महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत हा माहितीपट आज यु ट्यूबवर प्रकाशित झाला आहे.
दिग्दर्शक अरविंद गजानन जोशी यांचं मनोगत
"भारतीय उपखंडाच्या एकूणच स्थिती-गतीसाठी सर्वार्थाने जबाबदार असलेली एकमेव गोष्ट म्हणजे इथली जातिव्यवस्था.कॅन्सरची गाठ वेळेत काढून टाकण्यात आली नाही आणि हळूहळू शरीरातल्या सर्वच पेशींनी कॅन्सर ला स्वीकारायला सुरुवात केली, तर त्या शरीराचे अस्तित्व कॅन्सरवरच अवलंबून राहायला लागेलं.कॅन्सर आणि शरीर एकरूप होईल. जातीयता हा भारतीय उपखंडाच्या शरीराला झालेला असा कॅन्सर आहे. थोड्याफार शिल्लक राहिलेल्या पांढऱ्या पेशी कॅन्सरशी म्हणजे अख्ख्या शरीराशीच लढायचं म्हणतही असतात. त्याचप्रमाणे जातिविरहित समाजाची स्वप्ने पाहण्यात आणि त्यासाठी रक्त आटवण्यात अनेक महानुभवांची उभी हयात खर्ची पडली आहे.त्यातलंच गणपती महाराज भभूतकर हे अक्षम्य दुर्लक्षिले गेलेले एक नाव. त्यांच्या जातिव्यवस्थेविरुद्धच्या तुंबळ लढ्याची गोष्ट म्हणजे 'अजात'.
5 वर्षांपूर्वी 20 ऑगस्ट 2015 रोजी,नरेंद्र दाभोलकरांच्या स्मृतिदिनी पुण्याच्या ओंकारेश्वर पुलावर घेतलेल्या पहिल्या शॉट पासून ते जवळपास 6 महिने दिवसरात्र चाललेल्या एडिटिंग पर्यंत, अजात ने माझ्या आयुष्यातले एक पूर्ण वर्ष गिळंकृत केले.
या प्रवासात कोणत्याही परतीची अपेक्षा न ठेवता प्रोजेक्टला पैसाअडका पुरवणारे माझे सर्व स्नेही, निर्मितीत मोलाचे वाटेकरी असणारे माझे सर्व सहकारी, मंगरूळ दस्तगीर या गावचे अजात गावकरी, या सर्व गणगोताच्या प्रेमळ उपकारांचा मी आजन्म वाहक आहे.
या सर्वांनी मिळून माझ्याकडून ही कृती करवून घेतली आहे.
जातिनिर्मूलनाच्या लढ्यामध्ये गणपती महाराज हे तसे बाबासाहेबांना काही वर्षे सिनियर. बाबासाहेबांची आणि गणपती महाराजांची भेट मात्र होऊ शकली नाही. ती भेट झाली असती तर आज गाडगे बाबांसारखेच गणपती महाराज अख्ख्या महाराष्ट्राला माहिती झाले असते. पण इतिहास हा जरतरच्या समीकरणावर चालत नसतो. उद्या 14 एप्रिल 2020 ला बाबासाहेबांच्या 129व्या जयंती निमित्त गणपती महाराजांच्या कवितांचा आणि कार्याचा, आणि त्यांच्यामार्फत महाराष्ट्रातील संत परंपरेचा आणि सत्यशोधक समाजाचा धांडोळा घेण्याचा आमचा हा प्रयत्न आम्ही लोकार्पित करणार आहोत. 'अजात' च्या फेसबुक पेजवर उद्या सकाळी 10 वाजता अजात ची युट्युब लिंक शेयर केली जाईल. तुमचे प्रेम मिळेलच याची खात्री वाटते."
मायबोलीकरांना आवर्जून सांगावीशी वाटते अशी बाब म्हणजे माहितीपटाच्या निर्मितीत महत्त्वाची कामगिरी बजावणार्या ट्यागो (मयुरेश चव्हाण) यांच्यामुळे निर्मितीपश्चातच्या प्रक्रियांसाठी थोडेफार सहाय्यभूत होण्याची संधी आम्हां काही मायबोलीकरांना मिळाली.
माहितीपट आवर्जून पहा. आपल्या परिचितांना पाहायला सांगा आणि तुमचे अभिप्राय इथे नक्की नोंदवा.
माहितीपटांसाठी वेगळा ग्रुप
माहितीपटांसाठी वेगळा ग्रुप दिसला नाहत, त्यामुळे चित्रपट विभागात धागा काढला आहे.
इथे कळवल्याबद्दल धन्यवाद.
इथे कळवल्याबद्दल धन्यवाद.
नक्की बघेन.
धन्यवाद बघून मग लिहीते.
धन्यवाद बघून मग लिहीते.
भरत, इथे सांगितल्याबद्दल
भरत, इथे सांगितल्याबद्दल धन्यवाद. बघतो आणि मग लिहितो.
भरत धन्यवाद. पाहतो आहे.
भरत धन्यवाद. पाहतो आहे.
मीही पाहिली थोडा वेळ.
मीही पाहिली थोडा वेळ.
धन्यवाद! बघते युट्यूबवर.
धन्यवाद! बघते युट्यूबवर.
.
.