जवळ जवळ २४ वर्षांपूर्वी अमेरीकेत आल्या आल्या पहिल्यांदा नवा पदार्थ चाखला तो म्हणजे नवर्याने टोस्टरमधे गरम केलेला एगोचा वाफल आणि त्यावर ओतलेला मधाच्या रंगाचा पाक. बेताच्या गोडीचा हा पाक मला फारच आवडला. त्या पाकाला मेपल सिरप म्हणतात आणि तो मेपल नावाच्या झाडापासून मिळतो अशी ज्ञानात भरही पडली. त्यानंतर मधला काही काळ फ्रोजन वाफल्सची जागा घरच्या देशी खाण्याने घेतली आणि मेपल सिरपही मागे पडले. पुन्हा वाफल्स, पॅनकेक वगैरे प्रकार आमच्या घरात आले ते लेक शाळेत जावू लागल्यावर. शाळेत मार्केट डे म्हणून फंडरेझरचा प्रकार असे. दर महिन्याला तयार खायच्या पदार्थांची यादी यायची. त्यातून पदार्थ सिलेक्ट करुन ऑर्डर दिली की ठरलेल्या दिवशी शाळेत खाऊचा खोका मिळायचा. आम्ही पण पिटूकले पॅन केक आणि वाफल स्टिक्स ऑर्डर केले. त्या सोबत पिटूकल्या ड्ब्यांतून सिरपही आले. लेक मिटक्या मारत खायचा. एक दिवस मी देखील त्यातलाच खाऊ खाल्ला तर सिरप एकदम गोड मिट्ट! खोक्यावरची माहिती वाचल्यावर कळले की हे नुसतेच पॅनकेक सिरप आहे मेपल सिरप नाही. गावातल्या दुकानातही पॅनकेक सिरपच होते. झाले! खरे मेपल सिरप कुठे मिळेल याचा शोध सुरु झाला. नवर्याने स्थानिक मित्राला विचारले तर तो म्हणाला आता नाही मिळणार, सिझन सुरु होईल तेव्हा मिळेल. वाट बघता बघता एकदाचा मार्च उजाडला आणि आम्हाला मिळालेल्या पत्त्यानुसार दीड-दोन तास ड्राईव करुन जाऊन मेपल सिरप फेस्टिवलला गेलो. तिथे मेपल सिरप फार्मर्सच्या रानात फिरुन , ते कसे तयार होते ते बघून, गॅलनभर सिरप घेवून आम्ही परतलो. लेकाला ती भटकंती खुपच आवडली. पुढे मध, मेपल सिरप या गोष्टी थेट शेतकर्यांकडून स्टेटफेअर मधे विकत मिळतात हे कळल्यावर वर्षाची खरेदी स्टेटफेअरमधेच होवू लागली आणि इतर व्याप वाढल्याने मार्चमधे फेस्टीवलला जाणे आपोआपच मागे पडले.
दोनवर्षांपुर्वी मात्र अचानक मेपल सिरप फेस्टिवलचा योग जुळून आला. या विकेंडला काय करायचे, जवळपास काय इवेंट आहेत म्हणून जालावर शोधताना शेजारच्या स्टेटमधल्या फेस्टिवलची माहिती मिळाली. सव्वातासाची ड्राईव होती आणि रस्ताही ओळखीचा होता तेव्हा शनिवारी लगेच फोन करुन माहिती घेतली आणि रविवारी शेजारच्या ओहायो राज्यातील ह्युस्टनदवुड स्टेट पार्कला जायचे पक्के केले. दुपारी साधारण एकच्या सुमारास पार्कमधे पोहोचलो. मेपल सिरप फेस्टिवलसाठीचे राखीव पार्किंग कुठे आहे ते दर्शवणार्या पाट्यांचा मागोवा घेत योग्य ठिकाणी गाडी पार्क केली. समोर शांत अॅक्टन लेक आणि सभोवताली पानगळ झालेले रान! एका बाजूला खाद्य पदार्थ विकत घ्यायची सोय होती आणि हवेतील गारव्यावर उपाय म्हणून दुसर्या बाजूला चक्क शेकोटी! पार्कच्या ट्र्कबेडसमधे पेंढ्याची बैठक असलेल्या राईड्स - हे राईड्स आम्हाला रानात घेवून जाणार होत्या. त्यासाठी रांगेत उभे राहिल्यावर १५ मिनिटात आमचा नंबर लागला. रानातल्या रेंजरच्या ताब्यात आमच्या ग्रूपला देवून राईड दुसरा ग्रूप आणायला गेली आणि आम्ही रेंजर सोबत ट्रेलवरून माहिती ऐकत चालायला सुरुवात केली.
