हा मेला अनेक प्रकारे एपिक आहे.आमिर चा आपल्या भावाबरोबर चा, ट्विंकल बरोबरचा बहुधा एकमेव पिक्चर.सुरुवातीला नावं येत असताना ट्विंकल पांढरा शुभ्र स्किन फिट लो नेक फ्रंट बटन जॉर्जेट लखनवी ड्रेस घालून अंधाऱ्या रात्री एका झोक्यावर झोका घेत गाणं म्हणताना दिसते.हे बघून बऱ्याच प्रेक्षकांचा हा भुताचा चित्रपट आहे आणि त्याचे नाव (ट्विंकल)'मेली' ऐवजी चुकून 'मेला' ठेवलंय असा समज होतो.नीट निरीक्षण केल्यास ट्विंकल च्या ड्रेस ला मागे झिपर दिसेल.बॉलिवूड मधली लेडी भुतं सैल पांढरे कुर्ते किंवा गाऊन घालतात.झिपर असलेले डिझायनर टाईट्ट कपडे नव्हे.यावरून हा साधाच नॉन भूतपट आहे हे समजावे.
पुढच्या सीन मध्ये ट्विंकल कोणत्या तरी देवीच्या उत्सवात असते.आणि तिचा लष्करातला भाऊ येतो.(हा आहे दिल चाहता है मध्ये आमिर खान ला ठोसा मारून त्याचा डोळा जांभळा करणारा अयुब खान.भविष्यजन्मपिक्चर च्या पापाची आधीच शिक्षा म्हणून इथे त्याला आमिर खान च्या एन्ट्री पूर्वीच मारलंय.) त्यानंतर अयुब खान सैन्याच्या ड्रेस मध्येच गावात घोषणा करतो की त्याने रूपाचा(ही ट्विंकल) विवाह त्याच्या पलीकडच्या गावच्या मित्राबरोबर ठरवलाय.हे ऐकून ट्विंकल प्रचंड चिडते.या सीन मध्ये आपल्याला दोन वेण्या आणि बंद गळा ड्रेस वाली शाळेच्या युनिफॉर्म सारखी घडी करून 2 पिना लावलेली नवनीत निशान आणि चांदोबातल्या खात्या-पित्या राजकन्येच्या चित्रासारखे सारखे लाल कपडे, पिवळे धमक दागिने(बहुधा कोणत्यातरी व्हॉटसप टिप्स वाचून सोनं हळदीत उकळलं असेल स्वच्छ करायला) आणि केशभूषण घातलेली अर्चना पुरणसिंग दिसते.या दोघींनी पण अजून लग्न केलेलं नसतं.त्यामुळे ट्विंकल ला 'हे काय मलाच लग्न का करायला लावतात' म्हणून सात्विक संताप येतो.तितक्यात एक लहान मुलगा रूपा माझ्याशी लग्न करेल असं सांगून मोठ्याने रडतो.अयुब खान तिला समजावतो की मुलगा बघून तरी घे.(पूर्वी ना, एसटीत विक्रेते यायचे.कंपनीचा प्रचार आपला फायदा.घेतलं पाहिजे असा आग्रह नाही.वस्तू बघा.बघायला पैसे पडणार नाहीत. असं काही काही म्हणायचे आणि लोकांना स्क्रू ड्रायव्हर चा सेट, 5 किलो वजन करणारा स्प्रिंग चा वजन काटा असं काहीकाही विकायचे.तसं बरं का.)
