मी सध्या एका वेगळ्याच समस्येने ग्रासलो आहे. लॉकडाउनपूर्वी मी व्यवस्थित होतो म्हणजे मी जो आहे तोच असायचो. सकाळी उठायचो ऑफिसमध्ये जायचो काम करायचो आणि थकून भागून घरी आल्यावर मस्त टीव्ही बघत जेऊन झोपून जायचो. परंतु लॉकडाउन सुरू झालं आणि या विचित्र प्रकाराला सुरवात झाली. आता मी सकाळी 7 ला उठतो. 7 ते 8.30 मी माझ्या ओरिजिनल पर्सनॅलिटी मध्ये वावरत असतो नंतर 8.30 ते 11 पर्यंत मी एक शेअर मार्केट ट्रेडर बनतो. 11 नंतर मी कॉर्पोरेट एम्प्लॉई बनून ऑफिस वर्क करत बसतो. 1 नंतर जेवणाची वेळ होते तेव्हा बायकोने बनवलेल्या पदार्थांचे फोटो काढून फोटोग्राफर होतो. नन्तर 2 ते 5 मस्त ताणून देतो तेव्हा महाभारतातला कुंभकर्ण होतो. पाच वाजता उठून मस्त बासरी वाजवायला सुरवात करतो. बासरी वाजवायला सुरवात केली की आजूबाजूचे पशु पक्षी बसरीची धून ऐकायला घराजवळ जमतात. तेव्हा मला वाटते की मी बहुतेक कृष्णाचा अवतार असेल. आजूबाजूचे बस कर रे बाबा म्हणेपर्यंत वाजवतच बसतो. नंतर रात्री मी बायकोला स्वयंपाक करायला मदत करतो तेव्हा मी एक आचारी बनतो. रात्री उशिरा कधीतरी माझ्यातला मूळ माणूस बाहेर येतो. विशेष म्हणजे जेव्हा एका फेजमधून दुसऱ्या फेजमध्ये जातो तेव्हा आधी आपण काय केलं ते आठवत नाही. इंग्रजीत याला मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर असं काहीतरी नाव आहे. सध्यातरी सहा सात माणसं अंगात येतात पण भविष्यात अजून माणसं माझ्या अंगात येऊन हा आजार अजून वाढण्याची शक्यता आहे. यातून बाहेर पडण्यासाठी उपाय सुचवा.
माझ्या अंगात वेगवेगळी माणसं येतात.
Submitted by आगबबूला on 30 April, 2020 - 13:23
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
2 ते 5 मस्त ताणून देतो तेव्हा
2 ते 5 मस्त ताणून देतो तेव्हा महाभारतातला कुंभकर्ण होतो>>
ओ बोकलत भाऊ, कुंभकर्ण रामायणात होता हो.
रात्री उशिरा कधीतरी माझ्यातला
रात्री उशिरा कधीतरी माझ्यातला मूळ माणूस बाहेर येतो.
>>> लोल
लक्षात रहात नाही म्हणता पण
लक्षात रहात नाही म्हणता पण क्रमवार, वेळेनुसार सांगीतलय की सगळे.
मजा करा हो.
जोवर तुम्ही सकाळी उठून, वेणी-फणी करून तुळशीला पाणी घालत नाही तोवर चिंता करू नका.
तुम्हाला अभिषेकेरीया
तुम्हाला अभिषेकेरीया रूनमेषेसीस झालाय.
मायबोलीवर बोकलत म्हणून आहेत,
मायबोलीवर बोकलत म्हणून आहेत, ते मदत करू शकतील .
त्यांना संपर्क करा..
भुते वगैरे काढण्यात त्यांची speciality आहे:)
2 ते 5 मस्त ताणून देतो तेव्हा
2 ते 5 मस्त ताणून देतो तेव्हा महाभारतातला कुंभकर्ण होतो>>> रामायणात होता का?? जाऊ दे संपादनाची वेळ निघून गेली आता.
मायबोलीवर बोकलत म्हणून आहेत,
मायबोलीवर बोकलत म्हणून आहेत, ते मदत करू शकतील .>>> गंगाधर ही शक्तिमान है किल्लीताई.
ऑफिस वर्क ११ ते १ .
ऑफिस वर्क ११ ते १ .
२ तास काम हे कसले ऑफिस आहे.
जोवर तुम्ही सकाळी उठून, वेणी
जोवर तुम्ही सकाळी उठून, वेणी-फणी करून तुळशीला पाणी घालत नाही तोवर चिंता करू नका. >>>>

तुम्हाला अभिषेकेरीया
तुम्हाला अभिषेकेरीया रूनमेषेसीस झालाय.
नवीन Submitted by अजिंक्यराव पाटील on 1 May, 2020 - 00:16
>>>
हो पण हा माझा आयडी असेल असे वाटत नाही.
@ धागा सल्ला जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमच्या अंहात ईतके विविध कलागुण आणि व्यक्तीमत्वे आहेत ज्यांना आपण एका आयडीने न्याय देऊ शकत नाही तेव्हा अनेक आयडी काढावे. प्रत्येक व्यक्तीमत्वाचे अनुभव किस्से हे सोशलसाईटवर वेगवेगळ्या नावांनी पोस्ट करावेत.
व्हायरसला आजार होत नसतो
व्हायरसला आजार होत नसतो ऋन्मेष! हा तुमचा आयडी नसावा
या लॉक डाऊनच्या काळात
या लॉक डाऊनच्या काळात
तुम्ही तुमच्या पाळीव प्राणी, पक्षी, भिंत, वस्तू इ. शी बोलू शकता.
जेंव्हा ते प्राणी किंवा पक्षी किंवा भिंत तुमच्याशी बोलू लागेल तेंव्हा आम्हाला संपर्क करा.
मनोविकार विभाग-- सरकारी रुग्णालय
जेंव्हा ते प्राणी किंवा पक्षी
जेंव्हा ते प्राणी किंवा पक्षी किंवा भिंत तुमच्याशी बोलू लागेल तेंव्हा आम्हाला संपर्क करा.
>>>
आमचा शेजारचा पोपट बोलतो
आम्हाला छान हाका मारतो तसेच आपण जे बोलू ते रिपीट करतो.
आम्हाला छान हाका मारतो तसेच
आम्हाला छान हाका मारतो तसेच आपण जे बोलू ते रिपीट करतो.>>> स्तोत्र आरत्या पण रिपीट करतो काय? की फक्त हाय हॅलो?
फडकुले बाईंची आठवण झाली हे
फडकुले बाईंची आठवण झाली हे वाचून