मेपल सिरप हे शुगर मेपल, रेड मेपल आणि ब्लॅक मेपलच्या सॅप पासून बनवतात. थंड प्रदेशात वाढणारी ही मेपलची झाडे हिवाळ्यात टिकून रहाण्यासाठी हिवाळा सुरु होण्याआधी आपल्या मूळांमधे पिष्टमय पदार्थ(स्टार्च) साठवतात. या स्टार्चचे रुपांतर नंतर साखरेत होते. हे साखर असलेले पाणी म्हणजेच सॅप ही झाडाच्या xylem system मधून वर सरकते. खोडातून वर सरकत झाडांच्या फांद्यांच्या टोकातून खाली ठिबकू लागते. झाडाच्या खोडाला भोक पाडून ही सॅप गोळा करता येते. उत्तर अमेरीका खंडात रहाणारे मुळचे रहीवासी हे मेपलच्या झाडाची सॅप गोळाकरुन ती लाकडी भांड्यात साठवत असत. खालच्या चित्रात लाकडी खोदलेले ट्रे टाईप जे आहे तशा भांड्याचा उपयोग करत.
ही सॅप म्हणजे गोडसर पाणीच असे. त्यातील पाण्याचा अंश कमी करण्यासाठी ही सॅप आटवणे आवश्यक होते. मात्र या लोकांकडे धातूची भांडी नव्हती. त्यामुळे विस्तव पेटवून त्यात दगड गरम करुन ते गरम दगड सॅप असलेल्या लाकडी भांड्यात टाकत आणि पाण्याला उकळी आणत. मात्र या प्रकारे आटवलेली सॅप ही सिरप इतकी गोडही नसे आणि घट्टही नसे. खालच्या चित्रावरुन अंदाज येइल.
पुढे युरोपियन लोकं आले, त्यांच्यासोबत धातूची भांडी आली. मेपलची गोड सॅप गोळा करुन धातुच्या भांड्यात आटवणे सुरु झाले.
उघड्यावर मोठ्या भांड्यात सॅप आटवणे
हळू हळू तंत्र विकसित होत बॅरल स्टोवचा वापर होवू लागला.
बॅरल स्टोवच्या वरचा ट्रे
आजकाल मोठ्या प्रमाणात सॅप आटवायचे काम शुगर शॅकमधे करतात.
शुगर शॅकमधे
सॅपमधील पाण्याच्या अंश आणि साखरेचे प्रमाण यानुसार साधारण ४० गॅलन सॅप पासून १ गॅलन मेपल सिरप तयार होते. पूर्वी सॅप लाकडी बॅरलमधे गोळा करत, मग धातूच्या बादल्या आल्या आणि आता बरेच जण प्लॅस्टिकच्या बॅग्जही वापरतात.
टॅप केलेले झाड - लाकडी बॅरल आनि धातूच्या बादल्या
ओहायो स्टेटमधे शुगरमेपल जास्त प्रमाणात आहेत. शुगर मेपलच्या सॅपमधे साखरेचे प्रमाणही जास्त असते. सॅप गोळा करायला टॅप करायचे झाड साधारणतः ३० पेक्षा जास्त वयाचे असते. सॅप गोळा करायचा एक विशिष्ठ अवधी असतो. रात्रीचे तापमान गोठवणारे हवे आणि दिवसाचे तापमान त्यामानाने उबदार हवे. असे असताना दिवसा सॅप वाहू लागते आनि रात्री हे वाहणे थांबून नव्याने सॅप खोडापर्यंत येवून थांबते. त्यामुळे साधारण हिवाळ्याच्या शेवटच्या ट्प्प्यात, फेब्रुवरीचा शेवट ते मार्च या काळ हा शुगरिंग सिझन असतो. त्यानंतर झाडावर कळ्या येऊ लागल्या की सॅप मधे रासायनिक बदल घडून येतो आणि सॅपची चव बदलते. त्यामुळे ४-६ आठवड्याचा शुगरिंग सिझन असतो. टॅप करायला झाडाला जिथे भोक पाडलेले असते तो भाग झाड स्वतःच दुरुस्त करुन पुन्हा पुढल्या वर्षासाठी अन्न साठवायला तयार होते.
