एका संध्याकाळी बाल्कनीमध्ये चहा पीत असताना अचानक विचार आला. आपण का म्हणून balcony/kitchen garden सुरु करु नये ?
पण ज्या गोष्टीत आपल्याला शुन्य अनुभव किंवा माहिती आहे त्याची सुरुवात कुठून आणि कशी करायची ?
मग videos बघुन, blogs आणि पूस्तकं वाचून
प्राथमिक माहिती मिळाली.
पण जोपर्यंत आपण स्वतः अनुभव घेत नाही तोपर्यंत पूस्तकी ज्ञान (therotical knowledge) उपयोगी नाही.
तर, शेवटी पुदीना लावायच ठरलं
पण पुदीनाच का?
ज्यांना बागकामामधला काही अनुभव नाही ते ही पुदीना लावुन, जगवुन वाढवु शकतात म्हणुन.
फक्त पुदीना लावताना घ्यावयाची काळजी ही की
त्यांना सुर्यप्रकाशाची गरज असते पण उन्हाळ्यात ज्या वेळेस सुर्याची प्रखरता खुप असते तेव्हा मात्र त्यांना थोड्या आडोश्याच्या जागी ठेवावे.पुदीन्याला खत दिले नाही तरी चालण्यासारखे आहे परंतु १५ दिवसांमधुन एकदा खत दयावे.
पुदीना लावण्याच्या दोन पध्दती आहेत.
१.पुदीन्याच्या काड्या ४५° मध्ये कापुन (जिथे पानं येतात त्याच्यावर) सरळ एका ग्लासात पाणी घालुन ठेवाव्या, दर ७-८ दिवसांनी पाणी बदलावे.
२. ४५° मध्ये कापलेल्या काड्या एका कुंडीत लावाव्या. साधारणतः १०-१५ दिवसात नवीन पानं यायला सुरुवात होते.
आपण लावलेल्या रोपाला/झाडाला जेव्हा नवीन पालवी फुटते/नवीन पानं येतात; ते बघण्यात जो आनंद आहे तो दुसऱ्या कशात नाही
छान दिसतोय पुदिना..
छान दिसतोय पुदिना..
छान माहिती
छान माहिती
छान
छान
पुदिना फार जलद वाढणारी
पुदिना फार जलद वाढणारी वनस्पती आहे. जमिनीवर लावली तर खूप पसरते. फेसबूकवर गच्चीवरची बाग हा गृप छान आहे. तसेच एसव्हीएस सीडस् ह्या गृपवर मोफत फुलझाडे, शोभेची झाडे, औषधी वनस्पती यांच्या बिया, कंद, फांद्या मिळतात. आपल्या कडील देऊन बदल्यात पण मिळतात. संजय नरोटे, श्रृती ओझा हे संस्थापक/अॅडमीन आहेत.
छानच!
छानच!
पुदिन्याला उथळ व पसरट कुंडी
पुदिन्याला उथळ व पसरट कुंडी घ्या.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद !!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद !!
(@Shraddha, कनिका, BLACKCAT, Srd)
@परशुराम परांजपे
सहमत !(पुदिना फार जलद वाढणारी वनस्पती आहे. जमिनीवर लावली तर खूप पसरते)
मी नक्की भेट देइन Facebook page la
माहिती बद्दल धन्यवाद !!
@अश्विनी के
पुदीन्याचे cuttings उथळ व पसरट कुंडीत लावुन बघेन
Thanks for suggestion !!
पुदीना जंगली आहे. भयंकर पसरतो
पुदीना जंगली आहे. भयंकर पसरतो, फोफावतो, निबरट , फताडी होतात पानं.
>>पुदीन्याच्या काड्या ४५°
>>पुदीन्याच्या काड्या ४५° मध्ये कापुन (जिथे पानं येतात त्याच्यावर) सरळ एका ग्लासात पाणी घालुन ठेवाव्या, दर ७-८ दिवसांनी पाणी बदलावे.
२. ४५° मध्ये कापलेल्या काड्या एका कुंडीत लावाव्या. साधारणतः १०-१५ दिवसात नवीन पानं यायला सुरुवात होते.
या प्रकारे बेसिलही छान होतो घरी.
