मायबोलीवरील प्रतिसाद आणि दिवाकरांची नाट्यछटा.. "असें केल्याशिवाय जगांत भागत नाही !"

Submitted by अजिंक्यराव पाटील on 4 March, 2020 - 09:44

मायबोलीवर अनेक धाग्यांवर बागडताना पुढील नाट्यछटेसदृश्य वर्तन आढळले. हि नाट्यछटा आम्हाला मराठीला होती, आणि हिचे सादरीकरण करून अस्मादिकांनी शाबासकी देखील मिळविली होती. गम्मत म्हणून लिहीत असून, कुणी ह्या लेखाला व्यक्तिगत हल्ला समजल्यास धागाकर्ता किंवा नाट्यछटाकार दिवाकर त्यास जबाबदार नाहीत.

माझें मोठें भाग्य, यांत कांहीं शंका नाहीं ! नाहींतर, आपल्यासारख्या थोर लोकांची कोठून गांठ पडायला ! - अहो कशाचे, कशाचे ! आम्ही कसले कवि ! कोठें एका कोपर्‍यांत लोळत पडलों आहोंत झालें ! नाहीं खरेंच ! परवांची आपली कविता फारच बहारीची होती बोवा ! फारच छान ! एक्सलंट ! अहो आधीं नांव पाहूनच थक्क झालों ! ' माझें आंबट अजीर्ण ! ' वा ! किती सुंदर ! - नाहीं, तें आलें लक्षांत. आहे कविता एकंदर आत्म्यालाच उद्देशून ! पण त्यांतल्या त्यांत या दोन ओळी तर मला फारच आवडल्या ! काय पहा ! - हां बरोबर, - ' अजीर्णामुळें ! जीव कळवळे ! ॥' काय बहार आहे यांत ! शब्द सोपे असून किती खोल, गंभीर अर्थ ! - काय म्हणतां ! इतका खोल अर्थ आहे का ? शाबास ! ' प्रेमभंगामुळें हदय पिळवटून डोळ्यांतून खळखळा वाहिलेल्या अश्रूंचें अजीर्ण ! ' क्च ! काय विलक्षण मिस्टिक कविता आहे हो ! टेरिबल ! फारच प्रतिमा अफाट ! माझें समजा हो ! - कोणती ? - कोणती बरें माझी कविता आपल्याला अतिशय आवडली ? हां, हां ! ती होय ? गेल्या मस्तकमंजनांतील चहादाणीवरील ! अस्सें ! - हो, ती सुद्धां आहे आत्म्यालाच धरुन ! - बरें आतां रस्त्यांत नको - केव्हां ? उद्यां सकाळी येऊं आपल्या घरीं ? - ठीक आहे - हं : ' अहो रुपम् अहो ध्वनिः ' चाललें आहे जगांत ! म्हणे ' आपली चहादाणीवरील कविता अतिशय आवडली ! ' हः हः कमाल आहे बोवा या लोकांची ! इतकी भिकार कविता कीं, मला स्वतःलासुद्धां आवडत नाहीं ! माझी चहादाणी ! साखरपाणी ॥ अधण येई सळसळा ! अश्रू येती घळघळा ॥ हः हः यंवरे कविता ! पण चाललें आहे कीं नाहीं ! भेंडीरमणानें उठावें, बटाटेनंदनाची स्तुति करावी ! बटाटेनंदनानें पुढें यावें, भेंडीरमणाची वाहवा करावी ! मनांत परस्परांना त्यांची कविता मुळींच आवडत नसते ! पण जगांत यानें त्याला शेली म्हणावें, उलट त्यानें याला कीट्स म्हणावें ! चालला आहे सपाटा ! बरें असें केल्याशिवाय जगांत भागत नाहीं ! अहो नाहीं तर, आपली खरीं मतें सांगून जगांत तंटेच करायचे - वैरीच निर्माण करायचे कीं नाही ? रिकामा जिवाला ताप ! जाऊं द्या !

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Happy
काही कविता वाचून, माबोवरुन पळून जावेसे वाटले खरे.

आपली खरीं मतें सांगून जगांत तंटेच करायचे - वैरीच निर्माण करायचे कीं नाही ? >>>>किती चपखल लिहिले आहे. आजही लागू होते.
बाकी नाट्यछटा प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद.

दिवाकरांच्या नाट्यछटा प्रताधिकारमुक्त आहेत आणि विकिस्रोतवर उपलब्ध आहेत.

> हि नाट्यछटा आम्हाला मराठीला होती > कोणती बॅच? आम्हाला होती की नाही आठवत नाहीय.

> भेंडीरमणानें उठावें, बटाटेनंदनाची स्तुति करावी ! बटाटेनंदनानें पुढें यावें, भेंडीरमणाची वाहवा करावी ! मनांत परस्परांना त्यांची कविता मुळींच आवडत नसते ! पण जगांत यानें त्याला शेली म्हणावें, उलट त्यानें याला कीट्स म्हणावें ! चालला आहे सपाटा ! बरें असें केल्याशिवाय जगांत भागत नाहीं ! > Lol Lol

> अहो नाहीं तर, आपली खरीं मतें सांगून जगांत तंटेच करायचे - वैरीच निर्माण करायचे कीं नाही ? रिकामा जिवाला ताप ! जाऊं द्या ! > हो ना उगाच रिकामा जीवाला ताप! मीतर वाचणंच कमी केलंय नवीन वर्षात...