आता गावात एक मंत्री येतो.त्याच्या स्वागतासाठी या गावकऱ्यानी जितके पोशाख वापरून मेळा(ला) ठेवलेला असतो तितके ड्रेस आपल्या इथे 26 जानेवारी परेड मध्ये सगळी राज्य मिळून वापरतात.या दृश्यात इतके रंग आहेत की डोळ्याच्या दवाखान्यात रंगांध असण्याची टेस्ट करायला हे 3 मिनिटांचं गाणं दाखवावं.अयुब खान चा काळा ड्रेस नारिंगी विटकरी स्कार्फ,डार्क गुलाबी धोतर, ट्विंकल वर लाईन मारणाऱ्या लहान मुलाचा पिवळा धमक कुर्ता, कथकली ड्रेस मधली 2 माणसं, पंजाबी माणसं,फेटा भगवा झेंडा वाली माणसं, नटरंग मधल्या अतुल कुलकर्णी सारखा गेटप वाला प्रसिद्ध डान्सर,लिंबू कलर,गुलाबी स्ट्रॉबेरी आईस्क्रीम कलर,निळा कलर मधल्या बायका,हिरवी भडक नऊवारी वाल्या बायका, क्रीम कलर शर्ट ग्रे पॅन्ट मधले 2 जण,टोमॅटो लाल घागरा वाली ट्विंकल.(ट्विंकल च्या ब्लाऊज ची फॅशन आय ड्रीम ऑफ जिनी मधल्या जिनीच्या लाल श्रग आणि गुलाबी ब्लाऊज सारखी आहे.शिवाय सध्याची कोल्ड शोल्डर ची फॅशन पण केलीय.) अर्चना पुरणसिंग ला बजेट कमी असल्याने तिचे कॉलेज च्या फेस्टिव्हल मध्ये शिवलेले ब्लाउज वापरायला सांगितले आहेत.नवनीत निशान ला पण राजा हिंदुस्तानी मध्ये वापरलेले कपडेच घेऊन ये असं सांगीतलंय.इतके विविध कपडे घेण्यात बजेट बरंच गेल्याने मंत्री महोदयांसमोर टेबल नाही.शेजारी चिमुकल्या स्टूल वर हार ठेवलाय.
या गाण्याच्या सुरुवातीला अयुब खान मूकबधिर समाचार मध्ये करतात तसं जायंट व्हील कडे बोट दाखवून, आणि नाकातला शेंबूड काढल्याची ऍक्शन करून त्या लहान मुलाला काहीतरी सांगतो.मुलाला बराचवेळ काही झेपत नाही आणि तो 'काय डोक्यावर आपटलास का भिडू, नीट सांग ना'असे हावभाव करतो.जायंट व्हीलकडे बघून 'मेला दिलो का आता है, एक बार आके चला जाता है' हे कसं गेस होईल हे कोडं मला अजूनही उलगडलं नाहीये.
हे गाणं संपताना टाईट स्किन फिट काळी जीन्स आणि काळं घोंगडं आणि फेटा घालून निळे लेन्सेस लावून गुज्जरसिंग नावाचा डाकू येतो.(घोंगडं पांघरून,गळ्यात नाणेहार टाईप घट्ट दोन पदरी नेकलेस घालून गन हाताळणं, टाकीचे सापाकृती जिने चढणं, गन काढणं,फायर करणं किती कठीण जाईल ना.पण फॅशन चॉईस पुढे कम्फर्ट चे बलिदान द्यावेच लागते. त्याला त्याची फिगर सध्या गावाला उघड करायची नाहीये.)निळे लेन्स लावून याचा एक डोळा लाल झालाय.त्यामुळे त्याला लाल कपड्यातली रूपा इतक्या डान्सर्स च्या गर्दीत पण लगेच दिसते आणि आवडते.'पहिले लाईन मारणं की पाहिले कर्तव्य' या धर्म संकटात तो साधारण 15 सेकंद सापडतो आणि मग मंत्र्याला गोळी मारतो.इथे एक डाकू चालत्या जायंट व्हील मधून गोळ्या मारताना दाखवला आहे.मी गुज्जर असते तर या डाकूला हलत्या जागेवरून गोळ्या मारून वाया घालवल्याबद्दल 'बिलो एक्सपेक्टड टारगेट' असं रेटिंग देऊन पगार नक्की कमी केला असता.अयुब खान ने गुज्जरसिंग वर पिस्तुल रोखलेले असते.पण त्याला डायलॉग पूर्ण करायचा मोह न आवरल्याने मागून तितक्यात त्यालाच कोणीतरी गोळी मारतं.आता गुज्जर घोंगडं फेकून देऊन त्याला पट्ट्याने खूप मारतो.(अजून 2 चांगल्या लोकांच्या हातात बंदुका असतात पण ते बघत बसतात.)मग गुज्जर घोंगडं गावातच सोडून रूपा ला उचलून घेऊन जातो.डाकू अड्ड्यावर गुज्जर ला रूपा शी तिचा नक्की करियर प्लॅन डिस्कस करण्याचा मोह न आवरल्याने तितक्यात रूपा धबधब्यातून खाली उडी मारते.(खरं तर पिक्चर स्त्री प्रधान असल्याने नाव मेली असायला हवं होतं.कारण इथे ती मेली आहे असं आपण मानायचं आहे.)