@सामो
@सामो
सहमत !
परंतु तो कुंडीत लावला तर पसरण्याची/फोफावण्याची भिती नाही
@वर्षा
@वर्षा
मी Greek Basil च्या बीया लावल्या होत्या. परंतु रोपट तग धरत नव्हत.
मी cutting लावुन बघेन
माहिती बद्दल धन्यवाद !
यूट्यूबवर मातीविरहीत पुदीना
यूट्यूबवर मातीविरहीत पुदीना आणि कोथिंबीर उत्पादनाचे दोन मस्त व्हिडिओ मिळाले.
पुदीना
https://www.youtube.com/watch?v=dmjXzq-DGNk
कोथिंबीर
https://www.youtube.com/watch?v=_qpuQ87Oxtg
छान माहिती.
छान माहिती.
मी एकदा बाजारातून पुदिन्याची जुडी आणली होती. त्यातल्या एक-दोन काड्यांना किंचित मुळं असलेली दिसली. सहज एका कुंडीत त्या काड्या खोचल्या. तो पुदिना आता चांगला रुजलाय.
@ललिता-प्रीति
@ललिता-प्रीति
मी पहिल्यांदी पुदीना लावण्याचा प्रयत्न केला होता. पण तो प्रयोग फसला.
नंतर परत काड्या लावल्या तेव्हा रुजला आणि आता चांगला वाढत आहे!
@वर्षा
@वर्षा
हे करुन बघायला हरकत नाही
धन्यवाद !
काल बाजारातून आलेली पुदीना
काल बाजारातून आलेली पुदीना जुडीपैकी १० काड्या ४५° मध्ये कापून पाण्यात घातल्या तर आज त्यातील अर्ध्याहुन जास्त काड्या ज्या काल उथळ भांड्यात असल्याने पाण्यात गपगुमान पडून होत्या त्या आज सकाळी मोडेन पण वाकणार नाही स्टाइल मध्ये किमान इंचभर तरी सरळ ९०° मध्ये उभ्या राहिल्यात. बहुतेक त्याना मुळे फुटण्याची प्रक्रिया सुरु झाल्याने असेल हे !
मीही एका मोठ्या पसरट कुंडीत
मीही एका मोठ्या पसरट कुंडीत बाजारातून आणलेल्या पुदीना च्या काड्या पाने काढून घेऊन लावल्या होत्या. त्यातल्या 2-3 च काड्याना पाने आली व पूर्ण कुंडीभरून फोफावल्या .
ती पुदिन्याची पाने मी बरेचदा स्वयंपाकात वापरली.
त्यानंतर मी थोडा मूर्खपणा केला. एक छोटा कोंब आलेला आल्याचा तुकडा फेकून देण्याऐवजी पुदिन्याची कुंडी बरीच रुंद असल्याकारणाने त्याच कुंडीत घाई घाईत कोपर्यात पुरला. नंतर काही दिवसानी पाहिलं (आठवण आली तेव्हा) तर आल्याने हातपाय पसरले होते व पुदीन्याने काही दिवसात मान टाकलेली . आत्ता नवीन पुदिन्याच्या काड्या नवीन कुंडीत लावल्यात.
कुंडीत पुदीना लावणे व त्याची हवी तेवढीच पाने खुडणे मला बरच सोयिस्कर वाटते कारण बाजारातून आणलेला पुदिन्याची जूडी एकदम वापरली जात नाही (माझ्यासारख्या कधीतरी स्वयंपाक करणार्यांसाठी ) व मला पाने सुटी करायला सुद्धा वेल लागतो
छान माहिती.
छान माहिती.
@MeghaSK
@MeghaSK
एखाद झाडं मरतं तेव्हा जीवाला लागत.
सहमत !!
(कुंडीत पुदीना लावणे व त्याची हवी तेवढीच पाने खुडणे मला बरच सोयिस्कर वाटते कारण बाजारातून आणलेला पुदिन्याची जूडी एकदम वापरली जात नाही )
@साद धन्यवाद !
@साद
धन्यवाद !
@अज्ञानी
@अज्ञानी
होय !!
म्हणजे अजून ७-८ दिवसात नविन पानही येतील
पुदिना पाण्यात चांगला वाढतो.