> भेंडीरमणानें उठावें, बटाटेनंदनाची स्तुति करावी ! बटाटेनंदनानें पुढें यावें, भेंडीरमणाची वाहवा करावी ! मनांत परस्परांना त्यांची कविता मुळींच आवडत नसते ! पण जगांत यानें त्याला शेली म्हणावें, उलट त्यानें याला कीट्स म्हणावें ! चालला आहे सपाटा ! बरें असें केल्याशिवाय जगांत भागत नाहीं ! >>>>>>>>>> Rofl

छान लिहिलंय. Happy

ओळींमध्ये योग्य ठिकाणी एकेका ओळींची जागा सोडल्यास बरे होईल.

@ ऍमी : २००९..

@ हर्पेन: नक्की वापरावे असे शब्द आहेत ते..

@स्वामीनि : दिवाकरांपर्यंत तुमची प्रतिक्रिया पोचेल अशी आशा करतो..

@मानव पृथ्वीवर : विकिस्रोतवरून कॉपी पेस्ट करताना लक्षात आले नाही.. पुस्तकात सुद्धा सलग होते हे. एकपात्री प्रयोग असल्यासारखेच म्हणा ना.

आम्हाला पाचवीला का सहावीला आता आठवत नाही पण दिवाकरांची "बोलावणे आल्याशिवाय नाही" ही नाट्यछटा होती.

वर जर ओळीमध्ये जागा असती तर वाचायला आणि कळायला सोप्पी जाईल. त्यांच्या नाट्यछटा बहुतेकदा एक पात्री प्रयोगात वापरायचे वार्षिक सोहळ्यात.
भेंडीरमण आणि बटाटेनंदन. Rofl

मीतर वाचणंच कमी केलंय नवीन वर्षात.
जगायचही कमी कर ना. ऊगा ईथ तिथ पिंका टाकत जगण्याला जगनं म्हणत नाही. नवऱ्यालाही बारीकसारीक बाबीवर हेंबाडते का गपगुमान राह्यते

माझें मोठें भाग्य, यांत कांहीं शंका नाहीं ! नाहींतर, आपल्यासारख्या थोर लोकांची कोठून गांठ पडायला !

- अहो कशाचे, कशाचे ! आम्ही कसले कवि ! कोठें एका कोपर्‍यांत लोळत पडलों आहोंत झालें ! नाहीं खरेंच ! परवांची आपली कविता फारच बहारीची होती बोवा ! फारच छान ! एक्सलंट ! अहो आधीं नांव पाहूनच थक्क झालों ! ' माझें आंबट अजीर्ण ! ' वा ! किती सुंदर !

- नाहीं, तें आलें लक्षांत. आहे कविता एकंदर आत्म्यालाच उद्देशून ! पण त्यांतल्या त्यांत या दोन ओळी तर मला फारच आवडल्या ! काय पहा ! - हां बरोबर, - ' अजीर्णामुळें ! जीव कळवळे ! ॥' काय बहार आहे यांत ! शब्द सोपे असून किती खोल, गंभीर अर्थ !

- काय म्हणतां ! इतका खोल अर्थ आहे का ? शाबास ! ' प्रेमभंगामुळें हदय पिळवटून डोळ्यांतून खळखळा वाहिलेल्या अश्रूंचें अजीर्ण ! ' क्च ! काय विलक्षण मिस्टिक कविता आहे हो ! टेरिबल ! फारच प्रतिमा अफाट !

माझें समजा हो !

- कोणती ? - कोणती बरें माझी कविता आपल्याला अतिशय आवडली ?

हां, हां ! ती होय ? गेल्या मस्तकमंजनांतील चहादाणीवरील ! अस्सें !

- हो, ती सुद्धां आहे आत्म्यालाच धरुन !

- बरें आतां रस्त्यांत नको - केव्हां ? उद्यां सकाळी येऊं आपल्या घरीं ? - ठीक आहे - हं :

(स्वगत) ' अहो रुपम् अहो ध्वनिः ' चाललें आहे जगांत ! म्हणे ' आपली चहादाणीवरील कविता अतिशय आवडली ! ' हः हः कमाल आहे बोवा या लोकांची ! इतकी भिकार कविता कीं, मला स्वतःलासुद्धां आवडत नाहीं ! माझी चहादाणी ! साखरपाणी ॥ अधण येई सळसळा ! अश्रू येती घळघळा ॥ हः हः यंवरे कविता ! पण चाललें आहे कीं नाहीं ! भेंडीरमणानें उठावें, बटाटेनंदनाची स्तुति करावी ! बटाटेनंदनानें पुढें यावें, भेंडीरमणाची वाहवा करावी ! मनांत परस्परांना त्यांची कविता मुळींच आवडत नसते ! पण जगांत यानें त्याला शेली म्हणावें, उलट त्यानें याला कीट्स म्हणावें ! चालला आहे सपाटा ! बरें असें केल्याशिवाय जगांत भागत नाहीं ! अहो नाहीं तर, आपली खरीं मतें सांगून जगांत तंटेच करायचे - वैरीच निर्माण करायचे कीं नाही ? रिकामा जिवाला ताप ! जाऊं द्या !