मेपल सिरप ही कॅनडा आणि अमेरीकेच्या उत्तर-पूर्व भागाची खासीयत. इथल्या मूळ रहिवाश्यांनी गोडाची गरज भागवायला गोळा केलेली सॅप ते मिलियन्स ऑफ डॉलरचा कॅनडाचा मेपल सिरप एक्स्पोर्ट असा हा प्रवास. मेपल सिरप बनवणारी आमची सहावी पिढी, आठवी पिढी असे अभिमानाने सांगणारे शेतकरी बघितले की कौतुक वाटते. त्यांनी राखलेले रान आणि जपलेली परंपरा दोन्ही कौतुकास्पद.
छान माहिती. आता मेपल सिरप
छान माहिती. आता मेपल सिरप घेताना हा धागा आठवेल
लेख आवडला.
लेख आवडला.
> पुढे युरोपियन लोकं आले, त्यांच्यासोबत धातूची भांडी आली. > धातूच्या भांड्यांच्या मोबदल्यात जमिनी घ्यायचे म्हणे मुलनिवासींकडून. ते आदिवासी टाईप असल्याने त्यांच्यात जमिनीची मालकी ही संकल्पना नव्हती - हे आऊटलँडरमधुन मिळालेलं ग्यान!
> मेपल सिरप बनवणारी आमची सहावी पिढी, आठवी पिढी असे अभिमानाने सांगणारे शेतकरी बघितले की कौतुक वाटते. त्यांनी राखलेले रान आणि जपलेली परंपरा दोन्ही कौतुकास्पद. > हे कोण असतात युरोपियनच का?
माहितीपूर्ण लेख .
माहितीपूर्ण लेख .
मेपल सिरपच्या उत्पादनात प्रचंड आर्थिक हितसंबंध आहेत . नेटफ्लिक्सवर Dirty Money नावाची सिरीज आहे , त्यात या विषयाचा सविस्तर उहापोह केलाय .जरूर पाहा
मस्त माहिती ..
मस्त माहिती ..
फोटो पण मस्त . ४० गॅलन सॅप पासून १ गॅलन मेपल सिरप तयार होते>> अरे बापरे बरंचस पाणी च असतं असं दिसतंय सॅप मध्ये !!
खूप वर्षांपूर्वी बहिणीच्या नवऱ्याने मेपल सिरप वापरून किंवा (मेपल चा काहीतरी वापरून ) केलेली चॉकलेट्स आणली होती ... मस्त लागली होती चव !
अवांतर : फोटो आणि टॅपिंग शब्द ऐकून रबराच्या झाडांचा चीक गोळा करण्याची प्रोसेस आठवली .. थोड्याफार फरकाने अगदी असाच चीक साठवतात रबराचा
हे कोण असतात युरोपियनच का?>>
हे कोण असतात युरोपियनच का?>> होय, जवळपास.
छान लेख. इथे मेपल सिरप कुकीज
छान लेख. इथे मेपल सिरप कुकीज आणि चॉकोलेट म्हणजे राष्ट्रीय खाद्य आहे
बाकी मेपल म्हंटल की बारा महिने उडणारी 'मोहोब्बते' मधली पानं आठवतात
मस्त माहिती
मस्त माहिती
मेपल सिरप फक्त फ्रेंड्स च्या चॅनडलर रॉस फुकटे हॉटेल वाल्या भागात बघून आणि वाचून माहीत आहे.मस्त लागत असेल
काढायची पद्धत वाचून आपली नीरा आणि ताडी आठवली.ताडीचा गूळ==मेपल सिरप असे काहीसे दुरून कम्पेअर करता येईल.
Mast lekh ani mahiti.
Mast lekh ani mahiti.
मस्त माहिती. माझा एक मित्र
मस्त माहिती. माझा एक मित्र अमेरिकेतून येताना मेपल सिरप फ्लेवर असलेले एक सिरप घेऊन आला. ते घरात सगळ्यांना खूप आवडले. फ्लेवर्ड सिरप इतके छान तर खरे मेपल सिरप मस्तच लागणार या आशेने पुढच्या वेळेस त्याला मेपल सिरपच आण म्हणून सांगितले. मस्त लागते चवीला. लेक अशीच खायची. मी ग्रानोला मध्ये वापरले.
उत्तराखंडात जंगलात व शहरात मेपलची खूप झाडे आहेत पण ती सॅपवाली नसावीत.
मस्त लेख.
मस्त लेख.
