Submitted by बिपिनसांगळे on 30 April, 2020 - 00:59
ऋषी कपूर यांचे दुःखद निधन झाले .
तो नेहमीच उंचे खानदानका छोरा वाटायचा . राजबिंडा ! ग्रेसफुली नाचणारा .
शेवटी- वेगळ्या भूमिकांमध्येही त्यांनी रंग भरले .
आणि एक अभिनेता गेला ! ...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
ॠषी कपुर यांना भावपूर्ण
ॠषी कपुर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कलाकारांची/दिग्दर्शकाची मुले चित्रपटात येणे आता नवीन नाही. पण याची सुरवात झाली ती कपुर कुटुंबापासून असे म्हणणे वावगे ठरू नये. पृथ्वीराज कपुरांचा वारसा त्यांच्या तीन मुलांनी समर्थपणे पुढे चालवला. नंतर राज कपुर आणि शशी कपुरांच्या मुलांनी सुध्दा चित्रपटात पदार्पण केले. पण यात कलाकार म्हणून यश मिळाले ते ॠषी कपुर यांना. बाॅबी चित्रपटामधून वयाच्या अठराव्या वर्षी नायक म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास उत्तरोउत्तर बहरत गेला. अनेक यशस्वी दिग्दर्शक/कलाकारांसोबत त्यांनी काम केले. राज कपुर यांचा मुलगा म्हणून नाही तर एक चांगला कलाकार म्हणून त्यांना हे यश मिळाले. गोंडस चेहरा आणि सहजसुंदर अभिनय याच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले. त्यांच्या मुलगा रणबीर कपुर आज चित्रपट सृष्टीत स्वतःची ओळख बनवून आहे. जी एकवेळ त्यांनी सुध्दा बनवली होती. राज कपुरचा मुलगा म्हणून आलेला आज रणबीर कपुरचा बाप म्हणून जरी आहे तरी तो ॠषी कपुर म्हणूनच ओळखला जाईल यातच त्याचे यश सामावले आहे.
आज तो या जगात नाही पण त्याच्या चाहत्यांच्या ह्रदयात नेहमीच असेल.
एका विषयावर दोन धागे झाले
एका विषयावर दोन धागे झाले आहेत .
कृपया हा धागा वेमा यांनी डिलीट करावा .