आता आमिर खान आणि त्याचा भाऊ ट्रक चालवत चालवत एका ठिकाणी आंघोळीला थांबतात.रूपा वाहत वाहत बेशुद्ध पडलेली असते दुसऱ्या टोकाला.बेशुद्ध पडण्यापूर्वी रूपा च्या ब्लाउज च्या मधल्या भागात मण्यांचं भरतकाम असतं.पण पडल्यावर तिच्या सगळ्या ब्लाउजवर मण्यांचं भरतकाम येतं.मग ही रूपा पलीकडे चालत जाऊन आमिर खान चा शर्ट चोरून घागरा ब्लाउज ठेवून जाते.(जे अंगात पूर्ण घालेपर्यंत आमिर खान ला कळतच नाही की आपण शर्ट ऐवजी स्कर्ट आणि ब्लाउज घालतोय.)आणि नंतर रूपा ते शर्ट पॅन्ट घालून खिश्यातली नोटांची गड्डी बाहेर काढून मोजत बसते.(काय बै, अयुब खान ने अजिबात संस्कार केले नाहीत.आमचे आई बाप असते या जागी तर लहानपणी पासून मार मारून पैसे चार ठिकाणी विभागून ठेवायचे संस्कार केले असते.पैसे इतके सुरक्षित लपवून ठेवायचे की कधीकधी स्वतःला पण 3-4 वर्षं सापडणार नाहीत.)तर असे उघड्यावर पैसे मोजत बसल्याने रूपावर परत संकट येतं तितक्यात आमिर खान 6 जणांशी मारामारी करून तिला सोडवतो.
रूपा त्यांच्याच ट्रक मध्ये लपून पुढे येते.आणि सापडल्यावर तिला नौटंकी मध्ये काम करायची ऑफर देऊन हे दोघे लिफ्ट देतात.नौटंकी च्या सीन मध्ये फैजल ने घातलेला काळा जाळीदार बनियान एक महिन्याने कहो ना प्यार है मध्ये एक पल का जीना गाण्यात ह्रितिक ने उसना घेतला असण्याची मला दाट शंका आहे.
रूपा पळून जाता जाता परत गुज्जर च्या माणसाला सापडते आणि तिथून पळून आमिर फैजल च्या नौटंकी मध्ये गाणं गाते.या गाण्याचे सुरुवातीचे हॉरर पिक्चर मधल्या सारखे आलाप ऐकून बऱ्याच लोकांना रूपा खरंच मरून आत्मा रूपाने आलीय अशी शंका येईल.शिवाय तिचा पाठलाग करणारा गुज्जर एम्प्लॉयी पण बऱ्याच रामसे पटात असतो त्यामुळे शंका अजूनच गडद होईल.पण तसं नाहीये.
