Submitted by सुप्रिया जाधव. on 1 February, 2020 - 04:15
एक त्यावाचून माझे लक्षही नसते कुठे
भेटणे याहून काही वेगळे असते कुठे ?
भिंगरी हृदयास कायम बांधली आहे तुझ्या
शांत एखाद्या ठिकाणी मन तुझे बसते कुठे ?
अनुभवांनी वाढला बुध्यांक आहे एवढा
आज पूर्वीसारखे निर्व्याज मी हसते कुठे ?
तो फसवतो ते जिव्हारी लागते पण हासते
सर्व जर कळते मला तर सांग मी फसते कुठे ?
पचवले आहेत झटके जर प्रसंगांचे तिने
हादऱ्यांनी ह्या मनाची भिंत ही धसते कुठे ?
जीवनाचा सातबारा फक्त नावावर हवा !
मालकीची जमिन कोणाची, 'प्रिया' कसते कुठे ?
सुप्रिया मिलिंद जाधव
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त, आवडली
मस्त, आवडली
वाह!!! सुंदरच.
वाह!!! सुंदरच.
>>>>>>>अनुभवांनी वाढला बुध्यांक आहे एवढा
आज पूर्वीसारखे निर्व्याज मी हसते कुठे ?>>>> __/\__
आभारी आहे
आभारी आहे
Wah.. sunder gazal
Wah.. sunder gazal