घरी कमी जागा असल्यामुळे, वेळ नसल्यामुळे बर्याचदा आवड असुनही आपल्याला झाडं लावता येत नाहीत. परंतु, झाडं कुंडीतच लावली पाहिजे हे गरजेचे नाही. बाटलीमध्येही आपण झाडं लावु शकतो. वापरात नसलेल्या बाटलीमध्ये (किंवा ग्लासात) पाणी घालुन त्यात आवडत्या झाडाची/ रोपट्याची फांदी कापून ठेवावी. मात्र, झाडाची जशी वाढ कींवा जसा बहर आपल्याला मातीत असलेल्या रोपट्याला मिळेल तसाच पाण्यात ठेवलेल्या रोपट्याला नाही मिळणार. परंतु, काही नसण्यापेक्षा काहीतरी असणं कधीही चांगल.
शहरातल्या लोकांना, किंवा ज्यांच जीवन घड्याळ्याच्या काट्यावर चालत, ज्यांना झाडांची निगा राखायचा वेळ नाही. त्यांच्यासाठी हा पर्याय उत्तम आहे.
ह्यामध्ये करायच फक्त हेच आहे की आवडलेल्या झाडाची/रोपट्याची फांदी ४५° मध्ये कापायची. फांदी कापताना धारदार सुरीचा / कात्रीचा वापर करावा. परंतु, फांदी नक्की कुठे कापावी ?
नोड ( Node) च्या लगेच खाली कींवा दोन नोडच्या मध्यभागी ४५° मध्ये फांदी कापावी. कापलेली फांदी लगेच पाण्यात ठेवावी. फांदी बाटली कींवा ग्लासात ठेवताना अगदी तळाशी लागु देउ नये. किमान २-३ इंच अंतर ठेवावे.
एकदा मुळं आली की दर १५-२० दिवसांनी पाणी बदलत रहावे. ह्यांना खताची आवश्यकता नाही. परंतु, तरिही पानं टवटवीत दिसण्यासाठी liquid खताचा (seaweed fertilizer) फवारा दर २०-२५ दिवसांनी मारावा. ही बाटलीतील झाडं कुठेही राहु (table , desk, teapoy) शकतात व कुठेही ठेवुन त्या जागेची शोभा वाढवतात.Pothos म्हणजेच मनी प्लांट सर्वात पटकन व सहजरीत्या पाण्यात वाढत.
तर, अशी ही सहज, सरळ, सोप्प्या पध्दतीने लावता येणारी "बाटलीतील झाडं". जर इच्छा असेल तर आपण ह्या फांद्या एखाद्या कुंडीतही लावु शकतो.
Node - झाडाचा असा भाग जिथे पानं येतात
Mast idea!
Mast idea!
मस्तच.....
मस्तच.....
हे प्रयोग केले. काचेच्या
हे प्रयोग केले. काचेच्या बाटली चांगली दिसते पण अरुंद तोंड ही अडचण ठरते.
प्लास्टिक बाटली (पाण्याची पेट) वाईट दिसते. पण उलटी वापरता येते.
टाइटल वाचून वाटले की
टाइटल वाचून वाटले की terrarium बद्दल असेल काही !
पण हेही छान आहे. हाइड्रोपॉनिक्स मध्ये सर्व प्रकारची झाडे संपूर्ण जीवनकालासाठी similar results देतात का ? की ठराविक फांद्या फक्त जगतात (without flowering effect etc). ह्याबद्दल सविस्तर अनुभव वाचायला आवडेल.
धन्यवाद.
छान
छान
प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये अस करता येईल का ?
@अज्ञानी
@अज्ञानी
मी अजुन तरी ह्या (हाइड्रोपॉनिक्स) पध्दतीने भाज्या उगवल्या नाही आहेत. त्यामुळे मला अनुभव नाही.
परंतु, तुम्ही जर फुलझाडांची फांदी पाण्यात लावली तर त्यांना येतात फूले. आणि सगळीच झाडं पाण्यात नाही वाढत.
@mrsbarve @ऋतुराज. @Srd @जाई
@mrsbarve @ऋतुराज. @Srd @जाई.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
@जाई.
होय !
@Srd
तोंड जरी अरुंद असल तरी फांदी आरामात बाटलीत जाते
प्लास्टीकची बाटली आपण शोभेसाठी नाही वापरु शकत. पण जर काचेची बाटली नसेल तर हा पर्याय उत्तम आहे
>>>प्लास्टीकची बाटली आपण
>>>प्लास्टीकची बाटली आपण शोभेसाठी नाही वापरु शकत. >>>>
खरंय.