आमिर फैजल ने बस फुगडी खेळत वाजवलेली गिटार हा अत्यंत प्रेक्षणीय आयटम आहे.(ही गिटार पण नंतर बऱ्याच वर्षांनी दिवानी मस्तानी गाण्यात दीपिका ने रियुज केली असण्याची शंका आहे).रूपा ने ऐन वेळी तिला दरडावल्यावर गायलेलं गाणं पण आमिर फैजल ला माहीत असतं. आणि त्याला द्यायचा ठेका पिटात बसलेल्या वादकांना पण माहीत असतो.या गाण्यात रूपाला पकडायला आलेल्या तिन्ही डाकूंनी ड्रेस वर स्कार्फ घातले आहेत.त्यातल्या एकाला मारून रूपा परत पळून जाते ती थेट परमीत सेठी च्या घरी.(हा म्हणजे तो 'तू निदान बघून तरी घे मुलगा, बघायला पैसे पडत नाहीत' वाला रुपासाठी अयुब खान ने ठरवलेला मुलगा.)या सीन मधली रूपा ची डायलॉग डिलिव्हरी नाटकाच्या स्टेज वरच्या सारखी मोठ्या आणि खणखणीत आवाजात आहे.ती इतक्या मोठ्याने आणि ठासून बोलते की परमीत सेठी बहिरा असावा अशी प्रेक्षकांना शंका येते.(खूप खूप बोला...कर्णबधिरांशी वाली ती जाहिरात आठवते ना).परमीत सेठी शी पण पटत नाही.(पोरीला कुठ्ठे म्हणून ठेवायची सोय नाही.सगळीकडे भांडणं करते.)मग रूपा पळून जाऊन एका एकाकी पण वर led लायटिंग केलेल्या देवळात जाऊन देवी मां शी परत खणखणीत आवाजात ओरडून बोलते.त्यामुळे देवी वैतागून दुर्लक्ष करते. तितक्यात गुज्जर चे 3 स्कार्फ वाले डाकू तिला पकडायला परत येतात.यातल्या एकाला तर तिने भोसकलेलं पण असतं.पण स्कार्फ मात्र अजिबात इकडचा तिकडे होत नाही.इथे त्या बिचाऱ्या भोसकलेल्या डाकूवर परत पूर्ण रुपाला उचलून बऱ्याच पायऱ्या उतरायचं टास्क दिलंय.तितक्यात तिच्या हाका ऐकून आमिर फैजल परत येतात आणि स्कार्फ वाला डाकू तिला उचलून तिथेच थांबतो.इथे त्या डाकूच्या डोळ्यातले 'लवकर या की पावट्यानो..इथं आतडं तुटाय आलंय वजन उचलून' वाले याचनेचे भाव आपल्याला स्पष्ट दिसतात.बरीच फायटिंग झाल्यावर तिन्ही स्कार्फ वाले पळून जातात आणि रूपा स्वतःशी जोरजोरात स्वगत बोलते(परत एकदा 'खूप खूप बोला...कर्ण बधिरांशी..') आणि ठरवते की आपण या दोघांना प्रेमात पाडून आपला सूड पूर्ण करायला वापरायचं.
गुज्जर पाण्यातून बाहेर येताना त्याला ही अशी पळून गेल्याची बातमी कळते.(हा स्त्री प्रधान चित्रपट असल्याने पुरुष पाण्यातून बाहेर येऊन जास्त देह प्रदर्शन करतात.रोल रीव्हर्सल.)या सीन मध्ये गुज्जर ने वॉटर प्रूफ आय लायनर लावलाय.इथे तो 'असला बारुद आणि असली बारुद' दोन्ही घेऊन या असं त्याचा माणसांना सांगतो.इथे रूपा ला 'असला बारुद' का म्हटलंय मला कळलं नाही.'असला आरडाओरडा करणारा चक्रम मारकुटा बारुद' या अर्थाने म्हटलं असेल.
