नमस्कार,
घरी नवी पाहुणी आली आहे. तिच्या बारश्याची तयारी चालली आहे. माझं जसं सेल्फीविहीन, नॉनप्लास्टिक, घरातल्या एका ऊबदार खोलीत बारसं झालं तसंच माझ्या लेकीचं व्हावं ही इच्छा आहे. माझ्या बारशाला राम कृष्णांचे, विठ्ठलाचे, आणि एका लिंगायत आज्जीकडून बसवेश्वरांचेसुद्धा पारंपारिक पाळणे गायले गेले.
लेकीसाठी मात्र मला स्त्रियांवरचे पाळणे हवे आहेत. इतरत्र तसा शोध घेतला तर काहीच हाती लागले नाही. मुळात कोणत्या स्त्रियांचे पाळणे अस्तित्त्वात आहेत तेच कळत नाही. पंचकन्यांचे पाळणे आहेत का? नेटवर जिजाऊंचा पाळणा मिळाला. तोही मालिकेतला असल्याने त्याला तसलीच (झी-मराठीछाप) सुमार कळा आहे.
१. कोणत्या भारतीय स्त्रियांवर पाळणे रचायला हवेत/ रचले गेले आहेत? ( मला सीता, द्रौपदी या भारतीय कथांच्या नायिका, मुक्ताई, राणी लक्ष्मीबाई(?), जिजाऊ, सावित्रीबाई इतक्या स्त्रिया पटकन आठवतात)
२. यांच्यावर कुणी पारंपारिक पाळणे लिहिले आहेत काय?
३. मायबोलीवरच्या कवी/कवयित्री मला नवीन पाळणे लिहून देतील का? ( पाळणे पारंपारिक मीटर्समध्ये गाता यावेत. उदाहरणार्थ हा रामाचा पारंपारिक पाळणा पाहा -
पहिल्या दिवसी बोलली गंगा,
राखा(?) बायांनो ....... दंगा,
दसरथ राजाला जाऊनी सांगा,
गुढ्या उभारा पाचिया रंगा,
जो बाळा जो जो रे जो...
दुसऱ्या दिवसी बोलली भागा,
निरंकाराचे ....................झगा/जागा(?)
उठा बायांनो चरणासि लागा,
दान चुड्याचे रामाला मागा,
जो बाळा जो जो रे जो...
याव्यतिरिक्त राम कृष्णांचे रामदासांनी लिहलेले पाळणे आहेत. मात्र ते मात्रांत/वृत्तात इतके ठासून भरलेले आहेत की त्यातली सगळी गेयता अतिशय कृत्रिम आणि नीरस होऊन जाते. म्हणून मला ते अजिबात आवडले नाहीत. त्यापेक्षा वरील पारंपारिक पाळणा खूप साधा सरळ आणि सुंदर आहे.
तर अशाच पद्धतीचे वरील स्त्रियांचे पाळणे कुणी रचतील का?)
[ संपादन १]
माझी भूमिका मी परत स्पष्ट करतो -
मला पाळणे का आवडतात ?
पाळणा म्हणजे भारतीय मिथकांच्या, त्यांतील सर्वात महत्त्वाच्या पात्रांच्या आयुष्याचा एक छोटासा ट्रेलर असतो. त्यांची स्मृती पुढच्या पिढीकडे संक्रमित करण्याची मी मौखिक पद्धत मला आवडते. आरती पेक्षा पाळणे हे जास्त मानवी असतात.
बाराव्या दिवशी नाव ठेवण्यापूर्वी बारा दिवसांची डायरी अशा प्रकारचे पाळण्यांची रचना असते. तीही मला आवडते. पाळण्यांच्या चाली गोड असतात. त्यांच्यात अंगाईचं माधुर्यही असतं आणि सामूहिक गाण्याच्या जागाही असतात. आरतीचा कंठाळीपणा नसतो.
स्त्रियाच का?
माझा समजानुसार पाळण्यामागची भावना "बाळाचा आदर्श प्रोटोटाईप" ठरविणे असतो. मोठं होऊन बाळ असंच युगप्रवर्तक इत्यादी व्हावं अशी मनीषा असते. मुलीसाठी असे प्रोटोटाईप भारतीय समाजात असताना त्यांचे पाळणे पूर्वी रचले गेले आहेत का हे विचारण्यामागे हाच समज आहे.
सीता असो की दुर्गा, पार्वती, सरस्वती, लक्ष्मी या देवतांचे पाळणे आहेत का ते विचारायचं होतं.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/62450
हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा
हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा
पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा
हे बघा चालतय का तुम्हाला
हे बघा चालतय का तुम्हाला
त्याचे अन्तरे टिपिकल असतात
त्याचे अन्तरे टिपिकल असतात
पहिल्याच दिवशी पहिला प्रकार
बाळाने घेतला *** अवतार
नाचून नाचून बाळ हासते
जो बाळा जो जो रे जो
हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा
हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा
पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा>>> स्पिचलेस.
