात एवढंच बस. दुसऱ्या धाग्यासाठी काही मटेरियल ठेवतो. प्लिज आयड्या (वाटाणाप्पा, आपले सरकार, महादेवाचा अभिषेक, शशीभूषण...अरे माझ्याच आयड्या मला आठवत नाहीये. ब्रेक, ब्रेक.)
हं, आयडिया सुचवा.
धन्यवाद,
तुमचा मेंढा
अजिंक्यराव पाटील - आज जिम बीम
अजिंक्यराव पाटील - आज जिम बीम उघडतोय...
अंडा भुर्जि नक्की बनवणार...
बोरबोन आणि कोक मला आवडते...
असं नाय काय च्रप्स, संस्कृत
असं नाय काय च्रप्स, संस्कृत शब्द वापरले की कितीही वाईट लिह्यलं तरी पावन होऊन जातं
सा. हो माहित आहे पण थोडीतरी
सा. हो माहित आहे पण थोडीतरी संवेदनशीलता दाखवली पाहिजे. समोरची व्यक्ती देखील माणूस आहे...
समोरचा सगळे खेळीमेळीने घेतो फक्त म्हणून ?
फॅनलिस्टीत नाव न आल्याने एक
फॅनलिस्टीत नाव न आल्याने एक माणूस रागावलंय वाटतं.
हो ... पण मी फॅन नाही
माझा आक्षेप पाथफाईंडर यांच्या कमेंट वर आहे.
बायकोला बड्डडे गिफ्ट काय द्यावे? आणि तुमचा जोडीदार तुमचा वाढदिवस लक्षात ठेवतो का ? हे पाथफाईंडर यांनी उघडलेले धागे आहेत. त्यांनी अशी कमेंट करावी हे पटले नाही. तो एक जेन्युईन आयडी वाटला होता ...
हि ती कमेंट-----
मी कोणी भक्त नाहीये, एके काळी मी स्वतः तुटून पडायचो त्याच्या धाग्यांवर. नंतर लक्षात आले की श्वानपुच्छ आणी कार्ले आपला स्वभाव गुण सोडत नाही, किंवा चिखलातली वराहा बरोबरच्या मस्तीचा आनंद वराहलाच अधिक होतो, मग का आपले रक्त आटवायचे?
<बायकोला बड्डडे गिफ्ट काय
<बायकोला बड्डडे गिफ्ट काय द्यावे? आणि तुमचा जोडीदार तुमचा वाढदिवस लक्षात ठेवतो का ?>
उगाच मी फॅनबॉय नं १ म्हणत नाही.
मी कोणी भक्त नाहीये, एके काळी
मी कोणी भक्त नाहीये, एके काळी मी स्वतः तुटून पडायचो त्याच्या धाग्यांवर. नंतर लक्षात आले की श्वानपुच्छ आणी कार्ले आपला स्वभाव गुण सोडत नाही, किंवा चिखलातली वराहा बरोबरच्या मस्तीचा आनंद वराहलाच अधिक होतो, मग का आपले रक्त आटवायचे?
>>> पाथफाईन्डर तुमच्याकडून हि अपेक्षा नव्हती... लिहिताना समोरच्याला काय वाटेल इतका तरी विचार करून कमेंट करा...
Submitted by च्रप्स on 26 April, 2020 - 03:41
विचार करूनच लिहीले होते. कर नाही त्याला डर कशाला. आणि मला अपेक्षीत परीणाम घडून गेला आहे.
समोरचा सगळे खेळीमेळीने घेतो
समोरचा सगळे खेळीमेळीने घेतो फक्त म्हणून ?
Submitted by च्रप्स on 26 April, 2020 - 05:32
>>>
धन्यवाद च्रप्स,
मी खेळीमेळीचे खेळीमेळीत घेतो.. वैचारीक वाद एंजॉय करतो. जिथे आकस दिसून येतो तिथे वैयक्तिक वादात न शिरता ईग्नोर करतो. कोण्या त्रयस्थ व्यक्तीमुळे आपला मूड का खराब करावा? ईतके सिंपल लॉजिक आहे.
आपण घेतलेल्या आक्षेपाबद्दल आभार पण मी अश्या पोस्ट टाळून पुढे निघून जातो
मी खूपSSSSS रोमँटिक आहे. किंग
मी खूपSSSSS रोमँटिक आहे. किंग सारखा. किंग कोण? ते विचारू नका.
लेम्मी गेस...किंग मीन्स किंगकाँग
ओ ओ ओ माय मिस्टेक माय मिस्टेक....किंग शुड बी किंग फिशर (गॉचॅ)
सिंघ इज किंग विसरलात व्हय !
सिंघ इज किंग
विसरलात व्हय !
IT लिहिणारा स्टीफन किंग पण
IT लिहिणारा स्टीफन किंग पण असू शकतो


असेही शाखा दिसला की आता किती आचरटपणा करणार या विचाराने धडकी भरते
त्यामुळे हेही असू शकते
अपेक्षित विनोद येऊ लागलेत.
अपेक्षित विनोद येऊ लागलेत.
यातून हेच दर्शवले जाते की किंग म्हणजे शाहरूख ये बच्चे बच्चे को पता है
विसरलात व्हय !
विसरलात व्हय !
युह मीन्स अक्षय कुमार
खरंय बाबा, सुसर बाई तुझीच पाठ
खरंय बाबा, सुसर बाई तुझीच पाठ मऊ
माकडाचे पण आहे पण इथल्या काहींना ते अति वाटेल आणि ते परत त्यावर धागा काढतील त्यामुळे नकोच
(No subject)
मगरीचा आजचा फोटो!
Pages