मला ही अनु सारखी नीरा ,ताडी च आठवली.☺
मला ही हे खूप आवडतं पॅन केक वर घालून खायला.
सर्व वाचकांचे आणि
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.
हे कोण असतात युरोपियनच का?>>हो.
>> नेटफ्लिक्सवर Dirty Money नावाची सिरीज आहे , त्यात या विषयाचा सविस्तर उहापोह केलाय .जरूर पाहा>> धन्यवाद जाई. नक्की बघेन.
साधना,
सॅप तयार होणे हे तापमानावर अवलंबून असते, तसेच त्यातली साखरही तापमानावर अवलंबून असते. ४० अंश फॅ. च्या खाली तापमान गेले की झाडाच्या xylem पेशीत अतिरिक्त पिष्ट्मय पदार्थ साठवणे सुरु होते. हे तापमान ४० अॅशाच्या खाली राहाते तोपर्यंतच ही साठवणूक होते. एकदा का हे तपमान ४० अंश फॅ. च्यावर गेले की एनझाईम सक्रिय होवून पिष्टमय पदार्थाचे साखरेत रुपांतर सुरु होते, मात्र हे तपमान ४५ अंशाच्या पुढे गेले की हे साखर तयार करणे थांबते. साहाजिकच सॅपमधे साखरेचे प्रमाण कमी होते आणि सिरप करायला फारसा उपयोग होत नाही. चांगल्या प्रतीच्या सॅपसाठी दिवसाचे तापमान ४० अंशाच्या आसपास आणि रात्रीचे तापमान गोठणबिंदूच्या खाली असे उत्तम धरले जाते. उत्तराचलातील मेपलवर तिथल्या तापमानाचा परीणाम होवून सिरपसाठी उपयोगी सॅप तयार न होणे होत असावे का?
इथे हल्ली ब्लॅक वालनट ची झाडे टॅप करुन वालनट सिरप तयार करणे देखील वाढत आहे.
मस्त माहिती तुमच्या मुळे आज
मस्त माहिती तुमच्या मुळे आज नवीन माहिती मिळाली. फूड टेक या टी. व्ही. वरील कार्यक्रमाची आठवण झाली
लेख आवडला.
लेख आवडला.
वा ! छान माहिती व चित्रे.
वा ! छान माहिती व चित्रे.
हे सिरप मी चाखलेले नाही पण ते मला माझ्या अभ्यासात नेहमी भेटते !
कसे ते सांगतो.
‘मेपल सिरप युरीन डिसीज’ नावाचा एका जन्मजात गंभीर जनुकीय आजार आहे. यात संबंधित बालकाच्या लघवीला या सिरपचा मधुर वास येतो. म्हणून या आजाराचे ते नाव.
जेव्हा केव्हा मी हा आजार पुस्तकात वाचतो तेव्हा दर वेळी या सिरपची उत्सुकता वाटते. आज तुमच्या लेखाने ते कळाले.
छान माहितीपर लेख.
छान माहितीपर लेख.
मस्त. माझ्या पहिल्या
मस्त. माझ्या पहिल्या अमेरिकावारीवरून परत येताना सामानात 2 मेपल सिरपचे कँन्स होते. ते घरगुती पँनकेक्स वर घालून लेकीला देत असे.
मस्त माहिती! मेपल सिरप खूप
मस्त माहिती! मेपल सिरप खूप आवडतं. अति गोड नाही आणि घट्टही नाही.
छान माहिती. मेपल सिरप एक
छान माहिती. मेपल सिरप एक-दोनदा चाखलं आहे. माफक गोड असल्यामुळे आवडलं होतं. त्याचा तो खास स्वादही लक्षात आहे.
पराग, मेपल आणि मुहब्बतें
हम्म.
हम्म.
आणि जेव्हा मोठ्या प्रमाणात व्यावसायिक कारणासाठी या झाडांची लागवड करण्यास सुरवात झाली तेव्हा जंगल साफ करणे, जमीन तयार करणे, सॅप काढायचे-आटवायचे काम वगैरे यासाठी आफ्रिकेतून आणलेल्या गुलामांचा वापर झाला का?
https://www.vice.com/en_us
https://www.vice.com/en_us/article/qvnyvv/maple-syrup-politics
ॲमी, मला गुगल वर हा लेख सापडला. तुमच्या प्रश्नाचे उत्तर नाहीये हे पण एक वेगळा पैलू आहे.