पुदिना पाण्यात चांगला वाढतो. पाण्यातून कुंडीत शिफ्ट केल्यावर माझा पुदिना खराब झाला होता. कदाचित तो पॉटमिक्सचा प्रॉब्लेम होता.
पाण्यातून कुंडीत शिफ्ट
पाण्यातून कुंडीत शिफ्ट केल्यावर माझा पुदिना खराब झाला होता. >> मातीत शिफ्ट केले की मलाही पाण्याच्या ५० टक्के सर्व्हायवल मिळाले. बहुतेक जमिनीची आर्द्रता किती असावी ह्यावर थोड़े कन्फ्यूजन होते मनात म्हणून घडले असेल. नंतर मात्र मस्त चिखल केला तेव्हा सर्व फांद्या तजेलदार झाल्या आणि पुढे ३ दिवसात वाढीचा छान जोर धरलाय. मातीमध्ये ५० टक्के भाग घरगुती कंपोस्टचा घातलाय.
होपफुली अजुन पुढील १५ दिवसात
होपफुली अजुन पुढील १५ दिवसात ट्रे पूर्ण भरेल...


.
.
@धागा - Thank you
Indoor भाज्या कोणत्या लावता
Indoor भाज्या कोणत्या लावता येतील
मातीमध्ये ५० टक्के भाग घरगुती
मातीमध्ये ५० टक्के भाग घरगुती कंपोस्टचा घातलाय. <<< घरगुति कंपोस्ट काय देता येइल?
मि कुंडीत कारले टोम्येट बि पेराले आहे. नुकातिच रोपे आलि आहेत.
मेथि एकदा काढुन झालि. आता त्यात पुदिना लावते.
रोजचे निर्माल्य + किचन मधील
रोजचे निर्माल्य + किचन मधील सेंद्रिय कचरा (प्रामुख्याने केळीची साले ) एका बादलीत (माझ्याकडे बादली ऐवजी प्लास्टिकपिशवी अच्छादलेले छोटे करोगेटेड बॉक्स वापरतो ... टाकाऊतुन टिकाऊ) महिनाभर जमा करत त्यावर दर ३ दिवसांनी थोडं जीवामृत शिंपडतो म्हणजे कुजल्याचा घाण वास येत न येता बॅक्टेरियल एक्टिविटी लवकर होते. फ्रूटफ्लाइजपासून त्रास नको म्हणून पातळ कपड़ा / ओढणीने वर झाकलेले ठेवतो आणि दुसऱ्या महिन्यात हा सर्व लगदा झाडाना १:१ प्रमाण वापरला की पुन्हा फ्रेश स्टार्ट..
@नौटंकी
@नौटंकी
पुदिना, कांद्याची पात, टोमॅटो हे indoor लावु शकतो ( पश्चिम किंवा दक्षिण दिशेच्या खिडकीजवळ ). ह्याव्यतिरिक्त Indoor भाज्या लावण्याचा मला एवढा काही खास रिझल्ट नाही मिळाला. (फळभाज्या ,पालेभाज्या ह्यांना थेट सूर्यप्रकाशाची गरज असते)
पुदीन्याच्या काड्या ४५° मध्ये
पुदीन्याच्या काड्या ४५° मध्ये कापुन (जिथे पानं येतात त्याच्यावर) सरळ एका ग्लासात पाणी घालुन ठेवाव्या, दर ७-८ दिवसांनी पाणी बदलावे. >>
अगदी असंच केलं. जश्या होत्या कड्या तशाच राहिल्या. आज दोन आठवडे झाले.
पुदिना लावायला सोपा आहे. मी
पुदिना लावायला सोपा आहे. मी काड्या आणल्या की त्यातल्या त्यात जाड काड्या बघून त्याची शेंडा सोडून सगळी पाने काढते. मग त्या काड्या दोन दिवस ग्लासमध्ये ठेवते. दोन दिवसांनी बारीक केसासारखी पांढरी मुळे फुटतात. त्या काड्या मातीत रोवायच्या. साधारण 8 दिवसात नवीन पालवी फुटते. 25 दिवसात पुदिना बहरतो.

हा मी जून एन्ड ला लावलेला.
Pages