आपल्याला दररोज कितीतरी गोष्टींची नकळतच सवय झालेली असते. त्या सवयी कधी आपल्या जगण्याचा भाग बनून जातात हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही.
अगदी झाडांना पाणी घालणं असो की मग दररोजच्या वाटेवर लागणार एखादं सुंदर घर न्याहाळणे असो..दुसऱ्यांच्या अर्थी काहीच महत्वाच्या नसणाऱ्या या गोष्टी आपल्या व्यस्त धकाधकीच्या जीवनात आपल्याला मात्र आनंदाचे, समाधानाचे काही क्षण देऊन जातात..
लायब्ररी मधे आली की बहरलेलं हिरवगार सदानकदा आनंदी असणार हे अशोकाच झाड पाहून मनावरची मरगळ निघून जायची.
शरद ऋतूत होणारी पानगळ आणि वसंत ऋतूत नवी कोवळी पालवी फुटणारा हा अशोक पाहिला की कितीही वाईट परिस्थितीत तगून राहायचं बळ आपोआपच मिळत जायचं..आपल्या आयुष्यातील शरद संपून वसंत नक्कीच फुलेल ही प्रेरणा दिवसभर मला अभ्यास करत राहायला पुरेशी असायची..
तर..अशा या खिडकीतून रोज दिसणाऱ्या, माझ्या सवयीचा भाग असलेल्या आणि माझ्या जीवनाच्या वाटेवर माझा सोबती झालेल्या मला आनंद,प्रेरणा आणि शांतता देणाऱ्या या अशोकाला आज सकाळीच अशा अवस्थेत पाहून मन अगदी विषण्ण झालं..
पण...हा शेवट नसतो..आपली प्रगती कुणी खुंटीत केली की तिथे न थांबता निराश, हताश न होता थोडा विसावा घेऊन आधीपेक्षा अधिक ऊर्जेने वाटचाल करून पुन्हा नव्याने बहरणे जमायला पाहिजे..
आपल्याला खूप उंच उंच शिखरावर जायचं असेल तर मधे थोडा विसावा घ्यावाच लागतो..सतत आपल्या ध्येयासाठी धडपड करण जितकं महत्वाचं तितकंच महत्वाचं असत विसावा घेऊन नवनिर्मितीच्या सर्व शक्यता तपासून पाहणं आणि पुन्हा ताकतीने पुनरागमन करणं..
आता याची सुद्धा सवय करावीच लागेल..नाही का??
सवय
Submitted by अमृताक्षर on 15 April, 2020 - 11:11
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
छान !
छान !
>>>>शिखरावर जायचं असेल तर मधे थोडा विसावा घ्यावाच लागतो >> +७८६
धन्यवाद साद..
धन्यवाद साद..
छान लिहिलंय..+ve!
छान लिहिलंय..+ve!
पटले!
पटले!
धन्यवाद मन्या S आणि cuty..
धन्यवाद मन्या S आणि cuty..