मात्र बऱ्याचशा लेखांवर तुमचे प्रश्न हे इतके कोणत्या ना कोणत्या भेदाच्या अनुषंगाने जाणारे असतात. भले त्या लेखाचा तो विषय असो की नसो. हे माझे निरीक्षण आहे. हे असे सुटे प्रश्न उपस्थित करून चांगल्या लेखाचा रसभंग होण्याखेरीज काय साध्य होते हे मला माहीत नाही. Such comments add no value but rather digress the topic. Had you added a few new facts regarding how maple sugar industry thrived on slavery or how it thrived as white people business it would have added some value to the thread.
जि ,अनुमोदन 100 टक्के पटलं
जि ,अनुमोदन 100 टक्के पटलं
आता ह्या वरून चांगला धागा भरकटला नाही म्हणजे मिळवली.
जिज्ञासा +१
जिज्ञासा +१
या लेखात मेपल सिरप
या लेखात वैयक्तिक अनुभव, विज्ञान आणि मेपल सिरप इंडस्ट्रीचा इतिहास हे तिन्ही भाग आहेत ना?
मग इतिहासबद्दल प्रश्न विचारले तर
> भले त्या लेखाचा तो विषय असो की नसो.
चांगल्या लेखाचा रसभंग होण्याखेरीज काय साध्य होते.
Such comments add no value but rather digress the topic. > हे कशावरून लिहलंय?
> Had you added a few new facts regarding how maple sugar industry thrived on slavery or how it thrived as white people business it would have added some value to the thread. > मला माहीत नाहीय म्हणून स्वाती२ ना प्रश्न विचारला की त्या भेटीत, टूरमध्ये याचा काही उल्लेख झाला का किंवा कोणी प्रश्न विचारला का?
जिज्ञासा +१
जिज्ञासा +१
जिज्ञासा +१
Double post
अॅमी,
अॅमी,
ऊसापासून साखर यात गुलामीचा वापर केला गेला. कॅरिबीअन असो की लुझिआना ऊसाची शेतीच ही गुलामीवर आधारीत होती. अतिशय कष्टाचे , भरपूर मनुष्यबळ लागणारे असे ऊस, कापूस शेतीचे काम होते. मेपल पासून सिरप आणि साखर हे काम करण्यासाठी गुलामांची गरज नव्हती. वेस्ट इंडीजमधली साखर वापरुन गुलामी जोपासू नका, स्वतः कष्ट करा आणि मेपल साखर तयार करा असे सांगितले गेले. क्वेकर्स( तेच ते राजालाही कर्ज देणारे) तर पहिल्यापासून गुलामीच्या विरोधातच होते पण स्वतः गुलाम ठेवणारे थॉमस जेफरसन वगैरे मंडळी देखील वेस्ट इंडीज मधील ब्रिटीश साखर उत्पादकांना चाप बसावा म्हणून अमेरीकेची आपली स्वतःचीच मेपल शुगर या विचाराने यासाठी प्रयत्नशील झाली. साहाजिकच मेपल शुगर ही गोर्या स्वतंत्र लोकांनी बनवलेली, नैतिक दृष्ट्या उच्च आणि ऊसाची साखर ही गुलामांच्या कष्टावर असे एक प्रकारे काहीसे सिंप्लिफिकेशनही झाले. मात्र ज्या मूळ रहिवाश्यांनी हे तंत्र गोर्या वसाहत करणार्यांना शिकवले त्यांनाच बेघर केले गेले हे विसरुन चालणार नाही.
अवांतर - न्यू ओरलिन्सला भेट देण्याचा योग आल्यास ऊसाची, कापसाची शेती, साखर , कॉटन, आणि गुलामी याबद्द्ल जाणून घेण्यासाठीविटनी प्लांटेशन या म्युझियमला जरुर भेट द्या. हादरुन जायला होते. गुलामीचा फायदा फक्त साऊथला झाला, उत्तर भागाने त्याचे काहीच फायदे मिळवले नाहीत वगैरे माझे चुकीचे समज गळून पडले.
मला माहीत नाहीय म्हणून
मला माहीत नाहीय म्हणून स्वाती२ ना प्रश्न विचारला की त्या भेटीत, टूरमध्ये याचा काही उल्लेख झाला का किंवा कोणी प्रश्न विचारला का? >>ॲमी, असा प्रश्न असता तर कदाचित असं वाटलं नसतं पण तुमचा प्रश्न थोडा क्रिप्टीक होता आणि त्यातून मला जे प्रतित झाले ते मी लिहिले. तुम्हाला असे अभिप्रेत नसेल तर उत्तमच आहे.
