आपल्या वाढीसाठी, निरोगी व सुदृढ राहण्यासाठी जशी प्रथिने, जीवनसत्वे, इत्यादींची आवश्यकता असते त्याच प्रकारे झाडांनाही वाढीसाठी, रोगांशी लढा देण्यासाठी जीवनसत्वे, minerals, इत्यादींची गरज असते. जे त्यांना खतापासून मिळतं. त्यालाच आपण "झाडांचा खाऊ" म्हणू. खतांच्या बराच प्रकारांमधील एक प्रकार म्हणजे "कंपोस्ट". कंपोस्ट आपण घरच्या घरी, घरात असणाऱ्या टाकाऊ वस्तूंपासून बनवू शकतो.
कंपोस्ट बनवण्याचे साहित्य :
१.एक जुना म्हणजेच वापरात नसलेला माठ (जिथे नळ आहे तो काढून टाकावा त्यामुळे तिथे हवा जाण्या- येण्यास आणि अतिरिक्त पाणी बाहेर येण्यास जागा होईल). जर माठ उपलब्ध नसेल तर जुनी बादली किंवा टब घ्यावा व त्याला खालून छिद्र पाडावे (पाण्याचा निचरा होण्यासाठी व aerationसाठी)
२. माती, ३. आधी बनवलेलं कंपोस्ट किंवा शेणखत, ४. पाणी, ५. ओला कचरा - नायट्रोजन (kitchen waste म्हणजेच उरलेले अन्न, भाज्यांची सालं, ज्यांचं विघटन होऊ शकत असा कचरा), ६. वाळलेली पानं - कार्बन
कृती :
माठात सर्वात आधी माती टाकावी नंतर आधी तयार केलेलं खत किंवा शेणखत त्यानंतर ओला कचरा त्याच्यावर वाळलेली पानं नंतर परत माती आणि सर्वात शेवटी हे मिश्रण एकजीव करण्यासाठी पाणी घालावे. ही cycle प्रत्येक वेळी repeat करावी.
वाळलेली पानं आणि ओला कचरा यांचे प्रमाण समान ठेवावं (१:१). आणि माती मुठभर घालावी. दर ७-८ दिवसांनी हे मिश्रण खालीवर करावे जेणेकरून aeration राहील. कंपोस्ट कोरड झालं की त्यात पाणी घालावे.
कंपोस्ट मध्ये कोणते पदार्थ टाकावेत ?
जे मातीपासून निर्माण झालं आहे ते सर्व पदार्थ, वस्तू आपण कंपोस्टमध्ये टाकू शकतो. परंतु काही पदार्थ असे असतात ज्यामुळे कंपोस्ट तयार होण्याच्या प्रक्रियेला जास्त वेळ लागतो. Acidic (आम्लीय) पदार्थ, अंड्याच कवच (egg shell), मांस या पदार्थांचं लवकर विघटन (decompose) होत नाही.
कंपोस्ट ची प्रक्रिया जलद करण्यासाठी जो काही कचरा (ओला कचरा) आपण टाकणार आहोत तो बारीक करून टाकावा. कंपोस्ट तयार व्हायला साधारणतः ४० ते ५० दिवस लागतात. जिथे कंपोस्ट तयार करणार आहोत ती जागा नेहमी साफ ठेवावी व जरा आडोशाला असावी. जिथे कंपोस्ट बिन ठेवलं असेल त्याच्या आजूबाजूला जर झाडं किंवा रोपटी ठेवायची असल्यास अशी ठेवावी ज्यांना कीड लागत नाही. शक्यतो मातीचं भांडच खत बनवण्यासाठी वापरावं.
या खतामुळे झाडांनाही त्यांचा खाऊ मिळतो आणि आपलं kitechen waste ही परत वापरता येतं (reuse). त्यामुळे हि पाककृती (recipe) "Worth trying" आहे
मस्त माहिती!
मस्त माहिती!
मस्त लेख.
मस्त लेख.
छान माहिती!
छान माहिती!
घरच्याघरी पौष्टिक खत.
घरच्याघरी पौष्टिक खत. प्रत्येकाने हा प्रयोग अवश्य करावा.
किती दिवस ओला कचरा घालत
किती दिवस ओला कचरा घालत राहायचं? माठ लहान असेल तर लवकर भरेल. मग ओला कचरा टाकल्याच्या शेवटच्या दिवसानंतर ४०-५० दिवसांनी कंपोस्ट तयार होईल ना? आणि माठ मोठा असेल तर ४० दिवसांचा किंवा अधिकही कचरासुद्धा राहू शकेल. मग त्यानंतर ४०-५० दिवस का?
कांदा, लसूण,डाळिंबाची साल
कांदा, लसूण,डाळिंबाची साल यांची माती होण्यास खूप वेळ लागतो, त्याबद्दल सांगाल काय?
अजून एक शंका, माठ/बादलीच्या खाली भोक पाडणार,तिथून पाणी किंवा टाकलेल्या कचरा बाहेर येणार का?त्याखाली काय ठेवावे?
छान माहिती
छान माहिती
छान लेख!
छान लेख!
