आता घराचे Refinance करणे योग्य ठरेल का?

Submitted by sneha1 on 17 April, 2020 - 20:28

मंडळी,
आताची अमेरिकेतली परिस्थिती बघता घराचे Refinance करणे योग्य राहील का? तसेच, ते करताना काय खबरदारी घ्यावी, किंवा अजून काही टिप्स वाचायला आवडतील.
धन्यवाद!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आणि नवरा कालच या विषयावर बोललो. पण निर्णय नाही घेतला. मीही वाचत जाईल हा धागा.. धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा. अमेरिकेत कुठे आहात तुम्ही ( नाही सांगितले तरी चालेल ) .काळजी घ्या.

नंबर्स टाकून बघा किती वाचेल आणि ते वर्थ आहे का? दुसरे म्हणजे कागदावर वर्थ वाटले तरी २-३ वर्षात दुसरीकडे जायचा विचार असेल तर कदाचित योग्य होणारही नाही.

मी टेक्सास मधे असते आदिश्री. तुम्ही कुठे असता?

स्वाती,
दुसरीकडे जायचा विचार असेल तर म्हणजे? सॉरी, मला समजले नाही.

दुसरीकडे राहायला, हे घर सोडून अशा अर्थाने असावे. म्हणजे तुमच्या सध्याच्या प्लॅन नुसार तुम्ही या घरात २-३ वर्षे असाल की जास्त - या संदर्भाने.

सध्या विचार करायला हरकत नाही. पण गेल्या वर्षभराच्या मानाने इण्टरेस्ट रेट्स वाढलेले दिसत आहेत सध्या. स्पेसिफिकली या सिच्युएशन मधे रिफायनान्स ला काही वेगळा विचार करायचे कारण दिसत नाही. पुढे रेट्स आणखी चढतील की पडतील याचा सध्या अंदाज नाही.

टिपिकल लोक फ्रंट लोडेड असते. सो रिफायनान्स केल्यावर तुम्हाला परत पहिली काही वर्षे इंटरेस्ट जास्त भरायला लागेल.
कॅल्क्युलेशन मध्ये रिफायनान्स केल्यानंतरची अ‍ॅमॉरटायझेशन पर्यंतची कॉस्ट आणि सध्याच्या रेटने असलेली कॉस्ट कंपेअर करुन त्यात लोन रिफायनान्सची कॉस्ट अ‍ॅड करून मग तुलना करा.

<< टिपिकल लोन फ्रंट लोडेड असते. रिफायनान्स केल्यावर तुम्हाला परत पहिली काही वर्षे इंटरेस्ट जास्त भरायला लागेल. >> चूक.

थंबरुल : 1% व्याजदर कमी पडत असेल तर फायद्याचे पडेल. क्लोजिंग कॉस्ट किती आहे आणि किती वर्षे अजून त्याच घरात राहणार ते बघा. रिफायनान्स करण्याआधी घराचे अप्रेजल पुरेसे होईल का ते बघा. घराची किंमत कमी झाली असेल तर बँक फक्त 80% लोन देणार आहे, हे लक्षात घ्या.

If you’re already 10 or more years into your loan, refinancing to a new 30-year or even 20-year loan — even if it lowers your rate considerably — tacks on interest costs. That’s because interest payments are front-loaded; the longer you’ve been paying your mortgage, the more of each payment goes toward the principal instead of interest.

Ask your lender to run the numbers on a loan term equal to the number of years you have remaining on your current mortgage. You might reduce your mortgage rate, lower your payment and save a great deal of interest by not extending your loan term.
https://www.nerdwallet.com/blog/mortgages/mortgage-refinancing-time/