अॅमी,
अॅमी,
रानातली झाडे जंगल स्वास्थ्यासाठी 'कल' केली जातात पण इथे जेव्हा वसाहत करायला लोकं आली तेव्हा जंगले ही होतीच. तसेही ही इथली मूळची झाडे त्यामुळे लागवड काही कठीण नाही. याचा शुगरिंग सिझनही शेतीची कामे सुरु करण्याआधी असतो. स्वतःपुरते उत्पादन करुन बाकीचे विकायला असे करुन भागत असे. आजही भागते. माझ्या मैत्रीणीची परंपरेने चालत आलेली शेती आहे. घरच्या कोंबड्या, अंडी , गोट चिझ तसे घरचे मेपल सिरप. आपल्याकडे कोकणात घरच्यांना पुरुन थोडे विकायला जशी थोडी भात शेती, एक-दोन गाई म्हशी, चार आंबा फणसाची झाडे असे असते तसेच हे. इथे १०० बॅक वालनट लावतोय, ५० पिच, ५० अॅपल असे आजही सर्रास बोलले जाते. १ एकराची घरगुती फळबाग बाहेरच्या कामगारांशिवाय सहज करतात.
उत्तर आवडले स्वाती.
उत्तर आवडले स्वाती.
> मात्र ज्या मूळ रहिवाश्यांनी हे तंत्र गोर्या वसाहत करणार्यांना शिकवले त्यांनाच बेघर केले गेले हे विसरुन चालणार नाही. > हो तेच!
मेपल सिरप बनवणारी आमची सहावी आठवी पिढी सांगणारे हे वर्तमानकाळातले युरोपियन. मूलनिवासी, त्यांची पद्धत वगैरे सगळे ते तुम्हाला सांगत होते. म्हणजे त्यांनी हे वरचे सत्य मान्य केले असावे किंवा त्याबद्दलचे प्रश्न आले तर त्यांना उत्तर द्यायला तयार असावेत.
तसेच गुलमगिरीबद्दल बोलायला ते तयार होते का? त्याचा काही उल्लेख माहिती सांगताना केला का हे विचारायचे होते. > साहाजिकच मेपल शुगर ही गोर्या स्वतंत्र लोकांनी बनवलेली, नैतिक दृष्ट्या उच्च आणि ऊसाची साखर ही गुलामांच्या कष्टावर असे एक प्रकारे काहीसे सिंप्लिफिकेशनही झाले. > हे सांगत होते का ते?
एनिवे मलातरी ही नवीनच माहिती कळाली.
===
> अवांतर - न्यू ओरलिन्सला भेट देण्याचा योग आल्यास ऊसाची, कापसाची शेती, साखर , कॉटन, आणि गुलामी याबद्द्ल जाणून घेण्यासाठीविटनी प्लांटेशन या म्युझियमला जरुर भेट द्या. हादरुन जायला होते. गुलामीचा फायदा फक्त साऊथला झाला, उत्तर भागाने त्याचे काहीच फायदे मिळवले नाहीत वगैरे माझे चुकीचे समज गळून पडले. > लिंक वाचते. पण जमलं तर यावरदेखील वेगळा लेख येऊदे.
===
अवांतर-
जिज्ञासा,
मी जेवढी स्वतःला जाणते त्यानुसार दिवसभरात माझे जास्तीतजास्त ४-५ प्रतिसाद असतात. १० म्हणजे डोक्यावरून पाणी. त्यातले बरेच छान-आवडलं असेच असतात एखाद-दुसरा ऋण असतो. तरीही तुला (आणि इतर +१ करणार्यांना) 'बऱ्याचशा लेखांवर' माझे प्रश्न हे 'irrelevant, चांगल्या लेखाचा रसभंग करणारे, add no value but rather digress the topic' वगैरे वाटत असतील तर ते त्या त्या वेळी तिथेच पॉईंट आउट केले तर मला स्वपरिक्षणाला मदत होईल.
> Submitted by स्वाती२ on 6
> Submitted by स्वाती२ on 6 March, 2020 - 17:38 > हम स्मॉलस्केल बिझनेस आहे म्हणजे हा. मिलियन्स ऑफ डॉलरस् वरून मला वाटलं मोठी व्यवसायिक लागवड होते.
परत एकदा आभार डिटेल उत्तर दिल्याबद्दल
Pages