बोकलत,
बोकलत,
मला पाळणे का आवडतात ?
मला पाळणे का आवडतात ?
पाळणा म्हणजे भारतीय मिथकांच्या, त्यांतील सर्वात महत्त्वाच्या पात्रांच्या आयुष्याचा एक छोटासा ट्रेलर असतो. त्यांची स्मृती पुढच्या पिढीकडे संक्रमित करण्याची मी मौखिक पद्धत मला आवडते. आरती पेक्षा पाळणे हे जास्त मानवी असतात.
बाराव्या दिवशी नाव ठेवण्यापूर्वी बारा दिवसांची डायरी अशा प्रकारचे पाळण्यांची रचना असते. तीही मला आवडते. पाळण्यांच्या चाली गोड असतात. त्यांच्यात अंगाईचं माधुर्यही असतं आणि सामूहिक गाण्याच्या जागाही असतात. आरतीचा कंठाळीपणा नसतो
---- छान आणि वेगळा विचार.. खुप च आवडला.
आमच्या शेजारच्या कारटीला 'उठा
आमच्या शेजारच्या कारटीला 'उठा उठा चिऊताई, सारीकडे उजाडले' हे गाऊन दाखवले की झोप येत असे!
रॉयसाहेब खूप भाग्यवान आहात
रॉयसाहेब खूप भाग्यवान आहात तुम्ही .. घरी परी आली आहे त्यामुळे .... तुमचा जन्म सार्थकी लागलेला आहे कारण याच जन्मात तुम्ही कन्यादान करणार आहात. कन्यादानासारखे दुसरे पुण्य नाही .. विचार करा , तुम्ही स्वतःचा आत्मा दुसऱ्याला दान देणार आहात त्यावेळेस तुमच्या भावना कश्या असतील .. चिमुकलीला खूप साऱ्या शुभेच्छा .. मला काही ओली सुचतायत बघा आवडल्या तर
आली अर्धांगिनी लांघून माप
जणू पार्वती , या भोळ्याच्या घरी
खऱ्या अर्थाने सुरुवात झाली
झालो मी बाप अली ओ परी
जो बाळा जो जो रे जो
गोडगोजिरीं चिमणी इवली
हसत खेळत पाळणा तोली
तिच्या येण्याने आली गालावर लाली
सर्वत्र प्रेमाची पहाट झाली
चैतन्य देवी , मंजुळ गाई
जो बाळा जो जो रे जो
=============================
हे सर्व मला आताच सुचलेले हैत .. आवडले तर ठीक पण तुमच्या गॉड लेकीला अनंत शुभेच्छा द्या माझ्यातर्फे
>>>>>>आमच्या शेजारच्या
>>>>>>आमच्या शेजारच्या कारटीला 'उठा उठा चिऊताई, सारीकडे उजाडले' हे गाऊन दाखवले की झोप येत असे!
हाहाहा
>>>>आमच्या शेजारच्या कारटीला
>>>>आमच्या शेजारच्या कारटीला 'उठा उठा चिऊताई, सारीकडे उजाडले' हे गाऊन दाखवले की झोप येत असे!
हा हा हा
माझे बाळ
एका माकडाने टाकले दुकान ऐकत ऐकत झोपत असे..
पाळणा लिहिणे एक चॅलेंज आहे.
पाळणा लिहिणे एक चॅलेंज आहे.
जगदीश्वरबाला वृत्त येते शक्यतो पारंपरिक पाळण्यात.
त्यात रचना करणे आव्हानात्मक.
बघू जमते का?
मला दुसऱ्या कवींनी लिहिलेले पाळणे तोपर्यंत सापडतात का बघते.
पाळणा म्हणजे भारतीय
पाळणा म्हणजे भारतीय मिथकांच्या, त्यांतील सर्वात महत्त्वाच्या पात्रांच्या आयुष्याचा एक छोटासा ट्रेलर असतो. त्यांची स्मृती पुढच्या पिढीकडे संक्रमित करण्याची मी मौखिक पद्धत मला आवडते. आरती पेक्षा पाळणे हे जास्त मानवी असतात.
बाराव्या दिवशी नाव ठेवण्यापूर्वी बारा दिवसांची डायरी अशा प्रकारचे पाळण्यांची रचना असते. तीही मला आवडते. पाळण्यांच्या चाली गोड असतात. त्यांच्यात अंगाईचं माधुर्यही असतं आणि सामूहिक गाण्याच्या जागाही असतात. आरतीचा कंठाळीपणा नसतो. >>>>>> छान लिहिलं आहे.
असा कधी विचार केला नव्हता.
आमच्या शेजारच्या कारटीला 'उठा उठा चिऊताई, सारीकडे उजाडले' हे गाऊन दाखवले की झोप येत असे!>>>>>