छान पण एकदा मनीप्लांट लावलं
छान पण एकदा मनीप्लांट लावलं होतं त्यामुळे डास खूप झाले.
ओके अक्षता. धन्यवाद
ओके अक्षता. धन्यवाद
मस्तच!
मस्तच!
ग्लासमधे ब्रम्हकमळ आहे का?
छान दिसतीय ग्लासबाग.
छान दिसतीय ग्लासबाग. ब्रह्मकमळाच पान आहे. एका पानापासून खूप मोठं होतं झाड.
ओह, थँक्स ननि.. ब्रम्हकमळ
ओह, थँक्स ननि.. ब्रम्हकमळ कुंडीत लावलेला होता 4-5वर्ष. छान वाढ झाली होती पण फुल कधी आलीच नाही..नंतर घर बदलताना शेजारी दिला. ब्रम्हकमळाला साधारण किती वर्षानंतर फुल येतात??
छान च प्रयोग आहे हा.
छान च प्रयोग आहे हा.
पण एक शंका आहे. १५-२० दिवसांनी पाणी बदलायचे म्हणताय तर डेंग्यूच्या अळ्या होण्याची शक्यता नाही का तोपर्यंत?
छान माहिती आहे.
छान माहिती आहे.
अननस, अगेव इत्यादींची रोपे मी अशीच पाण्यात ठेऊन मुळे फुटल्यावर कुंडीत/जमिनीत लावली.
डास व्हायची शक्यता लक्षात घेऊन पाणी वारंवार बदलत राहायला हवे.
>>>डेंग्यूच्या अळ्या होण्याची
>>>डेंग्यूच्या अळ्या होण्याची शक्यता >>>यासाठी एक वेगळा उपाय केलेला. सक्सेस झाला पण चांगले दिसण्यासाठी प्लास्टिक बॉटलही चांगली घ्यावी लागते. किंवा काचेची मोठ्या तोंडाची बरणी.
कधी पुन्हा झाड वाढवून फोटो काढून टाकेन.
बाग म्हटली की रोज थोडी खटपट करावीच लागते. दुर्लक्ष झालेले चालत नाही.
मी पूर्वी अशी काचेच्या
मी पूर्वी अशी काचेच्या फुलदाणीत फांद्या कापून लावलेल्या आहेत. मॅनेज करायला सोप्प्या असतात पण जर जमिनीत रोप लावलं तर त्याला चांगली न्यूट्रियंट्स मिळतात असं वाटतं.
Bottleमध्ये २ गप्पी मासे
Bottleमध्ये २ गप्पी मासे सोडून ठेवायचे मग डास नाही होणार. फक्त ते लिक्विड फर्टिलाझरचा pH किती असतो आणि पाण्यावर काय इफेक्ट करतो ते पहायला हवे
@मंजूताई
@मंजूताई
मला असा अनुभव नाही आला आहे.
खरात खुप जास्त झाडं असल्याने डासांचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी रोज कापुर जाळतो आणि आठवड्यातुन एकदा कडुनिंबाच्या तेलाचा फवारा त्यामुळे डास होत नसावे कदाचित
@एस, @साधना
@एस, @साधना
धन्यवाद !
हा मुद्दा खरच माझ्या लक्षात नाही आला
१५-२० ह्या अर्थी सांगीतले होते की शेवाळ येउ नये म्हणून.
वारंवार पाणी बदलणे कधीही उत्तम !
परंतू , जर बाटली ऊन्हात असेल, तुम्ही पाणी २ दिवसांनी ढवळत असाल (oxygen पाण्यात राहण्यासाठी) तर नाही काही प्रार्दुभाव संभवत.
परंतू, precaution is better than cure !!
@अज्ञानी
@अज्ञानी
सहमत !
खत पाण्यातुन नाही द्यायच, पानांवर फवारा मारायचा (foliar spray)
@सायो
बरोबर आहे !
परंतु, हा प्रर्याय तुमच्याकडे वेळ नसेल तर करण्यासाठी आहे
@मन्या ऽ
@मन्या ऽ
फूले न येण्याची कारणं बरीच आहेत
खत व्यवस्थित न मिळणं, कुंडी जास्त लहान वापरली असेल तर, माती कोणत्या प्रकारची आहे त्यावर पण अवलंबुन आहे
(ब्रह्मकमळ mild acidic to acidic माती मध्ये ही जगतं)