आमिर खान प्रेमात पडायला चालू होतो. पण फैजल खान मात्र तिला अश्या नाटकाबद्दल जाब विचारतो.(इथे रूपा परत मोठ्याने ओरडून त्याला सर्व कहाणी सांगते.)फैजल खान ला दया येऊन ते दोघे तिला डिझायनर पांढऱ्या जॉर्जेट लखनवी मध्ये गावी परत सोडतात.(पण हा वेगळा आणि सुरुवातीचा वेगळा.)तिथे परत त्रास चालू असतो.पण त्यातल्या त्यात परिस्थितीत सुधार हा की अर्चना पुरणसिंगला तिच्या नीट मापाची ब्लाउजं घेण्याइतकं बजेट मिळालेलं असतं.मग ते सगळे हिंमत ठेवायचं ठरवतात आणि रूपा अजून एका पांढऱ्या डिझायनर घागरा मध्ये आमिर खान बरोबर गाणं गाते.त्याच्या पूर्वी आरश्यात काळ्या डिझायनर घागरा मध्ये स्वतःशी ओरडून एक स्वगत म्हणायला ती विसरत नाही(खूप खूप बोला..कर्ण बधिरांशी..).
आता गुज्जर सिंग परत गावावर हल्ला करायला येतो.इथे त्याने पहिल्या वेळेला गावात येताना घातला तो सिग्नेचर कॉईन नेकलेस परत घातलेला दिसतो.लकी असेल.गुज्जर सिंग च्या गॅंग मध्ये फारच विषमता दिसते. गुज्जर बिचारा नेहमी बिना शर्ट चा फिरत असतो आणि त्याचे एम्प्लॉयीज मात्र डबल लेयर ललेदर जॅकेट आणि स्कार्फ बिर्फ घालून.
आता फायनल हल्ल्याच्या वेळी परत सुरुवातीचं गाणं आणि तसेच सर्व विविधतेत एकात्मता वाले कपडे घातलेले डान्सर्स असतात.मग गुज्जर परत रूपा ला पकडतो आणि आमिर फैजल सोडवतात.(ही शहाणी स्वतः एकटी काही डिफेन्स करू शकत नसताना नेहमी गुज्जर ला धमक्या का देत असते काय माहीत.) आणि आमिर खान चे तिच्याशी जुळते.फैजल शहाणा आणि दूरदर्शी असल्याने तो आरडाओरडा करणारी रूपा आमिर खान ला देऊन स्वतःसाठी ऐश्वर्या मिळवतो.आणि सगळे सुखाने नांदतात.
इथपर्यंत पिक्चर बघून 'अरे काय चाललंय काय..' म्हणत केस उपटणारा प्रेक्षकवर्गही 'मेला' असतो.पिक्चर चा उद्देश सुफळ संपूर्ण होतो.
मी "मेला" मुवी कधीच एका
मी "मेला"कधीच एका बैठकीत पुर्ण बघितला नाहीये. तसच हा लेखही टप्प्याटप्प्यातच वाचेल म्हणते.
आणि मि अनु यानी मला पण मेली
आणि मि अनु यानी मला पण मेली बनवले आहे....
वेडे किती छळशील... माझ्या मम्मी आणि पपा चा आवडता मूवी आहे हा.... आता सूर्यवंशी वर पण लिहायच मनावर घे ग बाई !
शीबा चे स्वगत वाले डायलॉग ऐकून धन्य होतील लोक
अखेर मांजराला वेळ मिळाला.
अखेर मांजराला वेळ मिळाला. धन्यवाद खुप दिवसापासून वाट बघत होतो परिक्षणाची. लगे हातो और दो चार परिक्षण छाप दो.
हसून हसून मेलो.
हसून हसून मेलो.
छान
छान
मी मेला नाही पाहिला पण हे
मी मेला नाही पाहिला पण हे शीर्षक भयंकर आवडलंय. लेख नॅतर केव्हातरी वाचेन
शीर्षकापासून सगळंच
शीर्षकापासून सगळंच
थोडासंच वाचलं!
थोडासंच वाचलं!
फार ओढून ताणून लिहिल्यासारखं वाटतंय!!
