फ्लॅट सिस्टिममध्ये दोन पद्धतीच्या बागकामाला वाव असतो, Balcony gardening आणि Window gardening. त्यामध्येही प्रामुख्याने window gardening मध्ये कुंड्या ठेवायला अतिशय कमी जागा असते. Hanging pots हा प्रकार कमीत कमी जागा व्यापतो. (ही कल्पना मला सुचलेली नसून मी एका व्हिडीओ मध्ये बघितलेली आहे)
तर, ह्यात वापरात नसलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर कुंड्या म्हणून केला जातो व नंतर या बाटल्या किंवा कुंड्या grill ला hooks च्या सहाय्याने अडकवल्या जातात म्हणजेच कमीत कमी जागेत आणि खर्चातील कुंड्या. परंतु, D.I.Y( do it yourself ) प्रकारात मोडत असल्याने ह्या कुंड्या बनवायला जरासा वेळ लागतो. जो सध्या Quarantine च्या कृपेने किंवा अवकृपेने भरपूर आहे.
ह्यामध्ये लागणारे साहित्य म्हणजे प्लास्टिकची बाटली, सुरी, कात्री किंवा कोणतीही अणुकूचीदार, धारदार वस्तू, सुतळ आणि hooks.
एखादी वापरत नसलेली प्लास्टिकची बाटली आडवी ठेवून तिची वरील बाजू आयताकृती भागात कापून घ्यावी. तो होईल कुंडीचा सरफेस एरिया (surface area). कापलेल्या आयताकृती भागाच्या दोन्ही बाजूस दोन छिद्र पाडावे ( सुरी किंवा कात्रीच्या सहाय्याने) मग त्याच्या विरुद्ध बाजूस दोन छिद्र पाडावे (पाण्याचा निचरा होण्यासाठी) आता वरील बाजूस जे छिद्र आहेत त्यामधून सुतळ टाकावी ही कुंडी तयार झाली. आता तयार झालेल्या कुंडीत माती घालून हवं ते रोपट/झाड लावून ग्रीलला hooks च्या साहाय्याने अडकावे
जेव्हा आपण ही कुंडी ग्रीलला अडकवतो तेव्हा या कुंडीचं किंवा बाटलीच वजन कमीत कमी ठेवण्यासाठी माती बरोबर perlite आणि cocopeat चा वापर करावा.
बाटलीतलं झाडं -भाग 2 (hanging pots)
Submitted by अक्षता08 on 29 March, 2020 - 00:33
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
प्रयोग आवडले.
प्रयोग आवडले.
-------------
नको असलेल्या एक्सरे फिल्मचा वापर करून ट्रे*१ बनवले. ते बाल्कनीच्या साडेचार इंची रुंदीच्या कट्ट्यावर ठेवता येतात. ( या आकाराचे प्लास्टिक ट्रे मिळत नाहीत. )त्यात तळाला मातीचा थर घालून पिश्व्यांत झाडे ठेवली. मातीचं पाणी बाहेर वाहात नाही.

#*१ - फिल्म वळवून स्टेपलर पिना मारल्या आहेत. टेबलाच्या कडेवर ठेवून वाकवून घडी पाडावी लागते. जोर लावल्यावरच फिल्म वळते.
आम्ही हा प्रयोग मुलगा 6 वी की
आम्ही हा प्रयोग मुलगा 6 वी की 7 वित असताना विज्ञान प्रदर्शनात बघितला होता ते आठवले. त्या बाटल्या कापायला टेक्निक जमायला पाहिजे.
यामध्ये छोटी छोटी कोणकोणती
यामध्ये छोटी छोटी कोणकोणती झाडे लावता येतील, आणि त्यांची कशी काळजी घेता येईल हेही सांगावे.
माझ्या समोरच्या सोसायटीत
माझ्या समोरच्या सोसायटीत एकाने अस केलेय . मलाही करायचं आहे पण ते डेंग्यू वगैरेची भीती आहे
अरे वा अक्षता08 , तुम्ही बरीच
अरे वा अक्षता08 , तुम्ही बरीच हिरवळ केलीत कमी जागेत. थोडी आवड असेल तर या दिवसात करायला बेस्ट उद्योग आहे हा.
.... त्या बाटल्या कापायला टेक्निक जमायला पाहिजे.....
यासाठी (पूर्ण मेटलच्या) कात्रीची फक्त टोके गरम आचेवर काही सेकंद धरून मग त्यानी कापा, झटकन होते.
@Srd
@Srd
धन्यवाद !!
हि पण idea मस्त आहे !! ह्याचा seedling tray म्हणुन सुद्धा वापर होऊ शकतो
@ननि
@ननि
होय ! एकदा technique कळली की खुप सोप्पं आहे.
@अनिंद्य
धन्यवाद !
(यासाठी (पूर्ण मेटलच्या) कात्रीची फक्त टोके गरम आचेवर काही सेकंद धरून मग त्यानी कापा, झटकन होते.)
सहमत !
कात्री किंवा सुरी गरम केल्यावर सहजपणे बाटली कापता येते.
@जाई.
साचलेल्या पाण्यात डेंग्यू होण्याची दाट शक्यता असते. परंतु या पद्धतीमध्ये पाणी साचून राहत नाही त्याचा निचरा होतो त्यामुळे डेंग्यूची भीती नाही
हर एक मच्छर डेंगू नही होता
हर एक मच्छर डेंगू नही होता
@सुहृद
@सुहृद
आपण बाटली कोणत्या आकाराची घेतो त्यावरून कोणते झाड किंवा रोपटे लावायचे हे आपण ठरवू शकतो.
अशा बाटली वजा कुंड्यांचा उपयोग आपण seedling tray म्हणुनसुध्दा करू शकतो. Pothos, गव्हांकुर, कोथिंबीर, मेथी, पालक ( ह्यासाठी थोडी अजून खोलगट बाटली लागेल), succulents आणि अजून बरीच झाडं आपण या बाटल्यांमध्ये लावू शकतो
मी उलटी बॉटल लावतो, बुड वर
मी उलटी बॉटल लावतो, बुड वर येतं त्याचा थोडा गोल कापतो. ( तो प्लास्टिक गोल तुकडा आत टाकायचा. म्हणजे पाणी जमा होण्यास जागा मोकळी राहते. पूर्ण कडेपर्यंत कापायचं नाही, बॉटल लेचीपेची होते.) त्यात खाली नारळाची शेंडी (बुचाकडे खाली) वर माती. दोरीने टांगतो. ग्रिल वजन घेऊ शकते. पाणी निचरा होऊन बुचाकडे खाली आत जमा होते. डासांना नो एन्ट्री. वरची माती सुकली की बॉटल तिरकी करून त्या पाण्याने भिजवायची. खूपच जास्ती झाले तर बूच उघडून काढून टाकायचे. मनी प्लांट छान येतो, कुठेही घरात, बाथरुमातही टांगू शकतो.