@हीरा, धागालेखिका अधिक माहिती सांगतीलच, पण दोन किंवा तीन माठ/बादल्या ठेवणं सोयीस्कर ठरतं. एक भरला की दुसरा. दुसरा भरला की तिसरा. तिसरा भरेपर्यंत पहिल्यातलं कंपोस्ट तयार होतं. ते दुसऱ्या भांड्यात काढून ठेवता येतं.
धन्यवाद.
धन्यवाद.
2 मोठे बीन्स/माठ ठेवावे
2 मोठे बीन्स/माठ ठेवावे लागतात.म्हणजे आलटून पालटून वापरता येतात.
रोज 2 वेळा नीट स्वयंपाक करणारे, पालेभाज्या खाणारे, रोज 2 फळं खाणारे घर असेल तर अर्धा ते 1 किलो ओला कचरा तयार होतो(कलिंगड/फ्लॉवर वगैरे केस मध्ये 1 किलोच)
जितके छोटे तुकडे तितके ब्रेक व्हायला कमी वेळ लागतो.
@वर्षा, @mi_anu, @अज्ञातवासी,
@वर्षा, @mi_anu, @अज्ञातवासी, @किशोर मुंढे, @चैत्रगंधा
प्रतिसादाबद्दल धन्यवाद !!
@हीरा
@हीरा
@mi_anu, @वावे
सहमत !
जर तुमच्याकडे मोठी जागा असेल तर आरामात २-३ माठ राहु शकतात. ह्याला पर्याय म्हणून ज्यांच्याकडे मातीची भांडी मिळतात त्यांच्याकडे कंपोस्ट बनवण्यासाठी देखील भांडी मिळतात जी आपण एकावर एक ठेवू शकतो आणि जी आपल्याला आलटून-पालटून वापरता येतात. जर एकच माठ ठेवायचा असेल तर जिथे नळ असतो तो काढून टाकून त्या जागी आपला हात जाईल किंवा एखादा मोठा चमचा जाईल एवढी जागा करून घ्यावी. जेणेकरून तयार झालेल कंपोस्ट तळातून काढता येईल
@ऑर्किड
@ऑर्किड
लसूण आणि कांद्याच्या सालांच 40 ते 50 दिवसांत विघटन होतं. ही प्रक्रिया जलद करण्यासाठी आपण जो कचरा टाकणार आहोत तो बारीक करून घ्यावा. जेवढा बारीक कचरा आपण टाकू तेवढी प्रक्रिया जलद गतीने होते. (ज्याप्रकारे आपण भाजी बारीक चिरली कि ती पटकन शिजते त्याच प्रकारे जेवढा बारीक ओला कचरा टाकु तेवढ पटकन विघटन होण्यास मदत होते)
आपण एखाद्या कुंडीच्या तळाशी जशी छिद्र पाडतो (aeration आणि अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी) त्याच प्रकारे आपल्याला टब च्या खाली छिद्र पाडायची आहेत. आणि टब/माठाच्या खाली एखादी डिश किंवा ताटली ठेवावी जेणेकरून अतिरिक्त पाणी आहे ते जमा करता येईल. व ते पाणी परत त्या मिश्रणात टाकावे.
नाही. कचरा बाहेर येत नाही
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/66338
माझ्या कंपोस्टवरच्या धाग्याची रिक्षा. प्रतिसादांमध्ये बरीच माहिती गोळा झालेली आहे.
छान माहिती! पुढे जाऊन कधीतरी
छान माहिती! पुढे जाऊन कधीतरी नक्की उपयोगी पडेल..
मस्त माहिती!!
मस्त माहिती!!
@मन्या ऽ, @जव्हेरगंज धन्यवाद
@मन्या ऽ, @जव्हेरगंज
धन्यवाद
@वावे
@वावे
बरीच आणि खोलवर माहिती मिळाली. धन्यवाद !!
छान माहिती
छान माहिती
माझ्याकडे सध्या कंपोस्ट
माझ्याकडे सध्या कंपोस्ट नाहीये , विरजण म्हणून टाकायला .
मी कुंडीतली माती टाकली आहे .
नियमित भाज्यांची सालं वगैरे टाकते , खालिवर हलवते . सगळा कचरा वाळत चालला आहे पण रंग काही काळा होत नाहीये .
कंपोस्ट बनण्याचे काही chances आहेत का ?
@बोकलत
@बोकलत
धन्यवाद
@स्वस्ति
जेवढ्या प्रमाणात ओला कचरा असेल तेवढ्या प्रमाणातच सुका कचरा {सुकलेली पाने, कार्ड पेपर किंवा चारा -(आंब्याच्या पेटी सोबत येतो)} घालावा (१:१ प्रमाण), आणि कंपोस्ट कोरड वाटत असेल तर पाणी घाला.
सद्यस्थितीत दही (कंपोस्टची प्रक्रिया सुरू होण्यास मदत होते)आणि वाळलेली पान टाकून त्यावर पाणी शिंपडा (पाणी एवढ टाका कि तो कचरा एकजीव झाला पाहिजे). आठवडाभरात विघटन (decompose )व्हायला सुरुवात होईल. ७-८ दिवसातून एकदाच कंपोस्ट खालीवर हलवायचं
अशा प्रकारची आयडिया वापरल्यास
अशा प्रकारची आयडिया वापरल्यास कंपोस्ट आणि कंपोस्ट टी सुद्धा मिळेल.
पूरक माहिती
पूरक माहिती