गुरे घुसली समजता कापणीला शेत आहे*

Submitted by सुप्रिया जाधव. on 1 April, 2020 - 16:18

पुन्हा गाडी घसरलेली रुळावर घेत आहे
चला उतरायचे ?... अंतिम स्टेशन येत आहे

खुल्या डोळ्यांवरी ठरवून पट्टी बांधली तर
तुला दिसणार काळा, रंग ज्याचा श्वेत आहे

तिच्या गरजा तिची घुसमट कुणाला काय त्याचे ?
तुझ्या स्टेटसप्रमाणे आखलेला बेत आहे

असो अण्वीक ऊर्जा वा असो नाते जवळचे
जसा वापर तसा परिणामही ते देत आहे

उन्हातान्हात आपण राबलेलो पेरणीला
गुरे घुसली समजता कापणीला शेत आहे

सुप्रिया मिलिंद जाधव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Back to top