आवडलं नाही तर शेवट पर्यंत
आवडलं नाही तर शेवट पर्यंत वाचलं नाही तरी चालेल ☺️☺️ पण पिक्चर नक्की बघा.एकदम 'So bad that it's good' पठडीतला आहे.
बापरे! एवढ्या बारकाईने
बापरे! एवढ्या बारकाईने चित्रपट बघितलात?..
मी काल कुठले कपडे घातलेले हे माझ्या स्वतःच्याच लक्षात नसतात..
असो, धम्माल लिहलयं...बाकी काहीही म्हणा पण त्या व्हाईट कुर्त्यामध्ये ट्विकल खन्ना भारी दिसते... (डोळ्यात बदाम असलेली बाहुली)
इकडे कोणी काही लिहिले की उगाच
इकडे कोणी काही लिहिले की उगाच खुसपट काढायची फॅशन आली आहे...अगोदर मायबोली वर असले काही नव्हते... असो चालू दया
छान लिहिलंय. पण स्टोरी काहीच
मेला कशाबद्दल नाव दिलंय ?
मेलं मेलातलं काहीच आठवत नाही
मेलं मेलातलं काहीच आठवत नाही पण लेख आवडला.
ध मा ल लिहिलंय.
ध मा ल लिहिलंय.
Costume designerची मापं काढलीत.
मी हा अर्धवट (सोससला तिथवर पाहिलाय बहुतेक). तरीही काही आठवलं नाही.
बाटलीत सुसू करायचा सीन यात आहे का?
काही प्रसंग कारवॉंवरून उचलले आहेत की काय?
दैंया मैं ये कहॉं आ फंसी गाणं आठवलं.
हो.तो सीन अत्यंत यक्क आहे
हो.तो सीन अत्यंत यक्क आहे.त्यावर हाईट म्हणजे जॉनी लिव्हर.
मी या पिक्चर ची मापं काढण्या मागे तो सीन पिक्चर मध्ये असणं हे मुख्य सुप्त कारण आहे.
अर्शद वारसी उद्याही एका
अर्शद वारसीच्या एका पिक्चरमध्येही आहे तसाच सीन. सोबत नम्रता शिरोडकर आहे बहुतेक.
तो सिनेमा मला व्हिडियो कोचने प्रवास करताना बघावा लागला होता.
भारीच आहे. खरंच ट्विंकलचा हा
भारीच आहे. खरंच ट्विंकलचा हा एकमेव चित्रपट पहिल्यांदा पाहिला आणि शपथ घेतली पुन्हा तिचा चित्रपट पाहणे नाही. कारण हेच. मोठमोठ्याने ओरडणे तेही चिडका आवाज काढून.
अर्शद वारसीच्या एका
अर्शद वारसीच्या एका पिक्चरमध्येही आहे तसाच सीन. सोबत नम्रता शिरोडकर आहे बहुतेक. >> चित्रपट: हिरो हिंदुस्तानी.
आमिरखानचा राख नावाचा एक
आमिरखानचा राख नावाचा एक पिक्चर तर मेलापेक्षाही उच्चश्रेणीवरचा होता.. तो पाहुन मेलाला सुद्धा मेल्याहुन मेला सारखे वाटेल हे निश्चित !!
राख म्हणजे त्यात आमीर खान अल
राख म्हणजे त्यात आमीर खान अल पचिनो आहे ना?गॉडफादर ची कॉपी?
मी अनु,
मी अनु,
खरंतर फारच घाईत उरकलं तुम्ही… जरा विस्तारानं यायला हवं होतं… ट्विंकल खन्ना इतक्या कर्कश आवाजात स्वत:च स्वत:शी का बोलत असते काही कळत नाही. तशीही तिचं अभिनयाशी आणि सौंदर्याशीही काही देणं घेणं नाहीच. पण या सिनेमातून जगातला वाईटातला वाईट अभिनय कसा असावा, याचं उदाहरण घालून दिलंय. बरं तिचं ते स्वगत पहिल्या दृश्यापासूनच इतकं इरिटेटिंग आहे की असं वाटतं गुज्जरच्या आधी रुपालाच गोळी घालावी. मग बरोबर सिनेमाचं नाव सार्थ झालं असतं.. ‘मेली’.
हा डेब्यु रोल पण नाही.यांच्या
हा डेब्यु रोल पण नाही.यांच्या पूर्वी बहुतेक बरसात आणि लव्ह के लिये साला कुछ भी करेगा आणि इतिहास येऊन गेले असावे.
ही इतकी पण वाईट अभिनेती नाहीय.या पिक्चर मध्ये तिला खास असा लाऊड रोल करायला सांगितला असेल.कमरिया लचके रे च्या वेळचे तिचे दुःखी अधिक थोडे उग्र अधिक थोडे घाबरवणारे एक्सप्रेशन बघून मी तरी प्रेक्षक म्हणून घाबरले असते.अर्थात प्रेक्षक 'नाचात बाई पायजेल' वाले असतील तर एक्सप्रेशन वगैरे काही पाहिले नसेल.
Lol
Lol
छान लिहिलेय ! आवडेश !
छान लिहिलेय ! आवडेश !
मेला अतिभयंकर होता हे खरेच पण ट्विन्कल ची विनोदबुद्धी व खिलाडूपणा यावरही टाळ्या झाल्या पाहिजेत.
https://twitter.com/mrsfunnybones/status/1240683522056048640?lang=en
कहर आहे
कहर आहे
तुमचा लेख वाचून सिनेमा
तुमचा लेख वाचून सिनेमा पाहायला घेतला पण I could not complete this challenge ..
तुमच्या सहनशक्ती ला सलाम
लेख भारीच
'मेला' सिनेमाच्या वेळी
'मेला' सिनेमाच्या वेळी आमिर 'लगान' मध्ये बिझी असल्यामुळे त्याचे मेला कडे का- ना- डो-ळा ' केल्याचे कुठेतरी वाचल्याचे आठवते
नाचात बाई पायजेल' वाले असतील
नाचात बाई पायजेल' वाले असतील तर एक्सप्रेशन वगैरे काही पाहिले नसेल.>> lol
छान लिहिलं आहे.
माझा या सिनेमातला आवडता सीन जेव्हा ट्विंकलतै आमिरचा शर्ट घालून ढाब्यावर जातात तो आहे. तिथे अंदाज अपना अपना मधला बाबुलाल (देवेन वर्माच्या सलूनमधला कामगार) गुंड दाखवला आहे. तो ट्विंकलसोबत गुंडांना साजेशी कामे करण्याच्या मूडमध्ये आहे तर आमिरला त्याचे कपडे परत पाहिजेत. इथे "हंसी के गुब्बारे" मध्ये शोभतील असे डबल मीनिंग संवाद आहेतच पण खरी मजा त्यांची फायटिंग सुरु होते तेव्हा येते. आमिर याचा शर्ट फाडतो आणि एक गुद्दा लगावून सुरु करतो. मग या गुंडाची कुपोषित बालकाची बॉडी बघायला मिळते. ही कुपोषित बॉडी फ्रेम करून ठेवावी अशी आहे. लोक छाती पुढे काढतात, हा बरगड्या पुढे काढतो. या गुंडाप्रमाणेच या सिनेमात एकही रिअल थ्रेट असा नाही. हिरो लोक मूर्ख असल्याने छळसत्र नाहक पावणे तीन तास लांबले आहे.
जे अंगात पूर्ण घालेपर्यंत
जे अंगात पूर्ण घालेपर्यंत आमिर खान ला कळतच नाही की आपण शर्ट ऐवजी स्कर्ट आणि ब्लाउज घालतोय >> हाहा
ट्विन्कलबाईंना अभिनय, नृत्य नाही येत.
लेखातल्या काहीकाही बुक्क्या आवडल्या ...
अमीरखानचा हा भाऊ डरावना दिसतो वटारलेल्या रागीट डोळ्यांमुळे.
Pages